पोशाख घरगुती उपाय रंग उपाय

कपड्यांवरील डाग कसे काढावे?

2 उत्तरे
2 answers

कपड्यांवरील डाग कसे काढावे?

4
*👚👕🥼⚫ कपड्यावरील डाग*
👍 *आता डागांना म्हणा बायबाय*
📌  कपड्यांवरील डाग घालवण्याचे उपाय :

सुंदर कपडे, दागिने घालून आपण वावरताना जर कपड्यांवर डाग पडले तर आपला आवडता ड्रेस खराब झाला या भावनेतून आपण नाराज होतो. आता नाराज न होता आम्ही दिलेल्या टिप्स वापरून कपड्यांवरचे डाग घालवू शकता.

▪साडीवर तेलकट डाग पडल्यास त्या डागांवर टाल्कम पावडर चोळावी. एक दिवस तसेच ठेवावे नंतर धुवावे.
▪सायकल ऑईलचे डाग निलगिरी तेलाने निघतात.
▪ग्रीस किंवा वॉर्निशचे डाग टर्पेन्टाईलने जातात.
▪कपड्यावर पानाचे डाग पडले तर लगेचच लिंबू कापून डागावर घासावेत. स्वच्छ पाण्यात धुवावे.
▪कपड्यांवर पडलेल्या डागांवर टूथपेस्ट लावावी आणि ती सुकल्यावर कपडे डिटर्जंटने धुवावे. डाग निघण्यास मदत होते.
▪उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कपड्यांवर घामाचे पिवळसर डाग पडतात. लिंबाच्या रसाने हे डाग घालविता येतात. लिंबाचा रस या डागांवर 10 मिनिटे लावून ठेवावा मग नेहमीप्रमाणे कपडे धुवून टाकावेत.
▪कपड्यांवरचे हळदी डाग घालवण्यासाठी व्हिनेगर अथवा लिंबू लावा किंवा कपडे धुण्याची कोरडी पावडर त्यावर लावून घासून काढा.
▪चहा, कॉफीचा पडलेला डाग प्रथम स्वच्छ धुवून घ्यावा मग जेथे डाग पडला आहे त्या भागावर बोरॅक्स पावडरची पेस्ट लावावी.
▪चिखलाचा डाग पडलेला भाग स्वच्छ धुवून घ्यावा मग डाग पडलेल्या भागावर कच्चा बटाटा लावून थोड्या वेळाने डाग धुवावा.
▪शाईचा डाग पडलेल्या भागावर लिंबू व मीठ चोळावे व मग डाग धुवून टाकावा.
------------------------------------------------
उत्तर लिहिले · 27/5/2019
कर्म · 569225
0

कपड्यांवरील डाग काढण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:

  1. तुरटी: तुरटीचा उपयोग डाग काढण्यासाठी चांगला होतो. डाग असलेल्या भागावर तुरटी चोळा आणि नंतर कपडे धुवा.
  2. लिंबू: लिंबू डाग काढण्यासाठी नैसर्गिक उपाय आहे. लिंबाचा रस डागावर लावा आणि काही वेळानंतर कपडे धुवा.
  3. बेकिंग सोडा: बेकिंग सोडा डाग शोषून घेतो. डागावर बेकिंग सोडा टाकून काही वेळ ठेवा आणि नंतर ब्रशने घासून काढा.
  4. व्हिनेगर: व्हाईट व्हिनेगर डाग आणि दुर्गंध काढण्यासाठी उपयुक्त आहे. व्हिनेगरमध्ये कपडे काही वेळ भिजवून ठेवा आणि नंतर धुवा.
  5. डिटर्जंट: डाग काढण्यासाठी चांगल्या प्रतीचे डिटर्जंट वापरा.

प्रत्येक डागानुसार वरीलपैकी कोणताही एक उपाय वापरून तुम्ही कपड्यांवरील डाग काढू शकता.

टीप: डाग काढण्यापूर्वी, कपड्याच्या एका लपलेल्या भागावर प्रयोग करून पहा, जेणेकरून रंग उडणार नाही.

अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 980

Related Questions

मुलगी पचवण्यासाठी काय करावे?
वस्तूंना जपावे आणि त्यांची काळजी घ्यावी?
गण्डयोग निवारण करण्यासाठी काय उपाय करावा?
आज सकाळी कोलगेट संपला यावर काय उत्तर आहे?
लिंबू सोडा पित्तामध्ये का घेतात?
दृष्ट कशी काढावी?
एखाद्याला रात्री झोपताना रामरक्षास्तोत्र, घोरकष्टोधरण स्तोत्र, मारुती स्तोत्र वगैरे म्हणूनही झोपेत स्वप्न पडून झोपेत व्यत्यय येत असेल, तर स्वप्न न पडण्यासाठी त्याने काय उपाय करावा?