Topic icon

मुस्लिम कायदा

1
होय. मुस्लिम लग्नासंबंधी स्वतंत्र कायदा आहे. यात मुस्लिम व्यक्ती एकाच वेळी घटस्फोट न घेता चार स्त्रियांशी लग्न करू शकते.
उत्तर लिहिले · 23/12/2020
कर्म · 283320
0

तीन तलाक (Triple Talaq) भारतात कोणत्याही विशिष्ट कलमांतर्गत हटवण्यात आलेला नाही. हा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाद्वारे आणि त्यानंतर बनवलेल्या कायद्याद्वारे हाताळला गेला आहे.

कायदेशीर प्रक्रिया:

  1. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय:
    • 2017 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने 'शायरा बानो वि. भारत सरकार' (Shayara Bano vs Union of India) खटल्यात तीन तलाक असंवैधानिक ठरवला.
    • न्यायालयाने या प्रथेला इस्लामिक शिकवणींच्या विरोधात तसेच महिलांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन असल्याचे म्हटले.
  2. मुस्लिम महिला (विवाह अधिकार संरक्षण) कायदा, 2019:
    • भारत सरकारने 2019 मध्ये मुस्लिम महिला (विवाह अधिकार संरक्षण) कायदा [Muslim Women (Protection of Rights on Marriage) Act, 2019] पास केला.
    • या कायद्यानुसार, तीन तलाक (तोंडी, लेखी किंवा इतर कोणत्याही माध्यमातून) देणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे.
    • तसेच, या कायद्यात तीन तलाक देणाऱ्या पुरुषाला तीन वर्षांपर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो.

म्हणून, तीन तलाक हटवण्यासाठी विशेष कलम नाही, परंतु सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि त्यानंतर बनवलेल्या कायद्यामुळे तीन तलाक देणे कायदेशीररित्या अवैध ठरवण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5160
3
1. 'तत्काळ तिहेरी तलाक' आहे काय?
'तत्काळ तिहेरी तलाक' किंवा 'तलाक-उल-बिद्दत'ची इस्लामिक प्रथा नवऱ्याला तीन वेळा तलाक म्हणून लग्न संपवण्याची सवलत देते.
हा तलाक कोणत्याही प्रकारे कळवला जाऊ शकतो; तोंडी, टेक्स्ट मेसेजवर किंवा अगदी ई-मेल करूनही.
या प्रथेवर बंदी घालण्यासाठी अनेक महिलांनी सुप्रीम कोर्टाला अर्ज, विनंत्या पाठवल्यानंतर, ऑगस्ट महिन्यात कोर्टाने ही प्रथा घटनाबाह्य ठरवली.
भारतातल्या सुन्नी मुस्लिमांमध्ये तत्काळ तिहेरी तलाक देण्याची पद्धत रुढ आहे, असं असलं तरी सुन्नींमधले तीन पंथ ही प्रथा ग्राह्य मानत नाहीत. देवबंद- हा सुन्नी मुसलमानाचा चौथा पंथ एकमेव असा पंथ आहे जे ही प्रथा मानतात.
2. भारतातले सर्व मुस्लीम तिहेरी तलाकची प्रथा पाळतात का?
भारतातल्या मुसलमानांमध्ये 'तत्काळ तिहेरी तलाक'चं प्रमाण किती आहे, याबद्दल अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. यासंदर्भात एक ऑनलाईन सर्व्हे झाला. याचा सँपल साईज अगदी कमी होता.
पण या ऑनलाईन सर्व्हेनुसार मुस्लिमांपैकी केवळ 1 टक्का लोकांनी या प्रकारचा तलाक घेतला होता. एखाद्या मुस्लीम पुरुषाने तलाक द्यायचा ठरवला तर त्याला 'तलाक-उल-अहसान' म्हणतात. हा तलाकची प्रक्रिया तीन महिने चालते, या काळात त्या जोडप्याला आपले मतभेद दूर करून समेट घडवून आणण्याची संधी मिळू शकते.
3. कुराण कायद्याप्रमाणं तिहेरी तलाक कसा देतात?
मुस्लीम महिलेलाही तलाक घेण्याचा अधिकार आहे, त्याला 'खुला' असं म्हणतात.
पत्नीला तलाक हवा आहे पण पती तो देण्यास नकार देत असेल तर तिला काझीकडे जाऊन किंवा शरिया कोर्टात जाऊन घटस्फोट मिळवता येतो. अशा तलाकला फस्ख-ए-निकाह म्हणतात.
आपल्या लग्नाच्या करारात म्हणजेच निकाहनाम्यातही घटस्फोटाच्या अटी ठरवण्याचा अधिकार महिलेला असतो. याला तफविध-ए-तलाक असं म्हणतात, घटस्फोटाचे अधिकार पत्नीकडे हस्तांतरित करणं असा त्याचा अर्थ होतो.

4. तत्काळ तिहेरी तलाक विधेयकाबद्दल वाद का आहे?
मुस्लीम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयकाने 2017 (The Muslim Women Protection of Rights on Marriage Bill 2017) तत्काळ तिहेरी तलाक देणं गुन्हा ठरवला गेला आहे. तसा तलाक देणाऱ्या पुरुषाला तीन वर्षांपर्यंत कैद होऊ शकते.
या काळात तलाक दिलेल्या पत्नीला पतीने भत्ता देण्याचीही तरतूद या विधेयकात आहे.
काही मुस्लीम महिलांच्या गटांचं म्हणणं आहे की, या तरतुदींनी त्यांना फायदा होणार नाही, याउलट समान अधिकार देऊन आपलं लग्न शाबूत ठेवण्याची आणि प्रसंगी ते लग्न कसं मोडायचं हे ठरवण्याची त्यांना संधी मिळावी असं त्या म्हणतात.
कैद करून हा उद्देश साध्य होणार नाही आणि आपण तुरुंगात असल्याने भत्ता देऊ शकत नाही, असं म्हणण्याची पतीला संधी मिळेल आणि त्या महिलेला याची झळच बसेल असा युक्तिवाद त्या करतात.


उत्तर लिहिले · 18/12/2019
कर्म · 19320
4
तीन तलाक म्हणजे एक श्वासात तीनदा तलाक,तलाक,तलाक हा शब्द उच्चारला की पुरुषाला स्त्रीपासून घटस्फोट मिळतो.
निकाह म्हणजे लग्न विधी. इस्लाममध्ये लग्न हा एक करार मानला जातो. त्यामुळे निकाह म्हणजे एक करार होय.यामध्ये स्त्री आणि पुरुषाला निकाह कबुल आहे का हे तीनदा विचारलं जात. दोघेही जेव्हा कबूल हे,कबूल हे,कबूल हे असं म्हणतात तेव्हा करार प्रत्यक्षात अस्तित्वात येतो म्हणजेच लग्न होत आपल्या भाषेत.
हलाल ही अत्यंत घाणेरडा आणि स्त्रियांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहचवणारा प्रकार आहे. जेव्हा एखादा पुरुष त्याच्या पत्नीला भावनेच्या भरात तलाक देतो पण काही वेळाने त्याला त्याचा पश्चाताप होतो आणि त्याला त्याच स्रीसोबत पुन्हा संसार करायचा असतो तेव्हा मुस्लिम धर्मगुरुचा सल्ला घेतो. तो त्याला हलाल करण्यास सांगतो. या हलाल मध्ये घटस्फोटित स्त्रीला एक परपुरुषासोबत काही दिवस राहावं लागतं त्याच्या पत्नीप्रमाणे. यामध्ये शारीरिक संबंध सुद्धा ठेवले जातात मग नंतर तो पुरुष त्या पत्नीला तलाक देतो तेव्हाच तिच्या मूळ पतीला तिच्याबरोबर पुन्हा निकाह करता येतो.
उत्तर लिहिले · 21/3/2018
कर्म · 7480
8
तिहेरी तलाक म्हणजे नेमकं काय आहे, ते जाणून घेऊया.

- ट्रिपल तलाक म्हणजेच तिहेरी तलाक. तलाक या अरबी शब्दाचा अर्थ घटस्फोट असा होतो. 

- या पद्धतीमध्ये पुरुष तीनवेळा तलाक शब्दाचे उच्चारण करुन पत्नीशी कायमचा वेगळा राहू शकतो, फक्त या शब्दाच्या तीनदा उच्चारणाने घटस्फोट मिळतो. 

- वास्तविक तलाक शब्दाच्या उच्चारणानंतर पुर्नविचार करण्यासाठी वेळ देणं अपेक्षीत आहे, मात्र बहुतांशवेळेस एकाच बैठकीत तीनवेळा तलाक म्हटलं जातं. 

- तिहेरी तलाक लिखित किंवा तोंडी स्वरुपात दिली जातो.

- आधुनिक काळात फोन, एसएमएस, इ-मेल, सोशल मीडियाचाही वापर केल्याची उदाहरणे आहेत. 

- तलाक मिळालेल्या पतीशी पुन्हा विवाह करायचा असेल तर पत्नीला आधी दुसरया पुरुषाशी विवाह करावा लागतो, त्याला निकाह हलाला म्हटले जाते. मगच पहिल्या पतीशी पुन्हा विवाह करता येतो .

- भारतीय मुस्लिमांचे सर्व धार्मिक, विवाह कौटुंबिक व्यवहार मुस्लीम पर्सनल  लाँ ( शरियत) अँप्लिकेशन अँक्ट १९३७ च्या अंतर्गत येतात. 

- तिहेरी तलाकला तलाक -ए- मुघलझा असेही म्हटले जाते. 

- तिहेरी तलाक सहजगत्या वापरला जाऊन महिलांचे भविष्य धोक्यात येऊ शकते म्हणून या प्रथेला विरोध होत आहे. 

- काही धर्मगुरुंनी या प्रथेत बदल म्हणजे धार्मिक बाबतीत ढवळाढवळ केल्यासारखे होईल असे स्पष्टीकरण देत प्रथेला पाठिंबा दिला.

प्रकणाबद्दलचे महत्त्वाचे मुद्दे

काय आहे नेमके प्रकरण?
मार्च 2016मध्ये उत्तराखंडातील शायरा बानो या मुस्लिम महिलेने तिहेरी तलाक, हलाला निकाह आणि बहु-विवाह प्रथांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. याद्वारे बानोनं मुस्लिम पर्सनल लॉ (शरीयत)ला आव्हान दिलं.  मुस्लिमांमधील या प्रथेचा दुरुपयोग करीत काहीजण एकाचवेळी तीनवेळा तलाक शब्द उच्चारून बायकांना घटस्फोट देतात. तर, काहीजण फोनद्वारे वा एसएमएसद्वारेही तलाक देतात, याकडे शायरा बानोने लक्ष वेधलं होतं.त्यानंतर आफरीन रहमान, गुलशन परवीन, इशरत जहाँ आणि अतिया साबरी यांनी तिहेरी तलाक विरोधात आवाज उठवला.

 तिहेरी तलाकविरोधातील याचिका
सात याचिकाकर्त्या महिलांनी सर्वोच्च न्यायालयाकडे तिहेरी तलाक रद्द करण्याची मागणी केली होती. मुस्लिम महिला आंदोलन, मुस्लिम वीमेन पर्सनल लॉ बोर्ड, लॉयर्स कलेक्टिव या संघटनांनीही तिहेरी तलाक रद्द करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला होता. तिहेरी तलाकमुळे पुरूषांना लग्न मोडण्याचा एकतर्फी हक्क मिळतो. हे घटनेने देशातील नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन ठरते. गेल्या ७० वर्षांपासून आपण या सापळ्यात अडकलो आहोत. त्यामुळे धर्म आणि घटना या दोन्हींना धक्का लागणार नाही, असा कायदा बनवण्याची गरज पक्षकारांकडून व्यक्त करण्यात आली होती.

निकाल सुनावणाऱ्या घटनापीठात पाच धर्मांच्या न्यायमूर्तींचा समावेश
 निकाल सुनावणाऱ्या घटनापीठात पाच धर्मांच्या न्यायमूर्तींचा समावेश आहे. सरन्यायाधीश जे.एस. खेहर (शीख), कुरियन जोसेफ (ख्रिश्चन), आर.एफ. नरिमन (पारशी), यू.यू. ललित (हिंदू) आणि अब्दुल नजीर (मुस्लिम) यांचा समावेश आहे. तिहेरी तलाक प्रकरणातील घटनात्मक क्लीष्टतेमुळे हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवण्यात आलं होतं.

कपिल सिब्बल यांचं मत

समाजाच्या प्रथा, परंपरांच्या वैधतेची चाचपणी ही एक उतरण आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यामध्ये पडू नये असा युक्तीवाद खटल्याच्या सुनावणी दरम्यान मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे वकिल कपिल सिब्बल यांनी केला होता.

कोर्टाचा कपिल सिब्बल यांना सवाल

‘निकाहनाम्यात महिलांना तिहेरी तलाकसाठी नकार देण्याचा अधिकार दिला जाऊ शकतो का?,’ असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाकडून ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला विचारण्यात आला होता. ‘तीन तलाक स्वीकारणार नाही, असा पर्याय एखाद्या मुस्लिम महिलेला निकाहाच्यावेळीच देता येऊ शकतो का?’ असा प्रश्न मुख्य न्यायमूर्ती खेहर यांनी पर्सनल लॉ बोर्डाचे वकील कपिल सिब्बल यांना विचारला होता. ‘तिहेरी तलाकबद्दलचा महिलांचा विचार निकाहनाम्यात समाविष्ट करण्याचे आदेश पर्सनल लॉ बोर्डाकडून काझींना दिले जाणार का?,’ असा सवालदेखील सर्वोच्च न्यायालयाकडून उपस्थित करण्यात आला होता.

केंद्र सरकारही तिहेरी तलाकच्या विरोधात
तिहेरी तलाक प्रकरणात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले होते. ‘तिहेरी तलाक पद्धतीला आम्ही वैध मानत नाही. ही परंपरा सुरु राहावी, असे आम्हाला वाटत नाही,’ या शब्दांमध्ये सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे त्यांची भूमिका स्पष्ट केली होती.
 

मुस्लिम समाजाला पुढे येऊन तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याचं मोदींचं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी ट्रिपल तलाकच्या मुद्यावर बोलताना राजकारण न करण्याचा आग्रह करत मुस्लिम समाजाला पुढे येऊन तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं होतं. नरेंद्र मोदी यांनी बाराव्या शतकातील क्रांतीकारी समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलं होतं. मोदी बोलले की, "समाजातील लोकच जुन्या परंपरा तोडून आधुनिक गोष्टींचा स्विकार करतात. मला आशा आहे की मुस्लिम समाजातील लोक पुढे येतील आणि ट्रिपल तलाकशी संघर्ष करत असलेल्या मुस्लिम महिलांना मदत करत मार्ग काढतील" असे मोदी म्हणाले होते.

या देशांनी झटपट घटस्फोट देण्याची प्रथा केली हद्दपार 
पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंकास तुर्की, सायप्रस, सीरिया, जॉर्डन, इजिप्त, ट्यूनिशिया, अल्जेरिया, इराण, इराक, मेलिशाया, ब्रुनेई, युएई, इंडोनेशिया

उत्तर लिहिले · 29/9/2017
कर्म · 9760
14
jमुस्लीम समाजातील तीन तलाक पद्धती चांगली की वाईट, अथवा बंद व्हावी या चर्चेने आज संपूर्ण देश ढवळून निघत आहे. सर्वसामान्य मुस्लीम व विशेषत: स्त्रियांचा तीन तलाक पद्धतीने होणा-या घटस्फोटास तीव्र विरोध असल्याचे दिसून येते. या उलट मुस्लीम धर्मगुरू, मुल्ला-मौलवी, काझी या मंडळींना तीन तलाक घटस्फोट पद्धती मुस्लिमांची वैयक्तिक धार्मिक बाब असल्याने त्यांची सार्वजनिक चर्चासुद्धा त्यांना नको आहे. अशावेळी तीन तलाक आणि धर्म यांचा काही संबंध आहे का? आणि असल्यास नेमके त्याचे स्वरूप काय? या प्रश्नांची वास्तविक उत्तरे शोधण्याची गरज आहे.

सर्वप्रथम लक्षात घ्यावयास हवे की, एका श्वासात तीन वेळा तलाक बोलून घटस्फोट घेण्याची पद्धती भारत वगळता अन्य कुठल्याही देशात अगदी पाकिस्तान-बांगलादेश-इराण-इराक या मुस्लीम राष्ट्रांमध्येसुद्धा नाही. इस्लाम हा एक मानवतावादी धर्म असून एक आंतरराष्ट्रीय धर्म असल्याचे या धर्माचे चिंतक बोलत असतात. तेव्हा एका झटक्यात स्वत:च्या पत्नीला आयुष्यातून उठवण्याची अमानवी प्रथा आजच्या माहिती तंत्रज्ञान आणि वायफायच्या युगात कशी व्यवहार्य ठरते? असा प्रश्न साहजिक निर्माण होतो.

मात्र घटस्फोट प्रक्रिया एवढी क्लिष्ट आणि अवघड केल्याचे दिसते. विशेष म्हणजे तलाक होऊच नये हा त्या क्लिष्टतेमागचा उद्देश आहे. परंतु या कठोरतेला आणि क्लिष्ट प्रक्रियेला भारतातील सामंतशाही, जमीनदारी, जहागीरदारी या मध्ययुगीन कालखंडातील तत्कालीन भ्रष्ट राजे, नवाब, जमीनदार या घटकांनी आपल्या सोईप्रमाने वाकवले. तलाक या शब्दाचा अर्थ, ती प्रक्रिया संपूर्ण स्वत:च्या सोयीप्रमाणे बदलून ही तलाक प्रक्रिया बदलवून टाकल्याचे दिसते.

तीन वेळा तलाक बोलून पत्नीला घटस्फोट देण्यासाठी धर्माची साक्ष मिळत असली, तरी त्याचे स्वरूप खूप वेगळे आहे. प्रत्येक तलाक शब्दातले अंतर एक महिन्याचे असावे. एवढेच नव्हे तर पत्नी मासिक धर्मानंतर शुद्ध अवस्थेत असताना हा तलाक शब्द उच्चारला पाहिजे, असे सांगितले जाते. म्हणजे या प्रक्रियेत ३ वेळा तलाक शब्द उच्चारण्यास ३ महिन्यांचा कालखंड लागतो. दरम्यानच्या काळात या पती-पत्नीला विचार करण्याची संधी मिळावी, त्यांचे मनोमीलन व्हावे, या दरम्यान एखाद्या समजूतदार व्यक्तीने दोघांत सहमती, समेट घडवून आणावा, असा या तीन तलाकमधील अंतराचा अर्थ आहे. थोडक्यात ३ महिन्यांत घटस्फोटापासून त्यांनी परावृत्त व्हावे यासाठी हा अवधी एवढा मोठा ठेवला आहे. एका श्वासात तीन वेळा तलाक म्हणून घटस्फोट घेणे धर्मानुसार अवैध ठरते! असे जे करतात, ते प्रत्यक्ष धर्माच्या मूळ शिकवणुकीचा अपमानच करतात.

‘तलाक-निकाह-मेहेर’ या ३ गोष्टींचा परस्परांशी अतुट असा संबंध आहे. तलाक तेव्हाच होऊ शकतो, जेव्हा निकाह झालेला असतो. निकाह म्हटले की, मेहेर आलेच. इस्लामनुसार मेहेर म्हणजे वरपक्षाकडून वधूस नगदी स्वरूपात विवाहानिमित्त द्यावयाची रक्कम होय. ती शक्यतो चांदीच्या रुपयांच्या स्वरूपात असावी, असे मानतात. ती रक्कम जास्तीत जास्त असावी. तसेच तलाक झाल्यावर ही रक्कम स्त्रीने स्वत:च्या सोबत न्यायची असते. पुरुषाकडे ती ठेवली असल्यास त्याने घटस्फोटित स्त्रीला ती द्यायची असते. ही मेहेरची रक्कम जास्तीत ठेवण्यामागे हाच उद्देश आहे की, ती रक्कम परत करावी लागू शकते, म्हणून पुरुषाने घटस्फोटाचा विचारसुद्धा मनात आणू नये. परंतु या बाबतीत शहाबानो प्रकरण चांगले उदाहरण आहे. शहाबानोला तिच्या पतीने कबूल केलेली चांदीच्या नाण्याच्या स्वरूपातली रक्कम, रुपयांच्या चलनात परत करण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे इथेसुद्धा पीडित महिलेची पुरुषांकडून शुद्ध साफ फसवणूकच होते. हे लक्षात घेतले पाहिजे.

भारतीय मुस्लिमांनी ही क्लिष्ट प्रक्रिया सोपी करून टाकली आहे. शरीयतनुसार पहिला तलाक हा तलाक रजई ठरतो. याचा अर्थ हा एकदा उच्चारलेला तीन तलाक शब्दापैकीच प्रथम तलाक शब्द स्थगित म्हणजे रद्द होऊ शकतो. त्या दृष्टीने या प्रथम उच्चारणास फारसे महत्त्व राहात नाही. कारण एका महिन्याने जर दुसरा शब्द उच्चारलाच नाही तर हा प्रथम तलाक आपोआपच रद्द ठरतो. ‘तलाक – बाईन’ म्हणजे तलाक शब्दाचा दुस-यांदा केलेला उच्चार होय. यानंतर घटस्फोट होणारच! हे निश्चित होते. दोन वेळा तलाक शब्द उच्चारणे म्हणजे तिसरा तलाक मिळणार याची खात्री. पण त्यास एक महिना विलंब असतो. याच एका महिन्यात जर पती-पत्नी (विशेषत: पती) यांची मर्जी बदलली आणि जर त्यांनी पुन्हा एकत्र राहण्याची इच्छा प्रदर्शित केली तर त्यासाठी शरीयतनुसार एकच मार्ग शिल्लक राहतो. ‘हलाला!’ तलाक-बाईननंतर पुन्हा एकत्र राहण्याचा मार्ग म्हणजे हलाला मार्ग. त्या स्त्रीला प्रथम पतीशी एकत्र राहण्यासाठी पहिले दुस-या पुरुषाशी निकाह (लग्न) करावे लागते. त्याच्यापासून पुन्हा तलाक मिळवावा लागतो. नंतर पूर्ण लग्नविधी संपन्न करून हलाला प्रक्रिया पूर्ण होते. हलाला प्रक्रियेत स्त्रीला गर्भवती राहता येत नाही. ती गर्भवती नाही हे तिलाच सिद्ध करावे लागते. या सर्व बाबी काळजीपूर्वक अभ्यासल्या तर इथे स्त्रियांचे खच्चीकरण करून पुरुषवर्गास झुकते माप देते असे दिसते.

आजपर्यंत हिंदू धर्म आणि त्यास एक जीवन पद्धती म्हणून अंगीकरणा-यांनी वेळोवेळी काळानुरूप आवश्यक असणारे बदल स्वीकारले, प्रसंगी हिंदू धर्मातून निघालेले उपप्रवाहसुद्धा मान्य केले. जैन-बौद्ध-शिख ही त्याची उत्तम उदाहरणे होत. आजच्या माहिती तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या युगात तीन तलाक पद्धतीमध्ये कालानुरूप बदल व्हायला हवा. तेव्हाच मुस्लीम समाजातील महिलांच्या समस्या कमी होतील. त्यांना राज्यघटनेने दिलेल्या समाधिकाराचा वापर करता येईल. महिलांची मोठी समस्या म्हणून तीन तलाकच्या पद्धतीकडे पाहण्याची गरज आहे. यासाठी मुस्लीम समाजातील विचारवंत आणि बुद्धजीवींनी समोर येण्याची गरज आहे.

आजची ताजी बातमी (22/7/2017)--


#सर्वोच्च_न्यायालयाचा_ऐतिहासिक_निर्णय_आजपासून_तिहेरी_तलाकवर_बंदी ...


