Topic icon

आंतरराष्ट्रीय दिवस

0
सर्वात योग्य उत्तर आहे:

20 नोव्हेंबर हा दिवस जगभरात बाल अधिकार दिवस म्हणून ओळखला जातो.

1959 मध्ये, संयुक्त राष्ट्र महासभेने 'बालकांच्या हक्कांची घोषणा' स्वीकारली. या घोषणेचा उद्देश असा होता की प्रत्येक मुलाला संरक्षण, शिक्षण, आरोग्यसेवा आणि चांगले जीवन जगण्याचा हक्क आहे.

1989 मध्ये, संयुक्त राष्ट्र महासभेने बालकांच्या हक्कांवरील अधिवेशनाला मान्यता दिली. हे अधिवेशन बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण कायदेशीर साधन आहे.

20 नोव्हेंबर हा दिवस बालकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित आहे.

स्रोत:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1820
0

आंतरराष्ट्रीय कडधान्य दिवस दरवर्षी 10 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.

हा दिवस कडधान्यांचे पौष्टिक आणि पर्यावरणीय फायदे तसेच शाश्वत अन्न उत्पादनातील भूमिकेबद्दल जागरूकता वाढवतो.

कडधान्ये म्हणजे काय?

  • कडधान्ये वनस्पती-आधारित प्रथिने आणि अमिनो ऍसिडचा चांगला स्रोत आहेत.
  • त्यात फायबर, लोह, फोलेट, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात.

संयुक्त राष्ट्र संघाने (United Nations) 2019 मध्ये 10 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय कडधान्य दिवस म्हणून घोषित केला.

अधिक माहितीसाठी संयुक्त राष्ट्र संघाचे संकेतस्थळ पहा.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1820
2
महिलांनी स्वतःच्या हक्कांसाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.[१]

दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला, तरीही सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

उत्तर लिहिले · 14/2/2020
कर्म · 3385
5
*🙈🙉🙊जागतिक माकड दिन; जाणून घ्या माकड आणि माणसातलं साम्य!*

ऐकुन नक्कीच थोडस विचित्र वाटेल, पण आज जागतिक माकड दिन आहे. 2000 सालापासून 14 डिसेंबर हा दिवस जागतिक माकड दिन म्हणून साजरा करण्यास सुरवात झाली. माणसाची उत्क्रांती ही माकडा पासूनच झाली आहे. आश्मयुगात असलेले आदिमानव हे माकडा सारखेच जंगलात राहायचे, कंदमुळ खायचे हे आपण इतिहासात शिकलो आहोत. साधारण माकडाचे दोन प्रकार असतात, पहिल्या प्रकारात प्राचीन माकड येतात, जे प्रामुख्याने आशिया आणि आफ्रिका खंडात येतात. तर दुसऱ्या प्रकारातील माकड ही अमेरीकेतील नवीन प्रकारची माकड म्हणून ओळखली जातात. माकड हा मानवी शरीराच्या ठेवणीच्या अगदी जवळ जाणारा असा प्राणी आहे, जाणून घेऊयात माकडा विषयी काही खास माहिती.

*👤🐒माणूस आणि माकडातील साम्य*

▪️माणसा प्रमाणेच माकडाला देखील 32 दात असतात, तसेच माकड आणि माणसाचा डीएनए मध्ये 98 टक्के इतके साम्य असते.
▪️संशोधनानुसार सगळ्यात जास्त माकडांच्या प्रजाती ब्राझील या देशात आढळुन येतात, आतापर्यंत माकडाच्या 264 प्रजातींचा शोध लागला आहे.
▪️फळे, फुले या व्यतीरिक्त किडे काही सरपटणारे प्राणी माकड खातात. ( एखाद्या पर्यटन स्थळी केळे किंवा तुमच्या जवळ असलेले पदार्थ घेण्यासाठी माकडाने लोकांना हैराण केलेले तुम्ही बघीतलेच असेल.) तसेच मानवी अन्न सुद्धा खाणे माकड पसंद करतात.
▪️ज्या प्रमाणे माणसाला कावीळ, टीबी यांसारखे आजार होतात, तसेच माकडाला देखील हे आजार होतात.
▪️माणसा प्रमाणेच माकड हा देखील समुहात राहणारा प्राणी आहे. आपल्यावर एखाद्या प्राण्याने हल्ला करु नये म्हणून संरक्षणासाठी माकड समुहात राहते.

*🐒माकडाची काही वैशिष्टे*
माकडाचा आयक्यु 174 इतका असतो. संवाद साधण्यासाठी माकड चेहऱ्यावर हावभाव, वेगवेगळ्या हालचाली, वेगवेगळ्या आवाजाच्या सहाय्याने एकमेकांशी संवाद साधतात. HOWLER  जातीच्या माकडाचा आवाज साधारण पाच किलोमिटर अंतरा पर्यंत ऐकु येतो. मादी माकड साधारण 5 ते 8 महिने बाळाला पोटात ठेवते आणि मग जन्म देते. अंतराळ सगळ्यात आधी जाणारा प्राणी हा माकडच आहे. 1949 साला अंतराळात सोडण्यात आलेल्या यानात माकडाला बसवण्यात आले. यावेळी पृथ्वी पासून 133 किलोमिटरचा प्रवास माकडाने केला. माकडाचे आयुष्य हे साधारण 20 ते 30 वर्षे इतके असते.
उत्तर लिहिले · 14/12/2019
कर्म · 569245
2
*🤫 21 सप्टेंबर:आज आंतरराष्ट्रीय शांतता दिवस*




✌🏻 आज 21 सप्टेंबर. जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून साजरा केला जातो. शांतता दिवस देशांमध्ये आणि लोकांमध्ये स्वातंत्र्य, शांतता आणि आनंदाचे प्रतिक म्‍हणून ओळखला जातो. संपूर्ण पृथ्वीवर शांतता आणि अहिंसा प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा केला जातो.

📌 इतिहास

👉 सन 1982 मध्ये आंतरराष्ट्रीय जागतिक दिन साजरा करण्यास सुरूवात झाली. तर सन 2001 पासून सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी साजरा केला जायचा. मात्र, 2002 साला पासून 21 सप्टेंबर हा दिवस निश्चित करून याच दिवशी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस साजरा केला जाऊ लागला.

📣 आंतरराष्ट्रीय शांतता दिना निमित्त जाणून घेऊयात पंडित जवाहरलाल नेहरुंचे शांततेचे ‘पंचशील’ धोरण

1. एकमेकांच्या प्रादेशिक अखंडत्व आणि सार्वभौमत्वाचा आदर करा.
2. एकमेकांविरुद्ध आक्रमक कारवाई करू नका.
3. एकमेकांच्या अंतर्गत विषयामध्ये व्यत्यय आणू नका.
4. समानता आणि परस्पर फायद्याच्या धोरणाचे अनुसरण करा.
5. शांततामय सहजीवन आणि आर्थिक सहकार्य या तत्‍वांचा स्‍वीकार करा.
उत्तर लिहिले · 21/9/2019
कर्म · 569245
0
Q.) जागतिक जैवविविधता संवर्धन दिन केव्हा साजरा केला जातो?

24 नोव्हेंबर
https://t.me/rsuraj
उत्तर लिहिले · 27/12/2018
कर्म · 515