2 उत्तरे
2
answers
उत्तर प्रदेश मध्ये कोणता ताजमहाल आहे?
2
Answer link
आधुनिक शहाजहान : प्रेमासाठी बांधला ताजमहल 🕌
. *_उत्तरप्रदेश (बुलंद) : 'जिन्दा है शाहजहाँ की चाहत अब तक, जवान है मुमताज की उल्फत अब तक, जाकर देखो ताजमहल को यारो पत्थर से भी टपकती है मोहब्बत अब तक' अशा काहीशा भावना ताजमहलचं देखणं रुप पाहिल की मनात दाटून येतात. आग्र्याची आणि उत्तर प्रदेशची ओळख नाही म्हटल तरी ताजमहालमुळे होते असं म्हटल तरी अतिशयोक्ती ठरणार नाही._*
आग्र्यामधील ताजमहाल पाहून कुणीही नव्याने प्रेमात पडतोच, पण असाच आणखी एक ताजमहाल उत्तर प्रदेशमधील बुलंद शहरामध्ये आहे. भले त्याची 'नजाकता' ताजमहालच्या तुलनेत कुठेच नाही. पण ज्या कारणासाठी एका निवृत्त पोस्टमनने आपले सर्वंस्व गमावून हुबेहुब ताजमहल उभा केला ते कळाल्यास आपोआप डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. उत्तर प्रदेशमधील निवृत्त पोस्टमन फैजुल हसन कादरी (८२) यांनी प्राणाहून प्रिय असणाऱ्या पत्नीची आठवण म्हणून हुबेहुब ताजमहल उभा केला. ताजमहल उभा करण्यासाठी आयुष्यभराची जमवलेली पुंजी, जमीन सर्वकाही पणास लावूनही तो पूर्ण होऊ शकला नाही. अशा आधुनिक शाहजहाँ फैजुल हसन कादरी यांचा काल अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी मोटारसायकली धडक बसल्यानंतर त्यांच्यावर अलीगढमधील एका रुग्णालयात उपचार सुरु होते, पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. कादरी यांचा दफनविधी त्याच ताजमहलमध्ये करण्यात येणार आहे. त्याच ताजमहालमध्ये कादरींची पत्नी तज्जमुलीला दफन करण्यात आले आहे. कादरी यांनी निधनानंतर ताजमहालमध्ये पत्नीच्या बाजूला दफनविधी करावे अशी ईच्छा व्यक्त केली होती.डिसेंबर २०११ मध्ये कादरी यांच्या पत्नीचे निधन झाले.̶माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,कादरी आणि तज्जमुली यांना कोणतेही अपत्य नव्हते. दोघांनी त्याचा नात्यावर कोणताही परिणाम होऊ न देता अखेरच्या क्षणापर्यंत एकमेकांवर जीवापाड प्रेम करत राहिले. तरीसुद्धा दोघांच्या मनात एक खंत होती ती म्हणजे आपण या इहलोकाचा निरोप घेतल्यानंतर आपल्याला आणि आपल्या खानदानाला कोण लक्षात ठेवेल. तेव्हा कादरी यांनी पत्नीला असे काही वचन दिले की ते पाहूनच त्या दोघांच्या नात्याची साक्ष देते.
कादरी यांनी पत्नी तज्जमुलीला मिनी ताजमहाल बांधण्याचे वचन दिले. केवळ वचनावर न थांबता त्यांनी २०१२ मध्ये मिनी ताजमहालच्या बांधकामास सुरुवात केली. त्यासाठी कादरी आयुष्यभर जमवून ठवलेलं सर्वकाही त्या ताजमहलसाठी लावले. फंडामधील पैसे, दागिने आणि सगळी जमीन विकून हुबेहुब ताजमहाल व्हावा यासाठी रात्रंदिवस एक केला. कादरी यांनी १२ लाख रुपये खर्च करून ताजमहाल उभा केला. कादरी यांनी ताजमहलसाठी दगड, लाल दगड, चुना आणि सिमेंट आणि लोखंडाचा वापर केला.̶M̶̶a̶̶h̶̶i̶̶t̶̶i̶ ̶s̶̶e̶̶v̶̶a̶ ̶g̶̶r̶̶o̶̶u̶̶p̶̶,̶ ̶P̶̶e̶̶t̶̶h̶̶v̶̶a̶̶d̶̶g̶̶a̶̶o̶̶n̶
आग्र्यामधील ताजमहलचा जगातील आश्चर्यामध्ये समावेश असला तरी हा पोस्टमन कादरींचा ताजमहल बुलंद शहरामध्ये निश्चयाचा आणि निस्वार्थी प्रेमाचा प्रतीक बनून गेला आहे. भले त्या ताजमहालसारखाच बनवण्याचे स्वप्न कादरींचे अपूर्णच राहणार असले तरी पती आणि पत्नीमधील नाते काय असू शकते याचा दाखला देऊन गेला आहे. असा लढवय्या कादरी चिरंतन स्मरणात राहिल यात शंका नाही.

0
Answer link
भारतामध्ये दोन ताजमहाल आहेत:
- आग्रा येथील ताजमहाल: हा जगातील सर्वात प्रसिद्ध ताजमहाल आहे. हा उत्तर प्रदेश राज्यात आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
- मिनी ताजमहाल: याला 'छोटा ताज' म्हणून सुद्धा ओळखले जाते. हे उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.