5 उत्तरे
5
answers
सहकार म्हणजे काय?
4
Answer link
भारतात सहकारी संस्थांची चळवळ खूप दशके सुरू आहे. छोट्या गृहनिर्माण संस्था ते मोठा साखर कारखाना, दूध डेअरी अशी विविधांगी रूपे या प्रक्रियेतून आकाराला आली आहेत. केंद्र सरकारने मार्च २०11 मध्ये ९७वी घटनादुरुस्ती करून देशभरातील सर्व राज्यांतील सहकार कायद्याला घटनात्मक अधिकार प्राप्त करून दिला. यापूर्वी प्रत्येक राज्यातील सहकार कायदा वेगळा होता. देशपातळीवर हा कायदा एकच असावा, या उद्देशाने केंद्राने ही दुरुस्ती केली. महाराष्ट्र राज्यातील सर्व संस्था 'राज्य सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे' या कार्यालयाच्या नियंत्रणाखाली येतात.
३५ शिखर संस्था,
घोटाळे करणार्या ७२,००० सहकारी संस्थांची नोंदणी सरकारने रद्द केली आहे. अनेक सहाकारी संस्थांवर प्रशासक नेमले आहेत. राजकीय लाभ पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारांच्या कारकिर्दीत सहकारी संस्थांची मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली, त्यांपैकी अनेक संस्था अस्तित्वात आल्या नाहीत. केवळ कागदोपत्री नोंद असलेल्या या संस्थांच्या कार्यालयांचे पोस्टाचे पत्तेही खोटे होते. अशा बोगस संस्थांची नोंदणी भारतीय जनता पार्टीच्या सरकारने रद्द केली.
नोटाबंदीच्या काळात जिल्हा सहकारी बँकांना ५०० आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारायला बंदी होती, तरीही किमान चार सहकारी बँकांनी अशा नोटा स्वीकारून काळा पैसा पांढरा करून दिला. त्यांच्यावर रिझर्व बँकेची कारवाई अपेक्षित आहे. (डिसेंबर २०१६ची स्थिती)
विठ्ठलराव विखे पाटील, रत्नाप्पा कुंभार, धनंजय रामचंद्र गाडगीळ यांनी सहकाराचा पाया घातला. 'दुधाची टंचाई असलेला देश' ही भारताची ओळख पुसून या देशात 'दुधाचा महापूर' आणणारे धवलक्रांतीचे जनक डॉ. वर्गिस कुरियन यांनी 'अमूल'च्या रुपात सहकारी संस्थेची उभारणी केली.
३५ शिखर संस्था,
- २१ हजार ६२ प्राथमिक कृषी पतसंस्था
- २२,३३६ बिगर कृषी पतसंस्था
- १,५१८ पणन संस्था
- ३९.७८१ शेतीमाल प्रक्रिया उपक्रम संस्था आणि .
- १,४०.९९७ इतर सहकारी संस्था आहेत.
घोटाळे करणार्या ७२,००० सहकारी संस्थांची नोंदणी सरकारने रद्द केली आहे. अनेक सहाकारी संस्थांवर प्रशासक नेमले आहेत. राजकीय लाभ पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारांच्या कारकिर्दीत सहकारी संस्थांची मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली, त्यांपैकी अनेक संस्था अस्तित्वात आल्या नाहीत. केवळ कागदोपत्री नोंद असलेल्या या संस्थांच्या कार्यालयांचे पोस्टाचे पत्तेही खोटे होते. अशा बोगस संस्थांची नोंदणी भारतीय जनता पार्टीच्या सरकारने रद्द केली.
नोटाबंदीच्या काळात जिल्हा सहकारी बँकांना ५०० आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारायला बंदी होती, तरीही किमान चार सहकारी बँकांनी अशा नोटा स्वीकारून काळा पैसा पांढरा करून दिला. त्यांच्यावर रिझर्व बँकेची कारवाई अपेक्षित आहे. (डिसेंबर २०१६ची स्थिती)
विठ्ठलराव विखे पाटील, रत्नाप्पा कुंभार, धनंजय रामचंद्र गाडगीळ यांनी सहकाराचा पाया घातला. 'दुधाची टंचाई असलेला देश' ही भारताची ओळख पुसून या देशात 'दुधाचा महापूर' आणणारे धवलक्रांतीचे जनक डॉ. वर्गिस कुरियन यांनी 'अमूल'च्या रुपात सहकारी संस्थेची उभारणी केली.
0
Answer link
सहकार म्हणजे समान उद्दिष्ट्ये असणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन परस्परांच्या मदतीने आपले आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हितसंबंध साधणे होय.
- सहकार हा एक लोकशाही आणि स्वयं-सहाय्यतेवर आधारलेला दृष्टिकोन आहे.
- सहकारात, व्यक्ती स्वेच्छेने एकत्र येतात आणि समान मालकी तसेच नियंत्रणाद्वारे व्यवसाय चालवतात.
- सहकारी संस्था आपल्या सदस्यांना सेवा पुरवतात आणि नफा-तोटा समान वाटून घेतात.
सहकाराची काही उदाहरणे:
- सहकारी पतसंस्था: सदस्यांना कर्ज आणि बचत सुविधा पुरवतात.
- शेतकरी सहकारी संस्था: शेतमालाची विक्री आणि खते, बी-बियाणे खरेदीमध्ये मदत करतात.
- ग्राहक सहकारी संस्था: सदस्यांना माफक दरात वस्तू पुरवतात.
- गृहनिर्माण सहकारी संस्था: सदस्यांना घरे बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी मदत करतात.
सहकाराचे फायदे:
- गरजू लोकांना मदत.
- लोकशाही पद्धतीने व्यवस्थापन.
- आर्थिक विकास.
- सामाजिक समानता.
अधिक माहितीसाठी: