अन्न घरगुती उपाय पोट विकार आरोग्य आहार

अन्न घशाशी येते काय उपाय आहे?

2 उत्तरे
2 answers

अन्न घशाशी येते काय उपाय आहे?

5
 अन्न घशाशी येतंय ?   

  .         *_गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स डिसीज (जीआरडी) हा एक गंभीर आजार आहे, त्याची लक्षणे आणि कारणे समजून घ्यायला हवीत. साधारणपणे पोटातील अन्न पुन्हा उलट अन्ननलिकेत येते आणि जळजळ होते, त्याला गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स असे म्हणतात._*

*गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स हा पचनसंस्थेशी निगडीत आजार आहे. त्याला जीईआरडी देखील म्हटले जाते. गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्समुळे अनेक लोकांना छातीत जळजळ, पित्तप्रकोप आदी समस्यांना तोंड द्यावे लागते. हायटल हार्निया हे जीईआरडीचे मुख्य कारण आहे. छातीत जळजळ होण्याबरोबरच काही लोकांना छातीत वेदना होण्याची समस्याही होऊ शकते. त्यामुळे लोकांना हृदयविकाराचा झटका आला की काय, असे वाटते. गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स का आणि कसा होतो ते जाणून घेऊया.आपण वाचत आहात ⸾⸾मा ⸾⸾हि ⸾⸾ती ⸾⸾ ° ⸾⸾से ⸾⸾वा ⸾ ⸾° ग्रू ⸾⸾प ⸾⸾, ⸾⸾पे ⸾⸾ठ⸾ ⸾व ⸾⸾ड ⸾⸾गा⸾ ⸾व ⸾⸾ची पोस्ट,* *गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स या आजारामध्ये पोटातील अन्नपदार्थ पुन्हा अन्ननलिकेत येतात. त्यामुळे पचनासाठी आवश्यक असलेली आम्ले ही देखील अन्ननलिकेत जातात. त्यामुळे छातीत जळजळ होऊ लागते. पोटाची ही वारंवार उद्भवणार्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यास हानी पोहोचू शकते.
जीआरडीची लक्षणे
जीईआरडीमध्ये पोटातील अन्नपचनासाठी लागणारे आम्ल हे पुन्हा वर उलट्या दिशेने अन्ननलिकेत जाते. त्यामुळे छातीत जळजळ होतेच; पण ती वाढल्यास उलटी देखील होते. त्याशिवाय फुफ्फुसे, कान, नाक किंवा घसा यांनाही त्रास होतो. गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्सबरोबर इतरही अनेक त्रास होऊ शकतात. जसे अन्ननलिका संकुचित होते, अन्ननलिकेच्या अंतत्वचेला व्रण पडतात. हा त्रास दीर्घकाळ होत राहिल्यास एक नवी अवस्था निर्माण होते, त्याला बॅरेटस् इसोफेगस होतो आणि वेळेवर या अवस्थेत उपचार न झाल्यास अन्ननलिकेचा कर्करोगही होऊ शकतो.
*🔹तणावपूर्ण जीवनशैली*
सातत्याने तणावाखाली राहिल्यास पोटाची अवस्था खराब होते.   तणाव आल्यास अॅड्रिनल ग्रंथींमधून अॅड्रेलिन आणि कॉर्टिसोल नावाच्या हार्मोनचे स्रावत निघतात. तणावामुळे संपूर्ण पचनसंस्थेमध्ये जळजळ होते, त्यामुळे पचननलिकेला सूज येऊ शकते आणि त्याच्या परिणामस्वरूप शरीरात पोषक घटकांची कमतरता होते.
*🔹पोटाचे आजार*
जीवनशैलीतील बदल हे या आजाराचे मुख्य कारण आहे. अतिमद्यपान, सिगरेट, फास्टफूडचे अतिसेवन आणि अतितणाव यामुळे हे आजार जडतात. तणावाचा परिणाम आपल्या मनोवस्थेवर होतोच पण पचनसंस्थेवरही होतो. त्याव्यतिरिक्त एकाएकी झालेले जनुकीय बदलांमुळेही पॅनक्रियाइटिस आणि पित्ताशयात पित्ताचे खडे साऱखे रोग अधिक होतात. गॅस्ट्रोएसोफेगल रिफल्क्स, इरिटेबल बॉवेल सिड्रोम, फंक्शनल डिस्पेप्सिया,स्थूलता, यकृतात चरबी जमा होणे आणि पेप्टिक अल्सर साऱखे आजार जीवनशैलीशी निगडीत गॅस्ट्रोइटेस्टाईनल रोगांमध्ये सामील आहेत.

0

अन्न घशाशी येणे (Acid Reflux) ही एक सामान्य समस्या आहे. खाली काही उपाय दिले आहेत ज्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकेल:

जीवनशैलीतील बदल:
  • जेवणाच्या वेळा: रात्री उशिरा जेवण टाळा आणि झोपण्याच्या किमान 2-3 तास आधी जेवण करा.
  • आहारातील बदल: तेलकट पदार्थ, मसालेदार पदार्थ, टोमॅटो, लिंबूवर्गीय फळे (Citrus fruits), चॉकलेट आणि कॅफीनयुक्त पेये टाळा.
  • वजन नियंत्रण: जास्त वजन असल्यास ते कमी करण्याचा प्रयत्न करा.
  • धूम्रपान टाळा: धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि Acid Reflux वाढवू शकते.
  • कपडे: जास्त घट्ट कपडे घालणे टाळा.
घरगुती उपाय:
  • ऍपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar): एक चमचा ऍपल सायडर व्हिनेगर एक कप पाण्यात मिसळून जेवणानंतर घ्या. (WebMD)
  • आले (Ginger): आल्याचा छोटा तुकडा चघळा किंवा आल्याचा चहा प्या. (Medical News Today)
  • बडीशेप (Fennel seeds): जेवणानंतर बडीशेप चघळल्याने अन्नपचनास मदत होते.
  • पुदिना (Mint): पुदिन्याची पाने चघळल्याने किंवा पुदिन्याचा चहा प्यायल्याने आराम मिळतो.
औषधोपचार:

जर घरगुती उपायांनी आराम मिळत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर खालील औषधे देऊ शकतात:

  • एंटासिड (Antacids): हे औषध ऍसिड neutralize करते आणि लवकर आराम देते.
  • एच2 ब्लॉकर्स (H2 blockers): हे औषध ऍसिडचे उत्पादन कमी करते.
  • प्रोटॉन पंप इनहिबिटर (Proton pump inhibitors): हे औषध ऍसिडचे उत्पादन पूर्णपणे थांबवते.

Disclaimer: ही माहिती केवळ तुमच्या ज्ञानात भर घालण्यासाठी आहे. कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5220

Related Questions

मला ॲसिडीटी साठी औषध सांगा?
वेळोवेळी ढेकर का येतात त्यावर उपचार काय?