Topic icon

पोट विकार

5
 अन्न घशाशी येतंय ?   

  .         *_गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स डिसीज (जीआरडी) हा एक गंभीर आजार आहे, त्याची लक्षणे आणि कारणे समजून घ्यायला हवीत. साधारणपणे पोटातील अन्न पुन्हा उलट अन्ननलिकेत येते आणि जळजळ होते, त्याला गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स असे म्हणतात._*

*गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स हा पचनसंस्थेशी निगडीत आजार आहे. त्याला जीईआरडी देखील म्हटले जाते. गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्समुळे अनेक लोकांना छातीत जळजळ, पित्तप्रकोप आदी समस्यांना तोंड द्यावे लागते. हायटल हार्निया हे जीईआरडीचे मुख्य कारण आहे. छातीत जळजळ होण्याबरोबरच काही लोकांना छातीत वेदना होण्याची समस्याही होऊ शकते. त्यामुळे लोकांना हृदयविकाराचा झटका आला की काय, असे वाटते. गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स का आणि कसा होतो ते जाणून घेऊया.आपण वाचत आहात ⸾⸾मा ⸾⸾हि ⸾⸾ती ⸾⸾ ° ⸾⸾से ⸾⸾वा ⸾ ⸾° ग्रू ⸾⸾प ⸾⸾, ⸾⸾पे ⸾⸾ठ⸾ ⸾व ⸾⸾ड ⸾⸾गा⸾ ⸾व ⸾⸾ची पोस्ट,* *गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स या आजारामध्ये पोटातील अन्नपदार्थ पुन्हा अन्ननलिकेत येतात. त्यामुळे पचनासाठी आवश्यक असलेली आम्ले ही देखील अन्ननलिकेत जातात. त्यामुळे छातीत जळजळ होऊ लागते. पोटाची ही वारंवार उद्भवणार्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास आरोग्यास हानी पोहोचू शकते.
जीआरडीची लक्षणे
जीईआरडीमध्ये पोटातील अन्नपचनासाठी लागणारे आम्ल हे पुन्हा वर उलट्या दिशेने अन्ननलिकेत जाते. त्यामुळे छातीत जळजळ होतेच; पण ती वाढल्यास उलटी देखील होते. त्याशिवाय फुफ्फुसे, कान, नाक किंवा घसा यांनाही त्रास होतो. गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्सबरोबर इतरही अनेक त्रास होऊ शकतात. जसे अन्ननलिका संकुचित होते, अन्ननलिकेच्या अंतत्वचेला व्रण पडतात. हा त्रास दीर्घकाळ होत राहिल्यास एक नवी अवस्था निर्माण होते, त्याला बॅरेटस् इसोफेगस होतो आणि वेळेवर या अवस्थेत उपचार न झाल्यास अन्ननलिकेचा कर्करोगही होऊ शकतो.
*🔹तणावपूर्ण जीवनशैली*
सातत्याने तणावाखाली राहिल्यास पोटाची अवस्था खराब होते.   तणाव आल्यास अॅड्रिनल ग्रंथींमधून अॅड्रेलिन आणि कॉर्टिसोल नावाच्या हार्मोनचे स्रावत निघतात. तणावामुळे संपूर्ण पचनसंस्थेमध्ये जळजळ होते, त्यामुळे पचननलिकेला सूज येऊ शकते आणि त्याच्या परिणामस्वरूप शरीरात पोषक घटकांची कमतरता होते.
*🔹पोटाचे आजार*
जीवनशैलीतील बदल हे या आजाराचे मुख्य कारण आहे. अतिमद्यपान, सिगरेट, फास्टफूडचे अतिसेवन आणि अतितणाव यामुळे हे आजार जडतात. तणावाचा परिणाम आपल्या मनोवस्थेवर होतोच पण पचनसंस्थेवरही होतो. त्याव्यतिरिक्त एकाएकी झालेले जनुकीय बदलांमुळेही पॅनक्रियाइटिस आणि पित्ताशयात पित्ताचे खडे साऱखे रोग अधिक होतात. गॅस्ट्रोएसोफेगल रिफल्क्स, इरिटेबल बॉवेल सिड्रोम, फंक्शनल डिस्पेप्सिया,स्थूलता, यकृतात चरबी जमा होणे आणि पेप्टिक अल्सर साऱखे आजार जीवनशैलीशी निगडीत गॅस्ट्रोइटेस्टाईनल रोगांमध्ये सामील आहेत.

2
तसंच आपण रोज डाव्या कुशीवर झोपायची सवय करून घेतली पाहिजे. डाव्या कुशीवर झोपल्याने आपलं पचन चांगलं होतं. पोटातील ऍसिड वर येत नाही, पित्त वाढतं नाही आणि त्यामुळे छातीत जळजळ किंवा ऍसिडिटी हे त्रास होत नाही. त्यामुळे सुरुवातीला तरी काही वेळ तरी आपण डाव्या कुशीवर झोपल पाहिजे.

आणखी वाचा

येथे क्लिक करा
उत्तर लिहिले · 3/6/2020
कर्म · 44255
1
ढेकर म्हणजे पोटातील गॅस तोंडाद्वारे बाहेर पडणे. हे आजाराचे लक्षण नसले तरी चार चौघात ढेकर येणे योग्य दिसत नाही. जेवताना अतिरिक्त वारं पोटात शिरल्यामुळे ढेकर येण्याचा प्रकार घडतो. येते आम्ही ढेकरावर उपाय सांगत आहोत जे अगदी सोपे आहेत:

पाणी: सतत ढेकर येत असल्यास घुट घुट गार पाणी प्यावं.

 

बडीशेप:  पोटासंबंधित समस्यांसाठी बडीशेप लाभदायक आहे. याने गॅसची समस्या दूर होते. बडीशेपचे रस आणि गुलाबजल समप्रमाणात मिळवून पिण्याने उचकी आणि ढेकर येणे थांबते. आपण बडीशेप चावूनही खाऊ शकता.

 

वेलची: ढेकर आल्यावर वेलची टाकून केलेला चहा हळू-हळू प्यावा.

 

पोदीना: पोदीनाचे सेवन केल्याने पोट स्वच्छ राहतं. पोदीनाचे पाने चहात टाकून सेवन करावे.

 

कोथिंबीर: ढेकर येत असल्यास कोथिंबीरची दंडी चावावी.

 

सोडा: गॅस विकारात सोडा पिणे फायदेशीर आहे. सोडा असॅडिक असल्यामुळे गॅसपासून मुक्ती मिळते.

 

लिंबू: काही न मिसळता ताज्या लिंबाचे रस प्यावं.

 

आलं: आल्याचा चहा पिण्याने किंवा आल्याचा रस मध मिसळून पिण्याने फायदा होतो.

 

लवंग: सतत ढेकर येत असल्यास तोंडात एक लवंग ठेवून चोखावी.

 

दूध: उचकी किंवा ढेकर येत असल्यास गार दूध पिण्याने फायदा होतो.

उत्तर लिहिले · 1/12/2018
कर्म · 5495