2 उत्तरे
2
answers
14 डिसेंबर: जागतिक माकड दिन?
5
Answer link
*🙈🙉🙊जागतिक माकड दिन; जाणून घ्या माकड आणि माणसातलं साम्य!*
ऐकुन नक्कीच थोडस विचित्र वाटेल, पण आज जागतिक माकड दिन आहे. 2000 सालापासून 14 डिसेंबर हा दिवस जागतिक माकड दिन म्हणून साजरा करण्यास सुरवात झाली. माणसाची उत्क्रांती ही माकडा पासूनच झाली आहे. आश्मयुगात असलेले आदिमानव हे माकडा सारखेच जंगलात राहायचे, कंदमुळ खायचे हे आपण इतिहासात शिकलो आहोत. साधारण माकडाचे दोन प्रकार असतात, पहिल्या प्रकारात प्राचीन माकड येतात, जे प्रामुख्याने आशिया आणि आफ्रिका खंडात येतात. तर दुसऱ्या प्रकारातील माकड ही अमेरीकेतील नवीन प्रकारची माकड म्हणून ओळखली जातात. माकड हा मानवी शरीराच्या ठेवणीच्या अगदी जवळ जाणारा असा प्राणी आहे, जाणून घेऊयात माकडा विषयी काही खास माहिती.
*👤🐒माणूस आणि माकडातील साम्य*
▪️माणसा प्रमाणेच माकडाला देखील 32 दात असतात, तसेच माकड आणि माणसाचा डीएनए मध्ये 98 टक्के इतके साम्य असते.
▪️संशोधनानुसार सगळ्यात जास्त माकडांच्या प्रजाती ब्राझील या देशात आढळुन येतात, आतापर्यंत माकडाच्या 264 प्रजातींचा शोध लागला आहे.
▪️फळे, फुले या व्यतीरिक्त किडे काही सरपटणारे प्राणी माकड खातात. ( एखाद्या पर्यटन स्थळी केळे किंवा तुमच्या जवळ असलेले पदार्थ घेण्यासाठी माकडाने लोकांना हैराण केलेले तुम्ही बघीतलेच असेल.) तसेच मानवी अन्न सुद्धा खाणे माकड पसंद करतात.
▪️ज्या प्रमाणे माणसाला कावीळ, टीबी यांसारखे आजार होतात, तसेच माकडाला देखील हे आजार होतात.
▪️माणसा प्रमाणेच माकड हा देखील समुहात राहणारा प्राणी आहे. आपल्यावर एखाद्या प्राण्याने हल्ला करु नये म्हणून संरक्षणासाठी माकड समुहात राहते.
*🐒माकडाची काही वैशिष्टे*
माकडाचा आयक्यु 174 इतका असतो. संवाद साधण्यासाठी माकड चेहऱ्यावर हावभाव, वेगवेगळ्या हालचाली, वेगवेगळ्या आवाजाच्या सहाय्याने एकमेकांशी संवाद साधतात. HOWLER जातीच्या माकडाचा आवाज साधारण पाच किलोमिटर अंतरा पर्यंत ऐकु येतो. मादी माकड साधारण 5 ते 8 महिने बाळाला पोटात ठेवते आणि मग जन्म देते. अंतराळ सगळ्यात आधी जाणारा प्राणी हा माकडच आहे. 1949 साला अंतराळात सोडण्यात आलेल्या यानात माकडाला बसवण्यात आले. यावेळी पृथ्वी पासून 133 किलोमिटरचा प्रवास माकडाने केला. माकडाचे आयुष्य हे साधारण 20 ते 30 वर्षे इतके असते.