बांधकाम आपत्ती पूर

धरणे का फुटतात?

2 उत्तरे
2 answers

धरणे का फुटतात?

2
❓ _*धरणे का फुटतात?*_


रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामधील तिवरे धरण फुटल्याची दुर्घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर धरण फुटण्याची कारणे, त्याची लक्षणे आणि उपाययोजना याबाबत.

🔸 _*धरणांचे प्रकार*_
राज्यात मातीचे आणि सिमेंट काँक्रिट अशी दोन प्रकारची धरणे आहेत.
* तिवरे हे मातीचे धरण होते.
* जायकवाडी धरण हे आशिया खंडातील सर्वांत मोठे मातीचे धरण आहे
* राज्यात १४१ मोठी धरणे आहेत.
* २५८ मध्यम प्रकल्प आणि २८६८ लघु प्रकल्प आहेत.

🔸 _*धरणांच्या जागा*_
* कोणत्याही ठिकाणी धरण बांधण्यापूर्वी धरणाची जागा कशी आहे, हे तपासले जाते.
* धरणाचा पाया मजबूत असावा लागतो. त्यासाठी संबंधित परिसरात भूकंप झाला आहे का किंवा होण्याची शक्यता आहे का, याची माहिती घेतली जाते.
* धरणाच्या ठिकाणी असलेल्या खडकाची क्षमता तपासली जाते. अभेद्य खडक हे धरणासाठी चांगले समजले जातात.
* धरणासाठी जागा निवडण्यापूर्वी धरण परिसरातील पर्जन्यमानाचा अभ्यास केला जातो.
* धरणामुळे किती गावे विस्थापित होतील, याचीही विचार केला जातो.

🔸 _*धरण फुटण्याची कारणे*_
* धरणामध्ये असलेले खेकडे; तसेच उंदिर आणि घुशी यांच्यामुळे पाइपिंग तयार होते
* पाइपिंग म्हणजे घुशी, उंदिर, खेकडे हे बिळे पडतात. ती बिळे एकमेकांशी जोडल्यानंतर पोकळी निर्माण होते. त्यामध्ये पाणी गेल्यावर धरण फुटण्याचा धोका संभवतो
* झाडाची मुळे ही धरणात खोलवर गेलेली असतात. झाड तोडण्यात आले तरी, मुळे ही खोलवर रुतल्यामुळे धरणाच्या मजबुतीला धोका निर्माण होतो. मुळे खोलवर रुतल्यानंतर कुजून त्यातून पाइपिंग तयार होते. त्यामुळे कालांतराने धरण कमकुवत होऊ शकते
* धरणाच्या मूळ आकारात बदल होऊ लागल्यास धरण धोकादायक बनू शकते. मातीचे धरण असल्यास मातीचा थर ढासळू लागतो. त्याकडे वेळीच लक्ष न दिल्यास धरण फुटण्याचा धोका असतो
* धरण बांधताना काही ठिकाणी माती आणि सिमेंट या दोन्हींचा वापर केलेला असतो. माती आणि सिमेंट काँक्रिटचे बांधकाम एकत्र झालेल्या ठिकाणी कालांतराने भेगा पडण्याची शक्यता असते. त्यातून धरणाला धोका होतो
* धरणाचा पाणीसाठा क्षमतेपेक्षा जास्त झाल्यास किंवा धरणाच्या भिंतीवरून पाणी गेल्यास धरण कमकुवत होत असते.

🔸 _*धरण फुटीची लक्षणे*_
* धरण फुटण्याचा धोका असल्यास धरणाच्या भिंतींतून गळती होऊ लागते.
* धरणांमध्ये काही प्रमाणात गळती ही होत असते. प्रत्येक सेकंदाला अडीचशे लिटरपर्यंत गळती होत असल्यास ती गळती धोकादायक समजली जात नाही.
* या प्रमाणापेक्षा जास्त गळती झाल्यास धरण धोकादायक बनते.
* धरणाच्या आजूबाजूला असलेल्या विहिरींची पाण्याची पातळी कमी होत नसल्यास संबंधित धरणातून गळती होत असल्याचा अंदाज बांधला जातो.
* धरणाच्या परिसरातील विहिरींमध्ये गढूळ पाणी आढळल्यास ते धरण धोकादायक बनल्याचे सूचक असते.

🔸 _*दुरुस्ती आणि व्यवस्थापन महत्त्वाचे*_
* कोणतेही धरण बांधल्यानंतर त्याची नियमित दुरुस्ती आणि व्यवस्थापन करणे महत्त्वाचे असते
* पावसाळा सुरू होण्यापूर्वी आणि पावसाळा संपल्यानंतर प्रत्येक धरणाची संपूर्ण तपासणी करून त्याचा अहवाल नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधक संस्थेकडे द्यावा लागतो
* प्रत्येक धरणांवर अभियंत्यांची नेमणूक केलेली असते. त्यांच्याकडून धरणाची सुरक्षितता तपासली जाते. धरण कमकुवत किंवा फुटण्याची लक्षणे आढळल्यास संबंधित अभियंत्यांकडून त्याबाबतची माहिती दिली जाते.
*वेळीच माहिती दिल्यास जलसंपदा विभागाकडून ताबडतोब उपाययोजना केल्या जातात. मात्र, दुर्लक्ष झाल्यास धरण फुटीचा धोका संभवतो.
उत्तर लिहिले · 23/7/2019
कर्म · 569225
0

धरणे अनेक कारणांमुळे फुटू शकतात, त्यापैकी काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • पुराचा जास्त दबाव: जेव्हा धरणाच्या जलाशयात पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त वाढते, तेव्हा धरणावर अतिरिक्त दबाव येतो. या दबावामुळे धरण फुटू शकते.
  • धरणाची रचना आणि बांधकाम: धरणाची रचना सदोष असल्यास किंवा बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्यास, धरण कमजोर होऊन फुटण्याची शक्यता असते.
  • भूकंप: भूकंपांमुळे धरणाच्या संरचनेला तडे जाऊ शकतात, ज्यामुळे ते कमजोर होऊन फुटू शकते.
  • नैसर्गिक आपत्ती: अतिवृष्टी, भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे धरणाचे नुकसान होऊ शकते आणि ते फुटू शकते.
  • देखभाल आणि दुरुस्तीचा अभाव: धरणांची नियमित तपासणी करणे आणि आवश्यक दुरुस्ती करणे आवश्यक असते. यात निष्काळजीपणा झाल्यास धरण कमजोर होऊन फुटू शकते.
  • मानवी हस्तक्षेप: काही वेळा मानवी हस्तक्षेपामुळे, जसे की बांधकामात भ्रष्टाचार किंवा तोडफोड, धरण फुटू शकते.

याव्यतिरिक्त, पाण्याची वाढती मागणी आणि बदलामुळे धरणांवरील ताण वाढतो, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची समस्या निर्माण होते.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 980

Related Questions

आपत्ती व्यवस्थापनावर एक वाक्यात चर्चा करा?
आपत्ती व्यवस्थापनावर चर्चा?
नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती यांची यादी व उपाययोजना?
नैसर्गिक आपत्ती व दोन विकास प्रकल्पाचा आढावा कधी घेण्यात आला?
आपत्ती व्यवस्थापनासाठी काय उपाय आहेत?
अतिवृष्टी, दुष्काळ किंवा भूकंप यांसारख्या दुर्घटना झाल्यास तुम्ही काय कराल?
आपती निशयि माहिती?