3 उत्तरे
3
answers
आई या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे?
20
Answer link
पहिलं मत:
आई हा शब्द तामिळ भाषेतुन आला आहे. तामिळ भाषेत आईला किंवा आईच्या बहिणीला आयी म्हणतात. आयी म्हणजे मोठी किंवा कूटूंबातली महत्वाची स्त्री होयं.
त्याच प्रमाणे चिन्नायी म्हणजे आईची धाकटी बहिण अर्थात लहान मावशी तर पेरियायी म्हणजे मोठी मावशी होयं.
तामिळ मध्ये आयी ला ताय ताय म्हणुन पण हाका मारतात त्यावरुन हे आयी आलयं आणि त्यावरुन मराठीत आई आलयं.
बाकी ताई, माई, बाई आणि दाई ह्यांचा थेट संबंध आयी ह्या शब्दांशी आहे हे सांगण्यात हरकत नाही.
दुसरं मत :
आई = (आ)त्मा + (ई)श्वर असा पण होऊ शकतो. जी साक्षात ईश्वराचे रुप आहे, आत्मा आहे ती झाली आई..
आई हा शब्द तामिळ भाषेतुन आला आहे. तामिळ भाषेत आईला किंवा आईच्या बहिणीला आयी म्हणतात. आयी म्हणजे मोठी किंवा कूटूंबातली महत्वाची स्त्री होयं.
त्याच प्रमाणे चिन्नायी म्हणजे आईची धाकटी बहिण अर्थात लहान मावशी तर पेरियायी म्हणजे मोठी मावशी होयं.
तामिळ मध्ये आयी ला ताय ताय म्हणुन पण हाका मारतात त्यावरुन हे आयी आलयं आणि त्यावरुन मराठीत आई आलयं.
बाकी ताई, माई, बाई आणि दाई ह्यांचा थेट संबंध आयी ह्या शब्दांशी आहे हे सांगण्यात हरकत नाही.
दुसरं मत :
आई = (आ)त्मा + (ई)श्वर असा पण होऊ शकतो. जी साक्षात ईश्वराचे रुप आहे, आत्मा आहे ती झाली आई..
2
Answer link
संपादन करा
'आई म्हणजे ममता तसेच आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई होय. मायेची पाखरण करणारी एक स्त्री होय.एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते. आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते. आईचे खरे प्रेम आणि पालनपोषण या सोबत कशाचीही तुलना केली जाऊ शकत नाही. आमच्या आयुष्यातील ती एकमेव महिला आहे जी कोणत्याही हेतूशिवाय आपल्या मुलाला भरपूर प्रेमळ काळजी देते. मूल म्हणजे आईसाठी सर्वकाही.[१]
स्टाग्लियानोच्या स्मारक स्मशानभूमीत मुलांसह आईची प्रतिमा
ती एक चांगली श्रोता आहे आणि आम्ही म्हणत असलेल्या आमच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी ऐकत आहे. ती आम्हाला कधीही रोखत नाही आणि कोणत्याही प्रकारे आम्हाला बांधत नाही. ती आम्हाला चांगल्या आणि वाईट मधील फरक शिकवते. आई आम्हाला प्रत्येक आनंदात आणि दुःखात मदत करते, जेव्हा आपण आजारी असतो, तेव्हा ती आपल्यासाठी रात्रभर जागी राहते आणि आपल्या चांगल्या आरोग्यासाठी देवाची प्रार्थना करते.
शब्द मानवी भावनांशी निगडित असून त्यास माणसाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. स्त्रीने जन्म दिला नसतानाही ती सवतीच्या मुलाची किंवा दत्तक मुलाची आई बनते.
आई ही शांतादुर्गा चे रूप आहे, जी प््ऐ मराठी भाषेतला "आई" हा आई मायेचा सागर आहे.या विषयावर अनेकांनी काव्ये आणि निबंध लिहिले आहेत. रामायणातील महानायक श्रीरामचंद्रानीही, स्वर्णमयी लंकेपेक्षाच काय, पण स्वर्गापेक्षाही आपली जन्मभूमी अयोध्या श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे. हे सांगताना त्यांनी जन्मभूमीची आईशी बरोबरी केली आहे. ते म्हणतात, "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी". मराठीमध्येही आई या विषयावर अनेक कविता रचलेल्या आहेत. मराठीतील प्रसिद्ध कवी यशवंत यानी आपल्या कवितेत "स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी " ही ओळ लिहून आई या शब्दाची महानताच थोडक्यात सांगतात.स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.
आईसाठी समानार्थी शब्द संपादन करा
माता, माय, ममता, जन्मदा, जन्मदात्री, माउली, जननी, मातृ.आई माझा गुरु , आई कल्पतरू ,सौख्याचा सागरू ,माई,आई माझी .मा,मायाडी, माउली,आय हि देवदेणगी आहे.
आई म्हणजे आई असते...
आई म्हणजे आई असते
तिला सर्वां गोष्टींची घाई असते
आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असते
न केलेले प्रश्न सोडवण्यातही सक्षम असते
वेड्यासारखं वागल्यावर, ऐवढी अक्कल कशी नाही म्हटते
वळण लावण्यासाठी दोन-चार धपाटेही देते
आपण रागाने झोपी गेलो की नकळतच डोक्यावरुन हात फिरवते
स्वत:च्या वागणुकीची मनातल्या मनातच माफी मागते
गुपचुपच मित्र-मैत्रीणींसोबत सिनेमाला जायची परवानगी देते
सांगून बाहेर पडलो तरी वाट बघत असते
पोट भरलं असलं तरी घास भरत असते
आपल्याला काळजीत बघून तळमळ असते
आजारी झाल्यावर स्वत: डॉक्टर होऊन बसते
वेदनामुळे नुसत आईईई शब्द काढला की लगेच हजर असते
आपण जागे असलो तर तिची पापणी लागत नसते
फोनवर असलो तर ती आपल्याकडे लगेच कान करते
आपण खूश असलो तर कारण न जाणून घेता स्वत: ही हसते
यश मिळाल्यावर अश्रु भरलेल्या डोळ्याने भरभरुन बघते
जवळ असो वा दूर जीव आपल्यात अडकून ठेवते
मर्जीविरुद्ध किती तरी निर्णयांना प्रेमापोटी होकार देते
काही विस्टकले की वडिलांच्या तापटपणाच्या आचेपासून वाचवते
पुढल्या वेळी असे करु नको म्हणत पांघरुण घालते
आपली आवड-नाआवड तिला तोंडी पाठ असते
किती जरी मोठे झालो तरी आपल्यातच गुंतलेली असते
नि:स्वार्थ प्रेम आणि नातं काय हे तिच्याकडून शिकायला मिळते
खरंच आई ही देवाहून मुळीच कमी नसते
आई म्हणजे खरंच आई असते
-
0
Answer link
आई या शब्दाचा अर्थ:
आई हा शब्द केवळ एक नातं नाही, तर तो भावना, प्रेम, त्याग आणि वात्सल्याचं प्रतीक आहे.
- जन्मदात्री: आई म्हणजे आपल्या मुलाला जन्म देणारी स्त्री.
- पोषक: आई आपल्या मुलांचे पालनपोषण करते, त्यांना सुरक्षित ठेवते.
- मार्गदर्शक: आई मुलांना चांगले संस्कार देते आणि योग्य मार्ग दाखवते.
- मित्र: आई मुलांची सर्वात जवळची मैत्रीण असते, जिच्यासोबत ते कोणतीही गोष्ट share करू शकतात.
- आधार: आई मुलांसाठी नेहमी एक आधार असते, जी त्यांना कठीण परिस्थितीत साथ देते.
थोडक्यात, आई म्हणजे प्रेम, काळजी आणि त्यागाचं मूर्तिमंत रूप!
अधिक माहितीसाठी: