7 उत्तरे
7
answers
मनातले विचार कसे थांबवावेत?
9
Answer link
विचार करणे हे मेंदूचं खरं काम आहे. जोवर त्याला हे काम मिळतंय तोवर तो fit and fine आहे. पण जेव्हा त्याला नवनवीन कल्पना, विचार येणं, करणं बंद होतं तेव्हा मेंदू आकुंचन पावतो आणि त्याची आधीची क्षमता लोप पावते.
नवनवीन विचार करणे हे मेंदूचे मुख्य काम आहे. नवनवीन कल्पना किंवा विचार न केल्याने मेंदू आकुंचन पावतो. त्यामुळे विविध विचार करणे थांबवू नका.
मनातले विचार थांबवणे म्हणजे नक्की काय
ते विचार नाकारात्मक आहेत की सकारात्मक
चांगले की वाईट??
विचार सतत वाहतात, पण त्यांचे सामथ्र्य कमी होत नाही.. ते नदीप्रमाणे असतात.. एक एक विचार येत गेला, नाहीसा होत गेला.. पण सत्ता चालली ती विचारांचीच.. मनुष्याला या विचारांपासूनच प्रेरणा मिळत आली आहे. विचारांच्या सामर्थ्यांची तुलना करावी अशी अन्य शक्ती या जगात नाही..
विचारांचं सामथ्र्य फार मोठं असतं. असं म्हटलं जातं की, विचारांनीच माणूस घडतो. सकारात्मक विचार करणाऱ्यांची प्रगती लवकर होताना दिसते. त्याउलट नकारात्मक विचार करणाऱ्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. सामान्यपणे आपलं आपल्या विचारांकडे लक्ष नसतं; किंबहुना विचारांच्या बाबतीत जेवढी सजगता असायला हवी तेवढी आपल्यामध्ये नसते. एखादी चांगली गोष्ट करताना मनात येणारा पहिला सृजनशील विचार पकडून ठेवता आला पाहिजे, तशी सवयच लावून घ्यायला हवी व तात्काळ कृतीच्या अंमलबजावणीची रूपरेषा ठरवली गेली पाहिजे. मनात येणाऱ्या पहिल्या विचारालाच नकारात्मक विचारांचे मळभ लाभले की कार्यसिद्धीला ग्रहण लागलंच म्हणून समजा. पाणी ज्याप्रमाणे उताराकडे वाहतं तसे बहुसंख्य वेळेला माणूस नकारात्मक विचार करताना दिसतो. बहुतेक वेळेला खालील प्रकारचे विचार कार्यप्रवण होण्यामध्ये आणि चांगल्या विचारांना प्रत्यक्षात सिद्ध होण्यामध्ये अडसर ठरतात. उदाहरणार्थ,
* मी केल्याने काय फरक पडणार आहे?
* मला जमण्यासारखं नाही ते.
* मीच का म्हणून करू?
* योग्य वेळ आल्यावर करू, आत्ताच काही घाई नाही.
* लोक काय म्हणतील, हसणार तर नाहीत ना?
* पण योजना असफल झाली तर?
* करायला हरकत नाही, पण मला नशीब कधीच साथ देत नाही.
पहिल्या विचारावर कार्यप्रवण होण्यामध्ये जरा काळ गेला की असे असंख्य विचार अडचणींचे डोंगर उभे करतात आणि चांगल्या विचाराची हत्या होते. थोर व्यक्तींच्या चरित्राचं परिशीलन केलं असता असं लक्षात येतं की, प्रतिकूल परिस्थितीतही केवळ सकारात्मक विचारांची साथ न सोडल्यामुळे ते असामान्य कार्य करू शकले.
स्व-प्रतिमाग, विधायक विचार
स्वत:बद्दल व्यक्तीचं चांगलं मत असणं हे सृजनात्मक विचारांच्या जोपासनेसाठी, आत्मविश्वास निर्मितीसाठी व सुदृढ मानसिक स्वास्थ्यासाठी अग्रक्रमाची गोष्ट ठरत ‘स्व’ची ओळख होणं ही या प्रक्रियेतील महत्त्वाचा व सुरुवातीचा टप्पा आहे. सकारात्मक विचार करण्याची सवय लागली की आपोआपच स्वत:विषयी आदर निर्माण होतो व सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण होते. चांगली स्व-प्रतिमा निर्माण होण्यासाठी स्वत:चं चिकित्सक अवलोकन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याबरोबरच सकारात्मक विचारांचा पाया म्हणून ओळखली जाणारी सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. सकारात्मक स्व-प्रतिमा असणारे व्यक्ती स्वत:बद्दल जागृत असतात. स्वत:च्या गुण-दोषांबद्दल त्यांना जाणीव असते. स्वत:बद्दल चांगली भावना योग्य निर्णय घेण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पेलण्यासाठी महत्त्वाची आहे.
स्वत:ला स्वीकारणं
बऱ्याच वेळा व्यक्ती स्वत:च्या रंग, रूप, उंची यानुसार स्वत:चं मूल्यमापन करतो. वर्ण काळा असेल, उंची कमी असेल तर स्वत:बद्दल नकारात्मक विचार निर्माण होतात. क्वचित प्रसंगी आलेल्या अपयशाने खचून न जाता अपयशाच्या कारणांचा अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती ही निसर्गाची अद्वितीय कलाकृती असते, त्यामुळे इतरांशी तुलना करून स्वत:ला कमी लेखण्यापेक्षा स्वत:मध्ये सातत्याने सुधार कसा होईल, याचा प्रयत्न केला पाहिजे.
स्वत:शी संवाद साधणं
स्वत:शी संवाद साधणं हा सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. स्वत:ला स्वत:मध्ये असणाऱ्या गुण-दोषांसहित स्वीकारणं म्हणजेच सकारात्मक स्व-प्रतिमा निवडण्यासाठी उचललेलं पहिलं पाऊल होय. इतर व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करतात, त्यांना आपण कसे वाटतो, यावरून स्वत:ची किमत करू नये. कारण आपणच स्वत:ला चांगले ओळखू शकतो.
धन्यवाद

4
Answer link
विचार करणे थांबवायचे असतिल तर प्रथम आपली
जी काही अडचण आहे किंवा जी काही समस्या आहे
ती अगोदर सोडवा, ती समस्या सोडवण्यासाठी
योग्य तो सल्ला घ्या, समस्या सोडवणे हाताबाहेरचे असेल, तर जे काय होईल त्याला सामोरे जाण्याची
मनाची तयारी ठेवा, आणि उंच वायफळ विचार
करण्याची सवय असेल तर तो तुमचा दोष आहे, त्याला इलाज नाही, आनंदी जीवन कसे जगावे
ते शिकून घ्या.

0
Answer link
मनातले विचार थांबवण्यासाठी काही उपाय:
- ध्यान (Meditation): नियमितपणे ध्यान केल्याने मनाला शांत आणि एकाग्र ठेवण्यास मदत होते. श्वासावर लक्ष केंद्रित करा किंवा एखाद्या मंत्राचा जप करा.
- श्वासावर लक्ष केंद्रित करणे: जेव्हा मनात विचार येतात, तेव्हा आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा.
- वर्तमान क्षणात जगा: भूतकाळ आणि भविष्याच्या विचारांमध्ये अडकू नका. वर्तमानात काय चालले आहे यावर लक्ष केंद्रित करा.
- नकारात्मक विचार ओळखा: नकारात्मक विचार येतात हे ओळखून त्यांना सकारात्मक विचारांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करा.
- नियमित व्यायाम: नियमित व्यायाम केल्याने तणाव कमी होतो आणि मन शांत राहते.
- पुरेशी झोप घ्या: दररोज रात्री 7-8 तास झोप घेणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.
- आहार: संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या. जंक फूड आणि तेलकट पदार्थ टाळा.
- मनोरंजन: चित्रपट पाहणे, संगीत ऐकणे किंवा पुस्तके वाचणे यासारख्या गोष्टींमधून मन divert करा.
हे काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या मनातले विचार थांबवू शकता आणि शांतता मिळवू शकता.
टीप: जर तुम्हाला खूप जास्त नकारात्मक विचार येत असतील, तर कृपया मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घ्या.