देव रूढी परंपरा धार्मिक विधी धर्म

गणेशाला दुर्वा का वाहतात?

3 उत्तरे
3 answers

गणेशाला दुर्वा का वाहतात?

2
*_🤔जाणून घ्या का वाहतात गणपतीला दुर्वा?_*

गणेशोत्सव:गणपती बाप्पा का बसवतात?

https://www.uttar.co/question/5b9b4b01d023b908281aa2cd

_गणांचा अधिपती म्हणजे गणपती. हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक शुभकार्याच्या सुरुवातीला गणपती बाप्पाची पूजा करतात. गणपती विघ्नहर्ता आहे. त्यामुळे अनेक जण त्याची मनोभावाने पूजा करतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळामध्ये त्याचा थाट पाहायलाच नको. २१ पत्री, २१ दुर्वा, विविध फळे आणि नैवेद्याचं ताट असं सारं काही गणपतीच्या आवडीचं या दिवसांमध्ये केलं जातं. विशेष म्हणजे गणपतीला दुर्वा प्रिय असल्यामुळे प्रत्येक पूजेमध्ये दुर्वा या हमखास असतात. मात्र गणपतीला २१ दुर्वांचीच जुडी का अर्पण करतात हे जाणून घेऊयात_

*_📣पाहा यामागची आख्यायिका_*
गणपतीच्या डोक्यावर दुर्वा वाहतात यामागे एक आख्यायिका आहे. ऋषी मुनी आणि देवता यांना अनलासूर नावाच्या राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली होती. अनल अर्थात अग्नी. देवतांच्या विनंतीनंतर गणपतीने त्या असूराला गिळून टाकले. यामुळे गणपतीच्या पोटात जळजळ होऊ लागली. तेव्हा ८८ सहस्त्र मुनींनी प्रत्येकी २१ अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या. आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या २१ जुडी गणेशाला खाण्यास दिली. त्यावेली अथक प्रयत्नानंतरही गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली.त्यावेळी, यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल, असे गणराय म्हणाला होता. म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात.

*_📍दुर्वा ही एक औषधी वनस्पती आहे. पोटात जळजळ आणि इतर विकारांसाठी दुर्वा औषधी आहे. मानसिक शांतीसाठीही दुर्वा लाभकारक आहे. कर्करोगाच्या रुग्णांवरही दुर्वा लाभप्रद असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे._*
उत्तर लिहिले · 2/9/2019
कर्म · 569245
2

हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा केली जाते. विघ्नहर्ता गणपतीला दुर्वा खूप प्रिय असल्यामुळे त्यांना दुर्वांची जुडी वाहतात. यामुळे गणपती प्रसन्न होतो असे म्हणतात. गणपतीचे पूजन करताना २१ दुर्वांच्या २१ जुड्या किंवा त्याचा हार गणपतीला अर्पण करावा. एका मान्यतेनुसार, विषम संख्येत गणपतीला दुर्वा वाहव्यात. जसे की, ३, ५, ७, ९ अशा दुर्वांची जुडी. अशा प्रकारे दुर्वा अर्पण केल्यास गणपती प्रसन्न होतो.

गणपतीच्या दुर्वा वाहतात यामागे एक कथा आहे-
एका पौराणिक कथेनुसार एकेकाळी यमाच्या दरबारात तिलोत्तमा नावाच्या अप्सरेचे नृत्य सुरू होतं. यमदेवाला ती अप्सरा खूप आवडली आणि त्याने मध्येच नृत्य थांबवून तिला आपल्या भावना बोलून दाखवल्या. परंतु मध्येच नृत्य थांबवल्याने अप्सरेच्या क्रोधातून एक राक्षस निर्माण झाला. अनलासूर असे त्या राक्षसाचे नाव होते आणि त्याच्या डोळ्यांतून अग्नीच्या ज्वाळा भडकत होत्या. तिलोत्तमाचे नृत्य मध्येच थांबवल्यामुळे आता मी तूला खाऊन टाकेन अशा त्याच्या बोल्यावरुन यमधर्म घाबरुन पळून गेला.

अनलासुराने तांडव करण्यास सुरु केला. त्याला समोर जे दिसेल ते खात सुटला. अशाने सर्व देव घाबरून विष्णूंना शरण गेले. परंतु अनलासुर तेथेही पोहचला आणि त्याला पाहिल्यावर विष्णूंनीही गणपतीचे स्मरण केले. गणपती बालक रूपात प्रकट झाले आणि स्मरण केल्याचे कारण विचारले. तेव्हा अनलासुराने देवांचे जगणे कठिण केल्याचे दिसून आले परंतु गजानन आपल्याजागी उभे राहिले. अनलासुर जेव्हा गणपतीकडे वळला आणि त्यांना गिळण्यासाठी आपल्या पंज्यांनी उचलू लागला तेच अनलासुराच्या हातातील बाल गणपतीने प्रचंड रूप धारण केले. आभाळापर्यंत भिडलेले विराट रुप बघून अनलासुराला काही सुचेल तोपर्यंत गजाननाने एक क्षणात अनलासुराला सोंडेत पकडले आणि गिळून घेतले.

अनलासुराला गिळल्यानंतर गणपतीच्या सर्व अंगाची आग होऊ लागली. गणपतीचा त्रास बघून समस्त देव, ऋषी, मुनी उपचार सुरू केले. परंतु कशाचाही उपयोग होईना. शेवटी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ८८ हजार ऋषीमुनींनी प्रत्येकी २१ दुर्वांची जुडी अशा दुर्वा त्याच्या मस्तकावर ठेवल्या आणि चमत्कार म्हणजे दुर्वांकुर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दाह शमला. तेव्हापासून गणपतीला दुर्वा प्रिय आहे आणि गणपती पूजनात दुर्वाचे अत्यंत महत्त्व आहे.

गजाननाने म्हटले की ज्या दुर्वांमुळे माझ्या अंगाचा दाह शमला, या दूर्वा मला अर्पण करणाऱ्या व्यक्‍तींची सर्व पापे नाहीसे होतील. व्यक्तीला बुद्धी, सिद्धी प्राप्त होईल.
उत्तर लिहिले · 8/9/2021
कर्म · 121765
0

गणेशाला दुर्वा का वाहतात याची काही कारणे खालीलप्रमाणे दिली आहेत:

  1. पौराणिक कथा:

    एका पौराणिक कथेनुसार, अनलासुर नावाच्या एका राक्षसाने स्वर्गात आणि पृथ्वीवर हाहाकार माजवला होता. त्या राक्षसाला शांत करण्यासाठी गणेशाने त्याला गिळले. त्यामुळे गणेशाच्या पोटात जळजळ होऊ लागली. अनेक उपायांनंतरही जळजळ थांबेना, तेव्हा कश्यप ऋषींनी २१ दुर्वा एकत्र करून गणेशाला खायला दिल्या. दुर्वा खाल्ल्यानंतर गणेशाच्या पोटातील जळजळ थांबली, त्यामुळे गणेशाला दुर्वा प्रिय आहेत. लोकमतमधील माहिती

  2. औषधी गुणधर्म:

    दुर्वामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदानुसार, दुर्वा शीतलता प्रदान करतात आणि शरीरातील उष्णता कमी करतात. गणेशाला दुर्वा अर्पण केल्याने ते शांत आणि प्रसन्न राहतात. Dr. Charulata Thakkar यांच्याकडील माहिती

  3. पवित्रता आणि शुद्धता:

    दुर्वा पवित्र मानली जाते आणि ती शुद्धतेचे प्रतीक आहे. गणेशाला दुर्वा अर्पण केल्याने वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

  4. समर्पणाचे प्रतीक:

    दुर्वा हे समर्पणाचे प्रतीक आहे. ती सहज उपलब्ध होते आणि ती अर्पण करणे हे देवाप्रती आपली श्रद्धा आणि भक्ती दर्शवते.

या कारणांमुळे गणेशाला दुर्वा वाहिल्या जातात.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2540

Related Questions

विड्याच्या पानांना देवपूजेत महत्त्व का आहे?
कुलदैवताच्या आरत्या कधी लावतात?
गणपती पाण्यात विसर्जित का करतात?
वटपौर्णिमेला वडाचे झाड आणि केवळ वडाची फांदी यांच्या पूजनातील भेद कोणता आहे?
पूजा किंवा विधी करताना देव तांदुळावरच का मांडतात?
पूजा झाल्यानंतर ब्राह्मणाला सर्व शिधा (सामान) का दिले जाते?
औक्षण का व कसे करावे? यामागे काय शास्त्र आहे?