झाडांची पाने पिवळी का पडतात?
हे टाळण्यासाठी अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे योग्य वेळी ओळखता येणे आणि त्यावर लगेच उपाय करणे सर्वात महत्वाचे असते.
◆मुख्य अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे◆
■अन्नद्रव्य | लक्षणे
★नायट्रोजन (N)
:जुनी पाने पिवळी पडतात. तसेच पूर्ण रोपावर पोपटी छटा पसरते.
★फॉस्फरस (P): जुनी पाने लालसर जांभळी होतात. पानांची टोके जळाल्यासारखी दिसतात.
©पोटॅशियम (K): जुनी पाने कोमेजतात, वाळल्यासारखी दिसतात. पानाच्या देठाजवळील शिरा पिवळसर होतात आणि पानाच्या कडा करपतात.
★सल्फर (S) :सुरुवातीला नवीन आणि हळूहळू जुनी पाने पिवळी पडू लागतात.
★मॅग्नेशियम (Mg) :जुन्या पानांच्या कडा पिवळ्या पडतात आणि केवळ पानाचा मध्यभाग हिरवा दिसू लागतो•
★कॅलशियम (Ca) :नवीन पानांचा आकार वेडावाकडा असतो.
■सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे
★अन्नद्रव्य ♀ लक्षणे
∆बोरॉन (B): फुटवे सुकून जातात.
◆कॉपर (Cu):झाडांची वाढ खुंटते आणि पाने गडद हिरवी होतात.
◆आयर्न (Fe):नवीन पानांच्या शिरा पिवळ्या होतात.
◆मँगनीज (Mn):नवीन पानांच्या शिरा पिवळ्या होतात आणि झाडांची वाढ खुंटते
◆.मॉलिबडेनम (Mo):जुनी पाने पिवळी पडतात. तसेच पूर्ण रोपावर पोपटी छटा पसरते.
◆झिंक:फांदीच्या टोकाकडील नवीन पानांची वाढ खुंटते आणि पाने जवळ जवळ उगवतात. नवीन पानांच्या शिरा पिवळ्या होतात.
■अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आल्यास काय करावे?
शक्य तितक्या लवकर कमतरता असलेले अन्नद्रव्य घटक असलेल्या खताची फवारणी करावी/ जमिनीतुन द्यावे.
बाजारात अनेक उत्पादकांची चांगल्या दर्जाची खते सहज उपलब्ध आहेत.
जसे; मुख्य अन्नद्रव्ये: महिंद्रा, महाफीड, आर सी एफ, इत्यादी.
सूक्ष्म अन्नद्रव्ये: मॅक्झिम, एरीज एग्रो, ग्रीन क्रॉप एग्रो, मल्टी लाइन, अंजली बायोटेक, अलर्ट बायोटेक इत्यादी.
1. पोषक तत्वांची कमतरता:
झाडांना आवश्यक असणारे पोषक तत्वे, जसे की नायट्रोजन, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांची कमतरता असल्यास पाने पिवळी पडू शकतात. नायट्रोजनच्या कमतरतेमुळे जुनी पाने प्रथम पिवळी होतात, तर मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे पानांच्या शिरा हिरव्या राहून बाकी भाग पिवळा होतो.
2. अपुरा सूर्यप्रकाश:
जर झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसेल, तर पाने पिवळी पडू शकतात. सूर्यप्रकाशामुळे पाने प्रकाशसंश्लेषण (photosynthesis) करू शकत नाहीत, त्यामुळे क्लोरोफिल (chlorophyll) नावाचे रंगद्रव्य कमी होते आणि पाने पिवळी दिसू लागतात.
3. जास्त पाणी किंवा कमी पाणी:
झाडांना जास्त पाणी दिल्यास मुळे कुजतात आणि त्यामुळे पाने पिवळी पडू शकतात. तसेच, जर झाडांना पुरेसे पाणी मिळत नसेल, तर पाने सुकतात आणि पिवळी पडतात.
4. रोग आणि कीड:
झाडांवर बुरशीजन्य रोग (fungal diseases) किंवा किडींचा प्रादुर्भाव झाल्यास पाने पिवळी पडू शकतात. काही कीटक पानांतील रस शोषून घेतात, त्यामुळे पाने कमजोर होऊन पिवळी पडतात.
5. नैसर्गिक प्रक्रिया:
शरद ऋतूमध्ये झाडे पानगळ करतात, त्यामुळे पाने पिवळी होऊन गळतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि यात काळजी करण्यासारखे काही नसते.