Topic icon

मन

0
'मण' म्हणजे काय?

'मण' हे वजन मोजण्याचे एक भारतीय परिमाण आहे. हे विशेषतः धान्य आणि इतर शेती उत्पादने मोजण्यासाठी वापरले जाते.

'मणा'चे मूल्य:
  • एक मण म्हणजे 40 शेर.
  • आणि एक शेर म्हणजे सुमारे 933.12 ग्रॅम.
  • म्हणजे एक मण म्हणजे 37.3248 किलो.

टीप: 'मण' हे परिमाण भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या मूल्यांमध्ये वापरले जाते. त्यामुळे त्याचे मूल्य निश्चित करताना प्रदेशानुसार बदल होऊ शकतो.

उत्तर लिहिले · 19/5/2025
कर्म · 1040
0
उत्तरासाठी मी HTML मध्ये माहिती देत आहे:

मेंदूला शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी अनेक प्रक्रिया एकत्रितपणे काम करतात. त्यापैकी काही महत्वाच्या प्रक्रिया खालीलप्रमाणे:

  1. ध्वन्यात्मक प्रक्रिया (Phonological Processing):

    • या प्रक्रियेत, मेंदू ऐकलेल्या किंवा वाचलेल्या शब्दांमधील ध्वनी (phonemes) ओळखतो.
    • प्रत्येक ध्वनीला योग्य अर्थ देतो.

  2. आकारिक प्रक्रिया (Morphological Processing):

    • शब्द अनेक लहान अर्थपूर्ण भागांनी (morphemes) बनलेले असतात. उदाहरणार्थ, 'अ-परिचित' मध्ये 'अ' उपसर्ग आहे आणि 'परिचित' मूळ शब्द आहे.
    • मेंदू या भागांना ओळखतो आणि एकत्रित करून शब्दाचा अर्थ लावतो.

  3. वाक्यरचना प्रक्रिया (Syntactic Processing):

    • शब्द वाक्यात कसे जोडलेले आहेत आणि त्यांची रचना काय आहे, हे मेंदू समजून घेतो.
    • यामुळे शब्दांचे संबंध आणि वाक्याचा अर्थ स्पष्ट होतो.

  4. अर्थविषयक प्रक्रिया (Semantic Processing):

    • या प्रक्रियेत, मेंदू शब्दाचा शब्दकोशातील अर्थ (lexical meaning) आणि वाक्यातील संदर्भानुसार अर्थ समजून घेतो.
    • पूर्वी साठवलेल्या माहितीच्या आधारे नवीन शब्दांचा अर्थ जोडला जातो.

  5. प्रासंगिक प्रक्रिया (Pragmatic Processing):

    • बोलणाऱ्याचा हेतू, सामाजिक संदर्भ आणि संभाषण कोणत्या परिस्थितीत होत आहे, हे लक्षात घेऊन मेंदू शब्दाचा अर्थ लावतो.
    • उदा. ‘मी खूप थकून गेलो आहे’ या वाक्याचा अर्थ केवळ थकवा नसून, बोलणाऱ्याला विश्रांती हवी आहे, असाही होऊ शकतो.

या सर्व प्रक्रिया अत्यंत वेगाने आणि एकाच वेळी घडतात, ज्यामुळे आपल्याला शब्दांचा अर्थ सहजपणे समजतो.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1040
11
मन आणि बुद्धी यातील फरक सांगण्यासाठी एक पुस्तक लिहिले तरी सुद्धा कमी पडेल माझ्या अभ्यासानुसार उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.
बरेच लोक म्हणतात की मी माझा निर्णय माझ्या बुद्धीला पटेल त्यानुसार घेतो आणि काही लोक म्हणतात की मी माझा निर्णय माझ्या मनाला पटेल त्यानुसार घेतो पण तू हे मन आणि बुद्धी यामध्ये जास्त अंतर नाही असे माझे मत आहे म्हणजेच जेव्हा तुम्ही बुद्धीने निर्णय घेता त्यावेळेस तुम्ही त्या क्षणाला तुमच्या असलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही तो निर्णय घेतात. मात्र जेव्हा तुम्ही मनाने निर्णय घेता त्यावेळेस तुम्ही आत्तापर्यंतच्या जमा करत आलेल्या माहितीच्या आधारे म्हणजे तुमची विवेकबुद्धी आहे त्यानुसार निर्णय घेता आणि अशा वेळेस आपण म्हणतो की मी माझ्या मनाने निर्णय घेतला.

एक उदाहरण द्यायचे झाले तर असे समजा की तुम्ही एक माळकरी माणूस आणि आणि मांसाहार करत नाही आणि एखाद्या अज्ञातस्थळी हरवले आहात आणि तिथे तुम्हाला काही दिवसांपासून खायला मिळाले नाही आणि अशा वेळेस तुमच्यासमोर एखादा प्राणी येतो त्याला तुम्ही खाऊ शकता. अशा वेळेस तुम्हाला तुमची बुद्धी म्हणेल की जर तुला जिवंत राहायचे असेल तर आता या प्राण्याला खायला काही हरकत नाही. मात्र आतापर्यंतची शिकवण आणि तुमच्या गळ्यात माळ असल्याने तुमच्या मनाचे तुम्हाला सांगणे असेल की आजूबाजूला असलेला पालापाचोळा भाज्या खा मात्र या प्राण्याला मारून मांसाहार करू नको.
उत्तर लिहिले · 17/1/2021
कर्म · 283280
9
विचार करणे हे मेंदूचं खरं काम आहे. जोवर त्याला हे काम मिळतंय तोवर तो fit and fine आहे. पण जेव्हा त्याला नवनवीन कल्पना, विचार येणं, करणं बंद होतं तेव्हा मेंदू आकुंचन पावतो आणि त्याची आधीची क्षमता लोप पावते.

नवनवीन विचार करणे हे मेंदूचे मुख्य काम आहे. नवनवीन कल्पना किंवा विचार न केल्याने मेंदू आकुंचन पावतो. त्यामुळे विविध विचार करणे थांबवू नका.

मनातले विचार थांबवणे म्हणजे नक्की काय
ते विचार नाकारात्मक आहेत की सकारात्मक
चांगले की वाईट??

विचार सतत वाहतात, पण त्यांचे सामथ्र्य कमी होत नाही.. ते नदीप्रमाणे असतात.. एक एक विचार येत गेला, नाहीसा होत गेला.. पण सत्ता चालली ती विचारांचीच.. मनुष्याला या विचारांपासूनच प्रेरणा मिळत आली आहे. विचारांच्या सामर्थ्यांची तुलना करावी अशी अन्य शक्ती या जगात नाही..

विचारांचं सामथ्र्य फार मोठं असतं. असं म्हटलं जातं की, विचारांनीच माणूस घडतो. सकारात्मक विचार करणाऱ्यांची प्रगती लवकर होताना दिसते. त्याउलट नकारात्मक विचार करणाऱ्यांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. सामान्यपणे आपलं आपल्या विचारांकडे लक्ष नसतं; किंबहुना विचारांच्या बाबतीत जेवढी सजगता असायला हवी तेवढी आपल्यामध्ये नसते. एखादी चांगली गोष्ट करताना मनात येणारा पहिला सृजनशील विचार पकडून ठेवता आला पाहिजे, तशी सवयच लावून घ्यायला हवी व तात्काळ कृतीच्या अंमलबजावणीची रूपरेषा ठरवली गेली पाहिजे. मनात येणाऱ्या पहिल्या विचारालाच नकारात्मक विचारांचे मळभ लाभले की कार्यसिद्धीला ग्रहण लागलंच म्हणून समजा. पाणी ज्याप्रमाणे उताराकडे वाहतं तसे बहुसंख्य वेळेला माणूस नकारात्मक विचार करताना दिसतो. बहुतेक वेळेला खालील प्रकारचे विचार कार्यप्रवण होण्यामध्ये आणि चांगल्या विचारांना प्रत्यक्षात सिद्ध होण्यामध्ये अडसर ठरतात. उदाहरणार्थ,

* मी केल्याने काय फरक पडणार आहे?

* मला जमण्यासारखं नाही ते.

* मीच का म्हणून करू?

* योग्य वेळ आल्यावर करू, आत्ताच काही घाई नाही.

* लोक काय म्हणतील, हसणार तर नाहीत ना?

* पण योजना असफल झाली तर?

* करायला हरकत नाही, पण मला नशीब कधीच साथ देत नाही.

पहिल्या विचारावर कार्यप्रवण होण्यामध्ये जरा काळ गेला की असे असंख्य विचार अडचणींचे डोंगर उभे करतात आणि चांगल्या विचाराची हत्या होते. थोर व्यक्तींच्या चरित्राचं परिशीलन केलं असता असं लक्षात येतं की, प्रतिकूल परिस्थितीतही केवळ सकारात्मक विचारांची साथ न सोडल्यामुळे ते असामान्य कार्य करू शकले.



स्व-प्रतिमाग, विधायक विचार   

स्वत:बद्दल व्यक्तीचं चांगलं मत असणं हे सृजनात्मक विचारांच्या जोपासनेसाठी, आत्मविश्वास निर्मितीसाठी व सुदृढ मानसिक स्वास्थ्यासाठी अग्रक्रमाची गोष्ट ठरत ‘स्व’ची ओळख होणं ही या प्रक्रियेतील महत्त्वाचा व सुरुवातीचा टप्पा आहे. सकारात्मक विचार करण्याची सवय लागली की आपोआपच स्वत:विषयी आदर निर्माण होतो व सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण होते. चांगली स्व-प्रतिमा निर्माण होण्यासाठी स्वत:चं चिकित्सक अवलोकन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याबरोबरच सकारात्मक विचारांचा पाया म्हणून ओळखली जाणारी सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. सकारात्मक स्व-प्रतिमा असणारे व्यक्ती स्वत:बद्दल जागृत असतात. स्वत:च्या गुण-दोषांबद्दल त्यांना जाणीव असते. स्वत:बद्दल चांगली भावना योग्य निर्णय घेण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पेलण्यासाठी महत्त्वाची आहे.

स्वत:ला स्वीकारणं

बऱ्याच वेळा व्यक्ती स्वत:च्या रंग, रूप, उंची यानुसार स्वत:चं मूल्यमापन करतो. वर्ण काळा असेल, उंची कमी असेल तर स्वत:बद्दल नकारात्मक विचार निर्माण होतात. क्वचित प्रसंगी आलेल्या अपयशाने खचून न जाता अपयशाच्या कारणांचा अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती ही निसर्गाची अद्वितीय कलाकृती असते, त्यामुळे इतरांशी तुलना करून स्वत:ला कमी लेखण्यापेक्षा स्वत:मध्ये सातत्याने सुधार कसा होईल, याचा प्रयत्न केला पाहिजे.

स्वत:शी संवाद साधणं

स्वत:शी संवाद साधणं हा सकारात्मक स्व-प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. स्वत:ला स्वत:मध्ये असणाऱ्या गुण-दोषांसहित स्वीकारणं म्हणजेच सकारात्मक स्व-प्रतिमा निवडण्यासाठी उचललेलं पहिलं पाऊल होय. इतर व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करतात, त्यांना आपण कसे वाटतो, यावरून स्वत:ची किमत करू नये. कारण आपणच स्वत:ला चांगले ओळखू शकतो.

धन्यवाद
उत्तर लिहिले · 23/2/2019
कर्म · 55350
9
मनाची शक्ती 

मनुष्याशाची उत्पत्ती लाखो वर्षापूर्वी झाली.
निसर्गाचा प्रकोप त्याने अगदी जवळून अनुभवलेला आहे.
धो धो पडणारा पाऊस ,जिकडे तिकडे पाणीच पाणी म्हणजेच मोठा प्रलय, सोसाट्याचे वादळ, हादरणारी आणि फाटणारी जमीन, धरतीच्या  च्या पोटातून  येणारा तप्त  लाव्हा रस, आग ओकणारा सूर्य , हिमवर्षाव अशा कित्येक नैसर्गिक संकटाचा सामना त्याला करावा लागत असे. 
हळू हळू त्याने त्याच्या विचार गतीला वेग देवून निसर्गाचा चांगला अभ्यास करून ह्या अफाट शक्तीचा कसा उपयोग केला हे तर तुम्हाला आज दिसतच आहे.
आपण जसा विचार करतो तशीच प्रतिकृती वास्तवात करण्याचा परयत्न करतो आणि त्यात आपल्याला यश मिळतेच.  निसर्गाच्या प्रकोपापासून आपण स्वत:ला कसे वाचवू असा तो रात्रंदिवस विचार करत राही म्हणून त्याला एकामागे एक मार्ग मिळत गेले आणि मनाच्या शक्तीचा उपयोग करून विविध साधनांचा शोध लावत राहिला.
आदी मानवा पासून ते आजच्या प्रगत मनुष्याचे जे चित्र आहे ते केवळ त्याची विचार शक्ती म्हणजेच त्याच्या मनाची शक्ती होय.
निसर्गाने या पृथ्वीवर अनेक प्राण्यांची निर्मिती केली. त्यात मानवाचीही निर्मिती त्याने केली.
 
 आपल्याला जो मनुष्य जन्म मिळाला हे आपले मोठे भाग्य च होय. अशा मनुष्याला या पृथ्वीतलावर अनेक प्रकारची दु:खे भोगावी लागतात. दु:खाचे  ९०% कारण केवळ मनातील भ्रम हे आहे.अशा दु:खमय जीवनातून आनंद निर्मिती होण्यासाठी भरकटनाऱ्या मना वर नियंत्रण  ठेवले पाहिजे.
या पृथ्वी वर ७०० कोटी पेक्षा जास्त लोक आहेत तरी पण प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे आणि आपण त्या चेहऱ्या वरूनच ठराविक व्यक्तीला ओळखतो. निसर्गाने ठराविक थोड्याशा जागेतच नाक,डोळे,तोंड ,कान यांचा असा ले आउट केला आहे की प्रत्येकाची ओळख एका क्षणात व्हावी. जसा प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचे चालणे,बोलणे आणि स्वभाव वेगवेगळा असतो.
मनुष्य हा समाज प्रिय प्राणी आहे, तो एकटा राहू शकत नाही म्हणून Generally आपण एका सोसाटीत, चाळीत, गावात किंवा वाड्यात राहतो तर तेथील लोकात रममाण होण्यासाठी, एकरूप होण्यासाठी प्रत्येकाच्या सवई, स्वभाव आपल्याला माहित असल्या पाहिजेत. नाही तर आपण एखाद्याविषयी गैरसमज करून घेऊ म्हणून मानस शास्त्राचे थोडे तरी ज्ञान प्रत्येकाला असणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण प्रत्येक व्यक्तीशी स्वभाव ओळखून प्रेमाने राहू शकू.
 
मनुष्याचा एक दुसऱ्या कडे बघण्याचा दृष्टीकोण जर चांगला असेल तर जीवनात कुठलेही कठीनातले कठीण काम तो व्यवस्थित रित्या पार पाडू शकतो. विटेला वीट जोडूनच मोठी हवेली तयार होते, थेंबा थेंबानेच मोठे सरोवर भरले जाते. एकमेकाच्या विचारांची,ज्ञानाची, आणि अनुभवाची व्यवस्थित देवाण घेवाण झाल्यास सर्व काही शक्य होतं. मनुष्याचे मन हे एक शक्तीचे भांडार आहे. या शक्तीचा योग्य मार्गाने उपयोग केलास जीवनातील फार मोठी सफलता आपण मिळवू शकतो. आपले मन आपला शत्रू बनवायचे कि मित्र ते आपल्याच हातात आहे.
 
विंचू किंवा साप चावल्यास ते विष औषधाने संपवता येते किंवा संगणकात वायरस गेल्यास तो आंटीवायरस ने काढता येतो. परुंतु मन एकदा का विकारी झाले तर त्याला त्वरित ठीक करण्यासाठी काही ठोस असा वैज्ञानिक उपाय नाही . 
विकारी मन असलेल्याला मनुष्याला आपण सोडून बाकी सर्व लोक, तुच्छ वाईट आणि फालतू वाटतात. त्यांचा कोणावर विश्वास बसत नाही, अशा व्यक्ती नेहमी संशयी जीवन जगत असतात. अहंकार आणि क्रोध त्यांच्या शरीरात अगदी खचा-खच भरलेला आसतो. अशा व्यक्ती नेहमी काही न काही तरी शारीरिक व्याधीने ग्रासलेल्या असतात कारण त्यांच्या मध्ये असलेला मानसिक शांततेचा अभाव.
 
'संशय' ही एक प्रकारची आग आहे, तिच्या लपेट मध्ये जो कोणी व्यक्ती येते ती अगदी अक्षरश:जळून खाक होते.
एखाद्या स्त्री ला असा संशय घेणारा पती मिळाल्यास तिच्या जीवनाची पूर्णपणे नासाडी होते किंवा एखाद्या पुरुषाला अशी पत्नी मिळाल्यास त्याला जीवन अगदी नकोसे होते. 
 
एका मयार्देत संशय घेणे ठीक आहे जसं तुम्हाला कोणी म्हटले की एक हजार रुपयाचे तीन महीन्यात दाम दूप्पट देतो तर तेथे जरूर संशय घ्या. 
आपण दु:खी  का होतो ?मनुष्याच्या दु:खाचे कारण ९०% त्याचे मन च आहे. काही वेळा आपण दु:खी होतो आणि इतरांना पण दु:खी बनवतो. आपल्याला खरे काही माहीत नसताना अगदी बिनधास्त प्रतिक्रिया देता. अशा दिलेल्या प्रतिक्रिये मुळे काय परिणाम होतो ते पाहा.
 
 
एका गावात दोन व्यक्ती बोलत असतात  
पहिली व्यक्ती " अरे आपल्या सरपंचानी आज नवीन अशोक लिल्यालंड ट्रक आणला आहे "
दुसरा व्यक्ती " काय बोलतोस काय , आरारा नक्कीच ग्राम पंचायती मध्ये काही तरी गडबड केली असणार त्याने , तरी मी विचार करतो की वरतून एवढ्या सरकारच्या नवीन नवीन योजना येतात तर त्याचा अंमल का होत नाही ? कसा होणार हा आपला सरपंच फक्त स्वत:च च घर भरतोय"
ही चर्चा अगदी वाऱ्या सारखी गावात पसरते आणि गावातील स्वच्छ असलेले वातावरण काही प्रमाणात का होईना मलीन होते. अशा प्रकारे एखाद्या गावातील  किंवा एखाद्या घरातील  शांतीला  ग्रहण लागते ते केवळ आपल्या काहीही नियंत्रण नसलेल्या  विकारित मनाच्या  प्रतिक्रिये मुळेच.
 
ज्या व्यक्तीचे मानसीक आरोग्य अगदी उत्तम आहे त्याला बारीक सारीक गोष्टीत पण आंनद वाटतो. त्याचा चेहरा नेहमी टवटवीत आणि प्रसन्न असतो. त्याच्याकडे मनाची शक्ती भरपूर असल्यामुळे  तो नेहमी energetic दिसतो. क्रोध आणि अहंकार त्याच्यापासून १० मीटर दूर असतात. चांगल्या विचाराचे आणि ज्ञानाचे भांडार त्याच्या डोक्यात भरलेले असते त्या मुळे नकारात्मक विचार ,द्वेष ,जळ फळाट, बदलेची भावना यांना तेथे जागाच राहिलेली नसते.   
 
आपण जर दुसऱ्या विषयी किंवा स्वत: विषयी वाईट विचार करत राहिलो तर त्याचा अप्रत्यक्ष रित्या आपल्या मनावर आणि शरीरावर परिणाम होतो. नकारात्मक उर्जा शरीरात तयार होऊन मानसीक तान एवढा वाढतो की रहद्य केंव्हा ही बंद पडू शकते .
 
आपल्या मनात नेहमी चांगले विचार आणल्यास अशी परिस्थिती उदभवत नाही. 
थोडक्यात, जितके जोरात भिंतीवर माराल तेवढेच  जोरात आपल्याला लागते कारण क्रिया ही प्रतिक्रिये बरोबर असते.
मनात चांगले विचार  चांगले जीवन, जर विचार बरोबर नसतील  तर  जीवन  गडबड.
ज्या प्रमाणे आपल्या  मोबाइल मध्ये इंटरनेट चालू ठेवल्यास  battery consumption जास्त होते त्याच प्रमाणे आपल्या मनात अनावश्यक विचार चालू असतात तेंव्हा आपली उर्जा वाया जाते.
 
 
  
माणूस दिवसभरात जे काही विचार करतो ते दोन प्रकारचे असतात. एक सकारात्मक आणि दुसरा नकारात्मक. जर तुम्ही चांगला सकारात्मक विचार केला तर चांगले होईल नकारात्मककेलात तर वाईटच होईल. तुम्ही दिवसभरात जो विचार कराल तसेच तुम्ही बनाल. जीवनात जर काही चांगल बनायचं असेल तर आधी आपले विचार बदलले पाहिजेत. आणि जिथून या विचारांचीउत्पत्ती होते त्या मनावर आपल्याला ताबा मिळविणे आवश्यक आहे.
विज्ञानाच्या जोरावर मनुष्याने बऱ्याच गोष्टी मिळवल्या म्हणून आज आपण खूप प्रगती पथावर आहोत.  पैसे कमवून सर्व सुख सुविधा मिळवण्यासाठी आपण आयुष्य भर धडपडत असतो.  ऐहिक सुखाची चटक लागल्याने आणि मनाची मशागत न झाल्याने सुखी जीवनाची गुरुकिल्ली आम्हाला सापडत नाही.
 
आपल्या मनात सतत नकारात्मक विचाराचे थैमान चालू असल्यामुळे  असे वाटते की माझी पत्नी किंवा पती माझ्या कडे लक्ष देत नाही, कार्यालयात , मित्रांमध्ये , नातेवाईकांमध्ये स्वत:ला कमी समजणे , मुले आपलं काही ऐकत नाहीत असे वाटणे , आपल्या विषयीच लोक काहीतरी चर्चा करतात असे वाटणे या सर्व भ्रमाचे एकच कारण म्हणजे नकारात्मक विचारामुळे आत्मविश्वास कमी कमी होत जातो म्हणून असे मनाला वाटायला लागते.
 
कोणतेही ध्यान जसे राजयोग ,सोहम ध्यान , विपासना ध्यान केल्याने मनातील अनावश्यक विचार निघून जातात. मनातील विकार हळू हळू दूर होतात. क्रोधा वर नियंत्रण राहते , प्रतिक्रिया द्यावी किंवा देवू नये याचे तारतम्य ठरवता येते. मानसिक स्तिथी जाग्यावर येते जेणेकरून आपण कोठे काय बोलावे किंवा शांत राहावे हे लक्षात येते.  
 
आपले मन हे निसर्गाने बहाल केलेले सर्वात मौल्यवान धन आहे जे कोणी आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. याचा उपभोग घेण्यासाठी आपण आपले मानसिक नेत्र उघडायला हवेत. आपल्या मनाचे दोन स्तर असतात त्यातला बाह्य स्तर म्हणजे चेतन मन व आंतर स्तर म्हणजे अचेतन मन. आपल्या अचेतन मनात अदभुत चमत्कार घडवून आणणारी शक्ती व सामर्थ्य दडले आहे.चेतन व अचेतन ही दोन वेगवेगळी मने नाहीत तर ती एकाच मनाच्या कार्यपद्धतीची दोन क्षेत्रे आहेत. सामान्यपणे जो विचार आपण करतो तो चेतन मनाचा भाग असतो आणि ते विचार प्रत्यक्षातआणण्याचे काम अचेतन मन करत असते. आपल्या अचेतन मनाने एखादी कल्पना स्विकारली की ते लगेच अमलात आणायला सुरुवात करते. अचेतन मनावर आपण जी छाप किंवा ठसे टाकतो ते ठसेकिंवा आपण जाणीवपूर्वक ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतो त्या सगळ्या गोष्टी आपले अचेतन मन स्वीकारते.
आपले अचेतन मन हे अशा सुपिक जमिनीसारखे आहे जी चांगल्या-वाईट सगळ्या प्रकारच्या बीजांचा स्वीकार करते. आपले विचार सक्रिय असतात, ती बीजं असतात. नकारात्मक व विध्वंसकविचार आपल्या अचेतन मनात नकारात्मक रूपाने कार्य करतात. आपल्याला मिळणारी अचेतन मनाची प्रतिक्रिया ही आपल्या चेतन मनातील विचारांवर अवलंबून असते. चेतन मनाच्या इच्छेविरुद्धकोणतेही सुचन अचेतन मनावर छाप पाडू शकत नाही. आपले अचेतन मन विनोद समजू शकत नाही. ते आपल्या आदेशांचे शब्दशः पालन करते.
म्हणूनच “मला जमणार नाही, मी हे कधीच करू शकणार नाही”, हे उद्गार कधीही काढू नका. तुमचे मन तुमचा प्रत्येक शब्द खरा करीत असते. स्वतःला नियंत्रित करण्यासाठी व शिस्तलावण्यासाठी स्वयंसूचना एक उपयोगी साधन बनू शकते. जेव्हा तुमच्या मनात हा विचार येईल कि “मला हे शक्य नाही” तेव्हा त्या भयाला दूर सारण्यासाठी त्या वाक्याच्या जागी पुढचे वाक्य वापरा. “माझ्या अचेतन मनाच्या शक्तीद्वारे मी सगळे काही शक्य करू शकतो”. तुम्ही तुमच्या आत्म्याचे (अचेतन मनाचे) कॅप्टन आणि तुमच्या नशिबाचे मालक आहात. अशाप्रकारे तुमच्या सर्व समस्यांचेसमाधान तुमच्यापाशी आहे. ते आत्तापासूनच उपयोगात आणा. लक्षात ठेवा निवड करण्याची क्षमता तुमच्यात आहे. निरोगी जीवनाची निवड करा, प्रेमाची निवड करा, आनंदाची निवड करा. असे करालतर जीवन खूप सुंदर आहे.
समजा एखाद्या महिलेने तिचा आवडता पोशाख नवी साडी किंवा ड्रेस जो असेल तो, परिधान करून, मेक अप करून अगदी नटून थटून जेंव्हा आरशात पाहते, सरळ पहाते, ह्या कोनातून पाहते त्या कोनातून पहाते आणि परत परत पाहते कारणतिचे ते सुंदर रूप तिला नेहमी पाहायला आवडते.
अगदी याच प्रमाणे आपले मन स्वछ ठेवून,सुसंस्कारित केल्यास बाह्य जग खूप खूप  सुंदर दिसते. आपले मन हा एक आरसा आहे. तुम्ही जसा विचार मनात ठेवाल तसीच प्रतिकृती  बाहेर दिसते.
आपले लक्षं म्हणजेच जीवनातील ध्येय विद्यार्थी असेल तर ठराविक टक्केवारीचे ध्येय , शेतकरी असेल तर जास्तीत जास्त उत्पन्नाचे ध्येय, उद्योगपती असेल तर टर्न ओवर चे ध्येय, अधिकारी असेल तर बढतीचे ध्येय. अशा प्रकारे प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित करून मार्गाला लागल्यास  आपले अचेतन मन आपली सर्व शक्ती  ध्येया कडे केंद्रित करते आणि ते ध्येय साध्य करते . आपल्या ध्येया कडील वाटचाली ची प्रगती दररोज रात्री झोपण्या पूर्वी  रोजनिशी मध्ये लिहिणे आवश्यक आहे  तसेच  सकाळी उठल्याबरोबर  आपल्या ध्येयाची कल्पना आठवावी म्हणजेच  आपण आपल्या अचेतन मनाला वारंवार  सूचनाच देत आहोत, तेच अचेतन मन मेंदूला आणि मेंदू शरीराला सचेत करते जेणेकरून  मनातील असलेली  तुमची योजना प्रत्यक्ष अस्तित्वात येते.
 
आपण रोज पूजा करतो ,धार्मिक ग्रंथ वाचतो ,मंदिरात जातो या पाठीमागचे एकच कारण म्हणजे आपल्या मनात चांगले विचार येवोत , चांगल्या विचारांची जोपसना व्हावी आणि तसेच जीवनात होत राहते . आपल्या मनातील विचार म्हणा किंवा कल्पना यांची प्रत्यक्ष रुपात आमलात आणण्यासाठी आपला मेंदू हा आपल्या शरीराला नेहमी सूचना देत राहतो. सर्व प्रथम फोर्ड ला असे वाटले की आपली ही गाडी घोडयाने ओढण्या पेक्षा का बरे यांत्रिक शक्ती ने चालू नये ? म्हणून  त्याने त्याचे विचारचक्र सुरु ठेवले आणि जवळ असलेल्याला लोकांना पण सांगितले की यंत्रा वर गाडी चालवणे शक्य आहे फक्त विचार करा. त्याने त्याची कल्पना काही वास्तवात आण्यासाठी कितीतरी दिवस ,महिने आणि वर्षे लोटली परुंतु माघार न घेता प्रयत्न  चालूच ठेऊन एक दिवस  जगाला त्याने यंत्रा वर धावणारी गाडी दाखवली. हे एक उदाहरण होते फोर्ड प्रमाणेच असे किती तरी महान लोक होऊन गेले आणि सध्या आपल्या मध्ये आजही आहेत. आपल्या समोरचेच उदाहरण म्हणजे बिल गेट, Microsoft windows ने तर पूर्ण जगच बदलून टाकले.  आपल्या अचेतन मनाची ही शक्ती आहे . जो विचार आपण नेहमी करतो तोच अचेतन मन स्वीकारते आणि आमलात आणते  म्हणून सांगतों नेहमी सकारात्मक  राहा, चांगले विचारच जवळ ठेवा.
 
अच्छा सोचो, अच्छा पालो,
नकारात्मक सोच से बिलकुल, ध्यान हटा लो !
जिसपर ध्यान लगाओगे,
जीवन में वही तो पाओगे !
चेतन मन जो सोचेगा हरदम,
वही अवचेतन अपनाएगा !
वही विचार फिर पक्का हो के,
बीज में बदला जायेगा !
यही बीज फिर अवचेतन के,
खेत में रोपा जाएगा !
फिर विश्वास के पानी से ,
जब  इसको सींचा जायेगा !
फसल मिलेगी जीवन में,
जो बोया वो बढ़ के आयेगा !
इसीलिए फिर याद दिलाता, 
नकारात्मक  सोच से तोड़ो नाता !
यह सिद्धांत अटूट निराला,
जिसने मन को इसमें ढाला !
रंग सुहाने देख रहा वो,
चिड़ियों जैसे चहक रहा वो !
जीवन खुशियों की खान लगे अब,
मन न कभी परेशान रहे अब !!
 
आपण आपल्या घराला किंवा गाडीला लिंबू मिरची बांधतो का तर लोकांची नजर लागू नये म्हणून. खरे तर कोणाचीही नजर कोणाच्या घराला किंवा गाडीला लागत नसते, वास्तविक आपल्याच मनाची नजर लागते कारण आपले मन दुषित आहे जे लोकांविषियी असा विचार करते.
 
" मनाची अगाध शक्ति " ह्या विषयावर अनेक तज्ञांनी बरेच बरेच लिखाण केले आहे. पण ही शक्ति कशाप्रकारे काम करते ह्याचा शोध घेणे आवश्यक आहे. सुरुवात करायची आहे ती विश्वतील अती सूक्ष्म घटक असे समजल्या जाणार्‍या अणुपासून.
साधारण शंभर वर्षापूर्वी असा समज होता की ह्या विश्वातील सर्व वस्तूंचे दोन प्रकारात विभाजन होते. एक पदार्थ म्हणजे matter दुसरे म्हणजे energy अर्थात् चेतनत्त्व. पदार्थ म्हणजे दगड, भिंती, लाकूड, टेबल, सोफा, टीव्ही इत्यादि. चेतनत्त्व म्हणजे चेतनता असलेले वृक्ष, प्राणी, मानव वगैरे. दुसरा समज म्हणजे कोणत्याही पदार्थातील सर्वात सूक्ष्म कण म्हणजे अणु. पण पुढे आढळले की त्याच्याही अंतरंगात एक nucleus नावाचा घटक असून त्यात neutrons व protons असतात आणि बहिरंगात electrons असतात. nucleus स्थायी स्वरूपाचा असतो आणि electrons अंतस्थ nucleus च्या सभोवती वर्तुळाकार सतत फिरत असतात.
म्हणजे निसर्गात तीन मूलभूत कण (fundamental particles) असून त्यांचे गुणधर्म भिन्न भिन्न आहेत आणि अणूच्या निर्मितीत हे तिन्ही कण आवश्यक आहेत. पुढे समजले की अणू प्रारणे (radiation) शोषून घेऊन रासायनिक बदल घडवू शकतात तसेच योग्य परिस्थितीत अणू प्रारणे उत्सर्जित करतात. प्रारणे तरंगस्वरूप (frequency) असतात. आणखी काही वर्षांनी समजले की अणु व प्रारणे यांच्यात उर्जा विनिमय घडतो त्यावेळी प्रारणे पुंजस्वरूप (quantum) असल्यासारखीच वागतात. याचा अर्थ एकच वस्तू कधी प्रारणरूप तर कधी पुंजस्वरूप असू शकते. म्हणजे ती वस्तू पदार्थही आहे आणि ती ऊर्जाही आहे. म्हणजेच त्याचे स्वरूप द्वैती आहे. विरोधाभास दिसतो खरा पण वस्तुस्थिती द्वैती स्वरूपाचीच आहे. निष्कर्ष : निसर्ग कसा आहे हे निसर्ग ठरवतो. आपण नैसर्गिक वस्तुस्थिती समजावून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. अणु व प्रारणांचे द्वैतीस्वरूप हे वस्तुस्थितीचे शक्य तेवढे अचूक वर्णन आहे.
शास्त्रज्ञ बोहर याने अणुप्रणालीद्वारे सूक्ष्म अणु आणि त्याहून सूक्ष्मतर अणुघटक यांचे नविन गतिशास्त्र "पुंजगतिशास्त्र" (quantum mechanics) या शास्त्राचा पाया घातला. बरेच पुढे या शास्त्राचे परिपूर्ण भावंड quantum electrodynamics सुप्रतिष्टीत झाले. Quantum Electrodynamics या प्रणालीने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यातील जवळजवळ सर्व घटनांचे यशस्वी स्पष्टीकरण दिलेले आहे.
आता अणुचे स्वरूप जर पदार्थ आहे तर त्यात ऊर्जा येते कुठून. अणुचे संशोधन चालूच होते. शास्त्रज्ञांनी अणुच्या अंतरंगाच्याही आत म्हणजे nucleus च्या आत जायचा प्रयत्न केला तेव्हां त्यांना तिथे quark नावाचा पदार्थ दिसला. जेव्हां त्यांनी त्याच्याही आंत जायचा प्रयत्‍न केला तेव्हां त्यांना एक विलक्षण गोष्ट आढळली आणि ती म्हणजे त्या quarks मध्ये होता एक तरंग, एक vibration. त्याला भौतिकशास्त्रात string म्हणतात. शास्त्रज्ञांच्या लक्षात आले की अणुला जिथून ऊर्जा मिळते ती या तरंगापासून उत्पन्न होते. याचा अर्थ हे सर्व विश्व तरंगापासून बनलेले आहे. ह्या विश्वामधली प्रत्येक वस्तू तरंगांनी बनलेली आहे म्हणजेच विश्वामध्ये सर्वत्र vibrations आहेत. हे सर्व विश्व तरंगाच्या कंपनांनी भरलेले एक अतिप्रचंड जाळे आहे. या विश्वातील प्रत्येक वस्तू एकमेकाशी एका अती सूक्ष्म स्तरावर जोडलेली आहे. म्हणून या विश्वाला Holographic Universe असेही म्हणतात.
आपण सर्व सूक्ष्मतरावर का असेना पण एकमेकाशी जोडलेलो आहोत.
 
आपण पाहिले की नविन संशोधनानुसार आता हे स्पष्ट झाले आहे की ह्या विश्वात जे काही दृष्य वा अदृष्य आहे ते सर्व ऊर्जेचा अविष्कार आहे. ऊर्जा, स्पंदने, स्पंदनांचे 'resonance theory' नुसार वस्तूंचे एकमेकावर होणारे परिणाम हे पुढे आपण तपासूच. पण त्याआधी 'मन' म्हणजे काय आणि त्याची शक्ति म्हणजे काय ह्याचा एक आढावा घेऊ. 'मन' म्हणजे काय याची सर्वमान्य अशी नेमकी व्याख्या केलेली आढळत नाही. [निदान मला तरी तशी आढळली नाही]. विचारवंतांमध्ये याबद्दल बरेच मतभेद आहेत. पण मन म्हणजे विचारांची एक सरिता (नदी) असे बरेच विचारवंत मान्य करतात. जोपर्यंत विचारांची मालिका चालू आहे तोंवर मन आहे ह्याबद्दल शंकाच नसते. पण आपण जर काही क्षण विचार थांबवू शकलो तर जाणवते की मन गायब झाले आहे. अर्थात् विचाराव्यतिरिक्त 'भावना' हा देखील त्यातला एक घटक आहेच. पण भावनादेखील विचाराने प्रभावित होऊ शकते. तेव्हां आता विचार (thought) याबद्दल विचारबंत, संशोधक काय म्हणतात हे पाहू. अर्थात् काही उदाहरणेच. कारण विचार या विषयाबद्दल जगभर इतके संशोधन, लिखाण झाले आहे की कोणा एका माणसाला एका आयुष्यात ते सर्व तपासणे शक्य नाही. आता मनाची शक्ति म्हणजे विचारामुळे उत्पन्न होणारी, विचारामुळे प्रभाव पाडणारी शक्ति हे ओघाने आलेच. तेव्हां आपल्याला जे पाहायचे आहे ते मुख्यतः विचारांचा प्रभाव. 
विसाव्या शतकाच्या सुरुवातील फ्रान्समध्ये एमिली कोये नावाचा एक डॉक्टर होऊन गेला. खरा तर तो रसायनशास्त्रज्ञ. पुढे त्याने संमोहनविद्येचा अभ्यास करून काही प्रयोग केले आणि आपली एक प्रणाली बनवली. १९१० मध्ये त्याने एक दवाखाना उघडला जिथे कोणात्याही रुग्णावर मोफत उपचार केले जात. खरे तर तो काहीच उपचार करत नव्हता. कारण त्याची थेरपी होती स्वयंसूचना - autosuggestion. त्याने अक्षरशः हजारो रुग्ण बरे केले. त्यात rheumatism. Asthma, severe headaches, paralysis of a limb, fibrous tumors, ulcers and amazing variety of afflictions - ह्या सर्वांवर उपाय होते. उपाय म्हणजे त्याने कोणालाही कसलेही उपचार करून बरे केले नाही. त्याने सर्व रुग्णांना आपण स्वतः स्वतःलाच कसे बरे करावे हे शिकविले. त्याने त्या सर्व रुग्णांना स्वसूचना देण्यास शिकविले. अर्थात ह्या सर्व सूचना म्हणजे सकारात्मक, आपण बरे झालो आहोत अशा प्रकारच्या सूचना. डॉ. कोयेने स्वतः कसलाही उपचार न करता त्याच्या स्वसूचना प्रणालीने हजारो रुग्ण बरे झाले. आणि हे सर्व एक सुरेख रंगविलेले चित्र आहे असे नव्हे. कारण मी याबद्दल जिथे वाचले तिथे - All the cures are well documented - असे म्हटले आहे. 
जगाला एक नविन प्रणाली मिळाली. ब्रीद वाक्य होते - Day by day, in every way, I am getting better, better and better - अर्थात् हे वाक्य डॉ. कोये यांचे होते का आणखी कोणाचे हे मला माहित नाही. पण या प्रणालीतून एक महत्त्वाचा निष्कर्ष जगापुढे आला. तो म्हणजे - When we concentrate on a thought, the thought becomes true because our bodies transform it into action. ह्याचा अर्थ आपले विचार - आपली हाडे, आपल्या मासपेशी, आपल्या रक्तपेशी, आपले अवयव - पदार्थ ह्या घटकात मोडणार्‍या वस्तूवर परिणाम करू शकतात, नव्हे करतात. 
विचार फक्त आपल्यावरच प्रभाव पाडतात काय ? नाही त्याचा प्रभाव आपल्या आजूवाजूच्याच नव्हे तर हजारो मैल लांब असणार्‍या माणसांवर, घटनांवर, वस्तूवर होऊं शकतो. पण त्याआधी विचार - thought - यासंबंधी आणखी दोन-तीन जणांचे विश्लेषण पाहणे उपयोगी होईल. 
 
आपण जेव्हां विचार करतो तेव्हां आपल्या अंतरंगात विचार तरंग निर्माण होतात. ज्या प्रकारची आपली विचार स्पंदने असतात त्याप्रकारची एक frequency निर्माण होते. आपल्याला वाटते की आपले विचार, विचार तरंग आपल्यापुरतेच मर्यादित असतात. पण तसे होत नाही. आपले विचार तरंग वातावरणात, आपल्या अवतीभवती असलेल्या space मध्ये पसरतात. मग एक महत्त्वाची क्रिया घडते आणि ती म्हणजे ज्या frequency चे आपले विचार आहेत ते त्याच frequency चे विचार शोधतात आणि त्या विचारांना उत्तेजित करतात. आपले विचार जर आनंदाचे असतील तर आनंदाची frequency घेऊन हा विचार बाहेर जातो आणि आपल्या आजूबाजूला आनंदाची frequency जागृत करतो, वातावरणात आनंदाच्या frequency जागृत करतो, इतर व्यक्तिंच्यात देखील आनंदाच्याच frequency जागृत करतो. ह्या कृतीला resonance म्हणतात. पण ह्या resonance प्रमाणे आसपासच्या इतर व्यक्ति लगेच आनंदित होतात काय ? तसे तर आपल्याला कधी दिसत नाही. कारण दोन frequencies जेव्हां जुळतात - match होतात - तेव्हांच resonance तयार होतो हा नियम आहे. मग आपल्या आनंदाच्या frequency चे होते काय ? त्याचे पडसाद जाणवत का नाहीत. ह्याचे कारण म्हणजे हा परिणाम अति सूक्ष्म स्तरावर असतो. एका मोठ्या पाण्याच्या पिंपात मिठाचा एक खडा टाकावा तसे. अर्थात् आनंदाच्या frequency बाहेर पडल्यास जशा आनंदाच्या ऊर्मी पसरतात तशाच दुःखाच्या, क्रोधाच्या, भितीच्या विचारांच्याही frequencies बाहेर पसरतात. आनंदाचे तरंग हे लांब पल्ल्याचे म्हणजे higher frequencies असतात, आणि मोह, लोभ, मद, मत्सर ह्यांच्या कमी अधिक प्रमाणात पण आनंदाच्या frequencies च्या तुलनेत कमी दाबाच्या, म्हणजे lower frequencies असतात. आता आपल्या सुदैवाने म्हणा ह्या system मध्ये एक नियम आहे. Higher frequencies can affect lower frequencies but not viceversa. म्हणजे आपल्या जवळील व्यक्ति दुःखात असली आणि त्याच्या दुःखाची level जर पाण्याच्या पिंपाएवढी नसून जर एका कपाएवढी असेल तर कदाचित काही वेळाने त्याचे दुःख जवळील आनंदाच्या frequency ने निवळेल. ह्याच नियमानुसार तुम्ही जर आनंदात असाल आणि जवळची व्यक्ति कोणत्यातरी विचाराने (भूतकाळातील अप्रिय घटना वा भविष्यातील चिंता) उद्विग्न वा शोकावस्थेत असेल तर त्याचा आपल्यावर परिणाम होत नाही. म्हणजे त्याच्या विचारांची lower frequency आपल्या विचारांच्या higher frequency वर परिणाम करून शकत नाही. तसेच पवित्र ठिकाणी, देवळात, मठात तेथील वातावरणामुळे बहुधा प्रसन्न होण्यास अनुकूल अशा frequencies असतात, कारण बहुतेक मंडळी त्याच प्रकारचे विचार घेऊन तेथे वावरत असतात. [मंडळी तुमचा अनुभव काय आहे ? हां पण जवळील व्यक्तिवर बेतलेली दुःखद घटना, आणि दुःखद विचारामुळे तो शोकाकुल झाला आहे का ? ह्या दोन गोष्टी अगदी भिन्न आहेत हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आपण तपासतो आहोत ते विचारांच्या frequencies चे परिणाम; घटनांचे परिणाम नव्हे; हे लक्षात ठेवून आपल्या अनुभवाचे निरीक्षण करावे]
आपण पाहिले की विचारांचे तरंग बाहेर पडतात आणि तत्सम तरंगांशी ते एकरूप होऊन तशा प्रकारचे वातावरण निर्माण करतात, आणि त्यानुसार वातावरणावर परिणाम होतो. ह्याच न्यायाने वातावरणातील frequencies ना आपणही आकर्षित करून घेत असतो. आपण जरा खिन्न झालो (lower frequency) की खिन्न प्रकारचे तरंग आपल्यावर परिणाम करायला टपून बसलेलेच आहेत म्हणा. म्हणजे आपण ज्या पद्धतीचे विचार करतो त्या पद्धतीच्याच गोष्टी आपण आपल्याकडे आकर्षित करीत असतो. म्हणजे आपण जर नेहमी सकारात्मक विचार करीत असलो तर वातावरणातील सकारात्मक विचारच आपण आकर्षित करून घेऊ. तसेच failure, disease, finance, low self esteem, I can never do that, inferiority complex इत्यादि संबंधीचे नकारात्मक विचार घेऊन वावरत असू तर, तर त्याचे परिणाम आपण सर्वत्र पाहतोच आहोत. - म्हणून ही frequency, resonance प्रणाली लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
विज्ञानाचा एक नियम आहे , ’उर्जा ही निर्माण करता येत नाही, तशीच ती नष्ट  ही करता येत नाही, केवळ तिचे एका माध्यमातुन दुसर्‍या माध्यमामध्ये रुपांतर करता येते.’ 
३१३७ बी.  सी . म्हणजेच २०१५+३१३७=५१५२ वर्षा पूर्वी भगवान श्रीक्रीष्णा ने गीते मध्ये हे सर्व सांगितले आहे ते म्हणजे आत्मा हा अमर आहे.
 
 
 
अशा प्रकारे प्रत्येक व्यक्ती ने आपली उर्जा नकारात्मक विचारात न घालवता भरकटनाऱ्या मना वर नियंत्रण ठेवून दृष्टीकोण चांगला ठेवल्यास प्रत्येक सोसायटीतील, चाळीतील आणि गावातीलव्यक्ती सुखी समाधानाने राहू शकतील, शांतता नेहमी टिकून राहील आणि तुम्हाला जिकडे पाहावे तिकडे आनंदी आनंदच दिसेल.

उत्तर लिहिले · 4/11/2018
कर्म · 7940
10
मन म्हणजे काय आहे?????


मन (mind)म्हणजे काय याचा उहापोह गेली अनेक शतके चालू आहे.सुरवातीला तत्वज्ञानाचा प्रांत असलेला मनाचा अभ्यास आता न्युरोसायन्सच्या प्रगतीमुळे विज्ञानाचाही प्रांत झाला आहे.ज्याला आपण मन किंवा mind म्हणतो त्याला शास्त्रीय भाषेत जाणीव किंवा consciousness असे म्हण्टले जाते.वेगवेगळ्या धर्मांमध्ये मनाची व्याख्या केली गेली आहे.हिंदू धर्मामध्ये आत्मा ही संकल्पना आहे.प्रत्येक जीवामध्ये अभौतिक (immaterial essence)स्वरुपात आत्मा नावाची गोष्ट असते असे हिंदू धर्म मानतो.बाकीच्या धर्मातही कमीअधिक प्रमाणात अशीच व्याख्या केली गेली आहे.
सतराव्या शतकात फ्रेन्च तत्वज्ञानी रेने देकार्त याने प्रथम याविषयाची सुसंगत मांडणी केली.ज्याला आज mind body problem असे म्हण्टले जाते.देकार्त हा द्वैतवादी होता.म्हणजे मन आणि शरीर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असे त्याचे म्हणने होते.विज्ञानाकडे जाणीवेचे (consciousness)कोणतेही स्पष्टिकरण नसल्याने या विषयाला अनेक शतके हात घातला गेला नाही .विसाव्या शतकात वर्तणूकशास्त्राचा(behaviorism) विज्ञानावर पगडा होता.पण यातून मनाचा कोणताच थांग लागत नव्हता.पुढे न्युरोसायन्सचा व आधुनिक इमेजिंग टेक्नॉलॉजीचा जन्म झाल्यानंतर मेंदूचा सखोल अभ्यास झाला.वेगवेगळे विचार ,भावना ,हरकती मेंदूत कुठे उगम पावतात याची सखोल माहीती मिळाली.याला neural correlates of consciousness असे म्हणतात.पण यात एक गंमत आहे.correlation is not explaination ह्या नुसार फक्त कारण शोधुन उपयोग नाही तर मानवी मनाचे पुर्ण विस्तृत असे विवरण दिले गेले पाहीजे.यात न्युरोसायन्स अपयशी ठरले आहे.

Hard problem of consciousness.--
ऑस्ट्रेलीयन फिलॉसॉफर डेव्हीड चामर्स यांनी आधुनीक काळात या विषयात खुप मोठे योगदान दिले आहे.१९९६ साली अमेरिकेत centre for consciousness studies इथे प्रथमच भरलेल्या कॉन्फरन्स मध्ये त्यांनी hard problem of consciousness ही संकल्पना मांडली.
काय आहे हार्ड प्रॉब्लेम?
एखादा व्यक्ती निरभ्र निळ्या आकाशाकडे पहात आहे.भौतिक अनुषंगाने याचे स्पष्टीकरण करता येईल.ठराविक तरंग लांबीच्या प्रकाशलहरी त्याव्यक्तीच्या दृष्टीपटलावर(retina) आदळतात.त्याच्या दृष्टीपटलाकडून विद्युत संकेत मेंदूकडे पाठवले जातात.त्याच्या मेंदूतील दृष्टीकेंद्रात(visual cortex) चेतापेशींचे संभाषण होते(neuronal activity) व त्याला निळ्या रंगाचे आकलन होते.यात भौतिक(materialist) अनुषंगाने सगळी प्रक्रीया जरी मापली गेली तरी त्यात "निळा रंग'' कुठेच सापडणार नाही.निळ्या रंगाची अनुभुती हा त्या व्यक्तीचा अत्यंत खाजगी अनुभव आहे.हा अनुभव नक्की कोण घेतो हे अजुनही ज्ञात नाही.देह अनुभव घेतो असे मानले तर तो अनुभव भौतिकवादातून स्पष्ट करता आला पाहीजे.तसे अजुनही स्पष्ट करता आलेले नाही.याला इंग्रजीत first person subjective experience असे म्हणतात व या वेगवेगळ्या अनुभुतींना qualia असे संबोधन आहे.हेच स्पर्श,चव,आवाजाची अनुभुती,विविध भावना याबाबतीतही सत्य आहे.मेंदुत घडणार्या या प्रक्रीया आपल्याला रंगाची,आवाजाची ,चवीची ,भावनेची अनुभुती का देतात हा आजच्या न्युरोसायन्स समोरचा एकमेव महत्वाचा असा प्रश्न आहे.यालाच हार्ड प्रॉब्लेम असे म्हणतात.


डेव्हीड चामर्स यांच्या म्हणन्यानुसार कूठलही भौतिक विज्ञान आपल्याला consciousness अर्थात जाणिवेचे उत्तर देऊ शकत नाही.चामर्स यांच्या मांडणीनुसार जाणीव( consciousness)ही अवकाश ,काळ याप्रमाणेच विश्वात मुलभुत स्वरुपात आहे.याला panpsychism असे म्हणतात.यानुसार अगदी मुलभुत कणांनाही जाणिव असते(miniscule consciousness).एकदंर संपुर्ण विश्व जाणीवेने भरलेले आहे.तुम्ही हातात घेतलेला मोबाईल वा तुमच्या समोरचा काँम्प्युटरही काही प्रमाणात conscious आहे.अर्थात extraordinary claims requires extraordinary proof नुसार अजुनहि याविषयी खात्रीशीर माहीती उपलब्ध नाही.
याचा अर्थ विज्ञानाने याकडे पाठ फिरवावी असे नव्हे.अमेरिकन भुलतज्ञ स्टुर्ट हॅमेरॉफ व नोबेलविजेते रॉजर पेनरोज यांनी quantum mind हा सिद्धांत मांड्ला आहे.त्यानुसार मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन मेंदूत पुंजपातळीवर एकत्रीत साठवलेली माहीती आहे(information stored at quantum level).
इटालीयन अमेरिकन न्युरोसायंटीस्ट ग्युलिओ टोनोनी यांनी मनाची व्याख्या करताना integrated information theory मांडली आहे.सध्याची विज्ञान जगतात फार गंभिर दखल घेतलेली ही थेअरी आहे.
व्यक्तीगत मला डेव्हीड चामर्स यांचा ॲप्रोच योग्य वाटत असल्याने त्याविषयी विस्तृत लिहीले आहे.
बाकी तुमची मन म्हणजे काय याविषयीची मते जाणुन घ्यायला आवडेल.
उत्तर लिहिले · 14/8/2018
कर्म · 35170
6
मन म्हणजे एक मोठे गूढ आहे. कधी काय करेल काही सांगता येत नाही. कुठल्याच गोष्टीला कशाचेच बंधन नाही. न कसली मर्यादा. ताब्यात राहणे हे मुळी माहितीच नाही. न वयोमर्यादा. जस वय वाढते, तसा याचा अल्लडपणा वाढत जातो. क्षणाक्षणाला बदलते.

कधी प्रश्न बनते. कधी प्रश्नाची उकल. जगात कायम अशांत राहणारी गोष्ट म्हणजे हे मन. मनाचा शोध घेणे म्हणजे एखाद्या काळ्याकुट्ट गुहेत जाण्याप्रमाणे आहे. कधी वेडावेल. कधी विचित्र गोष्टीचा हट्ट करेल. आणि कधी भूतकाळात जावून बसेल. न होणाऱ्या गोष्टीचा विचार करेल. म्हणजे सगळे विरूद्ध की. कितीही समजावा. कितीही दमदाटी करा. ऐकेल तर शपथ.

मनाच्या राज्यात, सगळे आहे. असलेल्या गोष्टी आणि नसलेल्या गोष्टी सुद्धा. गेलेल्या गोष्टी, पाहिजेल तेव्हा पुन्हा येतात. एक स्वप्ननगरी आहे. आणि त्याचे मन म्हणजे राजा. ह्या राजाला वर्तमानातील गोष्टी त्याच्या राज्याप्रमाणे हव्यात. ‘नाही’ हा शब्दच नाही माहिती या राजाला. का कुणास ठाऊक मनाच्या उद्योगांवर राग येण्याऐवजी हसू येते. पण ‘मन’ कायमच प्रत्येक गोष्टीत ‘सिरिअस’. मनाला न कुठली दवा बाधते. न कोण त्याला काबूत ठेऊ शकते
उत्तर लिहिले · 9/5/2018
कर्म · 5375