मनोरंजन व्यक्तिमत्व चित्रपट अभिनेते

रजनीकांत विषयी माहिती पाहिजे?

2 उत्तरे
2 answers

रजनीकांत विषयी माहिती पाहिजे?

7
रजनीकांत

शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत
हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेता, मनोरंजन व्यवसायातील सर्वांत प्रसिद्ध व्यक्ती, भारतीय चित्रपटक्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व, एक ख्यातनाम तमिऴ चित्रपट अभिनेते आणि परोपकारी/लोककल्याणकारी व्यक्ती आहेत. तमिऴनाडू राज्यात एम.जी.रामचंद्रन ह्यांच्यानंतरचे सर्वात यशस्वी कलाकार म्हणून रजनीकांत ह्यांची ख्याती आहे. भारतीय चित्रपटक्षेत्रात ते महानायक अमिताभ बच्चन ह्यांच्याहूनही अधिक यशस्वी कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेत.

रजनीकांत शिवाजीराव रामोजीराव गायकवाड
डिसेंबर १२, १९५०
बंगळूर, कर्नाटकइतर नावेरजिनी, तलैवर, सुप्परस्टार ,बॉस.राष्ट्रीयत्वभारतीयकार्यक्षेत्रअभिनय (चित्रपट : कन्नड, तेलुगू, तमिळ, हिंदी, मल्याळम, इंग्लिश, बंगाली)कारकीर्दीचा काळइ.स. १९७५ पासून भाषा मराठी, तमिळप्रमुख चित्रपटशिवाजी द बॉस, बिल्ला, दळपती, चंद्रमुखी, बाशा, मुतू, पडैयप्पा .वडीलश्री.रामोजीराव गायकवाड.आईसौ.जिजाबाई गायकवाड.पत्नी लता (रंगाचारी)रजनीकांत.अपत्ये मुलगी ऐश्वर्या रजनीकांत, मुलगी सौंदर्या रजनीकांत.

रजनीकांत गेल्या तीन दशकांहून अधिक काळ तमिऴ चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवत आहेत. तमिऴ आणि एकंदरीतच दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीचे अनभिषिक्त सम्राट, प्रेक्षकांची अलोट गर्दी खेचून आणणारे, आपल्या संवादफेकीबद्दल आणि आपल्या विशिष्ट अभिनय शैलीकरिता रजनीकांत प्रसिद्ध आहेत.

रजनीकांत तमिऴ चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेते आहेत. दक्षिण भारतात त्यांच्या नावावर सर्वात जास्त यशस्वी चित्रपट आहेत. त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगालीतसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यांची मातृभाषा मराठी असली, तरीही त्यांनी मराठी चित्रपटांत अद्याप पर्यंत काम केलेले नाही.

२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.
उत्तर लिहिले · 2/10/2019
कर्म · 10670
0

रजनीकांत (जन्म: १२ डिसेंबर, १९५०) हे एक लोकप्रिय भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता आणि पटकथा लेखक आहेत. त्यांचे मूळ नाव शिवाजीराव गायकवाड आहे.

कारकीर्द:

  • रजनीकांत यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात १९७५ मध्ये के. बालचंदर यांच्या 'अपूर्वा रागंगल' या चित्रपटातून केली.
  • त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत मोठे यश मिळवले आणि ते 'थलैवा' (Thalaivar) म्हणून ओळखले जातात.
  • रजनीकांत यांनी हिंदी, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि बंगाली चित्रपटांमध्येही काम केले आहे.
  • 'बाशा', 'शिवाजी', 'एंथिरन' आणि 'कबाली' हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.

पुरस्कार आणि सन्मान:

  • भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण (२०१६) आणि पद्मभूषण (२०००) पुरस्काराने सन्मानित केले आहे.
  • सिनेमातील योगदानाबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

राजकीय विचार: रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली होती, परंतु काही कारणांमुळे त्यांनी माघार घेतली.

अधिक माहितीसाठी आपण खालील दुवे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1100

Related Questions

अक्षय कुमारच्या वडिलांचे नाव काय आहे?
सलमान खान चे पूर्ण नाव काय आहे?
मराठी चित्रपट अभिनेते सूर्यकांत यांच्या विषयी माहिती द्या?
अमिताभ बच्चन यांची जन्म तारीख काय आहे?
एक जुना हिंदी अभिनेता?
अमिताभ बच्चन यांचे आडनाव बच्चन का आहे?
अक्षय कुमारचे आडनाव काय आहे?