2 उत्तरे
2
answers
पुणे शहराला मेट्रोची आवश्यकता आहे का?
1
Answer link
आहे कारण की पुण्याची लोकसंख्या जवळपास 35 ते 40 लाख इतकी आहे अन तितकेच वाहनांची सुद्धा आहे साधारणता आताच्या घडीला जवळपास तीस ते 32 लाख च्या जवळपास दुचाकी आणि सहा ते आठ लाख चार चाकी एवढी वाहनांची संख्या झाले जरी संख्या अशीच वाढत राहिली हे वाढणार त्यानुसार सार्वजनिक वाहतुकीचे गरज आहे आणि ह्या वाढीस लागण्याच्या कारण म्हणजे त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थित नसल्याने याची खरोखर खूप गरज आहे हे सध्या स्मार्ट सिटी मुळे मॅट्रो तरी सुरुवात झाली पण अजूनही विविध खास करून असे सार्वजनिक वाहतुकीची अत्यंत पुण्याला गरज आहे नाही तर पुढील काही दिवसात दिल्लीतील मधील घडामोडी तुम्ही जरा ऐकले असेल तर शुद्ध हवेचा ऑक्सिजन बॉटल विकत घेणे/ विकत मिळते इतपत हवेचे प्रदूषण झाले अशी अवस्था होण्याची शक्यता आहे जास्तही नाही पाचएक वर्षात ते होईल पण एवढी भीषण परिस्थिती निर्माण झाली याचा लोक जरासुद्धा दखल घेत नाही किंवा गांभीर्य घेत नाही एकेक घरात/कुटुंबात चार चार पाच पाच गाड्या हे अजूनही सारास चालू आहे मी जास्त बाहेरच जगाचाही अगदी उदाहरण देत नाही मुंबईत जवळ सव्वा कोटी लोकसंख्या असूनही तिथे बेस्ट म्हणा मेट्रो,लोकल या सर्वांचा लोकसंख्येनुसार योग्य व वेळापत्रकानुसार ही योग्य नियोजन आहे तेथील लोकल तुम्ही सर्विस पाहिले का पाच ते दहा मिनिटं उशीर होणे सुद्धा खूप महामुश्किलेने होते त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा लोकसंख्येनुसार समन्वय व्यवस्थित राहतो असे नियोजन व सार्वजनिक वाहतुकीची गरज यानुसार पुण्याला याची खूप गरज आहे
धन्यवाद
धन्यवाद
0
Answer link
होय, पुणे शहराला मेट्रोची आवश्यकता आहे. याची काही कारणे खालीलप्रमाणे दिली आहेत:
- वाढती लोकसंख्या: पुणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम असणे गरजेचे आहे.
- वाहतूक कोंडी: पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. मेट्रोमुळे रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होऊन वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
- प्रदूषण: वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे हवेचे प्रदूषण वाढले आहे. मेट्रोमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
- सुरक्षित आणि जलद प्रवास: मेट्रोमुळे सुरक्षित आणि जलद प्रवास करणे शक्य होईल.
- अर्थव्यवस्था: मेट्रोमुळे शहराच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
अधिक माहितीसाठी तुम्ही खालील लिंकवर क्लिक करू शकता: