3 उत्तरे
3 answers

मन काय आहे?

6
मन म्हणजे एक मोठे गूढ आहे. कधी काय करेल काही सांगता येत नाही. कुठल्याच गोष्टीला कशाचेच बंधन नाही. न कसली मर्यादा. ताब्यात राहणे हे मुळी माहितीच नाही. न वयोमर्यादा. जस वय वाढते, तसा याचा अल्लडपणा वाढत जातो. क्षणाक्षणाला बदलते.

कधी प्रश्न बनते. कधी प्रश्नाची उकल. जगात कायम अशांत राहणारी गोष्ट म्हणजे हे मन. मनाचा शोध घेणे म्हणजे एखाद्या काळ्याकुट्ट गुहेत जाण्याप्रमाणे आहे. कधी वेडावेल. कधी विचित्र गोष्टीचा हट्ट करेल. आणि कधी भूतकाळात जावून बसेल. न होणाऱ्या गोष्टीचा विचार करेल. म्हणजे सगळे विरूद्ध की. कितीही समजावा. कितीही दमदाटी करा. ऐकेल तर शपथ.

मनाच्या राज्यात, सगळे आहे. असलेल्या गोष्टी आणि नसलेल्या गोष्टी सुद्धा. गेलेल्या गोष्टी, पाहिजेल तेव्हा पुन्हा येतात. एक स्वप्ननगरी आहे. आणि त्याचे मन म्हणजे राजा. ह्या राजाला वर्तमानातील गोष्टी त्याच्या राज्याप्रमाणे हव्यात. ‘नाही’ हा शब्दच नाही माहिती या राजाला. का कुणास ठाऊक मनाच्या उद्योगांवर राग येण्याऐवजी हसू येते. पण ‘मन’ कायमच प्रत्येक गोष्टीत ‘सिरिअस’. मनाला न कुठली दवा बाधते. न कोण त्याला काबूत ठेऊ शकते
उत्तर लिहिले · 9/5/2018
कर्म · 5375
0
1)मन हि कन्सेप्ट प्रत्येक ठिकाणी बदलते। मानस शास्त्र मध्ये आपण वागतो त्या गोष्टींची सुरवात म्हणजे मन।
2) अध्यात्म मध्ये मन हे शरीराचे लगाम आहेत असे म्हणतात.
तुम्हाला कोणती मन कॉनसेप्टविचारायची आहे?
उत्तर लिहिले · 9/5/2018
कर्म · 15400
0

मन: मन म्हणजे विचार, भावना, आणि इच्छा यांचा एकत्रित अनुभव होय. हे एक अमूर्त अस्तित्व आहे, जे आपल्या मेंदूच्या कार्यांशी संबंधित आहे. मन आपल्याला जगाचा अनुभव घेण्यास, विचार करण्यास, निर्णय घेण्यास आणि कृती करण्यास मदत करते.

मनाची व्याख्या:

  • विचार प्रक्रिया: मन विचारांचे केंद्र आहे.
  • भावना: हे आनंद, दु:ख, राग यांसारख्या भावनांशी संबंधित आहे.
  • इच्छा आणि प्रेरणा: आपल्या इच्छा आणि ध्येये मनातूनच उद्भवतात.

मन आणि मेंदू: मन आणि मेंदू हे दोन भिन्न संकल्पना आहेत, पण ते एकमेकांशी संबंधित आहेत. मेंदू हा एक भौतिक अवयव आहे, तर मन हे त्या अवयवाचे कार्य आहे.

अधिक माहितीसाठी:

  1. मनाला वश करण्याचे सोपे उपाय
  2. मन म्हणजे काय ? सद्गुरूंचे विचार
उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1040

Related Questions

1 मन म्हणजे किती?
कोणत्या प्रक्रियेमुळे मेंदूला शब्दाचा अर्थ समजावा लागतो?
मन आणि बुद्धी मध्ये काय फरक आहे?
मनातले विचार कसे थांबवावेत?
मनाच्या शक्तीबद्दल सविस्तर माहिती द्या?
मन काय असतं?
मनामध्ये येणारे विचार कसे थांबवावे?