शब्दाचा अर्थ हत्यार संरक्षण तंत्रज्ञान तंत्रज्ञान

मिशन शक्ती ऑपरेशन? एलईओ? ए-सॅट हत्यार म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

मिशन शक्ती ऑपरेशन? एलईओ? ए-सॅट हत्यार म्हणजे काय?

2
💁‍♂ _*जाणून घ्या 'मिशन शक्ती' ऑपरेशन काय आहे?*_


_पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत देशाला संबोधित करताना मिशन शक्तीची माहिती दिली. पण नेमकं 'मिशन शक्ती' ऑपरेशन काय आहे? याबाबत जाणून घेऊयात..._

🧐 _*'मिशन शक्ती' ऑपरेशन काय?*_ :

▪ _भारताने एका एन्टी सॅटेलाईट हत्याराद्वारे (Anti-satellite weapon) पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (एलईओ) केवळ तीन मिनिटांत एक लाईव्ह सॅटेलाईटला पाडून एक ऐतिहासिक कामगिरी केली._

▪ _या मोहिमेला मिशन शक्ती असे नाव देण्यात आले होते._

▪ _एन्टी सॅटेलाईटद्वारे भारताने अंतराळातही आपल्या सुरक्षेची खातरजमा केली._

▪ _भारताच्या इस्रो आणि डीआरडीओ या संस्थांनी संयुक्तरित्या 'मिशन शक्ती' यशस्वी करून दाखवलं._

🤨 _*एलईओ(लो अर्थ ऑर्बिट)म्हणजे काय*_ :

▪ _एलईओ सॅटेलाईट हे एक असे 'टेलिकम्युनिकेशन सॅटेलाईट सिस्टम' आहे जे पृथ्वीकक्षेत 400 ते 2000 किलोमीटर उंचीवर काम करू शकते._

▪ _शत्रूकडून हेरगिरी करणाऱ्या किंवा नागरी कामांकरिता वापर करण्यासाठी जमिनीची अत्यंत सुस्पष्ट छायाचित्र काढणाऱ्या उपग्रहांचा वापर केला जातो, अशा उपग्रहांना रोखण्यासाठी 'उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र क्षमता' ही उपयोगी ठरणार आहे._

▪ _हेरगिरी करणारे हे सॅटेलाईट लो अर्थ ऑर्बिटमध्येच ठेवले जातात. अशा सॅटेलाईटना केवळ तीन मिनिटांत हाणून पाडण्याची क्षमता आता भारताकडे आहे._

🤔 _*ए-सॅट हत्यारं म्हणजे काय?*_

▪ _एन्टी सॅटेलाईट हत्यारं (Anti-satellite weapon) ही मुख्यत्वे सुरक्षेच्या दृष्टीने उपग्रहांना नष्ट करण्यासाठी तयार केली जातात._

▪ _हेरगिरी करणाऱ्या अंतराळातील उपग्रहांना हाणून पाडण्याची अशी 'उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र क्षमता' आत्तापर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे होती. आता भारतही याबाबतीत सक्षम झाला आहे._

▪ _अद्याप कोणत्याही देशाकडून ए-सॅट हत्यारांचा वापर युद्धात शत्रूराष्ट्रांविरुद्ध करण्यात आलेला नाही._

▪ _अनेक देशांनी आपल्या ए-सॅट क्षमता केवळ शक्ती प्रदर्शनासाठी तसंच आपले दोषपूर्ण उपग्रह नष्ट करण्यासाठी वापरल्या आहेत._
उत्तर लिहिले · 27/3/2019
कर्म · 569225
0

मिशन शक्ती हे भारताने केलेले एक महत्त्वाचे ऑपरेशन होते. याबद्दल काही माहिती खालीलप्रमाणे:

मिशन शक्ती (Mission Shakti):

  • मिशन शक्ती हे एक अँटी-सॅटेलाईट (Anti-Satellite) शस्त्र परीक्षण होते, जे भारताने 27 मार्च 2019 रोजी केले. Ministry of External Affairs
  • या अंतर्गत, भारताने आपल्याच एका निष्क्रिय उपग्रहाला (Low Earth Orbit satellite) पृथ्वीच्या कक्षेत (lower earth orbit - LEO)ক্ষেপणास्त्राने पाडले.
  • असे तंत्रज्ञानdemonstration करणारे भारत जगातील चौथा देश ठरला. याआधी अमेरिका, रशिया आणि चीनने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.

एलईओ (LEO):

  • एलईओ म्हणजे 'लो अर्थ ऑर्बिट' (Low Earth Orbit). ही पृथ्वीच्या सर्वात जवळची कक्षा आहे.
  • या कक्षेत उपग्रह पृथ्वीपासून 2,000 किलोमीटर (1,200 मैल) पर्यंतच्या उंचीवर फिरतात.

ए-सॅट (ASAT) हत्यार:

  • ए-सॅट (ASAT) म्हणजे 'अँटी-सॅटेलाईट वेपन' (Anti-Satellite Weapon). हे एक प्रकारचे क्षेपणास्त्र आहे.
  • या शस्त्राचा उपयोग शत्रूच्या उपग्रहांना निकामी करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी केला जातो.
  • मिशन शक्तीमध्ये भारताने याच ए-सॅट शस्त्राचा वापर करून LEO मधील उपग्रह नष्ट केला.
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 980

Related Questions

भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे शिल्पकार कोणाला ओळखले जाते?
भारतात क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचा शिल्पकार कोण आहे?
वीराच्या शस्त्रास्त्रांना शक्ती देणारी काय?
इंटरसेप्टर व्हेईकल म्हणजे काय?
नुकतीच केलेले मिशन शक्ती काय आहे?
भारताच्या पहिल्या मानवरहित रणगाड्याचे नाव काय आहे?
पृथ्वी, अग्नी यांसारख्या भारताच्या क्षेपणास्त्र क्षेत्राचे सूत्रधार कोण?