3 उत्तरे
3
answers
मन काय असतं?
10
Answer link
मन म्हणजे काय आहे?????
मन (mind)म्हणजे काय याचा उहापोह गेली अनेक शतके चालू आहे.सुरवातीला तत्वज्ञानाचा प्रांत असलेला मनाचा अभ्यास आता न्युरोसायन्सच्या प्रगतीमुळे विज्ञानाचाही प्रांत झाला आहे.ज्याला आपण मन किंवा mind म्हणतो त्याला शास्त्रीय भाषेत जाणीव किंवा consciousness असे म्हण्टले जाते.वेगवेगळ्या धर्मांमध्ये मनाची व्याख्या केली गेली आहे.हिंदू धर्मामध्ये आत्मा ही संकल्पना आहे.प्रत्येक जीवामध्ये अभौतिक (immaterial essence)स्वरुपात आत्मा नावाची गोष्ट असते असे हिंदू धर्म मानतो.बाकीच्या धर्मातही कमीअधिक प्रमाणात अशीच व्याख्या केली गेली आहे.
सतराव्या शतकात फ्रेन्च तत्वज्ञानी रेने देकार्त याने प्रथम याविषयाची सुसंगत मांडणी केली.ज्याला आज mind body problem असे म्हण्टले जाते.देकार्त हा द्वैतवादी होता.म्हणजे मन आणि शरीर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असे त्याचे म्हणने होते.विज्ञानाकडे जाणीवेचे (consciousness)कोणतेही स्पष्टिकरण नसल्याने या विषयाला अनेक शतके हात घातला गेला नाही .विसाव्या शतकात वर्तणूकशास्त्राचा(behaviorism) विज्ञानावर पगडा होता.पण यातून मनाचा कोणताच थांग लागत नव्हता.पुढे न्युरोसायन्सचा व आधुनिक इमेजिंग टेक्नॉलॉजीचा जन्म झाल्यानंतर मेंदूचा सखोल अभ्यास झाला.वेगवेगळे विचार ,भावना ,हरकती मेंदूत कुठे उगम पावतात याची सखोल माहीती मिळाली.याला neural correlates of consciousness असे म्हणतात.पण यात एक गंमत आहे.correlation is not explaination ह्या नुसार फक्त कारण शोधुन उपयोग नाही तर मानवी मनाचे पुर्ण विस्तृत असे विवरण दिले गेले पाहीजे.यात न्युरोसायन्स अपयशी ठरले आहे.
Hard problem of consciousness.--
ऑस्ट्रेलीयन फिलॉसॉफर डेव्हीड चामर्स यांनी आधुनीक काळात या विषयात खुप मोठे योगदान दिले आहे.१९९६ साली अमेरिकेत centre for consciousness studies इथे प्रथमच भरलेल्या कॉन्फरन्स मध्ये त्यांनी hard problem of consciousness ही संकल्पना मांडली.
काय आहे हार्ड प्रॉब्लेम?
एखादा व्यक्ती निरभ्र निळ्या आकाशाकडे पहात आहे.भौतिक अनुषंगाने याचे स्पष्टीकरण करता येईल.ठराविक तरंग लांबीच्या प्रकाशलहरी त्याव्यक्तीच्या दृष्टीपटलावर(retina) आदळतात.त्याच्या दृष्टीपटलाकडून विद्युत संकेत मेंदूकडे पाठवले जातात.त्याच्या मेंदूतील दृष्टीकेंद्रात(visual cortex) चेतापेशींचे संभाषण होते(neuronal activity) व त्याला निळ्या रंगाचे आकलन होते.यात भौतिक(materialist) अनुषंगाने सगळी प्रक्रीया जरी मापली गेली तरी त्यात "निळा रंग'' कुठेच सापडणार नाही.निळ्या रंगाची अनुभुती हा त्या व्यक्तीचा अत्यंत खाजगी अनुभव आहे.हा अनुभव नक्की कोण घेतो हे अजुनही ज्ञात नाही.देह अनुभव घेतो असे मानले तर तो अनुभव भौतिकवादातून स्पष्ट करता आला पाहीजे.तसे अजुनही स्पष्ट करता आलेले नाही.याला इंग्रजीत first person subjective experience असे म्हणतात व या वेगवेगळ्या अनुभुतींना qualia असे संबोधन आहे.हेच स्पर्श,चव,आवाजाची अनुभुती,विविध भावना याबाबतीतही सत्य आहे.मेंदुत घडणार्या या प्रक्रीया आपल्याला रंगाची,आवाजाची ,चवीची ,भावनेची अनुभुती का देतात हा आजच्या न्युरोसायन्स समोरचा एकमेव महत्वाचा असा प्रश्न आहे.यालाच हार्ड प्रॉब्लेम असे म्हणतात.

डेव्हीड चामर्स यांच्या म्हणन्यानुसार कूठलही भौतिक विज्ञान आपल्याला consciousness अर्थात जाणिवेचे उत्तर देऊ शकत नाही.चामर्स यांच्या मांडणीनुसार जाणीव( consciousness)ही अवकाश ,काळ याप्रमाणेच विश्वात मुलभुत स्वरुपात आहे.याला panpsychism असे म्हणतात.यानुसार अगदी मुलभुत कणांनाही जाणिव असते(miniscule consciousness).एकदंर संपुर्ण विश्व जाणीवेने भरलेले आहे.तुम्ही हातात घेतलेला मोबाईल वा तुमच्या समोरचा काँम्प्युटरही काही प्रमाणात conscious आहे.अर्थात extraordinary claims requires extraordinary proof नुसार अजुनहि याविषयी खात्रीशीर माहीती उपलब्ध नाही.
याचा अर्थ विज्ञानाने याकडे पाठ फिरवावी असे नव्हे.अमेरिकन भुलतज्ञ स्टुर्ट हॅमेरॉफ व नोबेलविजेते रॉजर पेनरोज यांनी quantum mind हा सिद्धांत मांड्ला आहे.त्यानुसार मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन मेंदूत पुंजपातळीवर एकत्रीत साठवलेली माहीती आहे(information stored at quantum level).
इटालीयन अमेरिकन न्युरोसायंटीस्ट ग्युलिओ टोनोनी यांनी मनाची व्याख्या करताना integrated information theory मांडली आहे.सध्याची विज्ञान जगतात फार गंभिर दखल घेतलेली ही थेअरी आहे.
व्यक्तीगत मला डेव्हीड चामर्स यांचा ॲप्रोच योग्य वाटत असल्याने त्याविषयी विस्तृत लिहीले आहे.
बाकी तुमची मन म्हणजे काय याविषयीची मते जाणुन घ्यायला आवडेल.

1
Answer link
मन काय असतं.....
मन काय असतं, क्षणांत बघ ना कसं पाखरु होतं, आत्ता इथे तर लगेच लांबवर जाऊन पोहोचतं.... कुणाचाच कधी नाही त्याला लगाम, बेफाम फिरत राहतं,
कधीतरी मात्र फिरुन फिरुन दमतं, विसवतं.....
नाही कळत त्याला काय हवं असतं... कारण ते मनच असतं.....
मन काहूर असतं....
आपर्ल्याच आतल्या मनातलं, कुठेही भटकतं, नाही ऐकत जरी कितीही थांबवलं, तिच्या काळजीनेच केवळ रात्र रात्र
जागवतं.....
असले त्याला जरी सगळंच समजलं, लपवलं का तिने काही, हेच का रे वाटतं.....
बघ ना स्वतःलाच ते कसं हरवून बसतं... कारण ते मनच असतं.....
सांग ना तूच आता करू कसे शांत,
कितीही समजावलं तरी भिती ती उरात...
जाईल का गं ती कधी विरुन अंधारात,
प्रकाश होऊन स्वच्छ दिसेल का नभांत..... दिसेल का नभांत........
जाणीव व बुद्धी यांच्यामुळे घडणाऱ्या ज्ञान, विचार, मत, स्मरणशक्ती, भावना, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, चेतना या गोष्टी ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणाला मन असे म्हणतात. या सर्व गोष्टी या मेंदूद्वारे होणाऱ्या प्रक्रिया आहेत.
प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये व तत्त्वज्ञानामध्ये मनाचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. मन हे राजासारखे असावे पण मनावर नियंत्रण हवे. मनातील सर्व काही बोलण्यासाठी समोर माणूस असून उपयोगाचे नाही तर त्या माणसाला हि जागृत मन असावे.
मानवी मन हि या जगात सर्वात अनाकलनीय अशी गोष्ट आहे.
मनशुद्धी संपादन करा
याबाबत एक श्लोक असा आहे:
सदाचारेण सर्वदा शुद्धं भवति मानसम् |
निर्मलं च विशुद्धं च मानसं देवमंदिरम् ||
अर्थ: सर्वदा चांगले आचरण केल्याने मन शुद्ध होते. असे निर्मळ व विशुद्ध मन हे (जणू) देवाचे मंदिरच आहे. मानाने वागा मनाने कृती करा पण मन षड्रिपू ने बांधलं असेल तर तथाकथित योगाभ्यास करूनच पवित्रता धारण होईल. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहा भावनांना षड्रिपू (सहा शत्रू, सूचना: ड चा पाय मोडावा) असे म्हणतात.
या भावनांमुळे मन अशांत होते. मन एकाग्र करण्यात यांमुळे अडचणी येतात.
१. काम म्हणजे अति व अनैतिक लैंगिक भावना.(इत्यादि कामना) २. क्रोध म्हणजे राग.(गुस्सा,चड़चिढाहट) ३. लोभ म्हणजे एखाद्या गोष्टीचा हव्यास, मिळविण्याची इच्छा, अतीव प्रेम.(लालच) ४. मोह म्हणजे अज्ञानामुळे एखाद्या क्षणभंगुर गोष्टीशी मन संलग्न करणे, गुंतविणे.(आकर्षण,फळ आकर्षणामुळे कार्यरत) ५. मद म्हणजे गर्व, अति अभिमान.(घमंड,अहंकार) ६. मत्सर म्हणजे द्वेष, जळावू वृत्ती, दुसऱ्याची भरभराट, प्रगती सहन न होणे.(ईर्ष्या,जलन)
मनाचे वर्णन
मनाची चंचलता संपादन करा
शहंशहा नावाच्या शायराने मनाच्या चंचलतेचे असे वर्णन केले आहे:
बालक मन और वानरा,कबहुं न रे निचंत |
बाल और वानर सोत है,यह सोवत में भी उडन्त ||
अर्थ:बालक मन व वानर हे कधीच चुपचाप बसत नाही.बालक व वानर झोपल्यास चुपचाप राहतात पण मन हे झोपेतच उड्डाण भरते.
मनाची एकाग्रता कशी होते ? संपादन करा
मेंदूला एकाच विषयावर केंद्रित करण्याकरिता डोळे व कान या मेंदूच्या आणि पर्यायान मनाच्या खिडक्या बंद कराव्या लागतील. बंद याचा अर्थ झोपेत डोळे व कान बंद असतात तसे नव्हे तर या २ इंद्रियांना सर्वशक्तीनिशी त्या विषयावर केंद्रित केलं पाहिजे .अर्थात पाचही ज्ञानेंद्रियांना एकाच विषयावर केंद्रित केले जाते. उदा: आवडता खेळ, डान्स, चित्रकला इ. आपल्याला काय व्हायचं?, लोखंड कि लोहचुंबक?, यशवान, किर्तीमान, ऐश्वर्यसंपन्न कि अपयशी, दरिद्री, दु:खी? ते आपणच ठरवायचं . आपले मन जेथे रमते ते काम आपण नेहमी करावे.
0
Answer link
मन म्हणजे काय?
'मन' हा शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, मन म्हणजे आपल्या भावना, विचार आणि जाणीवांचा एकत्रित अनुभव. हे आपल्या मेंदूतील न्यूरॉन्सच्या क्रियेतून निर्माण होते.
मनाची व्याख्या:
- विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि आठवणी साठवण्याची क्षमता
- भावना आणि इच्छांचा अनुभव घेण्याची क्षमता
- बाह्य जगाची जाणीव आणि आंतरिक आत्म-जागरूकता
मन कशा प्रकारे कार्य करते?
मन विविध मानसिक प्रक्रियांच्या माध्यमातून कार्य करते:
- संवेदना (Sensation): बाह्य जगातून माहिती प्राप्त करणे.
- समज (Perception): माहितीला अर्थ देणे.
- विचार (Thinking): माहितीवर प्रक्रिया करणे आणि समस्या सोडवणे.
- स्मृती (Memory): माहिती साठवणे आणि आठवणे.
- भाषा (Language): संवाद साधण्यासाठी चिन्हे आणि नियम वापरणे.
- भावना (Emotion): आनंद, दुःख, राग, भीती यांसारख्या भावना अनुभवणे.
मन आणि मेंदू:
मन आणि मेंदू हे दोन वेगळे पण संबंधित घटक आहेत. मेंदू हा एक भौतिक अवयव आहे, तर मन ही एक अमूर्त प्रक्रिया आहे. मन मेंदूच्या कार्यावर अवलंबून असते, परंतु ते त्याहून अधिक व्यापक आहे.
अधिक माहितीसाठी:
- मानसशास्त्र (Psychology): मानवी मनाचा आणि वर्तनाचा अभ्यास. विकिपीडिया