2 उत्तरे
2
answers
अमिताभ बच्चन यांचे आडनाव बच्चन का आहे?
5
Answer link

*🤔अमिताभ यांनी 'बच्चन' आडनाव का लावले?*
कोची येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय जाहिरात संघाच्या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी आपण 'बच्चन'आडनाव का वापरले याचा खुलासा केला. ते म्हणाले, जात लपवण्यासाठी माझे वडील हरिवंशराय बच्चन यांनी 'बच्चन' हे आडनाव लावले.
आमचे आडनाव श्रीवास्तव होते. मात्र आपल्याकडे आडनावावरून जात, धर्म ओळखला जातो. माझ्या वडिलांचा जातीधर्मावर विश्वास नसल्याने ही प्रथा बंद व्हावी यासाठी त्यांनी श्रीवास्तव हे आडनाव बदलून बच्चन असे ठेवले. मी माझ्या वडिलांची परंपरा पुढे चालवली, असेही बिग बी म्हणाले.
0
Answer link
अमिताभ बच्चन यांचे मूळ आडनाव श्रीवास्तव होते. त्यांचे वडील हरिवंशराय बच्चन, जे एक प्रसिद्ध हिंदी कवी होते, त्यांनी ते बदलून 'बच्चन' केले.
'बच्चन' हे त्यांचे साहित्यिक टोपणनाव होते, जे त्यांनी त्यांच्या कवितांसाठी वापरले. हरिवंशराय यांनी हेच नाव आपल्या कुटुंबासाठी आडनाव म्हणून निवडले.
अमिताभ बच्चन यांचे 'बच्चन' आडनाव त्यांच्या वडिलांनी साहित्य आणि कलेसाठी केलेल्या योगदानाला आदराने समर्पित आहे.
या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण खालील दुवे पाहू शकता: