2 उत्तरे
2
answers
मद्यार्क अल्कोहोल (ALCOHOL) म्हणजे काय?
10
Answer link
📙 *मद्यार्क (Alcohol)* 📙
**************************
मद्यार्क किंवा अल्कोहोल अतिप्राचीन काळापासून माहीत आहे. त्याचे विशुद्ध स्वरूप गेली काही शतके उपलब्ध होऊ लागले. औद्योगिक प्रगती व क्रांती जसजशी आकार घेत गेली, तसतसे अल्कोहोलचे अनेक उपयोग लक्षात येऊ लागले. दारू तयार करणे या एकमेव गोष्टीसाठी मद्यार्काचा पुरातन काळापासून वापर मानव वापर करत आहे
मद्यार्क किंवा अल्कोहोलचे शास्त्रीय नाव इथेनॉल. कार्बनचे दोन, प्राणवायूचे दोन व हायड्रोजनचे सहा अणू एकत्र येऊन तयार झालेल्या रेणूला आपण इथेनॉल म्हणतो. याचीच अनेक भावंडे थोड्याफार अणुसंरचनेतील फरकाने अस्तित्वात आहेत. स्वच्छ, पारदर्शक, रंगहीन असा द्रव असतो. हवेमध्ये उघडा राहिल्यास झपाट्याने जसा उडून जातो, तितकाच तो ज्वालाग्रही सुद्धा असतो. सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्वलनानंतर किंवा उडून गेल्यावर काही कसलाही अनुशेष राहत नाही. जळताना काजळीविरहित पूर्ण निळी ज्योत मिळत राहते व भरपूर उष्णता या ज्योतीतून मिळू शकते. या गुणामुळेच सर्व प्रकारच्या प्रयोगशाळांतून स्पिरिट लॅम्प वापरण्याची पद्धत आहे. यासाठी मेथॅनॉल मिश्रित इथेनॉल वापरले जाते. इंजेक्शन देण्यापूर्वी, जखमांच्या आसपासचा भाग साफ करण्यासाठी, ऑपरेशनपूर्वी कातडी किंवा हत्यारे निर्जंतुक करण्यासाठी, इथेनॉलचा वापर केला जातो.
सर्व प्रकारचे अल्कोहोल हे उत्तम द्रावण आहेत. विविध औषधी वनस्पतींचे अर्क काढण्यासाठी अल्कोहोलचा उत्तम उपयोग होतो. अनेक टॉनिक्स, खोकल्याची औषधे यांत अल्कोहोल असतोच. भारतीय आयुर्वेद पद्धतीत व जर्मनीतील होमिओपॅथी पद्धतीत अनेक औषधांच्या निर्मितीसाठी अंगभूत द्रावण म्हणून मद्यार्क असतो. रंग, नेलपेंट, हेअरडाय' शांपू, आफ्टरशेव्ह लोशन, सेंट्स, डिटर्जंट्स, प्लास्टिक उत्पादने यांपैकी कोणतीही गोष्ट असली तरी त्यासाठी अल्कोहोलची गरज भासतेच. काही देशात, मुख्यतः ब्राझीलमध्ये मोटारीचे इंधन म्हणून पेट्रोलच्या जोडीला देशातच तयार होणारा अल्कोहोल वापरतात. भारतात अल्कोहोल मुख्यत: साखरेच्या मळीपासून बनवला जातो. साखरेची मळी व किण्वपदार्थ (यीस्ट) एकत्र करून ठेवले असता फसफसून त्यात मद्यार्क तयार होतो. ऊर्ध्वपातन पद्धतीने शुद्ध मद्यार्क या मिश्रणातून मिळवला जातो. दारू तयार करण्यासाठी हा इथेनॉलचा मद्यार्क वापरला जातो. औद्योगिक वापरासाठी मिथेनाॅल वापरतात. पिण्यासाठी लोकांनी त्याचा वापर करू नये, म्हणून त्यात पिवळसर रंग व उग्र वासाचा द्रव घातलेला असतो. द्राक्षे, बार्ली, बीट, ओट, राय, तांदूळ, विविध प्रकारची मध असलेली फुले यांपैकी कशापासूनही मद्यार्क तयार केला जाऊ शकतो. यामुळेच दारू तयार करण्यासाठी जे उपलब्ध असेल त्यापासून दारू बनवून तिचा प्यायला वापर करायची जगभर पद्धत पडली आहे.
*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*

0
Answer link
मद्यार्क अल्कोहोल (Ethyl Alcohol) एक रंगहीन, ज्वलनशील द्रव आहे. ह्याला इथेनॉल (Ethanol) असेही म्हणतात. ह्याचा उपयोग अनेक प्रकारची पेये बनवण्यासाठी आणि रासायनिक कामांसाठी होतो.
रासायनिक सूत्र: C2H5OH
उपयोग:
- पेये बनवण्यासाठी (उदा. whiskey, beer, wine)
- औषधे आणि जंतुनाशक (sanitizers) बनवण्यासाठी
- रासायनिक प्रयोगशाळांमध्ये विलायक (solvent) म्हणून
- इंधन म्हणून
मद्यार्क अल्कोहोल fermentation प्रक्रियेद्वारे साखर किंवा स्टार्च पासून तयार केले जाते.
अधिक माहितीसाठी: