Topic icon

स्वातंत्र्य सैनिक

0

चंद्रशेखर आझाद
भारतीय स्वातंत्र्य सेनानी


चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी (जन्म : भावरा-अलिराजपूर, २३ जुलै १९०६; - अलाहाबाद, २७ फेब्रुवारी १९३१) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. राम प्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (एच.आर.ए.) या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (एच.एस.आर.ए.) या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली. त्यांना भगत सिंग यांचे गुरू मानले जाते व ते एच.एस.आर.ए. संघटनेचे प्रमुख होते.



चंद्रशेखर आझाद

अलाहाबाद मधील चंद्रशेखर आझादांचा पुतळा
जन्म:
जुलै २३, १९०६
भाबरा, झाबुआ तालुका,झाबुआ जिल्हा, मध्यप्रदेश
मृत्यू:
फेब्रुवारी २७, १९३१
अलाहाबाद
चळवळ:
भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना:
कीर्ति किसान पार्टी, नवजवान किसान सभा
धर्म:
हिंदू
वडील:
पंडित सिताराम तिवारी
आई:
जगरानी देवी
जन्म व बालपण

चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै, इ.स. १९०६ मध्य प्रदेशातील सध्याच्या अलिराजपूर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव 'सिताराम तिवारी' व आईचे नाव 'जगरानी देवी' असे होते. त्यांचे पूर्वज उत्तर प्रदेशातील कानपूर जवळच्या बादरका गावात राहात असत. जगरानी देवी ह्या सिताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरित झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले. मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते वाराणसी येथील संस्कृत पाठशाळेत गेले. डिसेंबर, इ.स. १९२१ मध्ये महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात तेव्हाच्या १५ वर्षे वयाच्या चंद्रशेखरने सहभाग घेतला होता. त्यासाठी त्याला अटक झाली होती. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव 'आझाद' असल्याचे नोंदवले. तेव्हापासून ते त्याच आडनावाने ओळखले जाऊ लागले.

मृत्यू

दिनांक २७ फेब्रुवारी, इ.स. १९३१ रोजी, अलाहाबाद मधील अल्फ्रेड पार्क येथे राजगुरू हे जेलमध्ये असतांना त्यांच्या आईला आर्थिक मदत व्हावी यासाठी ते एका क्रांतिकारक सहकाऱ्याला भेटण्यासाठी गेले असता, एका अज्ञात खबऱ्याने इंग्रजाना वार्ता दिली. इंग्रजांनी मैदानाला वेढा घातला. चंद्रशेखर आझाद व इंग्रजांमधे गोळीबार झाला. त्यांनी एकहाती गोळीबारात तीन इंग्रजाना मारले; मात्र त्यांच्याजवळील बंदुकीच्या गोळ्या संपल्यामुळे, शेवटच्या गोळीने त्यांनी स्वतःला मारून घेतले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे करण्यात आले.


उत्तर लिहिले · 29/5/2022
कर्म · 53710
0

शिवराम हरी राजगुर
भारतीय क्रांतिकारी



शिवराम हरी राजगुरू (जन्म : खेड-पुणॆ, २४ ऑगस्ट १९०८; - लाहोर, २३ मार्च १९३१) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात फाशी गेलेले क्रांतिकारक होते. ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले होते. डॉक्टर हर्डीकर यांच्या सेवा दलामध्ये असतानाच त्यांचा संबंध हा हिंदुस्तान रिपब्लिकन पार्टी या क्रांतिकारी संघटनेशी आला. चंद्रशेखर आझाद, भगत सिंग आणि सुखदेव अशा क्रांतिकारकांच्या सहवासात आल्याने ते सशस्त्र उठाव करण्यास प्रेरित झाले. लाला लजपत राय यांच्यावर जेम्स स्कॉट नावाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी लाठीहल्ला केला, त्यात जखमी होऊन ते मरण पावले. त्याचा बदला घेण्यासाठी १७ फेब्रुवारी १९२८ रोजी राजगुरू, भगतसिंग यांनी लाहोर येथे साँडर्सवर ( जेम्स स्कॉटला मारताना चुकून )गोळ्या घालून त्यांना ठार केले.

शिवराम हरी राजगुरू

शिवराम हरी राजगुरू
जन्म:
ऑगस्ट २४, इ.स. १९०८
राजगुरूनगर, पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू:
मार्च २३, १९३१
लाहोर, पंजाब
चळवळ:
भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना:
हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
धर्म:
हिंदू
नॅशनल बँकेची लूट, क्रांतिकारक जोगेश चंद्रा चॅटर्जी यांची सुटका यांतही राजगुरूंचा सहभाग होता, २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग व सुखदेव, राजगुरू यांना फाशी देण्यात आली.

जीवन

राजगुरूंचा जन्म पुण्या़जवळ खेड येथे ऑगस्ट २४, इ.स. १९०८ रोजी एका मराठी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांना ‘रघुनाथ’ या नावानेही ओळखले जात असे.

स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग



लहानपणी १४व्या वर्षी इंग्रजी विषयातील अपयशामुळे वडील भावाने आपल्या नवविवाहित वधूसमोर त्यांना इंग्रजी धडा वाचायची शिक्षा केली. हा अपमान राजगुरूंना सहन झाला नाही. अंगावरच्या कपड्यांनिशी, आईने तेल आणण्यासाठी दिलेले ९ पैसे व बहिणीने अंजिरांसाठी दिलेल्या २ पैशांसह त्यांनी आपले घर सोडले. आधी नाशिक आणि त्यानंतर थेट काशीलाच (शिक्षणासाठी) ते पोहचले. काशीतील त्यांचा बराचसा वेळ हा लोकमान्य टिळक ग्रंथालयत, महाराष्ट्र विद्या मंडळातील व्याख्याने - वादविवाद ऐकण्यात आणि भारतसेवा मंडळाच्या व्यायामशाळेत लाठी-काठी, दांडपट्टा यांच्या शिक्षणात जात होता. त्या काळी कलकत्ता, पाटणा, कानपूर, लखनौ, झाशी, मीरत, दिल्ली, लाहोर ही गावे क्रांतिकारकांची माहेरघरे होती, आणि काशी येथील पं. मदनमोहन मालवीयांचे हिंदू विद्यापीठ हेच साऱ्यांचे आश्रयस्थान व गुप्त केंद्र होते.

मध्यंतरीच्या काळात राजगुरूंनी अमरावतीच्या श्री हनुमान आखाड्यात व्यायामविशारदाची पदवी मिळवली व हुबळीला डॉ. हर्डीकरांकडे सेवादलाचे शिक्षणही घेतले. त्यानंतर ते पुन्हा काशीत परतले. दरम्यान चंद्रशेखर आझाद यांचा राजगुरूंशी परिचय झाला आणि आझादांनी राजगुरूंना क्रांतिकारकांच्या गटात घेतले. 'आपणासारिखे करिती तात्काळ' असे आझाद, अन्‌ 'दुजांसारखे होती तात्काळ' असे राजगुरू, एकत्र आले आणि त्यांचे ३६ गुण जुळाले. इंग्रज सरकारशी ३६चा आकडा हेच या गुणांचे फलित होते आणि या ध्येयासाठी व हौतात्म्यासाठी राजगुरू कायमच उतावळे असायचे. या संदर्भातील त्यांच्या भावना, त्यांचे वागणेच विलक्षण होते, त्यागासाठी ते कायम तयार, आसुसलेले होते. ही भावना इतकी पराकोटीची होती की, आपल्या आधी भगतसिंह किंवा इतर कोणीही फासावर चढू नये ही त्यांची इच्छा होती.

आझाद आणि राजगुरू काशीत एकत्र आले, पण थेट कार्यवाही करायची वेळ आली आणि तुझ्याजोगे काम निघाले, तर तुला पार्टीचे आमंत्रण मिळेल, असे सांगून आझाद निघून गेले. काही दिवसांनंतर राजगुरूंजोगे काम निघाले. पार्टीतील एका फितुराचा वध करण्याच्या कामगिरीवर शिव वर्मा यांच्यासोबत त्यांची निवड झाली. दोघेही दिल्लीत आले. पण पिस्तूल एकच असल्याने व गद्दार जिवाला घाबरून घराबाहेर क्वचितच पडत असल्याने त्यांची पंचाईत झाली. रात्री ७ ते ८ या वेळेत तो इसम ज्या ठिकाणी फिरायला जात असे, त्या ठिकाणी राजगुरूंनी त्याच्या मागावर राहावे, असे ठरवून दुसऱ्या पिस्तुलाची सोय करण्यासाठी वर्मा लाहोरला गेले आणि तीन दिवसांनंतर परतले ते पिस्तूल न घेताच. सायंकाळ असल्याने शर्मा प्रत्यक्ष मोक्याच्या जागीच पोहोचले, आणि त्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या, सर्चलाइट, गोळ्यांचे आवाज पाहून त्यांनी ओळखले की राजगुरूंनी मोहीम फत्ते केली होती. इकडे राजगुरूंनी एकाच गोळीत काम तमाम करून मथुरेकडील रेल्वेरुळांतून पळ काढला. पोलीस गोळ्या झाडू लागले, त्या वेळी त्यांनी रेल्वेरुळांखाली उडी टाकली आणि ते सरपटत एका शेतात घुसले. ते शेत पाण्याने तुडुंब भरलेले होते. एव्हाना पोलीस त्या ठिकाणी येऊन पोहोचले आणि चारी बाजूंनी प्रकाश टाकून गोळीबारही सुरू झाला. ही शोधमोहीम जवळजवळ २-३ तास सुरू होती. तोपर्यंत राजगुरू चिखल-पाण्यात, काट्याकुट्यात लपून राहू शकतील ही कल्पनादेखील पोलिसांना नव्हती. पोलिसांनी नाद सोडून दिला. पोलीस गेल्यावर मथुरेच्या दिशेने राजगुरू पळत सुटले. पुढील २ स्थानके त्यांनी पळतच पार केली. नंतर मथुरेच्या गाडीत बसून मथुरेत आले. येथे यमुनेकाठी कपडे धुऊन वाळूतच झोपले. तिसऱ्या दिवशी कानपूरला येऊन त्यांनी हा किस्सा ऐकवल्यानंतर वर्मांना धक्काच बसला!

राजगुरूंची भारताला खरी ओळख झाली ती साँडर्सच्या वधाच्या वेळी!

साँडर्सची हत्या

त्या काळी सायमन कमिशन एकाही भारतीय सदस्याला न घेता लाहोरला आले. लाहोरला पंजाबकेसरी लाला लजपतराय यांनी कमिशनची वाट अडवली. पोलीस अधिकारी स्कॉट याने साँडर्स याच्यासमवेत लालाजींवर जबरदस्त लाठीमार केला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्या दिवशीच सायंकाळी लाहोरच्या प्रचंड सभेत देशबंधू चित्तरंजन दास यांच्या पत्नी गरजल्या, ‘‘लालाजीकी चिता की आग ठंडी होने के पहलेही किसी भारतीय नौजवान ने इस क्रूरता का बदला लेना चाहिये!’’ त्यांच्या या शब्दांनी सरदार भगतसिंह व्याकूळ झाले. त्यांनी स्कॉटला मारण्याचा प्रस्ताव पार्टीत मांडला. स्कॉटला मारल्यानंतर न्यायालयासमोर तर्कसंगत भाषण करणे आवश्यक होते, की स्कॉटला का मारावे लागले? आणि हे काम भगतसिंह करू शकत होते. पण राजगुरूंना हे मान्य नव्हते. राजगुरू हट्टाने पेटून उठले. त्यांना मोहिमेत सामील केले गेले.

योजना अशी आखण्यात आली की, मालरोड पोलीस स्टेशनवर जय गोपाळ पहारा ठेवून स्कॉटच्या हालचालींवर लक्ष ठेवेल आणि भगतसिंग व राजगुरू त्याच्या इशाऱ्यावर गोळीबार करतील. पण ४ दिवस स्कॉट त्या भागात फिरकलाच नाही. शेवटी पाचव्या दिवशी कार्यालयातून एक गोरा अधिकारी बाहेर आला. जय गोपाळने भगतसिंहांना खूण केली की हाच स्कॉट असावा, यावर भगतसिंहांनी खुणेनेच सांगितले की हा नसावा, पण ही ‘नसावा’ची खूण राजगुरूंच्या लक्षातच आली नाही. राजगुरूंनी साहेबाच्या दिशेने गोळी झाडली. लगेचच भगतसिहांनी आपल्या पिस्तुलातून ८ गोळ्या झाडून साहेबाला पूर्ण आडवे केले. एव्हाना गोळ्यांचा आवाज ऐकून चौकीतील लोक बाहेर जमले. त्यातला एक अधिकारी राजगुरूंच्या अंगावर चालून गेला. राजगुरूंचे पिस्तूल नेमके या वेळी चालत नव्हते. त्यामुळे राजगुरूंनी झटकन पिस्तूल खिशात ठेवून त्या अधिकाऱ्याला कमरेला धरून इतक्या जोरात आपटले, की तो सर्व गोंधळ संपेपर्यंत तो उठलाच नाही. या सर्व गडबडीत भगतसिंह यांच्या पिस्तुलातील ‘मॅगझिन’ खाली पडले. राजगुरूंच्या हे लक्षात आल्यानंतर, त्यांनी प्रसंगावधान राखत, स्वतःचा जीव धोक्यात घालून, ते मॅगझिन शिताफीने उचलले. या राजगुरूंच्या कृतीमुळे चंद्रशेखर आझादांसह त्यांचे सर्व सहकारी राजगुरूंवर खूष झाले.

साँडर्सच्या हत्येनंतर लाहोरहून भगतसिंग एका मिलिटरी ऑफिसरच्या वेषात राजकोटला निसटले. (या वेळी भगवतीचरण व्होरा यांच्या पत्नी दुर्गाभाभी यांनी भगतसिंहांच्या पत्‍नी असल्याचे नाटक तान्ह्या लेकरासह केले होते.) राजगुरू त्यांचे नोकर आणि आझाद हे मथुरेतील पंड्याच्या रूपात भगतसिंहाबरोबर होते. तिघेही दिवसाढवळ्या, `जागृत' पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून, एकाच गाडीतून लाहोरहून राजकोटला निसटले.

त्यानंतरच्या काळात राजगुरूंनी लाठीकाठीचा वर्ग अगदी काशीच्या मुख्य पोलीस स्टेशनसमोर कंपनीबागेत सुरू ठेवला. राजगुरूंच्या या धारिष्ट्यास काही सीमाच नव्हती. बरेच महिने राजगुरू काशीत उघडपणे, निर्भयतेने वावरत होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या धनुष्यबाणाचे कौशल्यही लोकांनी गणेशोत्सवात पाहिले. पण कोणासही कल्पना नव्हती की इतका साधा दिसणारा मनुष्य मोठा क्रांतिकारक असेल! अनेक महिने ते पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरले. पण अखेर सप्टेंबर, १९२९ मध्ये ते पुणे येथे पोलिसांच्या ताब्यात सापडले. पुढे जेलमध्ये आमरण उपोषण, न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार ह्या घटना घडल्या. भगतसिंग, सुखदेव व अन्य काही क्रांतिकारक त्यांच्या समवेत होतेच. सर्व क्रांतिकारकांना आपले भविष्य माहीत होतेच, पण शिवराम राजगुरूंना मित्र भेटल्याचा आनंद झाला, तसेच राजगुरू भेटल्यामुळे इतरांमध्येही एक चैतन्य निर्माण झाले. सर्वांना राजकीय कैदी म्हणून वागणूक मिळावी यासाठी क्रांतिकारकांनी उपोषण सुरू केले. राजगुरू अर्थातच पुढाकार घेत होते. डॉक्टर रोज सकाळी १०-१२ सहकाऱ्यांना घेऊन रबरी नळीने, जबरदस्तीने दूध पाजण्याचा प्रयत्‍न करीत. या पोलिसांच्या प्रयत्‍नांमुळे राजगुरूंसह सर्वांनाच प्रचंड त्रास सहन करावा लागला, शारीरिक हाल-अपेष्टांचा सामना करावा लागला. पण याही स्थितीत सर्वच जण उपोषणाच्या निर्णयावर ठाम होते.

फाशी



लाहोर खटल्याचा निकाल लावण्यात आला व शिवराम राजगुरू यांच्यासह भगतसिंग व सुखदेव यांना अतिशय गुप्तता राखत फाशी देण्यात आले. २३ मार्च, १९३१ च्या सायंकाळी राजगुरू, भगतसिंग व सुखदेव हसत हसत फाशीला सामोरे गेले. पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात सतलज नदीच्या काठी हुसेनीवाला येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.[१] या तिघांच्या बलिदानाचा २३ मार्च हा दिवस, भारतात शहीद दिन म्हणून पाळण्यात येतो.

फाशीवर प्रतिक्रिया

कराची येथे काँग्रेस पक्षाच्या वार्षिक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विशेषतः पत्रकारांना फाशीची माहिती देण्यात आली.न्यू यॉर्क टाइम्सने अहवाल दिला :

संयुक्त प्रांतातील कानपूर शहरात दहशतीचे साम्राज्य आणि कराचीबाहेरील तरुणाने महात्मा गांधींवर केलेला हल्ला. ही भगतसिंग आणि दोन साथीदारांना फाशी देण्याच्या भारतीयांनी दिलेले होते.[२]

वारसा आणि स्मारके


राजगुरू यांच्या स्मृत्यर्थ काढलेले पोस्टाचे तिकीट
राष्ट्रीय शहीद स्मारक



राजगुरूंचे राष्ट्रीय स्मारक भारताच्या पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील हुसेनीवाला येथे आहे. लाहोर तुरूंगात फाशी दिल्यानंतर शिवाराम राजगुरू, भगतसिंग आणि सुखदेव थापर यांचे मृतदेह गुप्तपणे येथे आणण्यात आले होते. अधिकाऱ्यानी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. या तिघांच्या बलिदानाचा २३ मार्च हा दिवस, भारतात शहीद दिन म्हणून पाळण्यात येतो.स्मारकात श्रद्धांजली व आदरांजली वाहिली जाते.


राष्ट्रीय शहीद स्मारक, हुसैनीवाला
राजगुरुनगर

शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मगावाचे खेड हे नाव बदलून राजगुरुनगर असे करण्यात आले..[४][५]

राजगुरू वाडा




सध्याच्या राजगुरुनगरमधील राजगुरू वाडा
राजगुरू वाडा हे राजगुरूंचा जन्म झालेले त्यांचे वडिलोपार्जित घर आहे.२,७८८ चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेली ही वास्तू पुणे-नाशिक रोडवरील भीमा नदीच्या काठावर आहे. शिवराम राजगुरू यांचे स्मारक म्हणून ते राखले जात आहे. हुतात्मा राजगुरू स्मारक समिती (एचआरएसएस) ही स्थानिक संस्था २००४ पासून प्रजासत्ताक दिनी येथे राष्ट्रध्वज फडकावते.


उत्तर लिहिले · 29/5/2022
कर्म · 53710
0

बारेंद्र कुमार घोष हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि पत्रकार होते.

त्यांनी केलेले काही महत्वाचे कार्य:
  • अनुशीलन समिती या বিপ্লবী संघटनेचे सदस्य होते.
  • बंगालमध्ये क्रांतिकार्य সংগঠित करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
  • 'युगांतर' नावाचे বিপ্লবী वर्तमानपत्र सुरू केले, ज्याने लोकांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित केले.
  • Maniktala bomb conspiracy case (माणिकतला बॉम्ब कट खटल्यात) त्यांची भूमिका महत्त्वाची होती.

अधिक माहितीसाठी, आपण विकिपीडिया (https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7) ला भेट देऊ शकता.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1080
0
येथे यवतमाळ जिल्ह्यातील काही स्वातंत्र्यसैनिकांची नावे दिली आहेत:
  • वासुदेवराव नाईक
  • बब्रुवान वैरागडे
  • उत्तमराव राठोड
  • विठ्ठलराव देशमुख
  • ॲड. गजाननराव डांगे
  • शंकरराव ठाकरे
  • नारायण Reshmiye
  • रामराव शेळके
  • विनायक देशपांडे
  • बाबाराव पाटील
  • गंगाधरराव तेलंग

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1080
0

डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या रामेश्वरम जवळील धनुष्कोडी या गावी पकरीstylingम सेतुमाधव राव नावाचे क्रांतिकारक राहत होते.

ते एक स्वातंत्र्य सैनिक आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय भूमिका घेतली.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1080
0

आझाद हिंद सेनेशी संबंधित काही क्रांतिकारकांची नावे:

  • नेताजी सुभाषचंद्र बोस:

    नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केले. त्यांनी 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा' (Give me blood and I will give you freedom) असा नारा दिला.

  • कॅप्टन लक्ष्मी सहगल:

    कॅप्टन लक्ष्मी सहगल या आझाद हिंद सेनेच्या 'झाशीची राणी रेजिमेंट'च्या प्रमुख होत्या.

  • जनरल शाह नवाज खान:

    जनरल शाह नवाज खान हे आझाद हिंद सेनेतील महत्त्वाचे अधिकारी होते.

  • कर्नल प्रेम सहगल:

    कर्नल प्रेम सहगल हे देखील आझाद हिंद सेनेतील महत्त्वपूर्ण व्यक्ती होते.

  • कर्नल गुरबख्श सिंह ढिल्लन:

    कर्नल गुरबख्श सिंह ढिल्लन हे आझाद हिंद सेनेतील एक महत्त्वाचे अधिकारी होते.

या व्यतिरिक्त, आझाद हिंद सेनेत अनेक देशभक्तांनी योगदान दिले.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1080
4
*विनायक दामोदर सावरकर*

*विज्ञाननिष्ठ, महान क्रांतिकारक*

*जन्मदिन - २८ मे १८८३*

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महान देशभक्त, जहाल क्रांतिकारक, झुंजार स्वातंत्र्यसेनानी, धैर्याचे मेरुमणी, प्रतिभासंपन्न कवी, सिध्दहस्त लेखक, नाटककार, प्रखर बुद्धिवादी, विज्ञानवादी, हिंदुत्ववादी, तत्त्वनिष्ठ राजकारणी, सहस्रावधी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे वक्ते, चिंतनशील, कर्ते समाजसुधारक, भाषा शुध्दीचे प्रवर्तक आणि यंत्रयुगाचे समर्थक असे विविध पैलू होते.

'मी समुद्रात टाकलेली उडी लोक विसरले तरी चालेल, पण माझा सामाजिक विचार त्यांनी  विसरू नये' या त्यांच्या प्रतिपादनातून ते साजसुधारणांना किती महत्त्व देत होते हे समजून येते. ते हिंदू समाजापुरते बोलत आणि लिहीत होते. तरीपण त्यांना विज्ञाननिष्ठ, पोथीमुक्त आणि ऐहिकतेचे भान असलेला भारतीय समाज घडवायचा होता. सर्व पंथांना एकत्र करून आचार विचार भेद न मानता 'या भूमीला पितृभू आणि पुण्यमू मानणारे ते हिंदू' अशी माझी बौध्दिक व्याख्या आहे, असे ते म्हणत. त्यांच्या सामाजिक विचारांचा हिंदुत्व हा गाभा होता. त्यांनी आधुनिक विश्वसंस्कृतीस हिंदुत्वाला जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हिंदू धर्मग्रंथांचा, शास्त्रांचा अनुकूल असा अर्थ लावला नाही. त्यांनी वेदांचे प्रामाण्य मानले नाही. ते मनुस्मृतीला, वेदांना अभ्यासनीय, आदरणीय ग्रंथ मानत. पण ते अनुकरणीय नाहीत हे सुध्दा परखडपणे सांगतात. विज्ञानयुगाची, यंत्रयुगाची कास धरण्याचे आवाहन करतात. आधुनिकीकरण ही एक मानसिक प्रक्रिया असल्यामुळे मानसिक आधुनिकीकरणासाठी सर्वप्रथम धर्मग्रंथाचे दास्य झुगारून दिले पाहिजे, असे त्यांचे मत होते. धर्मग्रंथ हे ईश्वरनिर्मित आहेत, हे त्यांना मान्य नव्हते तर धर्मग्रंथ मानवनिर्मित आहेत, अशी त्यांची धारणा होती. त्यांचे सामाजिक विचार हे इहवादावर आणि भौतिकवादावर आधारित होते. तरीपण ते अध्यात्माचे वैयक्तिक स्तरावर महत्त्व मान्य करीत. विज्ञानाच्या संशोधन ग्रंथांनाच ते धर्मग्रंथ मानतात. बुध्दीची प्रतिष्ठापना केल्यावर जो धर्म समाजात अस्तित्वात राहील त्यालाच ते विज्ञानधर्म मानतात. हिंदुस्थानला धार्मिक अज्ञानाच्या तमोयुगातून आजच्या सुधारलेल्या विज्ञान युगात आणून सोडणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे, हाच खरा धर्म आहे, असे ते म्हणतात. धर्मनिष्ठा बाजूला केल्याशिवाय विज्ञाननिष्ठा प्रस्थापित होत नाही, विज्ञानधर्माशिवाय माणसाचा विकासच होऊ शकत नाही, असे त्यांचे ठाम मत होते.

 

ते विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ असल्याने प्रत्क्षनिष्ठ आणि प्रयोगसिध्द विज्ञानच आजच्या परिस्थितीत आमच्या राष्ट्राचा वेद झाला पाहिजे, असे त्यांचे ठाम प्रतिपादन होते. पाच हजार वर्षांपूर्वीच्या अज्ञानयुगाकडे पाठ फिरवा आणि विज्ञानुगाचे स्वागत करा, अशी त्यांची भूमिका असल्यामुळे त्यांनी शुध्द इहवाद मांडला. ते गाईला-बैलाला उपयुक्त पशू मानत. त्यांना देव मानणे म्हणजे मनुष्यास पशूहूनही नीच मानण्यासारखे आणि माणुसकीला कमीपणा आणणारे आहे, असे ते म्हणत. गोमतापूजन, सत्यनारायण, वास्तुशांती या गोष्टी त्यांना वेडेपणाच्या वाटत. गाय ही बैलाची माता आहे, मनुष्याची नव्हे अशा भाषेत ते गाईबद्दल धर्मश्रध्देची चिकित्सा करतात.

 

2 मे 1921 रोजी सावरकरांची रत्नागिरीमध्ये स्थानबध्दता आणि कोणत्याही राजकीय आंदोलनात भाग न घेण्याच्या मुख्य अटींवर सुटका करण्यात आली. अंदामानातील बंदिवासात आणि रत्नागिरीतील 1924 ते 1937 या तेरा वर्षांच्या स्थानबध्दतेच्या कालखंडात त्यांनी सखोल असे समाजचिंतन केले. या काळात त्यांनी सामाजिक आंदोलनावर, समाज प्रबोधनावर आणि विज्ञानाच्या प्रसारावर लक्ष केंद्रित केले. जातिभेदाचे उन्मूलन, अस्पृश्यता निवारण, भाषाशुध्दी, अंधश्रध्दा निर्मलून, लिपी सुधारणा, हिंदूंचे संघटन आणि शुद्धिकरण हे त्यांनी आपले कार्यक्षेत्र निश्चित केले. त्यासाठी व्याख्याने देणे, लेख लिहिणे, विचार विनिमय, चर्चा, प्रश्नोत्तरे शंकांचे समाधान, वैयक्तिक गाठीभेटी याद्वारे सवर्णांचे प्रबोधन आणि दलितांमध्ये जाणीवजागृतीला त्यांनी सुरुवात केली. सनातन्यांचा, धर्ममार्तंडांचा आपल्या कार्याला विरोध होणार, प्रतिकूल ते घडणार हे त्यांनी गृहीत धरलेले होतेच. परंतु सावरकरांच्या चार वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर रत्नागिरीतील बहुतांशी लोकांची मानसिकता समाजसुधारणांना अनुकूल होऊ लागली.

हिंदूंच्या समाजजीवनावर आघात करणार आणि हिंदूंनी आपल्या हातांनी हौसेने पायात घालून घेतलेल्या वेदोक्त बंदी, व्यवसाय बंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुध्दीबंदी, रोटीबंदी आणि बेटीबंदी या सात बेड्या तोडून घेतल्याशिवाय राष्ट्र त्याग केला पाहिजे. परधर्मात गेलेल्या किवा परधर्मीयांना हिंदू धर्मात घेता आले पाहिजे. त्यांना समतने आणि ममतेने वागवावे, अशी त्यांची शिकवण होती. यज्ञाने पाऊस पडतो हे साफ कोटे असून यज्ञात तुपाचा एक थेंबही वाया गावू नका असे ते सांगत. यज्ञाने पेटलेल्या भारतात दुष्काळ कसे पडतात? असा सवाल ते विचारतात. रत्नागिरीत अस्पृश्यतेचा पुतळा जाळण्यासाठी त्यांनी तरुणांना संमती दिली. 
त्यांनी केलेले कार्य म्हणजे देशभक्तीचे, मानवतवादी, चिरकालीन महत्त्वाचे आहे, असे त्यांनी म्हटले होते. सावरकरांचे हिंदुत्वाबद्दलचे, हिंदू राष्ट्राबद्दलचे विचार हे वादग्रस्त असू शकतील, पण त्यांचे पोथीमुक्तीचे, विज्ञानवादी, सुधारणावादी आणि इहवादी विचार त्यांच्या अनुयायांनाही पेलले नाहीत. पण त्यांचे हे विचार सगळ्यांनीच स्वीकारले, अमलात आणण्याच्या दृष्टीने पावले टाकली तर जातिवादचे, अंधश्रद्धांचे निर्मूलन होऊन जग सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल करू शकेल. अशा या विज्ञानवादी, समाजसुधारक, उत्कट देशभक्तीचे प्रतीक झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना शतश: नमन 🙏🏼

               संकलन
      आर.एम.डोईफोडे
      शिक्षण अधिकारी
डाॅ सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल पुणे
************************************
उत्तर लिहिले · 28/5/2019
कर्म · 16010