2 उत्तरे
2
answers
सेनापती धनाजी जाधव समाधी परिसर पर्यटन स्थळ का होत नाही?
4
Answer link
मुघल बादशहा औरंगजेबाच्या छावणीचे कळस कापण्याचा महापराक्रम करणार्या संताजी-धनाजी यांच्या दहशतीमुळे मुघल सैन्य चांगलेच बिथरले होते. तलावाच्या पाण्यात संताजी-धनाजी दिसत असल्याने त्यांची घोडीही पाणी पीत नसल्याचे अवई उठली होती. अशा पराक्रमी जोडीपैकी सरसेनापती धनाजीराव जाधव यांचे निधन 28 जून 1710 रोजी कोल्हापूर जवळ असणार्या पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथे झाले. येथे त्यांची समाधी बांधण्यात आली. हे स्मारक पर्यटन नकाशावर येणे गरजेचे आहे.*
अशा या पराक्रमी सरसेनापतींबद्दल अनेकांनी इतिहासाच्या पाना-पानांत भरपूर वाचले आहे. मात्र, त्यांच्या स्मारकाबद्दल फारशी माहिती नसल्याने तेथे भेट देणार्यांची संख्या अंत्यंत दुर्मिळ आहे. हे चित्र बदलण्यासाठी सरसेनापती धनाजीराव जाधव स्मारक पर्यटन नकाशावर येणे गरजेचे आहे. यासाठी शासनासह इतिहास संशोधन संस्था-संघटना व शिवप्रेमींकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे. आज सरसेनापती धनाजीराव जाधव यांचा ३०९ वा स्मृतिदिन आहे.
शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर (इसवी सन 1680) त्यांनी निर्माण केलेले रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य नष्ट करण्याच्या उद्देशाने मुघल बादशहा औरंगजेब आपल्या प्रचंड सैन्यासह महाराष्ट्रात आला. छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून त्याने हालहाल करून मारले (इसवी सन 1689). यानंतर छत्रपती राजाराम महाराज व रणरागिणी ताराराणी यांनी स्वराज्याचे रक्षण केले. इसवी सन 1700 मध्ये छत्रपती राजाराम महाराजांचा अचानक मृत्यू झाल्याने ताराराणी यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळाला. याने खचून न जाता ताराराणींनी औरंगजेबाला निकराचा लढा देत स्वराज्याचे रक्षण केले. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांना भक्कम साथ मिळाली ती सरसेनापती धनाजीराव जाधव व सरसेनापती संताजी घोरपडे यांची. त्यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याने रयतेचे स्वराज्य स्वतंत्र ठेवले. हताश औरंगजेबाचा इसवी सन 1707 मध्ये मृत्यू झाला.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट रणरागिणी ताराराणी यांच्या नेतृत्वाखाली सरसेनापती धनाजीराव जाधव व संताजी घोरपडे यांनी केवळ स्वराज्याचे रक्षण केले नाही तर त्याच्या विस्तारासाठी कर्नाटक व अन्य प्रांतात मोहिमा यशस्वी केल्या.
*⚔समाधी स्थळाचे जतन व परिसर विकास ⚔*
सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या समाधी स्थळाचे जतन-संवर्धन-संरक्षण व्हावे या उद्देशाने पेठवडगांव नगपरिषदेच्या वतीने या परिसराचा विकास करण्यात आला. सरसेनापती धनाजीराव जाधव यांचा पुतळा बसविण्यात आला. याशिवाय महाराष्ट्र शाहीर परिषद व कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषद यांच्या सहकार्याने प्रतिवर्षी 28 जून रोजी स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन गेल्या अनेक वर्षांपासून अखंड केले जाते.
समाधी परिसरात निसर्ग मित्र संस्थेच्यावतीने येथे ‘स्मृतिवन’ संकल्पना राबविण्यात आली. धनाजीराव जाधव यांच्यासह सती गेलेल्या त्यांच्या पत्नी गोपीकाबाई यांच्या वृंदावन परिसरात स्मृतिवन विकसित करण्यात आले आहे. या अंतर्गत या परिसरात महाराष्ट्राचे राज्यफुल जारुळ, नागकेसर, कंकू फळ, आपटा, सीतेचा अशोक आदी झाडे लावण्यात आली आहेत. असे हे ऐतिहासिक स्मारक पर्यटनाच्या नकाशात येणे गरजेचे आहे. जेणेकरून याची माहिती भावी पिढीला होऊ शकेल.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=747483212316271&id=100011637976439
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
_*!|! माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव !|!*_
*🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵*
. _*ണคн¡т¡ รεvค*_
. *_:::::∴━━━✿━━━∴::::_*

0
Answer link
सेनापती धनाजी जाधव यांची समाधी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी या गावी आहे. ही समाधी एक महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळ आहे, परंतु काही कारणांमुळे ती अजून पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालेली नाही. याची काही कारणे खालीलप्रमाणे असू शकतात:
1. अपुरा विकास आणि सुविधा:
- पर्यटन स्थळासाठी आवश्यक सुविधांचा अभाव, जसे की राहण्याची सोय, चांगले रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे इत्यादी.
2. प्रसिद्धीचा अभाव:
- या स्थळाबद्दल लोकांना पुरेशी माहिती नाही. जाहिरात आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून या स्थळाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.
3. निधीची उपलब्धता:
- पर्यटन स्थळाच्या विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसणे हे देखील एक कारण असू शकते.
4. जतन आणि संवर्धन:
- समाधीस्थळाचे योग्य जतन आणि संवर्धन करणे आवश्यक आहे, जेणेकरून ते दीर्घकाळ टिकून राहील.
5. स्थानिक सहभाग:
- स्थानिक लोकांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे. त्यांच्या सहकार्याने या स्थळाचा विकास करता येऊ शकतो.
या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित करून सेनापती धनाजी जाधव यांच्या समाधीस्थळाला एक उत्तम पर्यटन स्थळ बनवता येऊ शकते.
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC)