2 उत्तरे
2 answers

गावठाण म्हणजे काय?

4
.... कलम १२२ अन्‍वये प्रत्यक्ष जास्त घरे व जास्त लोकसंख्‍या असणारी गावातील मध्यवर्ती जागा म्‍हणजे गावठाण तर वाडा जमीन म्‍हणजे म.... कलम २(४४) अन्‍वये गावठाणामधील वैरण, खत, पीक, इतर गरजेच्या वस्तू ठेवण्यासाठी, गुरे-ढोरे बांधण्यासाठी वापरण्यात येणारी मोकळी जागा. .... कलम १२५ अन्‍वये या जमिनीस जमीन महसूल देण्यापासून सूट असते. आणि म.... कलम २(२६) अन्‍वये पार्डी/परडी जमीन म्‍हणजे गावठाणातील घरांलगत लागवड केलेली जमीन.

म. ज. म. अ. म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम.
उत्तर लिहिले · 7/7/2019
कर्म · 61495
0

गावठाण म्हणजे गावातील लोकांच्या निवासस्थानासाठी असलेले क्षेत्र. हे क्षेत्र गावाच्या एकूण जमिनीचा भाग असते आणि ग्रामपंचायतीच्या मालकीचे असते.

गावठाण खालील गोष्टींसाठी वापरले जाते:

  • घरे बांधणे.
  • दुकान व इतर व्यावसायिक बांधकाम करणे.
  • गावातील सामाजिक कार्यक्रम आयोजित करणे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

  1. महभूमी (mahabhumi.gov.in)
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1820

Related Questions

एमआयडीसीसाठी जमिनीचे व्यवहार कोण पाहते?
जुना सातबारा व नकाशा ४८ गुंठे आहे आणि ऑनलाइन नवीन नकाशा ३५ गुंठे आहे, पण उतारा ४८ गुंठ्यांचाच आहे. यात काय चूक आहे आणि काय बरोबर, हे कसे कळणार?
प्रत्येक गावातील जमीन धारकांच्या नोंदी कोण ठेवते?
जागा मोजणी शासकीय नियम काय आहेत?
बऱ्याच गावांच्या नावांमध्ये उपसर्ग किंवा प्रत्यय लावलेला असतो जसे की नान्नज दुमाला, जेऊर कुंभारी, जेऊर पाटोदा, लोणी खुर्द, पिंपरी खालसा, जळगाव नेऊर इत्यादी. तर त्यातील जेऊर, दुमाला, खालसा याचा अर्थ काय असावा, मुख्यत्वे जेऊरचा?
Online भू-नकाशा वर शेतीचा गट नंबर कसा शोधावा?
परगणा म्हणजे काय?