दिनविशेष दिनदर्शिका आंतरराष्ट्रीय दिवस

जागतिक शांतता दिन केव्हा असतो?

2 उत्तरे
2 answers

जागतिक शांतता दिन केव्हा असतो?

2
*🤫 21 सप्टेंबर:आज आंतरराष्ट्रीय शांतता दिवस*




✌🏻 आज 21 सप्टेंबर. जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून साजरा केला जातो. शांतता दिवस देशांमध्ये आणि लोकांमध्ये स्वातंत्र्य, शांतता आणि आनंदाचे प्रतिक म्‍हणून ओळखला जातो. संपूर्ण पृथ्वीवर शांतता आणि अहिंसा प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय शांतता दिन साजरा केला जातो.

📌 इतिहास

👉 सन 1982 मध्ये आंतरराष्ट्रीय जागतिक दिन साजरा करण्यास सुरूवात झाली. तर सन 2001 पासून सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी साजरा केला जायचा. मात्र, 2002 साला पासून 21 सप्टेंबर हा दिवस निश्चित करून याच दिवशी आंतरराष्ट्रीय शांतता दिवस साजरा केला जाऊ लागला.

📣 आंतरराष्ट्रीय शांतता दिना निमित्त जाणून घेऊयात पंडित जवाहरलाल नेहरुंचे शांततेचे ‘पंचशील’ धोरण

1. एकमेकांच्या प्रादेशिक अखंडत्व आणि सार्वभौमत्वाचा आदर करा.
2. एकमेकांविरुद्ध आक्रमक कारवाई करू नका.
3. एकमेकांच्या अंतर्गत विषयामध्ये व्यत्यय आणू नका.
4. समानता आणि परस्पर फायद्याच्या धोरणाचे अनुसरण करा.
5. शांततामय सहजीवन आणि आर्थिक सहकार्य या तत्‍वांचा स्‍वीकार करा.
उत्तर लिहिले · 21/9/2019
कर्म · 569245
0

जागतिक शांतता दिन दरवर्षी २१ सप्टेंबर रोजी असतो.

या दिवसाचा उद्देश जगामध्ये शांतता आणि सलोखा वाढवणे आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने (United Nations) १९८१ मध्ये हा दिवस प्रथम साजरा केला.

स्रोत:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1780

Related Questions

सर्व जगात कोणता दिवस बाल अधिकार दिवस म्हणून ओळखला जातो? ● 20 नोव्हेंबर ● 19 नोव्हेंबर ● 21 नोव्हेंबर ● 18 नोव्हेंबर?
जागतिक जैवविविधता दिन कधी साजरा केला जातो?
आंतरराष्ट्रीय कडधान्य दिवस कधी साजरा केला जातो?
जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
14 डिसेंबर: जागतिक माकड दिन?
जागतीक जैवविविधता दिन कधी साजरा केला जातो?
जागतीक जैवविविधता दिन कधी साजरा केला जात?ो