तोंडी तलाकला सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरविले आहे. पाच पैकी तीन न्यायाधीशांनी तोंडी तलाक बेकायदा ठरविला. उर्वरीत दोन न्यायाधीशांनी सरकारने कायदा बनवावा असे मत व्यक्त केले आहे.

सरन्यायाधीश जे. एस. खेहेर यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सलग सहा दिवस सुनावणी झाली होती. खंडपीठाने 18 मे रोजी यावरील निकाल राखून ठेवला होता. आज (मंगळवार) या तोंडी तलाकच्या मुद्द्यावर अंतिम निकाल घेण्यात आला. तोंडी तलाकवर आजपासून बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. संसदेत याबाबत कायदा करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत.

या खंडपीठामध्ये सरन्यायाधीश जे. एस. खेहेर, न्या. कुरियन जोसेफ, रोहिंटन एफ. नरिमन, यू. यू. ललित, आणि एस. अब्दुल नाझिर या पाच न्यायाधीशांचा खंडपीठात समावेश होता. खंडपीठामध्ये शीख, ख्रिश्‍चन, हिंदू, मुस्लिम व पारशी धर्माच्या न्यायाधीशांचा समावेश करण्यात आला होता. यातील तीन न्यायाधीशांनी हे घटनाबाह्य असल्याचा निकाल नोंदविला आहे. तर, दोघांनी याबाबतचा संसदेत कायदा करण्याचे आदेश दिले आहेत.

नरिमन, ललित आणि कुरियन या न्यायाधीशांनी दोन न्यायाधीशांच्या निकालाला विरोध दर्शविला. मुस्लिम राष्ट्रांमध्ये तोंडी तलाक संपुष्टात आला असताना भारतात यावर बंदी यावर बंदी का घातली नाही, असे मत नोंदविले.

उत्तर लिहिले · 22/8/2017
कर्म · 20545
0
हलाला (حلالة) हा इस्लामिक कायद्याचा (शरीयत) एक भाग आहे. हलाला म्हणजे एका महिलेला तिच्या घटस्फोटित नवऱ्याशी पुन्हा लग्न करायचे असल्यास तिला काही विशिष्ट प्रक्रियेतून जावे लागते. या प्रक्रियेनुसार, महिलेला दुसऱ्या पुरुषाशी लग्न करावे लागते, शारीरिक संबंध ठेवावे लागतात आणि नंतर त्या पुरुषाने तिला घटस्फोट दिल्यानंतरच ती तिच्या पहिल्या नवऱ्याशी पुन्हा लग्न करू शकते.

हलालाची प्रक्रिया:

  1. पहिला विवाह आणि घटस्फोट: एका महिलेचा विवाह होतो आणि काही कारणाने घटस्फोट होतो.
  2. इद्दत: घटस्फोटानंतर महिलेला इद्दत (विशिष्ट कालावधी) पाळावी लागते.
  3. दुसरा विवाह: महिलेला दुसऱ्या पुरुषाशी लग्न करावे लागते.
  4. शारीरिक संबंध: दुसऱ्या नवऱ्यासोबत शारीरिक संबंध स्थापित करणे आवश्यक आहे.
  5. दुसऱ्या नवऱ्याकडून घटस्फोट: दुसरा नवरा महिलेला घटस्फोट देतो.
  6. इद्दत: घटस्फोटानंतर महिलेला पुन्हा इद्दत पाळावी लागते.
  7. पहिल्या नवऱ्याशी पुनर्विवाह: इद्दत पूर्ण झाल्यावर ती महिला तिच्या पहिल्या नवऱ्याशी पुनर्विवाह करू शकते.

हलाला संबंधित वाद:

  • हलाला प्रथेवर अनेक मुस्लिम आणि गैर-मुस्लिम विद्वानांनी टीका केली आहे.
  • ही प्रथा महिलांसाठी अन्यायकारक आणि अपमानजनक असल्याचे मानले जाते.
  • काही इस्लामी देशांमध्ये हलाला कायद्याच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उभे केले गेले आहेत.

टीप: हलाला संदर्भात विविध मतप्रवाह आणि शिया व सुन्नी पंथांमध्ये वेगवेगळे नियम असू शकतात.

अधिक माहितीसाठी काही संदर्भ:

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 5160