2 उत्तरे
2
answers
बांडगुळ म्हणजे काय?
3
Answer link
_*⭕ बांडगुळ म्हणजे काय ? ⭕*_
*_आपण एखाद्या अपप्रववृत्तीच्या व्यक्तीला सहज बोलतो ‘काय रे बांडगूळ आहेस.’ खरच या वाक्यात एक मतितार्थ दडलेला आहे. तो समजावून घेतला पाहिजे. जो दुसर्याच्या जीवावर जगतो आणि फोफावतो त्याला ‘बांडगूळ’ असे म्हटले जाते. माणसाच्या बाबतीत झाडावरील परोपजीवी वनस्पती वरूनच हे बोलले जाते._*
*_बहुतांशी आंब्याच्या झाडाच्या फांद्यांवर, शेंड्याकाच्या बाजूला दुसरीच वनस्पती बंच पद्धतीने वाढलेली दिसते.हिचे प्रमाण जास्त असेल तर शेंड्याकाठच्या सर्वच फांद्यावर या परोपजीवी वनस्पतीने आपले साम्राज्य पसरवलेले दिसते.अशा या दुसर्याच्या जीवावर जगणाऱ्या म्हणजेच परोपजीवी वनस्पतीला ‘बांडगूळ’ या नावाने ओळखले जाते._*
*बांडगूळाची वैशिष्ट्य म्हणजे याला फळे येऊन त्यात बी तयार होते. हि वनस्पती पूर्णतः निरोगी असते. हिची पाने मोठी आणि सतेज असतात. बंच पद्धतीने अतिशय कमी कालावधीत वाढते. बांडगूळ या वनस्पतीच्या मुळ्या मूळ झाडाच्या खोडातील अन्नास, पाणी शोषून घेऊन स्वतः झपाट्याने वाढतात. त्यामुळे मूळ झाड कमकुवत होते. अनुउत्पादक होते आणि बांडगूळ मात्र फोफावते. असे आंब्याच्या मोठ्या झाडावर बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. आंब्याशिवाय इतर प्रकारच्या झाडांवर सुद्धा अशी बांडगुळे दिसतात. बांडगूळ म्हणजे मूळ झाडाचा शत्रू किंवा एक कीडच असते. याचे निर्मुलन करण्यासाठी जिथून बांडगूळ वाढायला सुरवात झाली आहे, त्या पाठीमागे फुटभर अंतरावरून ती फांदीच छाटून टाकली असता त्या बांडगूळाचे निर्मुलन होऊ शकते. मात्र एका वेळी झाडावरची सर्व बांडगुळे छातावीत.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,बांडगूळावर कोणत्याही प्रकारच्या किडीरोगांचा प्रादुर्भाव होत नाही. शिवाय यांच्यात औषधी गुणधर्म आहेत का, हे तपासणे महत्वाचे आहे. विशेष म्हणजे याच्यावर संशोधन होणे अतिशय गरजेचे आहे.बांडगूळ या वनस्पतीच्या मुळ्या मूळ झाडाच्या खोडातील अन्नास, पाणी शोषून घेऊन स्वतः झपाट्याने वाढतात. त्यामुळे मूळ झाड कमकुवत होते.
0
Answer link
बांडगुळ:
बांडगुळ ही एक वनस्पती आहे जी दुसऱ्या वनस्पतीवर वाढते, परंतु ती परजीवी नसते. याचा अर्थ ती स्वतःचे अन्न स्वतः तयार करते आणि फक्त आधारासाठी दुसऱ्या वनस्पतीचा वापर करते.
- बांडगुळ स्वतःचे अन्न तयार करण्यासाठी प्रकाशसंश्लेषण करते.
- ते ज्या झाडावर वाढतात त्या झाडाला कोणतीही हानी पोहोचवत नाहीत.
- बांडगुळे उष्णकटिबंधीय प्रदेशात अधिक प्रमाणात आढळतात.
उदाहरण: ऑर्किड (Orchid)
अधिक माहितीसाठी आपण हे पाहू शकता: