अतिवृष्टी किंवा दुष्काळ किंवा भूकंप झाल्यास काय करावे
भूकंप भूकंपादरम्यान काय करावे? भूकंप परिस्थिती निर्माण झाल्यास अधिकाधिक सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा. कधीकधी सुरुवातीला भूकंपाचा लहान धक्का बसतो व त्यानंतर त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता असते. अशावेळी कमीत कमी हालचाल करुन सुरक्षित स्थळी पोहोचावे आणि जमिनीची हालचाल थांबेपर्यंत घरात/वास्तूत थांबावे व लगेचच बाहेर पडून सुरक्षित जागी जावे.
घरामध्ये असाल तर..
• जमिनीवर बसा; अभ्यासाचं टेबल किंवा कोणत्याही एखाद्या फर्निचरखाली जाऊन स्वतःला झाकून घ्या आणि जमिनीची हालचाल थांबेपर्यंत तेथेच थांबा. तुमच्या आसपास कुठे टेबल किंवा डेस्क नसेल तर घराच्या एखाद्या कोपऱ्यात खाली बसून दोन्ही हात गुडघ्यभोवती गुंडाळून त्यात तुमचा चेहरा झाकून घ्या.
• आतला दरवाज्याची चौकट, खोलीचा कोपरा, टेबल किंवा पलंगाच्या खाली थांबून स्वतःचे रक्षण करा.
• काचा, खिडक्या, बाहेरील दरवाजे आणि भिंती किंवा कोसळू शकणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून लांब राहा.
• भूकंप आला असेल आणि तुम्ही अंथरुणात असाल तर तेथेच थांबवा. स्वतःचे डोके आणि चेहरा उशीने झाकून तेथेच थांबा. मात्र छतावर असलेली एखादी अवजड वस्तू खाली कोसळत नाहीये याची खात्री करा. अशावेळी एखाद्या जवळच्या सुरक्षित स्थळी जाऊन थांबा.
• जवळ असणाऱ्या एखाद्या प्रवेशद्वाराचा निवाऱ्यासाठी वापर करा. मात्र, या प्रवेशद्वाराचा मजबूत आधार मिळेल ही खात्री करुन घ्या.
• जमिनीची हालचाल थांबेपर्यंत आतच थांबा आणि मग बाहेर जा. भूकंप आल्यानंतर लोक बाहेर पडून इतर ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतानाच जखमी होतात असे अनेक संशोधनाअंती आढळून आले आहे. • भूकंप आल्यानंतर वीज पसरु शकते किंवा स्प्रिंकलर सिस्टम्स किंवा फायर अलार्म्स सुरु होऊ शकतात.
घराबाहेर असाल तर..
• तुम्ही सध्या असाल त्या जागेवरुन कुठेही हलू नका. मात्र, इमारती, झाडे, पथदिवे आणि विजेच्या तारांपासून दूर व्हा.
• जर तुम्ही मोकळ्या जागेवर असाल, तर भूकंपाचे धक्के कमी होईपर्यंत तिथेच थांबा. इमारतीबाहेरची जागा, बाहेर पडण्याची ठिकाणी आणि बाहेरील भिंतीशेजारी मोठा धोका असतो. भूकंपाचा परिणाम म्हणून बऱ्याचददा भिंती कोसळतात, काचा फुटतात आणि वस्तू जागेवरुन पडतात असे आढळून आले आहे.
चालत्या वाहनात असाल तर...
• सुरक्षित ठिकाण पाहून लगेच वाहन थांबवा आणि तुम्हीदेखील वाहनाच्या आत थांबा. मात्र, इमारती, झाडे, विजेच्या तारांजवळ थांबू नका. • भूकंप थांबल्यानंतर हळूहळू वाहन सुरु करा. भूकंपाचा धक्का बसलेले रस्ते, पूल आणि उतारावरुन जाण्याचे टाळा.
ढिगाऱ्याखाली अडकले असाल तर...
• काडी पेटवू नका.
• धूळीखाली असताना हलू नका किंवा ढिगाऱ्याला लाथा मारु नका
• हातरुमाल किंवा कपड्याने आपले तोंड झाकून घ्या.
• जवळचा पाईप किंवा भिंत वाजवा जेणेकरुन बचावकार्य करणाऱ्या लोकांना तुम्हाला शोधता येईल. एखादी व्यक्ती जवळ असेल तर शिटी वाजवा. शेवटचा उपाय म्हणून आरडाओरडा करा. कारण असे केल्यास तुमच्या शरीरात धोकादायक प्रमाणात धूळ जाण्याची शक्यता आहे.
पूर जर तुमच्या आजूबाजूच्या भागात जर पूर आला असेल तर...
• माहितीसाठी रेडिओ किंवा टीव्ही ऐका.
• अतिवृष्टीमुळे पूर येऊ शकतो हे लक्षात ठेवा. पावसामुळे पूर येण्याची शक्यता असल्यास उंचावर जाऊन थांबा. त्यासाठी कोणाच्याही सूचनेची वाट पाहू नका.
• प्रवाह, ड्रेनेज चॅनेल, कॅन्यन आणि पूराचा धोका असणाऱ्या प्रदेशांमध्ये सावधान राहा. अशा भागांमध्ये कोणत्याही पुर्व इशाऱ्याशिवाय पूर येऊ शकतो.
तुम्ही घराबाहेर पडण्याची तयारी करत असाल तर...
• आपले घर सुरक्षित ठेवा. हातात वेळ असेल तर बाहेरचे फर्निचर आत आणून ठेवा. महत्त्वाच्या वस्तू वरच्या मजल्यावर हलवा.
• तुम्हाला सूचना मिळाली असेल तर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे मुख्य स्विचेस आणि वॉल्व बंद करा. सर्व विद्युत उपकरणे बंद करुन ठेवा. तुम्ही पाण्यात असाल किंवा ओले झाले असाल तर विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका.
घर सोडणे आवश्यक असल्यास, या गोष्टी लक्षात ठेवा...
• वाहत्या पाण्यात चालू नका. प्रवाहाची सहा इंचापेक्षा जास्त असेल तर तुमचा तोल जाऊ शकतो. प्रवाही नसणाऱ्या पाण्यात तुम्ही चालू शकता. जमिनीवर पाय घट्ट ठेवण्यासाठी जमिनीची तपासणी करण्यासाठी एखादी काठी सोबत ठेवा.
• पूर आलेल्या भागांमध्ये जाऊ नका. जर आपली गाडी पाण्याखाली जायची असेल तर ती तशीच राहू द्या आणि तुम्ही सुरक्षित स्थळी धाव घ्या. पाण्याच्या प्रवाहात तुम्ही आणि तुमचे वाहन वेगाने वाहून जाऊ शकते.
प्रत्यक्ष पूरस्थिती उद्भवल्यास...
1. सरकारी आज्ञेचे पालन करा आणि अधिक सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा.
2. सुरक्षित ठिकाणी रहा आणि योग्य ती माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करा.
3. विद्युत पुरवठा बंद करा आणि उघड्या तारांना स्पर्श करु नका.
4. अफवांमुळे घाबरुन जाऊ नका आणि स्वतः अफवा पसरवू नका.
हे करा..
1. विद्युत आणि गॅस उपकरणे व मुख्य स्विचेस बंद करा.
2. आपात्कालीन किट सोबत ठेवा आणि तुमचे मित्र आणि कुटुंबीयांना तुम्ही कोठे जात आहात हे कळवा.
3. पूराच्या पाण्याशी संपर्क टाळा. हे पाणी मल, तेल, रसायने किंवा इतर पदार्थांमुळे दूषित असू शकते.
4. तुम्हाला जर पाण्यात उभे राहायचे असेल तर खांब किंवा काठीचा वापर करा. पाण्याची खोली तसेच ड्रेनेजचे खड्डे आणि नाले तपासा.
5. विजेच्या तारांपासून लांब रहा कारण पाणी हे विद्युतप्रवाहाचे वाहक आहे. वीज कंपन्यांकडे खाली पडलेल्या विजेच्या तारांविषयी तक्रार करा.
6. पूराचे पाणी ओसरलेल्या जमिनीवरुन चालताना काळजी घ्या. ढिगाऱ्याखालील जमिनी व फरशांवर फुटलेल्या काचा, अणकुचीदार वस्तू, खिळे इत्यादी वस्तू असू शकतात. चिखल आणि गाळ साचलेल्या जमिनीवरुन पाय घसरण्याची भीती असते.
7. अद्ययावत माहिती व बातम्या मिळविण्यासाठी रेडिओ किंवा टेलिव्हिजन ऐका.
8. इमारतीचे छत ओले झाले असेल तर वीज बंद करा. जिथून पाणी गळत असेल तेथे खाली बादली ठेवा आणि छताला लहानसे छिद्र पाडा जेणेकरुन त्यावरील भार थोडा कमी होईल.
9. खोलीतील पाणी काढून टाकण्यासाठी बादल्या, स्वच्छ टॉवेल्स आणि कपड्यांचा वापर करा.
10. फर्निचर आणि ओल्या कार्पेटमध्ये अॅल्युमिनियम फॉइल शीट ठेवा.
हे करु नका...
1. वाहत्या पाण्यातून चालू नका. त्यामुळे तुमचा पाय घसरण्याची भीती आहे.
2. वाहत्या पाण्यामध्ये पोहू नका. यादरम्यान वाहून जाण्याची किंवा एखाद्या वस्तूला धडकण्याची दाट शक्यता असते.
3. पूरग्रस्त भागातून वाहने नेऊ नका. तुम्हाला त्या परिसरातील अडथळ्यांचा अंदाज येणार नाही. तसेच अवघ्या अर्धा मीटर पाण्यात वाहने वाहून जाण्याची दाट शक्यता असते. तसेच पूरग्रस्त भागातून वाहने चालवताना आजूबाजूच्या मालमत्तेचे नुकसान होऊ शकते.
4. पुराच्या पाण्याच्या संपर्कात आलेले कोणतेही अन्न खाऊ नका.
5. अभियंताने तपासणी केल्याशिवाय वीजेचा वापर सुरु करु नका. गॅस गळतीबाबत सावध रहा. मेणबत्त्या, कंदील किंवा कसलीही ज्योत पेटवू नका.
6. वस्तूंवरील चिखल घासण्याचा प्रयत्न करु नका. यामुळे मालमत्तेचे आणखी नुकसान होऊ शकते.
7. छत ओले असताना त्याला जोडलेली उपकरणे वापरु नका.
8. ओल्या फरशीवर उभे राहून टीव्ही, व्हीसीआर, सीआरटी टर्मिनल्स किंवा इतर इलेक्ट्रीकल उपकरण सुरु करु नका.
9. व्हॅक्यूम क्लीनरचा वापर करून साचलेले पाणी काढण्याचा प्रयत्न करू नका.
10. तळघरातील पाणी बाहेर काढण्याची घाई करु नका. गरजेपेक्षा अधिक कमी वेळात पाण्याचा दबाव कमी झाला तर भिंतींवर ताण वाढू शकतो.
भूस्खलन हे करा...
• हवामान विभाग किंवा न्यूज चॅनेलवर माहिती पाहून डोंगराळ प्रदेशात दौरा आखा.
•वेळ न दवडता भूस्खलन मार्गावरुन किंवा दऱ्यांपासून लांब जा.
• गटारे स्वच्छ ठेवा,
• कचरा, पाने, प्लॅस्टिकची पिशव्या, मलबा इत्यादीचा निचरा झाला आहे याची तपासणी करा.
• ‘वीप होल्स’ उघडे ठेवा.
• भरपूर झाडे लावा जेणेकरुन ते मातीला मूळापासून घट्ट धरुन ठेवतील.
• भूस्खलनाचा इशारा देणाऱ्या प्रदेशातील दगड कोसळलेल्या, खचलेल्या इमारतींची तपासणी करा आणि सुरक्षित स्थळी धाव घ्या. नदीतील गढूळ पाण्यावरुनदेखील वरच्या भागात भूस्खलन झाल्याचा अंदाज येऊ शकतो.
• भूस्खलनाच्या सूचनांकडे लक्षा द्या आणि जवळच्या तहसील किंवा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क साधा.
• जमिनीच्या उतारांची टोके कापलेली नाहीत आणि सुरक्षित आहेत याची खात्री करा. जोपर्यंत नवी झाडे लावण्याची योजना केली जात नाही तोपर्यंत जुनी झाडे कापू नका.
• झाडांची पडझड किंवा खडक कोसळण्याच्या अनैसर्गिक आवाजांकडे लक्ष द्या.
• भूस्खलनाचा परिणाम होण्याची शक्यता असल्यास दक्ष, जागृत आणि सक्रिय राहा.
• योग्य आश्रयस्थान शोधा
• आपल्या कुटुंब आणि मित्र मैत्रिणींसोबत राहण्याचा प्रयत्न करा.
• जखमी आणि अडकलेल्या लोकांना शोधण्याचा प्रयत्न करा.
• तुम्ही जात आहात तो मार्ग लक्षात ठेवा जेणेकरुन तुम्ही जंगलात हरवणार नाही.
• हेलिकॉप्टर व बचाव पथकांना आपत्कालीन वेळ दरम्यान संकेत कसे द्यायचे आणि कशा प्रकारे संवाद साधावे हे जाणून घ्या. हे करु नका..
• बांधकाम सुरु असणाऱ्या किंवा संवेदनशील भागात राहण्याचे टाळा.
• रडून किंवा घाबरुन तुमची ऊर्जा खर्च करु नका.
• उघड्यावरील वस्तू किंवा सूटलेल्या विद्युत तारांना स्पर्श करु नका. जवळच्या ढिगाऱ्याजवळ आणि ड्रेनेज मार्गाजवळील घरे बांधू नका.
• झरे, विहिरी किंवा नद्यांचे दूषित झालेले पाणी थेट पिऊ नका.
• मोठा धोका असल्याशिवाय जखमी व्यक्तींना प्रथमोपचार न करता हलवू नका.
चक्रीवादळ
जेव्हा चक्रीवादळाला सुरुवात होते..
• रेडिओ ऐका (ऑल इंडिया रेडिओ स्टेशन्स हवामानासंदर्भातील इशारा देतात).
• इशाऱ्यांकडे लक्ष ठेवा. यामुळे चक्रीवादळानंतर निर्माण होणाऱ्या आणीबाणीसाठी तयारी करण्यास मदत मिळेल.
• इतरांनाही माहिती कळवा.
• अफवांकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःदेखील त्यांना पसरवू नका. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होणार नाही.
• शासकीय माहितीवर विश्वास ठेवा.
• जेव्हा आपल्या क्षेत्रासाठी चक्रीवादळासंदर्भता सतर्कतेचा इशारा मिळेल आपले दैनंदिन कामकाज सुरु ठेवा परंतु रेडिओवरुन मिळणाऱया यासंदर्भात मिळणाऱ्या माहितीवर लक्ष ठेवा.
• चक्रीवादळ इशारा मिळाल्यानंतर पुढील २४ तास दक्ष राहा. जेव्हा तुमचा परिसर चक्रीवादळाच्या प्रभावाखाली येण्याचा इशारा असेल तेव्हा समुद्र किनाऱयाजवळील सखल भागातून दूर जा.
• तुमचा निवारा वाहून जाण्याआधीच उंच ठिकाणाच्या दिशेने प्रवास सुरु करा.
• उशीर न करता लवकरात लवकर धोक्याच्या ठिकाणी अडकण्यापासून स्वतःला वाचवा
• जर तुमचे घर उंच जागी सुरक्षितपणे बांधण्यात आलेले असेल तर घरातील सुरक्षित जागेवर आश्रय घ्या. मात्र, घर रिकामे करण्याचा इशारा देण्यात आलेला असल्यास लवकरात लवकर घर सोडण्यास अजिबात संकोच करू नका.
• काचेच्या खिडक्यांवर सुरक्षा कवच लावा.
•बाहेरील दारांना मजबूत आधार आहे हे सुनिश्चित करा.
• खिडक्या सुरक्षित ठेवण्यासाठी जर तुमच्याकडे लाकडी पुठ्ठे नसतील तर काचेवर कागदाच्या पट्ट्या लावा. परंतु, यामुळे काचा फुटण्याचा धोका मात्र कायम राहील.
• न शिजवता खाता येईल असे भरपूर अन्न गोळा करुन ठेवा. झाकून ठेवलेल्या भांड्यात स्वच्छ पाणी झाकून ठेवा.
•घर रिकामे करावयाचे असल्यास मौल्यवान वस्तू वरच्या मजल्यावर हलवाव्यात. यामुळे पूरामुळे होणारे नुकसान कमी होण्यास मदत होईल.
• तुमच्याजवळील कंदील, टॉर्चेस किंवा इतर आवश्यक दिवे चालू स्थितीत आहेत याची खात्री करा आणि त्यांना सहज सापडतील अशा ठिकाणी ठेवा.
• वाऱ्याने उडून जाऊ शकणाऱ्या लहान मोठ्या वस्तू एका सुरक्षित जागी नेऊन ठेवा.
• दरवाजे आणि खिडक्या वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला उघडल्या जातील याची खबरदारी घ्या.
•लहान मुले आणि प्रौढांसाठी आहाराची विशेष तरतूद करा.
• जर चक्रीवादळाचा केंद्र थेट तुमच्या घरावरुन जात असेल तर वारा शांत राहील आणि अर्धा तास पाऊस पडेल. मात्र, त्यानंतर लगेचच घराबाहेर जाऊ नका कारण त्यानंतर अतिशय जोरदार वारे उलट्या दिशेने वाहण्यास सुरुवात होते. •तुमच्या घरातील वीजेचा मुख्य पुरवठा बंद करा.
• शांत रहा
जेव्हा घर रिकामं करण्याचे आदेश मिळतील...
• स्वत:चे आणि कुटुंबाचे काही दिवसांचे आवश्यक सामान बांधा. यामध्ये औषधे, लहान बाळ, मुले आणि वृद्धांसाठी विशेष अन्नाचा समावेश असावा.
• तुमच्या प्रदेशात ठरविण्यात आलेल्या योग्य निवाऱ्याकडे मार्गस्थ व्हा.
• तुमच्या मालमत्तेची काळजी करू नका.
• निवाऱ्याच्या ठिकाणी प्रभारी व्यक्तीच्या सूचनांचे पालन करा.
• सूचना मिळाल्याशिवाय निवारा सोडू नका.
चक्रीवादळानंतरच्या उपाययोजना
• निवासस्थानाकडे जाण्याची सूचना मिळाल्याशिवाय निवारा सोडू नका.
• त्यानंतर ताबडतोब रोगांवर प्रतिबंधक लस टोचून घ्या.
• विजेच्या खांबांपासून सुटलेल्या वारांपासून लांब राहा.
• वाहने चालवताना काळजी घ्या.
• तुमच्या आवारात साचलेला गाळ ताबडतोब स्वच्छ करा.
• संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना तुमच्या परिसरात झालेल्या नुकसानाविषयी माहिती द्या.
उष्णतेची लाट उष्णतेची लाट आल्यानंतर शारीरिक ताण येऊन मृत्यू ओढवण्याचीदेखील शक्यता असते. उष्णतेच्या लाटेचा शरीरावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी आणि उष्माघाताने होणारे मृत्यू रोखण्यासाठी खालील उपाययोजना करता
येतील-
•सुर्यप्रकाशास, विशेषत: दुपारी 12.00 आणि 3.00 दरम्यान बाहेर जाणे टाळा
• तहान नसली तरीही शक्य तितक्यांदा पुरेसे पाणी प्या.
• या काळात फिकट रंगाचे, हलके, ढिले आणि सुती कपडे वापरा. सूर्यप्रकाशात बाहेर जाताना संरक्षणात्मक चष्मा, छत्री/टोपी, बूट व चपलांचा वापर करा.
• बाहेर तापमान जास्त असेल तेव्हा बाहेरील काम टाळा. • प्रवासात पाणी सोबत ठेवा.
• शरीराचे डिहायड्रेशन करणारे द्रव्य उदा., दारू, चहा, कॉफी आणि सॉफ्ट ड्रिंक पिण्याचे टाळा.
• जास्त प्रमाणात प्रथिने असणारे अन्नपदार्थ खाऊ नका आणि शिळे अन्नदेखील खाऊ नका.
• बाहेर जाताना टोपी किंवा छत्री वापरा तसेच डोके, मान, चेहरा आणि हातावर ओला कपडा ठेवा.
• लहान मुले व पाळीव प्राण्यांना पार्किंगमधील वाहनांमध्ये सोडू नका.
• थकवा किंवा आजारपण जाणवत असल्यास लगेचच डॉक्टरकडे जा.
• शरीरात पाण्याची पातळी कायम राखणारे ओआरएस आणि लस्सी, लिंबू सरबत, ताक यासारखी घरगुती पेयांचे प्रमाण वाढवा.
उष्माघाताचा प्रभाव झालेल्या व्यक्तींवर उपचारासाठी उपाययोजनाः
• व्यक्तीला सावलीत किंवा थंड वातावरण असणाऱ्या जागेवर बसवा. त्या व्यक्तीचे शरीर ओल्या कपड्याने वारंवार पुसा आणि डोक्यावर साधारण तापमान असणारे पाणी ओता. यामागे व्यक्तीच्या शरीराचे तापमान करण्याचा उद्देश आहे.
• त्या व्यक्तीला लिंबू सरबत किंवा इतर एखादे थंड पेय द्या.
• व्यक्तीला ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा. उष्माघाताचा परिणाम घातक असू शकतो त्यामुळे त्या व्यक्तीला तातडीने दवाखान्यात नेणे आवश्यक आहे.
आण्विक किरणोत्सर्गामुळे उद्भवणारी आणीबाणी
हे करा..
1. घरामध्ये जा आणि आतच थांबा.
2. रेडिओ/टीव्ही सुरु करा आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष ठेवा.
3. दरवाजे / खिडक्या बंद करा
4. सर्व अन्न, पाणी झाकून ठेवा आणि झाकलेले पदार्थच वापरा.
5. बाहेर असाल तेव्हा एखादा हातरुमाल, टॉवेल, धोतर किंवा साडीने स्वतःचा चेहरा आणि शरीर झाकून घ्या. घरी येऊन आंघोळ करुन दुसरे स्वच्छ कपडे घाला.
6. स्थानिक प्रशासनाला संपुर्ण सहकार्य करा व त्यांच्या सूचनांचे पालन करा. मग ते एखादे औषध घेण्याबाबत असो किंवा बाहेर पडण्याबाबत
7. आण्विक किरणोत्सर्गामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी सतर्क राहा. घरातील लहान मुले आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबत याविषयी चर्चा करा व त्यांच्या मनातील याविषयीची भीती कमी करा.
हे करु नका..
1. घाबरू नका
2. लोकांनी तोंडी सांगितलेल्या गोष्टी व अफवांवर विश्वास ठेऊ नका.
3. बाहेर जाऊ नका किंवा बाहेरच थांबू नका.
4. खुल्या विहीरीतील पाणी, उघड्यावरील भाज्या, पिके, अन्न, पाणी किंवा दूधाचा वापर टाळा.
5. तुमची आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी जिल्हा किंवा नागरी संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचना मोडू नका. रासायनिक आपत्ती
रासायनिक(औद्योगिक) अपघातांदरम्यान किंवा त्यानंतर घ्यावयाची काळजी-
1. सर्वप्रथम घाबरुन जाऊ नका. लवकरात लवकर मात्र शांततेत वाऱ्याच्या काटकोनातील दिशेने असणाऱ्या नियोजित मार्गाने बाहेर पडा.
2. घर किंवा इमारतीतून बाहेर पडताना चेहऱ्यावर ओला हातरुमाल किंवा कपडे किंवा साडीचा भाग ठेवा.
3. आजारी, वयस्कर, अशक्त, अपंग आणि अन्य लोक जे घराबाहेर पडू शकत नाही अशांना घरातच थांबू द्या आणि घरातील सर्व दारे खिडक्या घट्ट लावून घ्या.
4. वातावरणाशी संपर्कात आलेले अन्न/पाणी इत्यादीचा वापर करू नका. बाटलीतील पाणी प्या.
5. सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यानंतर दुसरे चांगले कपडे घाला आणि हात स्वच्छ धुवा.
6. सुरक्षित ठिकाणाहून १०१, १०५ आणि १९८ क्रमांकावर फोन करुन अग्निशमन व आणीबाणी सेवा, पोलीस आणि वैद्यकीय सेवांशी संपर्क साधा.
7. जिल्हा / अग्निशमन / आरोग्य / पोलिस आणि इतर संबंधित अधिकाऱयांकडून सूचना प्राप्त करण्यासाठी प्रकल्प किंवा फॅक्टरीतील पब्लिक एड्रेसल यंत्रणा, स्थानिक रेडिओ किंवा टीव्ही चॅनलवरील माहिती ऐका.
8. शासकीय अधिकाऱ्यांस योग्य आणि अचूक माहिती पुरवा.
9. लोक एकत्र येणाऱ्या सार्वजनिक ठिकाणांवर (शाळा, शॉपिंग सेंटर, थिएटर इत्यादी) घडलेल्या घटनेविषयी माहिती व सतर्कतेचा इशारा द्या.
10. अफवांकडे लक्ष देऊ नका आणि अफवा पसरवू नका.
एरवी साधारण परिस्थितीत घ्यावयाची काळजी..
1. धोकादायक भागात धुम्रपान करु नका किंवा कसल्याही प्रकारची आग पेटवू नका.
2. औद्योगिक वसाहतीजवळ राहणाऱ्या समुहाने औद्योगिक घटक आणि त्याच्याशी निगडीत जोखमींबाबत अधिक सावध असावे.
3. आपात्कालीन परिस्थितीत उपयोगी पडणाऱ्या सर्वात जवळच्या अग्निशमन केंद्र, पोलीस ठाणे, कंट्रोल रूम, आरोग्य सेवा आणि जिल्हा कंट्रोल रूम यांचे संपर्क क्रमांक ठेवा.
4. शक्य असेल घातक रसायनांची निर्मिती करणाऱ्या किंवा त्यावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याच्या परिसरात वास्तव्य टाळा.
5. सरकारी/स्वयंसेवी संस्था/औद्योगिक संस्थांनी आयोजित केलेल्या सर्व आपत्ती
6. समाजासाठी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन योजना निर्मितीमध्ये सहभाग घ्या आणि सुरक्षित ठिकाणे व त्याठिकाणी पोहोचण्याचे सुरक्षित मार्ग ओळखा
7. कुटुंबात आपत्ती व्यवस्थापनाची स्वतंत्र योजना तयार करा व ती इतर सदस्यांना समजावून सांगा.
8. कुटुंबीय/ शेजाऱ्यांमध्ये विविध विषारी तसेच घातक रसायनांच्या मूलभूत वैशिष्ट्यांबद्दल जागरुकता निर्माण करा आणि त्यावर उपचारांसाठी आवश्यक प्रथमोपचार करा.
9. आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यासाठी पुरेशी वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे उपलब्ध करणे आवश्यक आहे.
10. औषधे, कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंसह घरात असलेल्या वस्तू आणि आवश्यक वस्तूंचा समावेश असणारी एक इमर्जन्सी किट तयार करा.
जैविक आपत्ती
आपत्ती येण्यापुर्वी..
अ. जैविक आपत्तीदरम्यान कुटुंबाचा आराखडा
ब. प्रतिबंधात्मक उपायांची तयारी:-
(अ)वैयक्तिक स्वच्छता – दररोज आंघोळ करा, जास्त नखे वाढवू नका आणि स्वच्छ कपडे घाला
(ब) हातांची स्वच्छता - अन्न शिजवण्यापुर्वी तसेच जेवताना, शौचाला जाऊन आल्यावर, खोकला किंवा शिंक आल्यानंतर हात साबण लावून पाण्याने स्वच्छ धुवा
(क) पौष्टिक आणि समतोल आहार घ्या
(डी) वेळोवेळी योग्य लसी टोचून घ्या
(ई) प्रचंड गर्दीत जाण्याचे टाळा
(फ) हवेशीर ठिकाणी बसा
(ग) अति गरम किंवा अति थंड वातावरणापासून स्वतःचे संरक्षण करा.
(ह) आरोग्य शिक्षण
काय करावे आणि काय करू नये
अ. कॉलरासह अतिसार गटातील आजार
हे करा
1. हातांची स्वच्छता राखा.
2. पिण्यासाठी निर्जंतुकीकरण(क्लोरिनेटेड) झालेले किंवा सुरक्षित स्रोतापासून मिळणारे पाणी वापरा. नियमितपणे सर्व सामुहिक विहिरींमध्ये ब्लीचिंग पावडर घाला.
3. घाईच्या प्रसंगी किमान १५ मिनिटे उकळलेले पाणी प्यावे आणि हे पाणी दिवसभरात संपवावे.
4. अरुंद तोंड असणाऱ्या भांड्यात पिण्याचे पाणी साठवावे.
5. मांस, पोल्ट्री, अंडी आणि समुद्री खाद्यपदार्थ व्यवस्थित शिजवा आणि गरम असतानाच ते ग्रहण करा.
6. शिजविले जाणारे मांस चांगले आणि त्याला कसलाही वास येत नाही याची खात्री करा. तसेच अंड्यांची टरफले निघालेली नाहीत याची खात्री करा.
7. अन्न शिजवून बराच वेळ झाला असेल तर जेवण करण्यापुर्वी ते पुन्हा गरम करा.
8. अन्न झाकून ठेवा.
9. अतिसार होत असल्यास ओआरएस किंवा साखर-मीठ पाणी यासारखे घरगुती द्रव्य पदार्थ घेण्याचे प्रमाण वाढवा
10. केळी खा. त्यातून शरीराला पोटॅशियम मिळते.
11. मुले आजारी असतानादेखील त्यांना अन्न देत राहा आणि लहान मुलांना स्तनपान देत असाल तर तेदेखील सुरु ठेवा.
12. अतिसाराची खालील लक्षणे आढळून आल्यास त्वरित जवळच्या आरोग्य सुविधा केंद्रात जाः लहान मुलांची चिडचिड, अस्वस्थता किंवा सुस्ती किंवा बेशुद्धावस्था, जेवण आणि तहान कमी होणे किंवा सारखी तहान लागणे, लहान मुलांच्या शौचावाटे रक्त जात असेल.
हे करु नका..
1. असुरक्षित स्रोतांपासून मिळणारे पाणी पिऊ नका.
2. सोललेले किंवा वरुन कवच नसलेले कच्चे अन्न खाऊ नका.
3. शिजवलेल अन्न दोन तासांपेक्षा अधिक काळ बाहेर ठेऊ नका.
4. विक्रेत्यांकडून कापलेली फळं विकत घेऊ नका
5. उघड्यावर शौचाला जाऊ नका
6. आपल्या आजूबाजूच्या परिसरात उंदीर आणि घुशींना प्रवेश देऊ नका.
ब. रेस्पिरेटरी समुहातील आजार;
उदा., ट्युबरक्युलोसिस, इन्फ्लुएंझा, कांजण्या
हे करा आणि हे करू नका:
1. श्वसनाशी निगडीत आजार असणाऱ्य़ा व्यक्तींच्या जास्त जवळ जाऊ नका.
2. यासंबंधी आजार झालेल्या व्यक्तींनी घरातच थांबावे आणि शाळा, ऑफिस यासारख्या सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.
3. आजारी लोकांना घरात इतरांपासून दूर ठेवावे.
4. श्वसनसंबंधी स्वच्छता / खोकला आल्यानंतर पाळावयाचे शिष्टाचार: -
(अ) खोकला किंवा शिंक आल्यानंतर नाक व तोंड रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकून घ्यावे. त्यानंतर हा टिश्यू पेपर कचराकुंडीत टाकावा.
(ब) हातांची स्वच्छता राखा. वेळोवेळी हात स्वच्छ पाण्याने धुवा आणि स्वच्छ कोरडे कापड किंवा टिश्यू पेपरने पुसा.
5. ज्या व्यक्तींमध्ये इन्फ्लुएन्झा किंवा इतर संबंधित आजार असणाऱ्या व्यक्तींनी व त्यांच्याशी संपर्कात असणाऱ्या व्यक्तींनी तीन आवरणे असणारे सर्टिफाईड मास्क घालायला हवे.
6. भरपूर झोप घ्या, शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहा, ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन करा, भरपूर द्रव्य प्या आणि पौष्टिक आहार घ्या.
7. धूम्रपान टाळा
8. ज्या व्यक्तीला श्वासोच्छवास करण्यात त्रास होत असेल तिच्यावर तातडीने उपचार करा किंवा जवळच्या रुग्णालयात घेऊन जा.
9. आजारी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी जात असेल तर तिने चेहऱ्यावर मास्क किंवा हातरुमाल ठेवावा जेणेकरुन आजाराचा इतरांना संसर्ग होणार नाही.
10. लसीकरण स्थिती राष्ट्रीय सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमानुसार अद्ययावत असणे आवश्यक आहे.
क. डासांमुळे होणारे आजार;
उदा. मलेरिया, डेंगी, चिकनगुनिया
हे करा..
1. सूर्यास्त झाल्यानंतर संपुर्ण हातांसह संपुर्ण शरीर झाकणारे कपडे घाला.
2. जमिनीवर एका ठिकाणी पाणी साचू देऊ नका. यामुळे मलेरिया निर्माण करणाऱ्या डासांचा प्रादुर्भाव होतो.
3. पाण्याची सर्व भांडी किमान एकदा रिकामी करा.
4. कूलरमधील पाणी वेळोवेळी काढून टाका.
5. सर्व सेप्टिक टाक्या झाकून ठेवा आणि सील करा.
6. मच्छरदाणीचा वापर करा.
7. झोपताना कीटकांना दूर ठेवणारे क्रीम किंवा इतर उपकरणे वापरा.
8. चिडचिड, बेशुद्धावस्था किंवा रॅश येत असल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.
हे करु नका...
1. लहान मुलांना शॉर्ट किंवा अर्धवट स्लीव्ह्स असलेले कपडे घालण्यास प्रोत्साहन देऊ नका.
2. पाणी साठवून ठेऊ नका.
3. टायर, नळी, रिकामे नारळ किंवा घरातील अशा वस्तू ज्यात पाण्याचा होतो, तेथे पाणी साठणार नाही याची काळजी घ्या.
4. गावतील तलावांत स्नान करू नका आणि गुरांनादेखील या तलावात आंघोळ करु देऊ नका.