राजकारण निवडणूक आयोग

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली?

2 उत्तरे
2 answers

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली?

9
भारतीय संविधानाच्या 73 व 74 दुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना दि.26 एप्रिल, 1994 रोजी करण्यात आली. संविधानातील भाग -9 मधील अनुच्छेद 243 ट (243 K) नुसार ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था (जिल्हापरिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत) व अनुच्छेद 243 यक (243 ZA) नुसार नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत) यांच्या निवडणुका घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आलेली आहे. संविधानातील सदर अनुच्छेदातील तरतुदीनुसार ‘निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कामाचे अधिक्षण, संचलन आणि नियंत्रण आणि अशा निवडणुकांचे आयोजन ’ अशी जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविलेली आहे.
उत्तर लिहिले · 27/12/2018
कर्म · 39105
0

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 26 एप्रिल 1994 रोजी झाली.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5060

Related Questions

लोकशाही विकेंद्रीकरणावर टिपा लिहा.
लोकशाही विकेंद्रीकरण म्हणजे काय?
लोकशाही विकेंद्रीकरणात माध्यमांचे योगदान स्पष्ट करा.?
साम्यवाद आणि कम्युनिझमचा प्रचार मार्क्सवाद?
भारतीय निवडणूक आयोगाची कार्ये काय आहेत?
भारतीय निवडणूक आयोगाची कार्ये कोणती आहेत?
2004 च्या राजकीय निवडणुकीचे विश्लेषण करा?