Topic icon

संरक्षण तंत्रज्ञान

0

भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे शिल्पकार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना ओळखले जाते.

ते एक विख्यात शास्त्रज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती होते. त्यांनी भारताच्या क्षेपणास्त्र विकासात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या योगदानाने भारताला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्त झाली.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 2200
0

भारतातील क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे शिल्पकार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आहेत.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम:

  • भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात त्यांनी मोठे योगदान दिले.
  • त्यांच्या योगदानामुळे भारताला संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी बनण्यास मदत झाली.
  • त्यांना 'मिसाइल मॅन' म्हणून ओळखले जाते.

अधिक माहितीसाठी:

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम - द हिंदू
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 2200
5
*👉 'इंटरसेप्टर व्हेईकलं' आलं... गाडी न अडवताही वाहनचालकास घरपोच दंडाची पावती*



● महामार्गावरील वाहनांचा वेग व सीटबेल्ट तपासणीसाठी अत्याधुनिक इंटरसेप्टर व्हेईकल पोलीस दलात दाखल झाले आहे. चालत्या वाहनाचा वेग कॅमेरात कैद करून वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास, तसे निदर्शनास आल्यास संबंधित वाहन चालकास घरपोच दंडाची नोटीस जाणार आहे. 18 नोव्हेंबर म्हणजेच आजपासून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

● भरधाव वेगाने वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे, विना हेल्मेट वाहन चालवणे आणि चारचाकी मध्ये सीट बेल्ट न वापरणे, या कारणांमुळे आपघातामध्ये मरण पावणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. या प्रकारावर लक्ष ठेवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस महासंचालकांनी वाहतूक पोलिसांना  इंटरसेप्टर व्हेईकल हे वाहन दिले आहे. या वाहनांमध्ये गाडीची वेगमर्यादा, ब्रिथ एनेलायझर, काळ्या फिल्मची जोडणी मशीन या सुविधा आहेत. हे वाहन राष्ट्रीय व राज्य महामार्गावर रस्त्याच्या कडेला थांबून फक्त येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवणार आहे.
उत्तर लिहिले · 18/11/2019
कर्म · 569245
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
4

_*‼  मिशन शक्तीः काय आहे ही ॲण्टिसॅटेलाईट मिसाईल सिस्टम आणि याची आवश्यकता काय?  ‼*_

  “मिशन शक्ती”… मिसाईलने लोअर ऑर्बिटमधल्या सॅटेलाईटला डिस्ट्रोय़ करण्याचं Make in India तंत्रज्ञान यशस्वी झाल्याचा पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचा संदेश ऐकला आणि आपल्या तमाम शास्त्रज्ञांचा, Central Government of India च्या पॉलिसी मेकर्सचा अतिशय अभिमान वाटला._*
*❗माझ्या माहितीप्रमाणे केवळ अमेरिका, रशिया आणि चीन या तीनच देशांकडे असलेलं हे तंत्रज्ञान आज भारताने स्वतःच्या हिमतीवर निर्माण केलं आहे ही खरोखर अतिशय आनंदाची बाब आहे!*
आधुनिक विश्वात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या अनुषंगाने सॅटेलाईटचं महत्व खूप मोठं आहे. अंतराळातून पृथ्वीच्या वातावरणाकडे पाहून त्यातले बदल ओळखून वेळीच डिझास्टर प्लॅनिंग करण्यासाठी सॅटेलाईट गेली काही वर्ष खूप महत्वाची भूमिका बजावत आहेत.
याबरोबरच माहितीचं आदान प्रदान, ज्या ठिकाणी communication systems चा सेटअप अवघड आहे अशा ठिकाणी सॅटेलाईट लिंकद्वारे communication channel म्हणूनही सॅटेलाईटचं महत्व, विशेषतः सीमा सुरक्षेच्या दृष्टीने अनन्यसाधारण आहे!
इथे लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे कुठल्याही टेक्नॉलॉजीचा जसा विधायक वापर होऊ शकतो, तसाच त्याचा गैरवापरही होऊ शकतोच!

अनेक विधायक कामांबरोबरच कालौघात हे सॅटेलाईट लांब पल्ल्याच्या मिसाईल्सना गाईड करण्यासाठी, एखाद्या देशावर, अगदी देशातल्या एखाद्या लहानशा भागावरही चोरून नजर ठेवून मिळवलेल्या माहितीचा गैरवापर करण्यासाठीही वापरात येऊ लागले.
*अनेक देशांनी आपापले कम्युनिकेशन सॅटेलाईट अंतराळात धाडले आणि एकूणच यामुळे भारतासारख्या देशांना राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आव्हान देऊ लागला.* मग असा एखादा स्पाय सॅटेलाईट जर भारताच्या सुरक्षा व्यवस्थेलाच आव्हान देत असेल आणि ज्या देशाचा तो सॅटेलाईट आहे तो देश आंतरराष्ट्रीय पटलावर भारतीय डिप्लोमसीला झुगारून देत असेल तर आपण काय करायचं?
चर्चेतून प्रश्न सुटतच नसेल तर अगदी शेवटचा ऑप्शन म्हणजे त्या सॅटेलाईटवरच थेट सर्जिकल स्ट्राईक! इथे मी सर्जिकल हा शब्द अचूकतेचं परिमाण म्हणून वापरला.
पण हे काम सोपं नाही… त्यासाठी अशी गाईडेड मिसाईल सिस्टम निर्माण करण्याची आवश्यकता होती जी एखाद्या मिसाईलला वातावरणाच्या अनेक लेअर्स छेदून एखाद्या सॅटेलाईटच्या अंतराळातल्या सद्य पोझिशनवर जाऊन मारा करण्याची ताकद देईल.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,पृथ्वीच्या फिरण्याची गती, त्या सॅटेलाईटच्या फिरण्याची गदी आणि त्या सॅटेलाईटच्या ऑर्बिटचं गणित अशी बरीच आकडेमोड आणि गाईडेड ट्रॅकिंग याचा अचूक मेळ साधत मिसाईलने आपलं टार्गेट कमीत कमी वेळात हिट करायचं आहे… आणि हेच काम करणारी संपूर्णतः भारतात विकसित झालेल्या प्रणालीचं आज यशस्वी टेस्टिंग झालंय.
चाचणी करण्यासाठी आपल्या शास्त्रज्ञांनी आपलाच एक चालू सॅटेलाईट या प्रणालीचा वापर करून यशस्वीपणे पाडला.
*🚀सर्वांगिण प्रगतीच्या अनुषंगाने देशाची सुरक्षा हा खूप मोठा घटक ठरतो. भारत सुरक्षेच्या अनुषंगाने अनेक मोठे टप्पे पार करत असतानाच अशी एक ॲण्टिसॅटेलाईट प्रणालीही भारताकडे यावी ही खरोखर एक मोठी गोष्ट आहे!*
पुन्हा एकदा तमाम शास्त्रज्ञ, Central Government of India चे पॉलिसी मेकर्स यांचं मनापासून अभिनंदन!

______________________________

2
💁‍♂ _*जाणून घ्या 'मिशन शक्ती' ऑपरेशन काय आहे?*_


_पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत देशाला संबोधित करताना मिशन शक्तीची माहिती दिली. पण नेमकं 'मिशन शक्ती' ऑपरेशन काय आहे? याबाबत जाणून घेऊयात..._

🧐 _*'मिशन शक्ती' ऑपरेशन काय?*_ :

▪ _भारताने एका एन्टी सॅटेलाईट हत्याराद्वारे (Anti-satellite weapon) पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (एलईओ) केवळ तीन मिनिटांत एक लाईव्ह सॅटेलाईटला पाडून एक ऐतिहासिक कामगिरी केली._

▪ _या मोहिमेला मिशन शक्ती असे नाव देण्यात आले होते._

▪ _एन्टी सॅटेलाईटद्वारे भारताने अंतराळातही आपल्या सुरक्षेची खातरजमा केली._

▪ _भारताच्या इस्रो आणि डीआरडीओ या संस्थांनी संयुक्तरित्या 'मिशन शक्ती' यशस्वी करून दाखवलं._

🤨 _*एलईओ(लो अर्थ ऑर्बिट)म्हणजे काय*_ :

▪ _एलईओ सॅटेलाईट हे एक असे 'टेलिकम्युनिकेशन सॅटेलाईट सिस्टम' आहे जे पृथ्वीकक्षेत 400 ते 2000 किलोमीटर उंचीवर काम करू शकते._

▪ _शत्रूकडून हेरगिरी करणाऱ्या किंवा नागरी कामांकरिता वापर करण्यासाठी जमिनीची अत्यंत सुस्पष्ट छायाचित्र काढणाऱ्या उपग्रहांचा वापर केला जातो, अशा उपग्रहांना रोखण्यासाठी 'उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र क्षमता' ही उपयोगी ठरणार आहे._

▪ _हेरगिरी करणारे हे सॅटेलाईट लो अर्थ ऑर्बिटमध्येच ठेवले जातात. अशा सॅटेलाईटना केवळ तीन मिनिटांत हाणून पाडण्याची क्षमता आता भारताकडे आहे._

🤔 _*ए-सॅट हत्यारं म्हणजे काय?*_

▪ _एन्टी सॅटेलाईट हत्यारं (Anti-satellite weapon) ही मुख्यत्वे सुरक्षेच्या दृष्टीने उपग्रहांना नष्ट करण्यासाठी तयार केली जातात._

▪ _हेरगिरी करणाऱ्या अंतराळातील उपग्रहांना हाणून पाडण्याची अशी 'उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र क्षमता' आत्तापर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे होती. आता भारतही याबाबतीत सक्षम झाला आहे._

▪ _अद्याप कोणत्याही देशाकडून ए-सॅट हत्यारांचा वापर युद्धात शत्रूराष्ट्रांविरुद्ध करण्यात आलेला नाही._

▪ _अनेक देशांनी आपल्या ए-सॅट क्षमता केवळ शक्ती प्रदर्शनासाठी तसंच आपले दोषपूर्ण उपग्रह नष्ट करण्यासाठी वापरल्या आहेत._
उत्तर लिहिले · 27/3/2019
कर्म · 569245