विवाह कायदा मुस्लिम धर्म मुस्लिम कायदा

तीन तलाक विषयी संपूर्ण माहिती मिळेल का?

3 उत्तरे
3 answers

तीन तलाक विषयी संपूर्ण माहिती मिळेल का?

8
तिहेरी तलाक म्हणजे नेमकं काय आहे, ते जाणून घेऊया.

- ट्रिपल तलाक म्हणजेच तिहेरी तलाक. तलाक या अरबी शब्दाचा अर्थ घटस्फोट असा होतो. 

- या पद्धतीमध्ये पुरुष तीनवेळा तलाक शब्दाचे उच्चारण करुन पत्नीशी कायमचा वेगळा राहू शकतो, फक्त या शब्दाच्या तीनदा उच्चारणाने घटस्फोट मिळतो. 

- वास्तविक तलाक शब्दाच्या उच्चारणानंतर पुर्नविचार करण्यासाठी वेळ देणं अपेक्षीत आहे, मात्र बहुतांशवेळेस एकाच बैठकीत तीनवेळा तलाक म्हटलं जातं. 

- तिहेरी तलाक लिखित किंवा तोंडी स्वरुपात दिली जातो.

- आधुनिक काळात फोन, एसएमएस, इ-मेल, सोशल मीडियाचाही वापर केल्याची उदाहरणे आहेत. 

- तलाक मिळालेल्या पतीशी पुन्हा विवाह करायचा असेल तर पत्नीला आधी दुसरया पुरुषाशी विवाह करावा लागतो, त्याला निकाह हलाला म्हटले जाते. मगच पहिल्या पतीशी पुन्हा विवाह करता येतो .

- भारतीय मुस्लिमांचे सर्व धार्मिक, विवाह कौटुंबिक व्यवहार मुस्लीम पर्सनल  लाँ ( शरियत) अँप्लिकेशन अँक्ट १९३७ च्या अंतर्गत येतात. 

- तिहेरी तलाकला तलाक -ए- मुघलझा असेही म्हटले जाते. 

- तिहेरी तलाक सहजगत्या वापरला जाऊन महिलांचे भविष्य धोक्यात येऊ शकते म्हणून या प्रथेला विरोध होत आहे. 

- काही धर्मगुरुंनी या प्रथेत बदल म्हणजे धार्मिक बाबतीत ढवळाढवळ केल्यासारखे होईल असे स्पष्टीकरण देत प्रथेला पाठिंबा दिला.

प्रकणाबद्दलचे महत्त्वाचे मुद्दे

काय आहे नेमके प्रकरण?
मार्च 2016मध्ये उत्तराखंडातील शायरा बानो या मुस्लिम महिलेने तिहेरी तलाक, हलाला निकाह आणि बहु-विवाह प्रथांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. याद्वारे बानोनं मुस्लिम पर्सनल लॉ (शरीयत)ला आव्हान दिलं.  मुस्लिमांमधील या प्रथेचा दुरुपयोग करीत काहीजण एकाचवेळी तीनवेळा तलाक शब्द उच्चारून बायकांना घटस्फोट देतात. तर, काहीजण फोनद्वारे वा एसएमएसद्वारेही तलाक देतात, याकडे शायरा बानोने लक्ष वेधलं होतं.त्यानंतर आफरीन रहमान, गुलशन परवीन, इशरत जहाँ आणि अतिया साबरी यांनी तिहेरी तलाक विरोधात आवाज उठवला.

 तिहेरी तलाकविरोधातील याचिका
सात याचिकाकर्त्या महिलांनी सर्वोच्च न्यायालयाकडे तिहेरी तलाक रद्द करण्याची मागणी केली होती. मुस्लिम महिला आंदोलन, मुस्लिम वीमेन पर्सनल लॉ बोर्ड, लॉयर्स कलेक्टिव या संघटनांनीही तिहेरी तलाक रद्द करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला होता. तिहेरी तलाकमुळे पुरूषांना लग्न मोडण्याचा एकतर्फी हक्क मिळतो. हे घटनेने देशातील नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन ठरते. गेल्या ७० वर्षांपासून आपण या सापळ्यात अडकलो आहोत. त्यामुळे धर्म आणि घटना या दोन्हींना धक्का लागणार नाही, असा कायदा बनवण्याची गरज पक्षकारांकडून व्यक्त करण्यात आली होती.

निकाल सुनावणाऱ्या घटनापीठात पाच धर्मांच्या न्यायमूर्तींचा समावेश
 निकाल सुनावणाऱ्या घटनापीठात पाच धर्मांच्या न्यायमूर्तींचा समावेश आहे. सरन्यायाधीश जे.एस. खेहर (शीख), कुरियन जोसेफ (ख्रिश्चन), आर.एफ. नरिमन (पारशी), यू.यू. ललित (हिंदू) आणि अब्दुल नजीर (मुस्लिम) यांचा समावेश आहे. तिहेरी तलाक प्रकरणातील घटनात्मक क्लीष्टतेमुळे हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवण्यात आलं होतं.

कपिल सिब्बल यांचं मत

समाजाच्या प्रथा, परंपरांच्या वैधतेची चाचपणी ही एक उतरण आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यामध्ये पडू नये असा युक्तीवाद खटल्याच्या सुनावणी दरम्यान मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे वकिल कपिल सिब्बल यांनी केला होता.

कोर्टाचा कपिल सिब्बल यांना सवाल

‘निकाहनाम्यात महिलांना तिहेरी तलाकसाठी नकार देण्याचा अधिकार दिला जाऊ शकतो का?,’ असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाकडून ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला विचारण्यात आला होता. ‘तीन तलाक स्वीकारणार नाही, असा पर्याय एखाद्या मुस्लिम महिलेला निकाहाच्यावेळीच देता येऊ शकतो का?’ असा प्रश्न मुख्य न्यायमूर्ती खेहर यांनी पर्सनल लॉ बोर्डाचे वकील कपिल सिब्बल यांना विचारला होता. ‘तिहेरी तलाकबद्दलचा महिलांचा विचार निकाहनाम्यात समाविष्ट करण्याचे आदेश पर्सनल लॉ बोर्डाकडून काझींना दिले जाणार का?,’ असा सवालदेखील सर्वोच्च न्यायालयाकडून उपस्थित करण्यात आला होता.

केंद्र सरकारही तिहेरी तलाकच्या विरोधात
तिहेरी तलाक प्रकरणात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले होते. ‘तिहेरी तलाक पद्धतीला आम्ही वैध मानत नाही. ही परंपरा सुरु राहावी, असे आम्हाला वाटत नाही,’ या शब्दांमध्ये सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे त्यांची भूमिका स्पष्ट केली होती.
 

मुस्लिम समाजाला पुढे येऊन तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याचं मोदींचं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी ट्रिपल तलाकच्या मुद्यावर बोलताना राजकारण न करण्याचा आग्रह करत मुस्लिम समाजाला पुढे येऊन तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं होतं. नरेंद्र मोदी यांनी बाराव्या शतकातील क्रांतीकारी समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलं होतं. मोदी बोलले की, "समाजातील लोकच जुन्या परंपरा तोडून आधुनिक गोष्टींचा स्विकार करतात. मला आशा आहे की मुस्लिम समाजातील लोक पुढे येतील आणि ट्रिपल तलाकशी संघर्ष करत असलेल्या मुस्लिम महिलांना मदत करत मार्ग काढतील" असे मोदी म्हणाले होते.

या देशांनी झटपट घटस्फोट देण्याची प्रथा केली हद्दपार 
पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंकास तुर्की, सायप्रस, सीरिया, जॉर्डन, इजिप्त, ट्यूनिशिया, अल्जेरिया, इराण, इराक, मेलिशाया, ब्रुनेई, युएई, इंडोनेशिया

उत्तर लिहिले · 29/9/2017
कर्म · 9760
1

🧐 *तिहेरी तलाक म्हणजे नेमकं काय?* : 'तत्काळ तिहेरी तलाक' किंवा 'तलाक-उल-बिद्दत'ची इस्लामिक प्रथा नवऱ्याला तीन वेळा तलाक म्हणून लग्न संपवण्याची सवलत देते. हा तलाक कोणत्याही प्रकारे कळवला जाऊ शकतो; तोंडी, टेक्स्ट मेसेजवर किंवा अगदी ई-मेल करूनही.

📍 *विशेष बाबी* :

●  तत्काळ तिहेरी तलाक देणाऱ्यांना पोलीस तातडीने अटक करु शकतात, मात्र त्यासाठी स्वतः महिलेने तक्रार करायला हवी.
●  महिलेच्या रक्ताचे नातेवाईकही तक्रार दाखल करु शकतात, परंतु शेजारी -किंवा अनोळखी व्यक्तींना तक्रार करता येणार नाही.
●  तोंडी, लेखी, व्हॉट्सअ‍ॅपवर तलाक देणाऱ्यांना तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते.
●  पीडित महिलेची बाजू ऐकल्यानंतर आरोपीला तात्काळ जामीन दिला जाऊ शकतो.
●  महिलेने तयारी दर्शवली तर मॅजिस्ट्रेट समजुतीने प्रकरण सोडवण्याची मुभा देतील.
●  पीडित महिला पोटगी मागू शकते.
● पीडित महिलेला किती नुकसान भरपाई द्यावी हे न्यायालयातील सुनावणीनंतर निश्चित केले जाईल.
●  पीडितेची मुलं अज्ञान असतील तर त्यांची कस्टडी कोणाकडे असेल? हे न्यायाधीश ठरवतील.
उत्तर लिहिले · 2/8/2019
कर्म · 569265
0

तीन तलाक (Triple Talaq) म्हणजे मुस्लिम धर्मातील पुरुषाने पत्नीला तीन वेळा 'तलाक' (Talak) हा शब्द बोलून घटस्फोट देणे. या प्रथेनुसार, मुस्लिम पुरुष आपल्या पत्नीला तोंडी, लेखी किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून (उदाहरणार्थ: SMS, ईमेल, व्हॉट्सॲप) तीन वेळा तलाक बोलून घटस्फोट देऊ शकत होता.

तीन तलाकचे प्रकार:

  • तलाक-ए-अहसन (Talaq-e-Ahsan): हा तलाक़चा सर्वोत्तम प्रकार मानला जातो. यात एक वेळेस तलाक बोलून, इद्दत (Iddat)period मध्ये पती-पत्नीला समेट करण्याची संधी असते.
  • तलाक-ए-हसन (Talaq-e-Hasan): यात तीन महिन्यांच्या अंतराने तीन वेळा तलाक बोलले जाते. तिसऱ्या वेळेस तलाक बोलल्यावर घटस्फोट पूर्ण होतो.
  • तलाक-ए-बिद्दत (Talaq-e-Biddat): या प्रकारात एकाच वेळेस तीन वेळा तलाक बोलून घटस्फोट दिला जातो. याला 'झटपट तलाक' असेही म्हटले जाते. हा प्रकार शिया मुस्लिम समुदायात (Shia Muslim community) मान्य नाही.

भारतातील तीन तलाक:

  • भारतात तीन तलाक हा मुद्दा खूप वादग्रस्त ठरला होता, कारण यामुळे मुस्लिम महिलांच्या हक्कांचे उल्लंघन (Violation of rights) होत होते.
  • 2017 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) 'शायरा बानो वि. भारत सरकार' (Shayara Bano v. Union of India) या खटल्यात तीन तलाकला असंवैधानिक (Unconstitutional) ठरवले. शायरा बानो वि. भारत सरकार खटला (Indiankanoon.org)
  • 2019 मध्ये, भारत सरकारने 'मुस्लिम महिला (विवाह अधिकार संरक्षण) कायदा' (Muslim Women (Protection of Rights on Marriage) Act) पारित केला, ज्याने तीन तलाकला कायद्याने गुन्हा ठरवला. मुस्लिम महिला (विवाह अधिकार संरक्षण) कायदा (prsindia.org)

कायद्याचे उल्लंघन:

  • तीन तलाक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या पुरुषाला तीन वर्षांपर्यंत कारावास आणि दंड (Punishment) होऊ शकतो.
  • हा कायदा मुस्लिम महिलांना सामाजिक सुरक्षा (Social security) आणि समानता (Equality) प्रदान करतो.

इतर देशांतील स्थिती:

  • पाकिस्तान (Pakistan), बांगलादेश (Bangladesh), आणि इजिप्त (Egypt) यांसारख्या अनेक मुस्लिम देशांनी तीन तलाकवर बंदी घातली आहे.

निष्कर्ष:

तीन तलाक ही प्रथा मुस्लिम महिलांसाठी अन्यायकारक होती. भारतीय सर्वोच्च न्यायालयाने आणि भारत सरकारने उचललेल्या पावलांमुळे मुस्लिम महिलांच्या हक्कांचे संरक्षण झाले आहे आणि त्यांना अधिक सुरक्षित वातावरण मिळाले आहे.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 5160

Related Questions

भारतात मुस्लिम व्यक्ती पहिल्या बायकोला तलाक न देता दुसरे लग्न करू शकतो का?
तीन तलाक कोणत्या कलमांतर्गत हटवण्यात आले?
मुस्लिम तलाक़्क़बद्दल माहिती द्या?
तीन तलाक, निकाह हलाला म्हणजे काय असते?
तीन तलाक म्हणजे काय?
हलाला बद्दल माहिती सांगा?