सामान्य ज्ञान रंग राष्ट्रध्वज

राष्ट्रध्वजाचा केसरी रंग कशाचे प्रतीक आहे?

3 उत्तरे
3 answers

राष्ट्रध्वजाचा केसरी रंग कशाचे प्रतीक आहे?

4
भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. (त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे).

डॉ. एस्. राधाकृष्णन् यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे
ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे.

वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.
मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो.
खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृध्दीोचा बोध होतो.
निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राच व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्‍या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्र‘ या नावाने ओळखले जाते.
उत्तर लिहिले · 11/10/2018
कर्म · 3395
2
केसरी रंग हा त्यागाच प्रतीक आहे.
ज्ञात अज्ञात अश्या असंख्य व्यक्तींनी देशासाठी लढत असताना रक्त सांडल त्यांच्या प्राणांची आहुती दिली.
त्या खऱ्याखुऱ्या हीरो लोकांचं ते प्रतीक आहे.
उत्तर लिहिले · 11/10/2018
कर्म · 12915
0

भारताच्या राष्ट्रध्वजातील केशरी रंग त्याग, शौर्य आणि धैर्याचे प्रतीक आहे.

इतर रंगांचे अर्थ:

  • पांढरा रंग: शांती आणि प्रामाणिकपणा.
  • हिरवा रंग: समृद्धी, सुfertilityता आणि पृथ्वीशी संबंधित शुभता.
  • अशोकचक्र: हे चक्र 'धर्माचे चक्र' आहे, जे 24 मानवी गुणांचे प्रतिनिधित्व करते.

अधिक माहितीसाठी: भारत सरकारची अधिकृत वेबसाईट

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 980

Related Questions

राष्ट्रध्वजाचा केशरी रंग कशाचे प्रतीक आहे?
राष्ट्रध्वजावर हिरवा रंग कशाचे प्रतीक आहे?
राष्ट्रध्वजाची उंची किती असावी?
राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली?
भारताचा राष्ट्रध्वज कोठे बनतो?
राष्ट्रध्वज कसा व कोठे बनवला जातो?
राष्ट्रध्वजातील पांढऱ्या रंगातून कोणता संदेश मिळतो?