शेती फळ कृषी रसायन

आपण डाळिंबावर ॲसिडची फवारणी करतो, त्या ॲसिडने त्वचा जळते, त्या ॲसिडचे नाव काय?

2 उत्तरे
2 answers

आपण डाळिंबावर ॲसिडची फवारणी करतो, त्या ॲसिडने त्वचा जळते, त्या ॲसिडचे नाव काय?

1
. डाळिंब फळांवरील रोग व किडींचे व्यवस्थापन

१) तेलकट डाग रोग

अ ) सुरुवातीस झाडाच्या कोणत्या भागावर काळपट करडया रंगाचे डाग दिसतास करावयाचे उपाय

उपाय :

पिक कालावधी मध्ये रोग नियंत्रणासाठी (०.५% बोर्डोमिश्रणाची परंतु १% छाटणी केल्यानंतर ) व त्यानंतर स्ट्रेप्टोसायक्लीन (५ग्राम /१०लि. )किंवा २-ब्रोमो ,२- नायट्रो प्रोपेन १,३-डायोल (ब्रोमोपॉल) (५ ग्राम . /१०लि. )+ कॉपर ऑक्सिक्लोरीड किंवा कॉपर हाड्रोक्साईडची (२०-२५ग्राम ./१०लि. )पाण्यात संयुक्तरीत्या मिसळून फवारणी करावी. जर इतर बुरशीजन्य रोग आढळल्यास कॉपर ऐवजी योग्य ते बुरशीनाशक फवारणीसाठी वापरावे .

विश्रांती कालावधीमध्ये छाटणीनंतर बोर्डोमिश्रणाची (१%) प्रतिबंधक फवारणी घ्यावी . तसेच आलटून पालटून स्ट्रेप्टोसायक्लीन (२. ५ग्राम./१०लि.) किंवा ब्रोमोपॉल ५ ग्राम. /१० लि. + कॉपर ऑक्सिलोरीड / कॉपरहाड्रोक्साईडची (२०-२५ग्राम /१० लि.) संयुक्तरीत्या फवारणी करावी. दोन फवारणीतील अंतर १५ ते २० दिवस ठेवावे.

बागेतील स्वच्छता (जीवाणूंची वाढ आणि प्रसार थांबविण्यासाठी )
प्रादुर्भाव झालेली झाडांची पाने , फळे व फांद्या शेतातून काढून जाळ्याव्यात.
ब्लिचिंग पावडरच्या साह्याने (कि.घ. ३३% क्लोरीन )प्रत्येक ३ महिन्यांनी २५कि. ग्रा . /१०० लि . / हेक्टर पाण्यात मिसळून झाडाखालील मातीत ओतावे,
छाटणी करावयाची अवजारे सोडियम हायपोक्लोईडच्या (२. ५%) च्या साह्याने निर्जंतुक करावीत.
बागेतील तणे उपटून नष्ट करावीत व बाग तणमुक्त ठेवावीत.

ब ) फळावर काळपट करड्या रंगाचे ठिपके दिसतात, फळावर चिरा पडतात व ते फुटते. प्रादुर्भाव वाढल्यास रोगाचे तेलकट डाग फांद्यावर सुद्धा आढळतात .

उपाय :

रोगाच्या नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन (५ ग्रॅम. /१०लि.) किंवा ब्रोमोपॉल (५ग्रॅम /१० लि. )+कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा कॉपर हायड्रोक्सिड (२० ते २५ ग्रॅम. /१० लि.) ची फवारणी आलटून पालटून बोर्डो /बोर्डोक्स मिश्रणाच्या (०. ५ ते १%) च्या फवारणी सोबत करावी.

बहार बदलणे :

मृग बहार घेणे टाळावे आणि त्याऐवजी कमीतकमी ४-५ वर्ष हस्त बहार घ्यावा.
बागेतील स्वछता (जीवाणूंची वाढ आणि प्रसार थांबविण्यासाठी ) आधी दिल्या प्रमाणे करावी

बागेतील झाडाची छाटणी :

तेल्या रोगाची लागण झाडांच्या इतर फांद्यांवर झाली असल्यास त्यांची छाटणी करावी आणि त्या जाळ्याव्यात.
फांद्याची छाटणी प्रादुर्भाव ग्रस्त भागापासून २-३ इंच खालून करावी.

छाटणी केल्यानंतर त्या भागावर बोर्डेक्स पेस्ट (१०%) लावावी. पावसाळ्यात तेलयुक्त पेस्ट (५०० ग्रॅम . कॉपर ऑक्सिक्लोराईड +१लि. जवसाचे तेल )वापरावी किंवा चौबातीया पेस्ट (१किलो लाल गेरू +१ किलो कार्बोनेट +१. २५ लि . जवसाचे तेल ) वापरू शकता.
झाड मोठ्या प्रमाणात प्रादुर्भावग्रस्त झाल्यास ते उपटून काढून टाकावे व त्या जागी नवीन रोप लावावे किंवा त्या झाडाचे मुख्य खोड जमिनीपासुन २-३ इंच वरून तोडावे आणि नवीन निघणाऱ्या फुटव्यामधून खोड तयार करावे.

बागेत घ्यावयाची दक्षता:

गरज असेल तरच फवारणी घ्यावी व रसायने योग्य मात्रेतच वापरावीत अन्यथा जास्त फवारण्यामुळे रोग वाढीस चालणा मिळते.
फवारणीच्या अगोदर सर्व प्रादुर्भाव ग्रस्त फळे काढून जाळून टाकावीत.
कीटकनाशके,बुरशीनाशके, किंवा अन्नद्रव्य यांच्या फवारण्या जीवाणू नाशकासोबत एकत्रित करून फावाराव्यात.
पीक कालावधीमध्ये पाऊस पडल्यानंतर लगेचच अतिरिक्त जीवाणूनाशकाची फवारणी करावी.
नेहमी (पाऊस असताना किंवा नसताना)चांगल्या प्रतीचे स्प्रेडर आणि स्टीकर फवारणीमध्ये वापरावेत व बोरडेक्स मिश्रणामध्ये ते वापरू नयेत.
बोरडेक्स मिश्रणाचे द्रावण तयार केल्यानंतर त्याचा वापर ताबडतोब करावा (एक दिवसामध्ये).
झाडांना संतुलित अन्नद्रव्ये पुरवावी, तसेच झाडांना ३ ते ४ महिन्याची विश्रांती दयावी आणि झाडांची योग्य वाढ व रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी वर्षातून फक्त एकच बहार घ्यावा.
फळे काढल्यानंतर बागेच्या विश्रांती कालावधीमध्ये रोगप्रतिबंधक फवारण्या न चुकता नियमित घ्याव्यात.

२) मर रोग

या रोगामुळे लागण झालेल्या झाडाची एखादी फांदी किंवा संपूर्ण झाडावरील फांद्या शेंड्याकडून पिवळ्या पडतात.

सविस्तर उपाय :

हा रोग बुरशी व खोड भुंगेरे यांच्यामुळे झाल्याची लक्षणे दिसताच क्लोरपायरीफॉस २०ई. सी. (२. ५ ते ४ मि. ली. /लि. )+कार्बेन्डाझीम ५० डब्लू पी. (२ग्रॅम. /लि. ) किंवा प्रोपिकोण्याझोल २५ ई. सी. (२मि. ली. /लि) या औषधाचे ५ ते ८ लिटर द्रावण झाडाच्या बुंध्याजवळच्या भागात चोहोबाजूंनी माती ओली होईल इतपत ओतावे. प्रादुर्भाव ग्रस्त झाडाच्या सभोवतालच्या भागात तसेच निरोगी झाडाभोवती १५ ते २० दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळेस अशा प्रकारचे ड्रेचिंग करावे.
खोड पोखरणारी आळी व खोड भुंगेर्याचा प्रादुर्भाव दिसून आल्यास माती /काव /गेरू (४ किलो )+लिंडेन (२५ग्रॅम) + क्लोरोपायरीफॉय २० इ. सी. (२०मि ली )+कॉपरऑक्साईड (२५ग्रॅम ) यांच्या मिश्रणाची १० लिटर पाण्यामध्ये पेस्ट बनवून खोडला जमिनीपासून १ते २फुट वरपर्यंत लावावी.
खोड पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास छिद्रातील भुसा सुईने बाहेर काढावा आणि प्रत्येक छिद्रात २ ते ३ मिली डी. डी. व्ही. पी. चे द्रावण (५मिली /१०ली)सोडून छिद्र लगेचच चिखलाने बंद करावे.
मार रोग जर सुत्रकृमिमुळे झाला असेल तर झाडाच्या अळ्यातील माती गोलाकार उकरून त्यात फोरेट १०जी (१० ते २०ग्रॅम. /झाड )किंवा कार्बोफ्युरोन ३जी (२० ते ४० ग्रॅम. /झाड )टाकावे व पुन्हा मातीने झाकून घ्यावे तसेच दोन झाडांमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत किंवा प्रत्येक झाडांच्या बुंध्याभोवती आफ्रिकन झेंडूची लागवड करावी. यामुळे सुत्रकृमिंची संख्या कमी होण्यास मदत होते. जर झेंडूची झाडे ४-५महिने तशीच राहू दिली तर त्याचा सुत्रकृमी नियंत्रणासाठी चांगला उपयोग होतो.
मर रोगाची लक्षणे दिसताचक्षणी लागण झालेले झाड आणि निरोगी झाड यामध्ये ३-४ फुट लांबीची चर खोदल्यास त्याचा इतत्र होणारा प्रसार रोखण्यास मदत होते. बागेमध्ये मर रोगग्रस्त झाडे आढळल्यास ती तोडून शेताच्या बाहेर खड्ड्यामध्ये जाळावीत.
छाटणी करावयाची अवजारे निर्जंतुक करावी. छाटणी पावसाळा ते उन्हाळा या कालावधीमध्ये टाळावी व नेहमी हिवाळ्यामध्ये करावी. प्रादुर्भाव व निरोगी झाडांवर आंतरप्रवाही बुरशी नाशकांची फवारणी करावी.

३) फळावरील बुरशीजन्य ठिपके आणि फळकुज

फळाच्या सालीवर वेगवेगळ्या आकाराचे व रंगाचे ठिपके आणि पाकळी किंवा देठांच्या टोकाकडून फळे कुजलेली आढळतात.

सर्कोस्पोरा


अन्थ्रॕक्नोज


स्कॕब


कोलेट्रोट्रायकम


आल्टरनेरीया


अस्पेर्जेलिअस


पेनिसिलिअम


फायटोप्थोरा करपा

सविस्तर उपाय :-

मृग बहारामध्ये या बुरशीच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होते म्हणून हस्त अथवा आंबे बहर घेणे अधिक सोयीस्कर ठरते.

बागेच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी नियमितपणे कीड व्यवस्थापन व स्वच्छतेमुळे (जुनी फळे, कोमेजलेल्या /वाळलेल्या फांद्या काढून टाकणे )रोगाचे प्रमाण कमी करता येते.

फळ तोडणीनंतर जर बागेकडे दुर्लक्ष केले तर बुरशीच्या बिजानुंचा संचय बागेमध्ये व प्रसार संभवतो. फळांची काढणी पश्चात हाताळणी करताना फळांना इजा होऊ नये याची काळजी घ्यावी कारण अशा जखमांमधून फळकुजसाठी कारणीभूत असणाऱ्या बुरशीची लागण होते. म्हणून बोर्डेक्स १% आणि कॉपर च्या फवारण्या विश्रांती कालावधीमध्ये पण नियमित कराव्यात.
खालील पैकी कोणत्या बुरशी नाशकाची फवारणी करावी :-
क्लोरोथ्यालोनिल ७५% डब्लू. पी. (ग्रॅ. लि),थायोफेनेट मिथिल ७०% डब्लू. पी. (१. ५ ग्रॅ. /लि ),कार्बेन्डाझीम (१. २ग्रॅ. /लि ), म्यान्कोझेब ७५% डब्लू. (पि. २ग्रॅम. /लि ),कॅप्टन ५०%डब्लू. पी. (२ ग्रॅ. /लि)बेनोमील (०. ५-१ ग्रॅ. /लि), सल्फर ८०% डब्लू. पी. (२. ५ ग्रॅ./लि ), आणि बोर्डेक्स मिश्रण (१%). फवारण्याची सुरुवात फुले येण्याच्या अगोदर किंवा फुले आल्यावर आणि त्यानंतर १० ते १५ दिवसांच्या अंतराने हवामानाच्या अंदाजानुसार आणि बुरशी नाशकाच्या प्रकारानुसार कराव्यात.

४) फुलकिडे

फुल किड्याच्या प्रादुर्भावामुळे झाडांची कोवळी पाने वेडेवाकडे व गुंडाळलेले आढळतात. तसेच फळांवर ओरखड ल्या सारखे व गंजल्यासारखे खडबडीत चट्टे पडतात .
सविस्तर उपाय :-
प्रादुर्भाची लक्षणे दिसताचक्षणी थायोमिथोक्झाम २५ डब्लू. जी (०. ३ ग्रॅम/लि )किंवा असेटामिप्रीड ७५ एस. पी. (१ग्रॅम/लि) चि फवारणी पालवी ते फळ तोडणीपर्यंतच्या कालावधी मध्ये करावी .
प्रादुर्भाव झालेली कोवळी पाने नेहमी नष्ट करावीत.
फुलकिडे मिरची, कांदा, लसुन, व टोमाटो या पिकांवर देखील उपजीविका करत असल्यामुळे डाळींबामध्ये यासारखी आंतरपिके घेऊ नयेत.

५) फळे पोखरणारी अळी

कळी,फुले व फळांवर छिद्रे दिसताक्षणी करावयाचे उपाय

सविस्तर उपाय :
फुल धारणा ते फळ काढणीपर्यंतच्या कालावधीमध्ये डेल्टामेथ्रीन २. ८ ई . सी. (१. ५ मि. ली. /लि )किंवा मिथोमिल ४० एस. पी. (१ ग्रा./लि. )किंवा अझाडीरक्तीन १५०० पी . पी . एम (३मि. ली. /लि .) ची फवारणी १५ दिवसाच्या अंतराने करावी.
प्रादुर्भावग्रस्त फळे, फुले व कळ्या जमा करून नष्ट कराव्यात
हि कीड पेरू, चिकू, आवळा आणि चिंच या फळांवर देखील उपजीविका करत असल्याने डाळींबामध्ये या सारखी आंतरपिके घेऊ नयेत.
जर डाळींबाची बाग १-२ हेक्टर असल्यास फळांना बटर पेपरणे झाकून घ्यावे त्यामुळे फळ पोखरणाऱ्या अळी पासून संरक्षण मिळते.

६) डाळींबामधील रस शोषणार पतंग आणि त्याचे व्यवस्थापन

तीव्रता - डाळींबामध्ये आढळणारे रस शोशाणारा पतंग हा ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीमध्ये सक्रिय होऊन मृग बहारमधील फळांचे मोठे नुकसान करतात.

अ) ओर्थेइस म्यार्तेना - या जातीच्या पतंगाचे शरीर हे नारंगी रंगाचे असून नर आणि मादी पतंगामध्ये पाठीमागच्या पंखावर काळा ठिपका आढळतो.
ब ) अर्थेइस फुलोनिआ - या पतंगाचे शरीर नारंगी रंगाच्या खवल्यांनी आच्छादलेले असते आणि नर व मादी या दोहोंमध्ये पाठीमागील पंखावर इंग्रजी उलट "c "अक्षराचे ठिपके असतात.
क ) आर्थेइस होनोईना - या जातीच्या पतंगाचे शरीर नारंगी रंगाचे असून पुढील पंखावर पोपटी रंगाचे पट्टे असतात. नर आणि मादीमध्ये पाठीमागील पंखावर इंग्रजीतील "c " आकाराचे ठिपके असतात.
ड ) अचइआ जनाटा - या पतंगाचे पुढील पंख हे तपकिरी -करड्या रंगाचे असतात. तर पाठीमागील करड्या रंगाच्या पंखावर टोकाकडील बाजूस चमकदार पांढऱ्या रंगाच्या खुणा आढळतात.

नुकसानाची पद्धत -

या पतंगाची सोंड हि फळाच्या सालीला छिद्र पडण्याइतपत मजबूत असते. रात्रीच्यावेळी नर आणि मादी दोन्ही पतंग फळांना छिद्रे पाडून नुकसान करतात. अशा छिद्रामधून विविध प्रकारच्या बुरशी व जीवाणूचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे अशा छिद्रामधून रस बाहेर पडताना दिसतो. अशा प्रकारे कालांतराने बुरशी व जीवाणूच्या प्रादुर्भावाने फळ सडन्यास सुरुवात होऊन अशी फळी नंतर गळून पडतात.

उपाय :

फळ शोषनारा पतंग हा ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यांमध्ये सक्रीय होत असल्याने ज्या भागांमध्ये याचा प्रादुर्भाव आढळून आलेला असल्यास त्या भागांमध्ये मृग बहार घेणे टाळावे.
या पतंगाचे पोषण करणाऱ्या इतर वनस्पती टिनोस्पोरा स्पेसीज, घाणेरी, एरंडी इ . वनस्पती बागेच्या परिसरातून नष्ट कराव्यात.
प्रादुर्भावग्रस्त फळे तोडू नयेत कारण अशा फळाकडे पतंग परत आकर्षिला जात असल्याने चांगल्या फळांचे संरक्षण होण्यास मदत होते.
बटर पेपर, वर्तमान पत्र तसेच पॉलिमर पिशव्या यांच्या आच्छादनानेफळे झाकून टाकावीत.
रात्रीच्या वेळी प्रखर झोताच्या विजेच्या (टोर्च) साहय्याने पतंगाना पकडून जाळून टाकावे.
विषारी आमिष बनवण्याकरिता ९५% मळी किंवा काकवी आणि ५% म्यालाथिओन ५० ई . सी . चा वापर करावा. अशी आमिषे रात्रीच्या वेळी सी एफ एल दिव्याखाली मातीच्या मोठ्या पसरट भांड्यामध्ये ठेवावी. त्यामुळे प्रकाशाकडे पतंग आकर्षिले जाऊन विषारी अमिषामध्ये पडून मरतात.
उत्तर लिहिले · 23/9/2018
कर्म · 9150
0

मला निश्चितपणे सांगता येत नाही की डाळिंबावर फवारणीसाठी वापरले जाणारे कोणते ऍसिड तुमच्या त्वचेला जळजळ निर्माण करते.

तथापि, खाली काही सामान्य ऍसिड दिले आहेत जे त्वचेला जळजळ निर्माण करू शकतात:

  • सल्फ्यूरिक ऍसिड (Sulfuric acid): हे ऍसिड तीव्र संक्षारक आहे आणि त्वचेच्या गंभीर रासायनिक जळजळीस कारणीभूत ठरू शकते. https://en.wikipedia.org/wiki/Sulfuric_acid
  • नायट्रिक ऍसिड (Nitric acid): हे ऍसिड देखील संक्षारक आहे आणि त्वचेला तसेच डोळ्याला गंभीर नुकसान पोहोचवू शकते. https://en.wikipedia.org/wiki/Nitric_acid
  • हाइड्रोक्लोरिक ऍसिड (Hydrochloric acid): हे ऍसिड त्वचेला आणि डोळ्यांना त्रास देऊ शकते. https://en.wikipedia.org/wiki/Hydrochloric_acid
  • फॉस्फोरिक ऍसिड (Phosphoric acid): हे ऍसिड देखील त्वचेला त्रास देऊ शकते. https://en.wikipedia.org/wiki/Phosphoric_acid

ऍसिडमुळे त्वचेला जळजळ झाल्यास, खालील उपाय करा:

  • त्वरित ऍसिडच्या संपर्कात आलेला भाग थंड पाण्याने 10-20 मिनिटे धुवा.
  • जळलेल्या भागावर sterile पट्टी बांधा.
  • तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

इतर माहिती:

डाळिंबावरील ऍसिड फवारणीच्या धोक्यांविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी, आपण कृषी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5120

Related Questions

भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व सविस्तर स्पष्ट करा?
माझी एनजीओ (NGO) संस्था आहे, मला कृषी विभागात प्रशिक्षण घ्यायचे आहे, काय करावे?
सेंद्रिय खतावर आधारित उपक्रम?
सेंद्रिय खत महत्त्व लागणारे घटक बनवण्याच्या पद्धती उपक्रम?
सेंद्रिय खत प्रकल्प माहिती?
मसाला पिकांचे महत्त्व सांगून हळद या पिकाविषयी खालील मुद्द्यांवर माहिती लिहा.
बीज उत्पादन तंत्रज्ञान?