3 उत्तरे
3
answers
राष्ट्रध्वजावर हिरवा रंग कशाचे प्रतीक आहे?
3
Answer link
भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. (त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे). २२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वज' भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोकचक्र (धम्मचक्र) असून ते सारनाथ येथील सिंहमुद्रेवर असलेले अशोकचक्र आहे. चक्राला २४ आरे आहेत. मच्छलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे. भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे. 

भारताचा राष्ट्रीय ध्वज
ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे.
• वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.
• मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो.
• खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृद्धीचा बोध होतो.
• निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राचे व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्र' या नावाने ओळखले जाते. त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. ‘धम्मचक्र प्रवर्तनाय' हे घोषवाक्य भारतीय संसद सभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे
• ध्वजाची परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे. अर्जुनाच्या कपिध्वजाचा उल्लेख महाभारतात सापडतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जरीची झालर लाभलेला भगवा ध्वज प्रसिद्ध आहे.
धन्यवाद...!!
0
Answer link
आपल्या तिरंग्यामधील हिरवा रंग, निसर्गाचा रंग - प्रगती, भरभराट, समृद्धी,सुसंवाद, स्थिरता,संतुलन, सहनशक्ती , अंत:र्बाह्य सौंदय आणि चैतन्याचे प्रतीक आहे.
आपल्या तिरंग्यामधील हिरवा रंग, निसर्गाचा रंग प्रगती, भरभराट, समृद्धी, सुसंवाद, स्थिरता, संतुलन, सहनशक्ती अंतर्बाह्य सौंदय आणि चैतन्याचे प्रतीक आहे. हिरवा रंग आर्थिक घडामोडी, बँकिंगशी संबंधित तसेच त्या मध्ये healing power देखील आहे. गडद हिरवा महत्वाकांक्षा, लोभ आणि मत्सर तर पिवळसर हिरवा आजारपण, भ्याडपणा, विसंगती आणि मत्सर दर्शवू शकतो. ऑलिव्ह ग्रीन शांततेचा पारंपारिक रंग आहे. निळा आणि पिवळा मुख्य रंगाच्या मिश्रणाने बनलेला हिरवा शीत रंग (थंडावा देणार) आहे. लाल, पिवळा, निळा, केशरी, जांभळा, ग्रे, ब्राऊन ह्यापैकी कोणत्याही रंगाबरोबर हिरवा रंग उठून दिसतो. -हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी, स्वप्नाळू, अस्थिर, काहीशी आपल्याच मनाप्रमाणे वागणारी, आपल्याच तंद्रित राहणारी आणि तरीही बुद्धिप्रामण्यवादी, प्रदर्शनप्रिय, निरपेक्ष प्रेम करणारी असतात दुसऱ्याला आणि स्वतःला क्षमा करण्याची ताकद त्यांच्याकडे असते. दुसऱ्याचे मन संभाळण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतात. त्यांना "नाही" म्हणता येत नाही.सकाळी हिरवेगार वृक्ष, लतावेली किंवा गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने डोळ्यातील सूक्ष्म वाहिन्यांना शीतलता प्राप्त होते. विश्रांती मिळते, मन ताजेतवाने होते कारण हा रंग रिफ्रेशिंग आहे. हृदयाशी संबंधित कोणताही आजार जसे कि उच्च निम्न रक्तदाब (Blood Pressure), कोलेस्ट्रॉल,निम्न रक्तदाब (Blood Pressure), कोलेस्ट्रॉल, blockages, बाय-पास सर्जरी, रक्ताभिसरण संस्था , फुफ्फुसांशी संबंधित विकार, श्वासोच्छवासाची समस्या, दमा, छातीत दुखणे, अकाली वृद्धत्व ह्या आजारात हिरव्या रंगाचा अधिक वापर हा आजाराची तीव्रता कमी करणारा आहे. हिरव्या पालेभाज्या,फळे दैनंदिन वापारात असलेल्या अधिकाधिक गोष्टी हिरव्या रंगात निवडाव्यात. करोना वायरसचा हल्ला हा सर्वप्रथम आणि श्वसन संस्था, फुफुसे ह्यावर होतोय आणि म्हणूनच इम्यून सिस्टम आणि श्वसनसंस्था strong करण्यासाठी आपण योगा प्राणायाम करतो आहोतच त्या बरोबर हिरवा रंग अधिक वापरणे हा एक प्रतिबंधक उपाय होऊ शकतो.कारणास्तव दुरावा निर्माण होतो, एखादा
जेंव्हा एखाद्या नात्यामध्ये कटुता निर्माण होते, काही आपल्याला दगा देतो तेंव्हा प्रचंड मानसिक धक्का बसलेला असतो ज्यामधून सावरणे अतिशय कठीण होते. ह्या परिस्थितीत मन:शांती, नवी आशा आणि आयुष्याची नवीन सुरुवात करायची असते तेंव्हा हिरव्या रंगाची healing power करते. निसर्गाचे परिस्थितीतून बाहेर यायला मदत होईल
निरीक्षण त्याच बरोबर वापरण्यात येणारी
छोट्यातली छोटी गोष्ट
उदा,
रुमाल,
छत्री,पेन,स्कार्फ, कंगवा नेलपेन्ट इत्यादी हिरव्या
रंगाच्या शेड मध्ये निवडू शकतो. ज्यमुळे हिरव्या
रंगाची vibrations सतत मिळतील गणि
तपरिस्थितीतून बाहेर यायला मदत होईल समारंभात हिरव्या साडीला, लग्नात हिरव्या चुड्याला इतकं महत्व का दिले गेले असावे हे लक्षात आले असेल.
औषधे आणि वैद्यकीय उत्पादनांची जाहिरात करताना सुरक्षितता दर्शविण्यासाठी हिरव्या रंगाचा वापर केला जातो. हिरवा रंग पर्यावरणसंबधी काम करणारी संस्था, बँकिंग, रिअल इस्टेट, Finance, Training Institutes, शेती व शेती संबंधीत व्यवसाय किंवा सेवा भावी संस्था यांच्या लोगो मध्ये हिरवा रंग असल्यास फायदेशीर. कोणत्या ही क्षेत्रात काम करणार्यांनी आर्थिक स्थैर्य, समृद्धी, व्यायसायवृद्धीसाठी आपल्या कार्यालयात हिरव्या फाईल्स, भिंतींचा रंग, इंटिरिअरथोडक्यात पाहिले तर हिरवा रंग आर्थिक उन्नती, मानसिक स्वास्थ्य, शांताता समृद्धी हा रंग देतो. जी आहे ती स्थिती उंचवतोय. मग हिरव्या रंगाकडून आपण काय शिकायचे ? मी आहे, माझे असणे, माझ्या विश्वात जे काही आहे ते आहे. त्याला अधिक चांगले कसे बनवायचे ह्यासाठी आपल्या परीने काम करत राहणे. हिरव्या रंगात रंगून
0
Answer link
भारताच्या राष्ट्रध्वजातील हिरवा रंग हा समृद्धी, सुfertता आणि भूमीशी संबंधित आहे.
हे खालील गोष्टींचे प्रतीक आहे:
- समृद्धी: हिरवा रंग देशाच्या समृद्धी आणि भरभराटीचे प्रतीक आहे.
- सुfertता: हा रंग शेती आणि जमिनीची सुfertatata दर्शवितो, जी भारताच्या अर्थव्यवस्थेचा आधार आहे.
- भूमीशी संबंध: हिरवा रंग भारताच्या भूमी आणि निसर्गाशी असलेल्या घनिष्ठ संबंधांना दर्शवितो.
त्यामुळे, राष्ट्रध्वजातील हिरवा रंग भारताच्या कृषी परंपरा, समृद्धी आणि भूमीशी असलेल्या संबंधांचे महत्त्वाचे प्रतीक आहे.