3 उत्तरे
3 answers

प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?

8
     दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी इ.स.१८४८ साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली.पुढे परम्हांस सभा विसर्जित झाल्यानंतर तिच्याच काही सभासदांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. दादोबांचे बंधू डॉ. आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. ता संस्थेस मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर मिळाल्यामुळे त्याची प्रतिष्ठा वाढली.
   
          न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉ. रा. गो. भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचे कार्य पुढे चालवले. मूर्तिपूजेला विरोध, एकेश्वरवाद, कर्मकांडाला विरोध ही प्रार्थना समाजाची तत्त्वे होती. उपासना व प्रार्थनेवर त्यांचा भर होता. प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी अनाथालये, स्त्री शिक्षणसंस्था, कामगारांसाठी रात्रशाळा, दलितांसाठी संस्था सुरू केल्या. प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ' डिप्रेस्ड क्लासेस मिशन ' स्थापन करून त्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला.....
उत्तर लिहिले · 21/7/2020
कर्म · 13290
4
प्रार्थना समाज या संस्थेची स्थापना डॉ. आत्माराम पांडुरंग, दादोबा पांडुरंग व भास्कर पांडुरंग या तीन तर्खडकर बंधूंनी दिनांक ३१ मार्च, इ.स. १८६७ रोजी मुंबईत केली. 'सुबोध-पत्रिका' या नावाचे मुखपत्रही प्रार्थना समाजाने चालविले होते. पुण्यातही बुधवार पेठेत प्रार्थना समाजाची एक शाखा आहे. मुंबईतले प्रार्थना समाजाचे मुख्यालय गिरगावात वल्लभभाई पटेल रोड (जुने नाव सँडहर्स्ट रोड) आणि विठ्ठलभाई पटेल रोड यांनी बनलेल्या चौकाजवळ आहे.
उत्तर लिहिले · 6/1/2020
कर्म · 18160
0

प्रार्थना समाजाची स्थापना

प्रार्थना समाजाची स्थापना ३१ मार्च १८६७ रोजी मुंबई येथे झाली.

या संस्थेची स्थापना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉ. आत्माराम पांडुरंग आणि इतर समाजसुधारकांनी केली.

प्रार्थना समाजाचा उद्देश एकेश्वरवादाचा प्रसार करणे, मूर्तिपूजा आणि कर्मकांडाला विरोध करणे, तसेच सामाजिक सुधारणा करणे हा होता.

मुख्य संस्थापक सदस्य:

  • न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
  • डॉ. आत्माराम पांडुरंग
  • दादोबा पांडुरंग तर्खडकर
  • वामन आबाजी मोडक
  • भाऊ दाजी लाड

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2360

Related Questions

दामोदर धर्मानंद कोसंबी, रामायण शर्मा, कॉम्रेड शरद पाटिल, महात्मा फुले?
म. फुले यांचे चरित्र मिळवून वाचा?
महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन चरित्र?
महात्मा फुले जीवन परिचय?
गाडगे बाबा यांच्या कीर्तनाबद्दल माहिती?
छत्रपती शाहू महाराजांनी पहिले वस्तीगृह कोठे सुरू केले आणि ते कोणासाठी होते?
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर?