
वनस्पतीरोग
- पाण्याची कमतरता किंवा जास्त पाणी: मिरचीच्या रोपाला नियमितपणे पाणी देणे आवश्यक आहे, पण जास्त पाणी देणे टाळा.
- जमिनीतील ओलावा तपासा. जर माती कोरडी वाटली तरच पाणी द्या.
- पाणी देताना ते हळू हळू द्या जेणेकरून ते मुळांपर्यंत पोहोचेल.
- अति पाणी साठून राहू नये म्हणून गमल्याला किंवा रोपाला योग्य निचरा असणे आवश्यक आहे.
- सूर्यप्रकाश: मिरचीच्या रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे.
- रोपाला दिवसातील किमान ६-८ तास सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा.
- जर सूर्यप्रकाश पुरेसा नसेल तर कृत्रिम प्रकाश वापरण्याचा विचार करा.
- पोषक तत्वांची कमतरता: रोपाला आवश्यक पोषक तत्वे न मिळाल्यास ते सुकू शकते.
- रोपांना नियमितपणे खत द्या. कंपोस्ट खत किंवा रासायनिक खत वापरू शकता. ॲग्रीप्रेरणा - कंपोस्ट खत (agriprerna.com)
- माती परीक्षण करून घ्या आणि त्यानुसार खत द्या.
- रोग आणि कीड: रोपांवर रोग आणि कीड लागल्यास ते सुकू शकतात.
- रोपांवर कीडनाशक फवारा.
- रोगग्रस्त पाने आणि फांद्या काढून टाका.
- नैसर्गिक कीटकनाशक म्हणून निंबोळी तेल वापरा. कृषी विभाग, महाराष्ट्र शासन - निंबोळी तेल (krishi.maharashtra.gov.in)
- मातीची गुणवत्ता: मातीची गुणवत्ता चांगली नसेल तर रोपे सुकू शकतात.
- रोपे लावण्यासाठी चांगल्या प्रतीची माती वापरा.
- मातीमध्ये कंपोस्ट खत आणि इतर आवश्यक पोषक तत्वे मिसळा.
उपाय:
उपाय:
उपाय:
उपाय:
उपाय:
_*⭕ बांडगुळ म्हणजे काय ? ⭕*_
*_आपण एखाद्या अपप्रववृत्तीच्या व्यक्तीला सहज बोलतो ‘काय रे बांडगूळ आहेस.’ खरच या वाक्यात एक मतितार्थ दडलेला आहे. तो समजावून घेतला पाहिजे. जो दुसर्याच्या जीवावर जगतो आणि फोफावतो त्याला ‘बांडगूळ’ असे म्हटले जाते. माणसाच्या बाबतीत झाडावरील परोपजीवी वनस्पती वरूनच हे बोलले जाते._*
*_बहुतांशी आंब्याच्या झाडाच्या फांद्यांवर, शेंड्याकाच्या बाजूला दुसरीच वनस्पती बंच पद्धतीने वाढलेली दिसते.हिचे प्रमाण जास्त असेल तर शेंड्याकाठच्या सर्वच फांद्यावर या परोपजीवी वनस्पतीने आपले साम्राज्य पसरवलेले दिसते.अशा या दुसर्याच्या जीवावर जगणाऱ्या म्हणजेच परोपजीवी वनस्पतीला ‘बांडगूळ’ या नावाने ओळखले जाते._*
*बांडगूळाची वैशिष्ट्य म्हणजे याला फळे येऊन त्यात बी तयार होते. हि वनस्पती पूर्णतः निरोगी असते. हिची पाने मोठी आणि सतेज असतात. बंच पद्धतीने अतिशय कमी कालावधीत वाढते. बांडगूळ या वनस्पतीच्या मुळ्या मूळ झाडाच्या खोडातील अन्नास, पाणी शोषून घेऊन स्वतः झपाट्याने वाढतात. त्यामुळे मूळ झाड कमकुवत होते. अनुउत्पादक होते आणि बांडगूळ मात्र फोफावते. असे आंब्याच्या मोठ्या झाडावर बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. आंब्याशिवाय इतर प्रकारच्या झाडांवर सुद्धा अशी बांडगुळे दिसतात. बांडगूळ म्हणजे मूळ झाडाचा शत्रू किंवा एक कीडच असते. याचे निर्मुलन करण्यासाठी जिथून बांडगूळ वाढायला सुरवात झाली आहे, त्या पाठीमागे फुटभर अंतरावरून ती फांदीच छाटून टाकली असता त्या बांडगूळाचे निर्मुलन होऊ शकते. मात्र एका वेळी झाडावरची सर्व बांडगुळे छातावीत.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,बांडगूळावर कोणत्याही प्रकारच्या किडीरोगांचा प्रादुर्भाव होत नाही. शिवाय यांच्यात औषधी गुणधर्म आहेत का, हे तपासणे महत्वाचे आहे. विशेष म्हणजे याच्यावर संशोधन होणे अतिशय गरजेचे आहे.बांडगूळ या वनस्पतीच्या मुळ्या मूळ झाडाच्या खोडातील अन्नास, पाणी शोषून घेऊन स्वतः झपाट्याने वाढतात. त्यामुळे मूळ झाड कमकुवत होते.
मेहबुबनगर :
*तेलंगणा राज्यात एका ७०० वर्षांच्या 🌳 वृक्षाला वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी वृक्षाला वनस्पतींसाठीची केमिकल औषधे सलाईनच्या माध्यमातून झाडालादिली जात आहेत. या वृक्षाचे फोटो पाहून असेच वाटते की एखाद्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.*
तेलंगणा राज्यात जगातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा वृक्ष आहे. मेहबुबनगर येथील पिल्लालामर्री भागात हा वृक्ष असून जवळपास तीन एकरांत तो पसरला आहे. वृक्षाचे वय ७०० वर्ष असल्याचे सांगितले जाते. या वृक्षामुळे मेहबुबनगर पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. वृक्ष आणि परिसर पाहण्यासाठी लोक दूरवरुन येतात. पण गेल्या काही महिन्यांपासून झाडाला किड लागल्याने ते कमकुवत झाले होते. ही किड नष्ट करण्यासाठी किटकनाशके झाडामध्ये सोडली जात आहेत. त्यासाठी शेकडो सलाईनच्या बाटल्या झाडाला टांगल्या आहेत.
आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट, जगातील मोठ्या वृक्षांपैकी एक असलेल्या या वृक्षाला किड लागल्याने कमकुवत झाले आहे. त्यामुळे डिसेंबरपासून त्याला पाहण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. किड लागल्याने त्याच्या फांद्या तुटायला लागल्या आहेत. कोणती दुर्घटना घडू नये यासाठी पर्यटकांना वृक्षाच्या परिसरात फिरण्यास बंदी घातली असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच या वृक्षाला वाचवण्यासाठी प्रत्येक फांदीला किटकनाशक मारणाऱ्या औषधांचे सलाईन लावले असल्याचेही ते म्हणाले.
1. अपुरी सूर्यप्रकाश:
कारणं: कढीपत्त्याच्या झाडाला दिवसातील किमान ६-८ तास सूर्यप्रकाश आवश्यक असतो. जर झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसेल, तर पाने पिवळी पडून वाळू लागतात.
उपाय: झाड अशा ठिकाणी हलवा जेथे भरपूर सूर्यप्रकाश मिळेल.
2. पाण्याची कमतरता किंवा जास्त पाणी:
कारणं: कढीपत्त्याच्या झाडाला नियमितपणे पाण्याची गरज असते, परंतु जास्त पाणी दिल्यास मुळे सडण्याची शक्यता असते. तसेच, पाणी कमी झाल्यास पाने वाळू लागतात.
उपाय:
- झाडाला नियमित पाणी द्या, पण माती सुकल्यावरच.
- पाणी देताना ते मुळांपर्यंत पोहोचेल याची खात्री करा.
- गमल्यामध्ये (pot)extra water drainage ची सोय असावी.
3. पोषक तत्वांची कमतरता:
कारणं: झाडाला आवश्यक पोषक तत्वे न मिळाल्यास पाने वाळू शकतात.
उपाय:
- झाडाला नियमितपणे कंपोस्ट खत (compost fertilizer) द्या.
- तुम्ही रासायनिक खतांचा (chemical fertilizer) वापर करू शकता, पण ते योग्य प्रमाणात असावे.
4. कीड आणि रोग:
कारणं: कढीपत्त्याच्या झाडावर ऍफिड्स (aphids), स्केल (scale), किंवा पांढरी माशी (white flies) सारख्या किडींचा प्रादुर्भाव झाल्यास पाने वाळू शकतात.
उपाय:
- झाडाची नियमित तपासणी करा आणि किडी दिसल्यास त्यांना त्वरित दूर करा.
- नीम तेल (neem oil) किंवा कीटकनाशक साबणाचा (insecticidal soap) वापर करा.
5. मातीची गुणवत्ता:
कारणं: कढीपत्त्याच्या झाडासाठी योग्य माती नसेल, तर झाडाला आवश्यक पोषक तत्वे मिळत नाहीत.
उपाय:
- चांगली निचरा होणारी माती वापरा.
- मातीमध्ये कंपोस्ट आणि इतर जैविक खते मिसळा.
इतर उपाय:
- झाडाची छाटणी (pruning) करा जेणेकरून त्याला नवीन पालवी फुटेल.
- झाडाला ताण येऊ नये म्हणून योग्य काळजी घ्या.
हे टाळण्यासाठी अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे योग्य वेळी ओळखता येणे आणि त्यावर लगेच उपाय करणे सर्वात महत्वाचे असते.
◆मुख्य अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे◆
■अन्नद्रव्य | लक्षणे
★नायट्रोजन (N)
:जुनी पाने पिवळी पडतात. तसेच पूर्ण रोपावर पोपटी छटा पसरते.
★फॉस्फरस (P): जुनी पाने लालसर जांभळी होतात. पानांची टोके जळाल्यासारखी दिसतात.
©पोटॅशियम (K): जुनी पाने कोमेजतात, वाळल्यासारखी दिसतात. पानाच्या देठाजवळील शिरा पिवळसर होतात आणि पानाच्या कडा करपतात.
★सल्फर (S) :सुरुवातीला नवीन आणि हळूहळू जुनी पाने पिवळी पडू लागतात.
★मॅग्नेशियम (Mg) :जुन्या पानांच्या कडा पिवळ्या पडतात आणि केवळ पानाचा मध्यभाग हिरवा दिसू लागतो•
★कॅलशियम (Ca) :नवीन पानांचा आकार वेडावाकडा असतो.
■सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे
★अन्नद्रव्य ♀ लक्षणे
∆बोरॉन (B): फुटवे सुकून जातात.
◆कॉपर (Cu):झाडांची वाढ खुंटते आणि पाने गडद हिरवी होतात.
◆आयर्न (Fe):नवीन पानांच्या शिरा पिवळ्या होतात.
◆मँगनीज (Mn):नवीन पानांच्या शिरा पिवळ्या होतात आणि झाडांची वाढ खुंटते
◆.मॉलिबडेनम (Mo):जुनी पाने पिवळी पडतात. तसेच पूर्ण रोपावर पोपटी छटा पसरते.
◆झिंक:फांदीच्या टोकाकडील नवीन पानांची वाढ खुंटते आणि पाने जवळ जवळ उगवतात. नवीन पानांच्या शिरा पिवळ्या होतात.
■अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आल्यास काय करावे?
शक्य तितक्या लवकर कमतरता असलेले अन्नद्रव्य घटक असलेल्या खताची फवारणी करावी/ जमिनीतुन द्यावे.
बाजारात अनेक उत्पादकांची चांगल्या दर्जाची खते सहज उपलब्ध आहेत.
जसे; मुख्य अन्नद्रव्ये: महिंद्रा, महाफीड, आर सी एफ, इत्यादी.
सूक्ष्म अन्नद्रव्ये: मॅक्झिम, एरीज एग्रो, ग्रीन क्रॉप एग्रो, मल्टी लाइन, अंजली बायोटेक, अलर्ट बायोटेक इत्यादी.