भारत सामान्य ज्ञान राष्ट्रध्वज इतिहास

भारताचा राष्ट्रध्वज कोठे बनतो?

2 उत्तरे
2 answers

भारताचा राष्ट्रध्वज कोठे बनतो?

8
हुबळीचे एकमेव केंद्र पुरवते राष्ट्रध्वज

https://bit.ly/312TEa5
हुबळी - राष्ट्रध्वज बनवणारे देशभरात एकच अधिकृत केंद्र आहे , ते म्हणजे हुबळीजवळचे बेंगेरी खादी ग्रामोद्योग केंद्र. यंदा या केंद्रातून सुमारे एक कोटी रुपयांची ध्वजविक्री झाली आहे . गेली दोन वर्षेही साधारण एक कोटीच्या घरात विक्री झाल्याची माहिती आहे .🇮🇳
राष्ट्रध्वज बनवण्याचे तीन मुख्य टप्पे आहेत ; सूतकताई , रंगकाम आणि शिलाई. कापसापासून चरख्याद्वारे सूतकताई करून ध्वजाचे कापड विणले जाते. या कापडाच्या एक चौरस इंचात 32 उभे आणि 32 आडवे धागे असले पाहिजेत , असा निकष भारतीय मानक विभागाने ( ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डस ) ठरवला आहे . त्यामुळे हे कापड बनवण्याचे काम फक्त बागलकोट ( कर्नाटक ) जिल्ह्यातील तुलसगिरी व वेलूरमध्ये चालते . सूत विणून बनलेले कापड फिकट तपकिरी रंगाचे असते . या कपड्याचे तागे हुबळीच्या बेंगेरी केंद्रात मागवले जातात.
*रंगकाम*
बागलकोटहून कापडाचे तागे हुबळीत आल्यानंतर पहिल्यांदा त्याचे "ब्लीचिंग ' करून ते कापड पांढरे शुभ्र बनवले जाते. त्यानंतर काही ताग्यांना केशरी रंग , तर काही ताग्यांना हिरवा रंग दिला जातो . रंगांचा " पीएच' आणि " स्पेक्ट्रोफोटोमेट्रिक व्हॅल्यू ' बीआयएसच्या मानकाप्रमाणे असते . त्यानंतर पांढऱ्या कापडावर निळ्या रंगाचे अशोक चक्र स्क्रीन प्रिंटिंग तंत्राद्वारे छापले जाते.♍ https://bit.ly/312TEa5
*शिलाई*
तिरंगा ध्वज सलग एकाच कापडाचा नसतो , तर तीन कापडे जोडून शिवलेला असतो. तीन एकक लांबी आणि दोन एकक रुंदी होईल , अशा प्रमाणात तीन रंगांचे तुकडे शिलाई मशिनवर जोडले जातात. केशरी तुकडा पांढऱ्या तुकड्याला जोडताना शिलाईसाठी केशरी दोरा वापरला जातो . तर हिरवा तुकडा पांढऱ्या तुकड्याला जोडताना हिरवा दोरा वापरला जातो . त्यामुळे दुरून पाहिले असता एकाच कपड्याला तीन रंग दिले असल्याचा भास होतो . प्रत्यक्षात तिरंगा बनतो तो तीन रंगांचे प्रमाणबद्ध कापलेले तुकडे जोडून !
*खास खोबण*
तिन्ही तुकडे एकमेकांना शिलाईने जोडल्यानंतर एका बाजूला खास शिवून तयार केलेली खोबण ( स्लीव्ह ) जोडली जाते. ही खोबण हातमागावर तयार केलेली असते . ती वरून खाली अशी जोडली जाते. शिवाय , खोबणीचे वरचे तोंड बंद केले जाते . एकदा ध्वज शिवून तयार झाला की तो " स्टीम इस्त्री ' केला जातो . त्यानंतर तो  पिशवीबंद केला जातो . हुबळीतील या केंद्रात बीआयएसच्या मानकानुसार 9 विविध आकारांचे राष्ट्रध्वज तयार केले जातात.♍
https://bit.ly/2CsBvJ1

0

भारताचा राष्ट्रध्वज कर्नाटकातील धारवाड येथे बनवला जातो.

अधिक माहिती:

  • कर्नाटक खादी ग्रामोद्योग संयुक्त संघ (Karnataka Khadi Gramodyoga Samyukta Sangha - KKGSS) ही एकमेव संस्था आहे जी भारतीय ध्वज बनवण्यासाठी अधिकृत आहे.
  • ही संस्था धारवाडमध्ये आहे.

संदर्भ:

  1. KKGSS website
  2. The Hindu article
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 2760

Related Questions

महात्मा फुले माहिती?
Hadappa Sanskriti Harappa Sanskriti konatya Kala til hoti?
हडप्पा संस्कृती कोणत्या काळातील होती?
गरीब निवाजी नंदा संस्था कोण होती?
तोरणा किल्ल्याची उंची किती आहे?
कालगणना करण्याची एकके कोणती? इतिहासाच्या अभ्यासाचे फायदे लिहा. स्वयंप्रकाशी साधने लिहा.
महाराष्ट्रातील कोणता सण राज्य सण म्हणून ओळखला जातो?