3 उत्तरे
3
answers
संघटन म्हणजे काय ?
6
Answer link
संघटन म्हणजे काय ते पुढील प्रमाणे :-
संघटन म्हणजे समाजातील माणसांचा समूह बनविणे. सामाजिक जीवन सुरळित चालविण्यामागे दोन मूलभूत तत्त्वे दडलेली आहेत. संघटनात्मक जीवन जगणे, हे त्यातील प्रमुख तत्त्व होय. तसेच परस्परसंबंधांची आणि विचारांची देवाणघेवाण हे दुसरे तत्त्व होय. त्यातूनच सामाजिक संघटना विकसित होत जातात. संघटनांचे उद्दिष्ट, दिशा आणि मार्ग यांनी निश्चित केलेले असते. यांत सभासदांनी सहकार्य करण्याचे तत्त्व स्वेच्छेने स्वीकारलेले असते. त्यांच्यातील समन्वय संघटनेला पूरक ठरतो. एरवी सक्ती करून समन्वय साधण्याचा प्रयत्न केल्यास संघटना यशस्वी होईलच याची खात्री नसते; कारण अशा सक्तीने स्वयंप्रेरणा होत नाहीत. म्हणून समाजरचनेतील संघटनांचा विकास पूर्ण नियोजित असला तरच पुढचे कार्य सुलभ होते.
सहकार्य प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन प्रकारचे असते. जेथे व्यक्ती सहकार्य निःस्वार्थीपणे करीत रहाते, तेथे सहकार्य प्राथमिक स्वरूपाचे रहाते. मानवशास्त्रज्ञांच्या मते नातेसंबंध हे अनौपचारिक संघटनेचे उदाहरण होय; तर हेतूपूर्वक स्थापन झालेल्या (कामगार संघटना, राजकीय संघटना ) संघटना या औपचारिक स्वरूपाच्या असतात. अनौपचारिक संघटनांमध्ये श्रम- महत्त्व असून ठरवून दिलेली जबाबदारी प्रत्येकजण पार पाडतो आणि अशा सहभागातून मोठी योजनाही सहजपणे पार पडते. उदा., मोठमोठी संमेलने, चळवळी, कांतीसारख्या अजरामर कृती.
संघटनेसाठी कुशल नेतृत्वाची गरज असते. निष्ठा निर्माण करु शकणारे नेते आणि निष्ठावान कार्यकर्त्यांचा सहभाग यांमुळे संघटित प्रयत्न यशस्वी होतात. नेतृत्वाइतकीच महत्त्वाची गरज असते, ती कार्यक्षम व्यवस्थापनाची. संघटन मोठ्या अथवा लहान प्रमाणावर असो, काळ अल्प किंवा दीर्घ असो, कार्यक्रम आखताना शेवटपर्यंत सहकार्य कसे टिकून राहील, यासाठी व्यूहरचना करावी लागते. आधुनिक काळात केवळ त्याग, निष्ठा आणि सेवा यांच्यामुळे संघटन टिकाव धरू शकत नाही. त्यासाठी विविध गुण असणारी सक्षम माणसे एकत्र यावी लागतात. जबाबदारी स्वीकारणाऱ्यांनी ती पार पाडली नाही, तर नियोजन कागदावरच रहाते.

0
Answer link
संघटन (Organization):
संघटन म्हणजे समान ध्येय किंवा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्र आलेल्या लोकांचा समूह. हे लोक एक विशिष्ट रचना आणि नियमांनुसार काम करतात.
संघटनेची काही वैशिष्ट्ये:
- Ortak Uddeş (Common Goal): संघटनेतील लोकांचे एक सामायिक उद्दिष्ट असते.
- Rəhbərlik (Leadership): संघटनेत एक नेता असतो जो लोकांना मार्गदर्शन करतो.
- İşbirligi (Coordination): संघटनेतील लोक एकमेकांच्या मदतीने काम करतात.
- Qaydalar (Rules): संघटनेत काम करण्यासाठी काही नियम असतात.
संघटनेचे प्रकार:
- व्यवसाय संघटना (Business Organization)
- सामाजिक संघटना (Social Organization)
- राजकीय संघटना (Political Organization)