2 उत्तरे
2
answers
मुस्लिम तलाक़्क़बद्दल माहिती द्या?
3
Answer link
1. 'तत्काळ तिहेरी तलाक' आहे काय?
'तत्काळ तिहेरी तलाक' किंवा 'तलाक-उल-बिद्दत'ची इस्लामिक प्रथा नवऱ्याला तीन वेळा तलाक म्हणून लग्न संपवण्याची सवलत देते.
हा तलाक कोणत्याही प्रकारे कळवला जाऊ शकतो; तोंडी, टेक्स्ट मेसेजवर किंवा अगदी ई-मेल करूनही.
या प्रथेवर बंदी घालण्यासाठी अनेक महिलांनी सुप्रीम कोर्टाला अर्ज, विनंत्या पाठवल्यानंतर, ऑगस्ट महिन्यात कोर्टाने ही प्रथा घटनाबाह्य ठरवली.
भारतातल्या सुन्नी मुस्लिमांमध्ये तत्काळ तिहेरी तलाक देण्याची पद्धत रुढ आहे, असं असलं तरी सुन्नींमधले तीन पंथ ही प्रथा ग्राह्य मानत नाहीत. देवबंद- हा सुन्नी मुसलमानाचा चौथा पंथ एकमेव असा पंथ आहे जे ही प्रथा मानतात.
2. भारतातले सर्व मुस्लीम तिहेरी तलाकची प्रथा पाळतात का?
भारतातल्या मुसलमानांमध्ये 'तत्काळ तिहेरी तलाक'चं प्रमाण किती आहे, याबद्दल अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. यासंदर्भात एक ऑनलाईन सर्व्हे झाला. याचा सँपल साईज अगदी कमी होता.
पण या ऑनलाईन सर्व्हेनुसार मुस्लिमांपैकी केवळ 1 टक्का लोकांनी या प्रकारचा तलाक घेतला होता. एखाद्या मुस्लीम पुरुषाने तलाक द्यायचा ठरवला तर त्याला 'तलाक-उल-अहसान' म्हणतात. हा तलाकची प्रक्रिया तीन महिने चालते, या काळात त्या जोडप्याला आपले मतभेद दूर करून समेट घडवून आणण्याची संधी मिळू शकते.
3. कुराण कायद्याप्रमाणं तिहेरी तलाक कसा देतात?
मुस्लीम महिलेलाही तलाक घेण्याचा अधिकार आहे, त्याला 'खुला' असं म्हणतात.
पत्नीला तलाक हवा आहे पण पती तो देण्यास नकार देत असेल तर तिला काझीकडे जाऊन किंवा शरिया कोर्टात जाऊन घटस्फोट मिळवता येतो. अशा तलाकला फस्ख-ए-निकाह म्हणतात.
आपल्या लग्नाच्या करारात म्हणजेच निकाहनाम्यातही घटस्फोटाच्या अटी ठरवण्याचा अधिकार महिलेला असतो. याला तफविध-ए-तलाक असं म्हणतात, घटस्फोटाचे अधिकार पत्नीकडे हस्तांतरित करणं असा त्याचा अर्थ होतो.
4. तत्काळ तिहेरी तलाक विधेयकाबद्दल वाद का आहे?
मुस्लीम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयकाने 2017 (The Muslim Women Protection of Rights on Marriage Bill 2017) तत्काळ तिहेरी तलाक देणं गुन्हा ठरवला गेला आहे. तसा तलाक देणाऱ्या पुरुषाला तीन वर्षांपर्यंत कैद होऊ शकते.
या काळात तलाक दिलेल्या पत्नीला पतीने भत्ता देण्याचीही तरतूद या विधेयकात आहे.
काही मुस्लीम महिलांच्या गटांचं म्हणणं आहे की, या तरतुदींनी त्यांना फायदा होणार नाही, याउलट समान अधिकार देऊन आपलं लग्न शाबूत ठेवण्याची आणि प्रसंगी ते लग्न कसं मोडायचं हे ठरवण्याची त्यांना संधी मिळावी असं त्या म्हणतात.
कैद करून हा उद्देश साध्य होणार नाही आणि आपण तुरुंगात असल्याने भत्ता देऊ शकत नाही, असं म्हणण्याची पतीला संधी मिळेल आणि त्या महिलेला याची झळच बसेल असा युक्तिवाद त्या करतात.

0
Answer link
मी तुमच्या प्रश्नाची नोंद घेतली आहे. मुस्लिम धर्मातील 'तलाक' (तलाक) संदर्भात काही माहिती खालीलप्रमाणे:
तलाक म्हणजे काय:
तलाक हा अरबी शब्द आहे, ज्याचा अर्थ 'सोडणे' असा होतो. इस्लामिक कायद्यानुसार, हा शब्द विवाह रद्द करण्यासाठी वापरला जातो.
तलाकचे प्रकार:
- तलाक-ए-अहसान: हा तलाक़चा सर्वोत्तम प्रकार मानला जातो. यामध्ये, पती पत्नीला एकदा तलाक बोलतो आणि त्यानंतर तीन महिन्यांच्या 'इद्दत' कालावधीची वाट पाहतो. या काळात त्यांचे समेट होऊ शकते.
- तलाक-ए-हसन: यामध्ये, पती तीन महिन्यांच्या अंतराने तीन वेळा तलाक बोलतो. तिसऱ्या वेळेस तलाक बोलल्यानंतर विवाह पूर्णपणे संपुष्टात येतो.
- तलाक-ए-बिद्दत (तात्काळ तलाक): या प्रकारात, पती एकाच वेळी तीन वेळा तलाक बोलून विवाह संपुष्टात आणतो. हा प्रकार भारतात अवैध ठरवण्यात आला आहे.
भारतातील स्थिती:
- २०१७ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने 'तलाक-ए-बिद्दत' (तात्काळ तलाक) अवैध ठरवला. टाइम्स ऑफ इंडियामधील माहिती
- मुस्लिम महिला (विवाह संरक्षण) कायदा, २०१९ नुसार, तोंडी तलाक देणे हा गुन्हा आहे. पीआरएस इंडिया
इतर माहिती:
- तलाक घेण्यापूर्वी समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.
- तलाकनंतर पत्नीच्या हक्कांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.