मासिक पाळी नियमित येण्यासाठी काय उपाय आहेत?
. *_मासिक पाळी नियमित येणे हे प्रत्येक स्त्रीसाठी महत्त्वाचे असते. काही स्त्रियांना पाळी दर महिन्याला अगदी वेळेवर येते तर काहीजणींना कित्येक महिने येतच नाही. पाळी अनियमित होण्याची कारणे अनेक आहेत. मासिक पाळी सुरु होण्याचा काळ, प्रजननक्षम वयातील अनियमित पाळी, पीसीओडी, थायरॉइड डिसऑर्डर्स, स्थूलत्व किंवा चाळीशीनंतरची अनियमित पाळी अशी अनेक कारणे आहेत_*
*_याव्यतिरीक्त आपली सध्याची जीवनशैलीही याला कारणीभूत आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहेच पण त्याव्यतिरीक्त घरगुती उपायही तुम्हाला उपयोगी पडू शकतात. त्याविषयी जाणून घेऊयात._*
♦१. आलं –
एक कप पाण्यात एक इंच आलं किसून पाच मिनिटं उकळवा. त्यात थोडंस मध मिसळा. दिवसातून तीन वेळा हे मिश्रण प्या. यामुळे पाळी नियमित येण्यास मदत होईल तसेच पाळीदरम्यान होणारा पोटदुखीचा त्रासही कमी होईल.
♦२) बडीशेप
दोन चमचे बडीशेप एक ग्लास पाण्यात मिसळा आणि ते रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी पाणी गाळून प्या. हे नियमित केल्यास पाळी व्यवस्थित येईल.
♦३. दालचिनी –
एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पावडर टाकून ते काही आठवडे प्या.
♦४. फळे आणि भाज्यांचा रस शरीरात पोषणतत्वांचा अभाव असणे हे पाळी अनियमित असण्याचे मुख्य कारण आहे.माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,त्यामुळे फळं आणि भाज्यांचा ज्यूस योग्य पोषणतत्व आणि जीवनसत्वासाठी उपयोगी आहे. याने पाळीही नियमित येते. गाजर आणि द्राक्षाचा ज्यूस मुख्यत्वे घ्या.
♦५. गरम पाण्याने शेक घेणे-
पाळी दरम्यान होणारा त्रास कमी करण्यासाठी अनेक महिला उष्णतेचा आधार घेतात. हॉट वॉटर बॅग किंवा जाड टॉवेल गरम पाण्यात भिजवून ते पोट आणि पाठीवर ठेवल्यावर बराच आराम मिळतो.
याचसोबत पाळी अनियमित होऊ नये म्हणून नियमित व्यायाम, वजनावर नियंत्रण, मानसिक ताण कमी करणे, आहार संतुलित आणि वेळच्या वेळी घेणे गरजेचे आहे.
- आहार:
नियमित आणि संतुलित आहार घ्या. आहारात फळे, भाज्या, धान्ये आणि प्रथिने यांचा समावेश असावा.
- व्यायाम:
नियमित व्यायाम करणे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. योगा केल्याने मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते.
- पुरेशी झोप:
दररोज रात्री 7-8 तास झोप घेणे आवश्यक आहे.
- तणाव व्यवस्थापन:
तणाव कमी करण्यासाठी ध्यान, श्वासोच्छ्वास व्यायाम, किंवा आपल्या आवडीच्या गोष्टी करा.
- हळद:
हळद मासिक पाळी नियमित करण्यासाठी गुणकारी आहे. एक ग्लास दुधात चिमूटभर हळद टाकून प्यायल्याने फायदा होतो.
- आले:
आले मासिक पाळीच्या समस्यांवर फायदेशीर आहे. आल्याचा चहा प्यायल्याने मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते.
- दालचिनी:
दालचिनी मासिक पाळी नियमित करण्यासाठी उपयुक्त आहे. दालचिनीचा चहा किंवा दालचिनी पावडर दुधात মিশ्रণ करून घ्या.
- बडीशेप:
बडीशेप मासिक पाळी नियमित करण्यासाठी मदत करते. बडीशेप रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्या.
- डॉक्टरांचा सल्ला:
जर मासिक पाळी अनियमितच राहिली, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार उपचार करा.