भारताचा इतिहास
संबंध
स्वातंत्र्य सैनिक
इतिहास
14 फेब्रुवारी व भगतसिंह, राजगुरू, व सुखदेव यांचा काय संबंध आहे?
2 उत्तरे
2
answers
14 फेब्रुवारी व भगतसिंह, राजगुरू, व सुखदेव यांचा काय संबंध आहे?
24
Answer link
फेब्रुवारी महिना आला की, प्रेमी युगुलांना प्रेमाचे वेड लागते. ज्यांच्या मनात तिच्याबद्दल प्रेम असते हे प्रेम १४ फेब्रुवारी रोजी व्यक्त केले जाते. प्रेमवीरांसाठी हा दिवस एक उत्सवच असतो. मात्र, काही लोकांच्या मते हा दिवस साजरा करू नये, कारण या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु आजच्या दिवशी फासावर चढले होते. त्यामुळे आजचा दिवस व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यापेक्षा श्रध्दांजली दिवस म्हणून साजरा करावा. मात्र, आजच्या दिवशी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांना फाशी दिली नव्हती.
भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे भारतमातेचे असे सुपूत्र होते जे स्वातंत्र्य लढ्यामध्ये हसत-हसत फासावर चढले. या महान शहीद झालेल्या सुपुत्रांचे व्हॅलेंटाईन डेशी काय संबंध आहेत? व्हॅलेंटाईन डेला भगतसिंह यांना फाशी दिली होती की फाशीची शिक्षा सुनावली होती? सोशल मीडियावर या विषयावर आज खूप चर्चा होताना पाहायला मिळत आहे.
खरे पहायला गेले तर ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना ७ ऑक्टोबर १९३० रोजी ३०० पानांच्या निकालाच्या आधारावर लाहोर येथील कट रचल्याच्या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावली होती. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तीन शहीदांव्यतिरिक्त त्यांच्या १२ साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानंतर २४ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात यावी असे आदेश देण्यात आले होते. परंतु, विशेष आदेशानुसार त्यांना २३ मार्च १९३१लाच संध्याकाळी ७:३० वाजता फाशी देण्यात आली.
आता तुम्ही विचार करत असाल की, मग फोटोमध्ये १४ फेब्रुवारी तारीख का आहे? खरे सांगायचे तर भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या आयुष्यात १४ फेब्रुवारीचे महत्व एवढेच आहे की, प्रीव्ही कौन्सिलने याचिका फेटाळल्यानंतर तेव्हाचे तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष मदन मोहन मालवीय यांनी १४ फेब्रुवारीला लॉर्ड इरविनच्या समोर दया याचिका दाखल केली होती. त्यानंतर ही याचिकाही फेटाळण्यात आली होती.
सोशल मीडियावरील फोटो व्हायरल होत आहे. त्यात असे म्हटले आहे की, " कुछ याद इन्हे भी कर लो '१४ फरवरी श्रद्धांजली दिवस' व्हॅलेंटाईन डेला विरोध न करता देशातील क्रांतिकारी पुरुषांच्या इतिहासामध्ये बदल होऊ नये तसेच त्या इतिहासामुळे देशातील तरुण भ्रमित होऊ नयेत. हे मुद्दे इतके संवेदनशील आहेत की हजारो लोकांच्या भावना त्यांच्याशी जोडल्या आहेत.
१) फोटो डॉक्टरांचे प्रमाणपत्र. फाशी दिल्या नंतर भगतसिंग यांचा मृत्यू झाला असे प्रमाणपत्र डॉक्टरांनी दिले त्यावर डॉक्टर आणि जेलर या दोघांची सही आहे.

२) वृत्तपत्रातील बातमी. भगतसिंग यांना फाशी दिल्या नंतर २५ मार्चच्या द ट्रिब्युन वृत्तपत्रात बातमी छापून आली होती.

लिख रहा हूं मैं अंजाम जिसका कल आगाज आएगा, मेरे लहू का हर एक कतरा इंकलाब लाएगा। !!!
शहिद भगत सिंग
धन्यवाद

0
Answer link
14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) म्हणून साजरा केला जातो. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना 14 फेब्रुवारी 1931 या दिवशी फाशी देण्यात येणार होती, परंतु ती 23 मार्च 1931 रोजी देण्यात आली. त्यामुळे या तिघांचा 14 फेब्रुवारीशी थेट संबंध नाही, परंतु काही लोकांच्या मनात या दिवशी भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बलिदानाला उजाळा दिला जातो.
या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता: