राजकारण भारत रंग भारतीय स्वातंत्र्य दिन राष्ट्रध्वज

राष्ट्रध्वजातील पांढऱ्या रंगातून कोणता संदेश मिळतो?

2 उत्तरे
2 answers

राष्ट्रध्वजातील पांढऱ्या रंगातून कोणता संदेश मिळतो?

3
भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. (त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे).

डॉ. एस्. राधाकृष्णन् यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे
ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे.

वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.
मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो.
खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृध्दीोचा बोध होतो.
निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राच व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्‍या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्र‘ या नावाने ओळखले जाते.
उत्तर लिहिले · 11/10/2018
कर्म · 3395
0

आपल्या राष्ट्रध्वजातील पांढरा रंग सत्य, शांती आणि प्रामाणिकतेचे प्रतीक आहे. हा रंग आपल्याला आपल्या जीवनात सत्यनिष्ठ राहण्याची, शांततापूर्ण मार्ग निवडण्याची आणि प्रामाणिक राहण्याची प्रेरणा देतो.

या रंगातून मिळणारे संदेश:

  • सत्य: पांढरा रंग सत्याचे प्रतीक आहे. तो आपल्याला नेहमी सत्य बोलण्याची आणि सत्य आचरणात आणण्याची प्रेरणा देतो.
  • शांती: हा रंग शांती आणि सलोख्याचे प्रतीक आहे. तो आपल्याला शांततापूर्ण जीवन जगण्याची आणि इतरांशी सलोख्याने वागण्याची शिकवण देतो.
  • प्रामाणिकपणा: पांढरा रंग प्रामाणिकपणा दर्शवतो. हा रंग आपल्याला आपल्या कामात आणि व्यवहारात प्रामाणिक राहण्याची प्रेरणा देतो.
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1820

Related Questions

2025 चे उद्योग मंत्री कोण आणि पत्ता काय?
उद्योगमंत्री कोण व सध्या काय आहे?
निवडणूक कार्यालय हे कुठे असते?
पियुष गोयल यांनी राज्यसभेची निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढवली होती?
पियुष गोयल यांनी कुठून निवडणूक लढवली होती?
पियुष गोयल यांचे मतदारसंघ कोणते आहे?
स्वतंत्र भारताचा अर्थमंत्री कोण?