Topic icon

धार्मिक विधी

1


का आहे विडयाच्या पानांना देवपूजेत महत्व 





कोणतेही शुभकार्य असो, सर्वात प्रथम विड्याचे पान हवेच असते. पूजा, लग्न, साखरपुडा किंवा अन्य कोणतेही शुभकार्य असेल तर अनेकदा ब्राह्मणाकडून विड्याची पानं आणा असे सांगितले जाते. आपल्या प्रत्येक कार्यात विड्याच्या पानाला खूप महत्त्व आहे. पूजा झाल्यावर गुरुजींना दक्षिणा देताना विड्याच्या पानावर दक्षिणा ठेवून दिली जाते. विड्याच्या पानाची वेल असते आणि ती सदाहरीत असते. याला नागवेल असंही म्हणतात. असे म्हणतात की, स्वतः शंभोमहादेवांनी आणि पार्वती मातेने नागवेल पेरली होती. पूर्वेकडील काही लोकगीतं असं सांगतात की, नागवेलीचं जन्मस्थान हिमालय आहे आणि कैलास पर्वत तर शंकर पार्वती यांचं निवासस्थान आहे.
नागवेलीची एक आख्यायिका सांगितली जाते. समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. त्यात शिल्‍लक राहिलेले अमृत मोहिनीने जवळ उभ्या असलेल्या नागराज नावांच्या हत्तींच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली. ही वेल नागाप्रमाणे खुंटावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली. हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले. भोजन झाल्यावर देव देवता या पानाचा विडा खाऊ लागले. त्यानंतर देवाला महानैवैद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा, दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली. आपल्याकडे देवीला तांबुलाचा नैवेद्य दाखवला जातो. नवरात्रात घराघरात तांबुल तयार केला जातो.
नागवेलीबद्दल आणखी एक आख्यायिका सांगितली जाते. प्राचीन काळी पृथ्वीवर विड्याचे पान नव्हते. पांडवांनी हस्तिनापुरात अश्वमेध यज्ञ केला तेव्हा त्यांना विड्याचे पान हवे होते. म्हणून पांडवांनी ते आणण्यासाठी आपल्या दूताला वसुकी नागाच्या राणीकडे पाठवले. तिने आपल्या करंगळीचा भाग कापून दिला. त्याने तो भाग पृथ्वीवर आणून जमिनीत पुरताच त्यातून नागवेल उगवली, तेव्हापासून विड्याच्या पानांना नागवेलीचे पान असे नाव पडले. विड्याचं पान हे ताजेपणाचे, टवटवीतपणाचे आणि भरभराटीचे चिन्ह मानले जाते. म्हणजे नागवेल सरसर वाढत जाते. ती वेल सदाहरित असते. म्हणून असाच तुमचा उत्कर्ष व्हावा आणि तो टिकून रहावा ही त्यातील भावना असते. विडा खाण्याची प्रथा भारतात दोन हजार वर्षांपासून चालत आलेली आहे. स्कंद पुराणात नागवेलीला अमृतोद्‍भव मानले आहे.
विड्याच्या पानाला तंबूल (संस्कृत), पक्कु (तेलगू ), वेट्टीलाई (तमिळ) नागवेल (मराठी) आणि नागुरवे(गुजराती) असे म्हणतात. नावे जरी वेगवेगळी असली तरी प्रत्येक कार्यात विड्याच्या पानाचा मोठा मान असतो. आपल्या पूजा साहित्यात दूर्वा, बेल, तुळस हे जितकं पवित्र आणि आवश्यक मानलं जातं तितकंच विड्याचं पानही पवित्र आणि आवश्यक मानतात. कुठलीही पूजा विड्याच्या पानाशिवाय मांडली जातच नाही. विड्याच्या पानात देवीदेवतांचा निवास असतो. टोकास लक्ष्मी, उजव्या बाजूस ब्रम्हदेव, मधोमध सरस्वती, डाव्या बाजूस पार्वतीमाता, लहान देठामध्ये महाविष्णू, मागील बाजूस चंद्रदेवता असते. तुम्ही पाहिले असेल, विड्याच्या पानाचे सेवन करताना खालचा भाग थोडासा काढून टाकतात. कारण विड्याच्या पानाखाली मृत्यूदेवतेचा वास असतो. तर विडयाच्या पानाच्या देठात अहंकार आणि दारिद्र्य लक्ष्मी राहते म्हणूनच पान सेवन करतांना देठ काढून देतात. जेवणानंतर पान खाणं ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. आयुर्वेदातही पान खाण्याचे फायदे नमुद करण्यात आले आहेत. अगदी आजीबाईच्या बटव्यातही या पानांचा आवर्जुन समावेश करण्यात येतो.
विडा ज्या कारणासाठी वापरला जातो त्यानुसार त्याला नावे आहेत. कोणतीही अवघड कामगिरी स्वीकारण्याचे आव्हान स्वीकारणे म्हणजे पानाचा विडा उचलणे. बाळंतपणात बाळंतणीला दिला जाणारा बाळंत विडा, पूजेत नैवेद्यानंतर अर्पण केला जाणारा गोविंद विडा, प्रणयाराधनेसाठी दिला जाणारा प्रेयसीचा विडा, जेवणानंतर खाल्ला जाणारा आयुर्वेदात सांगितलेला त्रयोदशगुणी विडा म्हणजेच गुणवंत विडा. या प्रत्येक विड्याचे गुण वेगवेगळे आहेत. विड्याच्या पानाला इतर धर्मातही फार महत्त्व आहे. बंगाली लोकांमध्ये लग्नामध्ये वधूच्या तोंडासमोर विड्याचे घेऊन मंडपात आणले जाते. तेलुगु, बिहारी, पंजाबी यांच्यात विड्याचे पान आणि सुपारी देऊन लग्नाची बोलणी करतात किंवा शुभकार्याला सुरुवात करतात. असे हे विड्याचे पान आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असे म्हणायला हवे.
उत्तर लिहिले · 29/1/2023
कर्म · 53720
0
कुलदैवताच्या आरत्या सहसा खालील वेळेत लावल्या जातात:
  • सकाळची पूजा: सकाळी देवाची पूजा केल्यानंतर आरती करतात.
  • संध्याकाळची पूजा: संध्याकाळी देवाची पूजा आणि प्रार्थना झाल्यावर आरती करतात.
  • विशेष दिवस: कुलदेवतेचे विशेष दिवस, जसे की aniversário (anniversary), उत्सव किंवा अन्य धार्मिक कार्यक्रम असल्यास आरती करतात.
  • नैवेद्य दाखवल्यावर: देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करतात.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1040
3
दहा दिवसानंतर, जेव्हा व्यासजींनी डोळे उघडले, तेव्हा गणपतीच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते, यामुळे महर्षी व्यासजींनी गणेशाचे शरीर थंड करण्यासाठी पाण्यात बुडवले, त्यानंतर त्यांचे शरीर शांत झाले. तेव्हापासून असे मानले जाते की त्यांना थंड करण्यासाठी गणेश विसर्जन केले जाते.
उत्तर लिहिले · 30/8/2022
कर्म · 1975
1
वटपौर्णिमेला वडाचे झाड आणि केवळ वडाची फांदी यांच्या पूजनातील भेद
वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाचे पूजन करणे
आणि वडाची फांदी घरी आणून तिचे पूजन करणे यांतील भेद
वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाचे मनोभावे पूजन करण्याचा प्रघात आहे. त्यामुळे पूजन करणार्‍या स्त्रीला आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो. हल्ली मात्र शहरासारख्या ठिकाणी वडाची फांदी घरी आणून तिचे पूजन करण्याची चुकीची प्रथा पडली आहे. वटवृक्षाचे पूजन करणे आणि वडाची फांदी घरी आणून तिचे पूजन करणे यांतील भेद खालील लेखातून समजून घेऊया.



 

१. वडाच्या झाडाचे पूजन करणे (सूक्ष्म-परीक्षण)

१. वडाच्या झाडात परमेश्वरी तत्त्व अगोदरच कार्यरत असणे

२. वटपूजन करतांना स्त्रीमध्ये भावाचे वलय निर्माण होणे

३. ईश्वराशी अनुसंधान होणे

४. पूजा सांगणार्‍या पुरोहिताच्या अनाहतचक्राच्या ठिकाणी मंत्रशक्तीचे वलय निर्माण होणे आणि त्याच्या मुखातून मंत्रशक्तीच्या प्रवाहाचे वातावरणात प्रक्षेपण होणे

५. झाडात परमेश्वराकडून निर्गुण तत्त्वात्मक प्रवाह आकृष्ट होणे

६. झाडात निर्गुण तत्त्वात्मक वलय निर्माण होणे

७. झाडात निर्गुण तत्त्वात्मक कण कार्यरत असणे

८. झाडात ईश्वराकडून आनंदाचा प्रवाह येणे

९. आनंदाचे वलय निर्माण होणे

१०. झाडात चैतन्याचा प्रवाह आकृष्ट होणे

११. झाडातून, तसेच त्याच्या पारंब्या आणि इतर भाग यांतून चैतन्याच्या प्रवाहांचे वातावरणात प्रक्षेपण होणे

१२. झाडात, तसेच वातावरणात चैतन्यकणांचे प्रक्षेपण होणे

१३. झाडातून पूजन करणार्‍या स्त्रीकडे चैतन्याच्या प्रवाहाचे प्रक्षेपण होणे

१४. स्त्रीमध्ये चैतन्याचे वलय निर्माण होणे

१५. ईश्वराकडून चैतन्यरूपी आशीर्वादाचा प्रवाह स्त्रीकडे आकृष्ट होणे

१६. स्त्रीच्या शरिरात शक्तीचे वलय निर्माण होणे

१७. तिच्या देहात शक्तीचे कण कार्यरत स्वरूपात फिरणे

१८. तिच्या देहाभोवती संरक्षककवच निर्माण होणे’

– 
 

२. घरी वडाची फांदी आणून तिचे पूजन
करण्यापेक्षा प्रत्यक्ष वडाच्या पूजेतून अधिक लाभ मिळणे

वडाची फांदी घरी आणून तिचे पूजन करणे आणि वडाच्या झाडाचे पूजन करणे
वडाच्या मूळ खोडामध्ये अधिक प्रमाणात शिवतत्त्व सामावलेले असल्याने प्रत्यक्ष झाडाची भावपूर्णरित्या पूजा करून ३० प्रतिशत, तर केवळ फांदीच्या पूजेने २ – ३ प्रतिशत एवढ्याच प्रमाणात लाभ मिळण्यास साहाय्य होते. मूळ, खोडविरहित झाडाची फांदी ही झाडाच्या मूळ चेतनेपासून विलग झाल्याने तिच्यामध्ये अचेतनत्व अधिक प्रमाणात असल्याने तिची चैतन्य ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमताही अतिशय नगण्य असते. फांदीतील अचेनत्वाचा परिणाम म्हणून तिची चैतन्य वहन करण्याची क्षमताही अतिशय नगण्य असल्याने घरी वडाची फांदी आणून पूजा करण्याने फारसा लाभ मिळत नाही. ज्या ठिकाणी नैसर्गिकता अधिक असते, त्या ठिकाणी चेतनेचे प्रमाणही अधिक असल्याने चैतन्याच्या फलप्राप्तीचे प्रमाणही अधिक असते. – ‘




३. स्त्रियांनी घरी वडाच्या झाडाच्या फांदीचे पूजन करणे (सूक्ष्म-परीक्षण)
झाडापासून त्याची फांदी वेगळी केल्यास ती निर्जीव बनणे
आणि त्यामुळे वडाच्या झाडाच्या फांदीच्या पूजनाचा फारसा लाभ न होणे
झाडापासून त्याची एखादी फांदी वेगळी केली असता तिच्यातील सजीव धारणा संपते आणि ती फांदी निर्जीव बनते. वटपौर्णिमेच्या दिवशी काही स्त्रिया बाजारातून वडाच्या झाडाची फांदी आणून तिचे पूजन करतात; परंतु स्त्रियांना त्याचा फारसा लाभ होत नाही. असे पूजन करणे, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा अवयव वेगळा करून तिच्या त्या अवयवाचा वापर करणे होय.

१. वडाच्या झाडाच्या फांदीत तत्त्वस्वरूपात थोड्या प्रमाणात चैतन्य वलयस्वरूपात कार्यरत असणे

२. पूजन करणार्‍या सामान्य स्त्रीमध्ये भाव नसल्यामुळे कर्मकांड केल्याप्रमाणे केवळ करायची म्हणून कृती केल्याने तिच्यामध्ये भावनेचे वलय निर्माण होणे

३. वडाच्या झाडाच्या फांदीतील सजीवत्व संपल्यामुळे तिच्यात रज-तमप्रधान वलय निर्माण होणे

४. या वलयातून वातावरणात तमोगुणी प्रवाहांचे प्रक्षेपण होणे

५. वातावरणात तमोगुणी कणांचे प्रक्षेपण होणे

६. फांदीतील रज-तमप्रधान वलयातून पूजन करणार्‍या स्त्रीच्या दिशेने तमोगुणी प्रवाहाचे प्रक्षेपण होणे

७. स्त्रीमध्ये रज-तमप्रधान वलय निर्माण होणे

८. फांदीच्या वाळणार्‍या पानांवर वायूमंडलातील वाईट शक्तींनी आक्रमण करणे

व्यक्तीला स्वतःच्या सोयीनुसार देव हवा असतो; पण ते शक्य नाही. त्यामुळे अशा प्रकारे पूजन करून कोणाला फारसा लाभ होत नाही.

– 
 

४. कागदावर वडाचे चित्र काढून त्याची पूजा
करण्यापेक्षा प्रत्यक्ष वडाच्या पूजेतून अधिक लाभ मिळणे
कागदावर वडाचे चित्र काढून त्याची पूजा करून इष्ट चैतन्याची फलप्राप्ती करण्यासाठी पूजकाची पातळी ५० प्रतिशतच्या पुढे हवी, तरच पूजकाच्या अव्यक्त भावाच्या प्रमाणात चित्राला देवत्व प्राप्त होऊन पूजकाला चैतन्य प्राप्त होते, अन्यथा नाही. नाहीतर याचा सर्वसामान्य जिवाला १-२ प्रतिशत एवढ्या प्रमाणातच लाभ मिळण्यास साहाय्य होते.
– ‘
उत्तर लिहिले · 13/6/2022
कर्म · 53720
0





तांदुळाला पूर्ण अन्न गृहित धरले जात.

तांदूळ हा अन्नातील महत्त्वाचा घटक आहे.

कुंकुमाने रंगविलेले शुभ्र तांदूळ म्हणजेच अक्षता.

अक्षतेतले धान्य सुपीकपणाचे प्रतीक समजले जाते. कोणताही पदार्थ वापरत असताना त्याची उपलब्धता हे पण एक कारण असते. तांदूळ आपणास सहज उपलब्ध होतात.

अखंड तांदळाचे दाणे घे‌ऊन त्यांस तेल व कुंकू किंवा हळद लावून सावलीत वाळवून तयार करण्यात येतात त्या अक्षता, किंवा अक्षदा. यांचा रंग हळदकुंकू लावल्यामुळे पिवळा वा लाल होतो.

भात खाल्ल्याशिवाय काही लोकांचे जेवण पूर्ण होत नाही. तसेच कोणत्याही कार्यात अक्षतांशिवाय ती पूजा पुर्णत्वास पोहोचत नाही.

अक्षता ह्या अखंड तांदुळाच्या असतात.

अगोदर गव्हाचा पण वापर होत असे. पण गहू वापरल्यावर काही तांत्रिक अडचणी येत होत्या जसे की फोटो हलणे, मूर्ती हलणे. त्यामुळे गव्हापेक्षा तांदूळ उत्तम.

आंध्र प्रदेश मध्ये काही ठिकाणी विविध डाळी पण वापरतात.

तांदुळाच्या रंग पांढरा असल्यामुळे तांदळाला हळद लावून पिवळसर रंग करणे, कुंकू लावून लालसर रंग व खाण्याचे विविध रंग वापर करून विविध रंगांचे तांदूळ तयार करता येतात. यामुळे पूजा विधी ही आकर्षक होते . पूजा विधी ही आकर्षक झाल्यामुळे मनाला प्रसन्न वाटते. पूजा मांडणी ही पण एक उत्तम कला आहे.

तांदुळाचे वैशिष्ट्य. रेल्वे ट्रॅक वर गीट्टी का टाकतात ?[1] . तोच वापर , तेच तत्त्व इथे तांदूळ वापरून पूजाविधीमध्ये केला जातो. तांदळावर देवाच्या प्रतिमा , मूर्ती , फोटो ठेवल्यावर त्या सहसा हलत सरकत नाहीत. किंचित नकळत धक्का जरी लागला तरी तांदुळ एकमेकात सरकून फोटो , मुर्ती , पडत नाही . पूजा विधी करत असताना फोटो , मूर्ती यांना जर धक्का लागला तर ….. आणि ते जर पडले तर …. आपल्याच मनाला अपशकुन वाटतो. हे टाळण्यासाठी तांदळाच्या एकात एक गच्च बसण्याच्या या गुणधर्माचा उत्तम उपयोग केला जातो.
उत्तर लिहिले · 30/5/2022
कर्म · 53720
1
पूजा झाल्यानंतर ब्राम्हणाला सामान नाही म्हणत तर त्याला शिधा म्हणतात तर हि शिधा देण्याच कारण असं की, ब्राह्मण आपल्या घरी पूजा मांडतात, ते मंत्र पठण करतात, आपल्याला सर्वांचा आशिर्वाद मिळावा म्हणून मंत्र पठण करतात, पुजा संपन्न झाली की आपण घरी भोजन करतो, ते भोजन सर्वच ब्राह्मण भोजन करत नाही म्हणून आपण भोजनाच जे सामान देतो ती शिधा देतो. शिधा देताना जेवणाच सामान देतो - तांदूळ, डाळ, बटाटा, भाजी, मसाला, खोबरं, गुळ आणि त्यात आपली दक्षिणा हि देतो. आपण जे सामान देतो त्याला ब्राह्मण भोजन म्हणतात.
उत्तर लिहिले · 2/5/2022
कर्म · 53720
4

हिंदू धर्मामध्ये औक्षण हे शुभ मानले जाते. लग्न कार्याच्या वेळी अथवा इतर शुभ प्रसंगी देवाची मूर्ती किंवा ज्यांचे मंगलकार्य असेल त्यास त्यांच्या चेहऱ्याभोवती सुवासिनीने ओवाळण्यासाठी घेतलेले दिपादियुक्त ताम्हन तसेच सदर ताम्हन ओवाळण्याच्या क्रियेला औक्षण असे म्हणतात.औक्षण शब्दाचा आध्यात्मिक अर्थ

औक्षण म्हणजेच दिव्याच्या प्रकाशाच्या साहाय्य कार्यरत असलेल्या विश्वातील देवतांच्या लहरींच्य आगमनाच्या क्षणाचे स्वागत करावे आणि तो क्ष लक्षात घेऊन त्या लहरींचा आश्रय घ्यावा.

औक्षणाचे महत्त्व

औक्षण करताना दिव्याच्या साहाय्याने उत्सर्जित होणाऱ्या किंवा प्राप्त झालेल्या लहरी आरती करणाऱ्या व्यक्तीच्या शरीराभोवती फिरणारे संरक्षक कवच तयार करतात.

औक्षण कुणाचे आणि कुठे करतात

औक्षण करणे किंवा ओवाळणे, हा हिंदु धर्मात सांगितलेला छोटासा विधी आहे.

वाढदिवस, परदेशगमन, परीक्षेतील यश, युद्धात विजयी होणे अशा शुभप्रसंगी त्या त्या व्यक्तीला ओवाळून शुभेच्छा देण्याची ही पद्धत आहे. तसेच मुले, सुसंस्कृत व्यक्ती, स्वागत मूर्ती, युद्धासाठी बाहेर पडलेले सैनिक, राजे, संत यांचे औक्षण केले जाते. सामान्यतः घरातील मंदिरात एखाद्या व्यक्तीला देवतेसमोर बसवून औक्षण के जाते. विशेष कार्य (उदा. यज्ञोपवीत संस्कार,

विवाह इ.) असल्यास त्या कार्यस्थळी औक्षण के जातं.उबंरठ्यावर औक्षण करु नये

दारात उभे राहून, सजीवांना या रज-तम सकारात्मक लहरींनी आकारलेल्या क्षेत्राचा त्रास होतो. या त्रासदायक लहरींचा एक समूह आत्म्याभोवती तयार होतो. त्यांचा प्रभाव जीवाच्या मनोमय कोशावर पडतो आणि तेथे रज-तम कणांचे बळ वाढल्याने जीवात चिडचिडेपणा निर्माण होतो. या कारणास्तव दारात औक्षण करणे हिंदू धर्माला मान्य नाही.

औक्षणासाठी आवश्यक साहित्य हळद-कुंकु, तुपाचे किंवा तेलाचे निरांजन, सुपारी,

सुवर्णमुद्रा, अक्षता, आणि कापूस अशा गोष्टीनी औक्षण केले जाते.

या प्रत्येक गोष्टीं मागे काही ना काही गर्भीतार्थ आहे.

औक्षणाच्या ताटात हळद आणि कुंकुम आपल्या डाव्या बाजूला कोणत्याही कामाला शक्ती देणाऱ्या शक्तीचे प्रतीक म्हणून ठेवा. हळदी-कुंकुममधून निघणाऱ्या सूक्ष्म-सुगंधाकडे, ब्रह्मांडात अस्तित्वात असलेल्या देवतांचे शुद्धतावादी त्वरीत आकर्षित होतात.

साजूक तुपाचा दिवा म्हणजे धनलक्ष्मी, प्रकाश याचा अर्थ म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्यातीलअंध:कार नाहीसा होऊन प्रकाश आणि समृद्धी यावी. अगोदर निरांजनाने त्याला ओवाळायचे.

अंगठी आणि सुपारी हे प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या शिवाचे ( पुरुषतत्त्वाचे) प्रतीक म्हणून आपल्या उजव्या बाजूला ठेवावे. सोन्याने ओवाळण्याचा अर्थ सोन्या सारखे निष्कलंक आणि झळझळीत आयुष्य त्याला लाभावे हा होय.

सुपारी सारखे टणक आणि अविनाशी आयुष्य लाभावे म्हणून सुपारीने औक्षण करावे. सुपारी उजव्या बाजूला ठेवा.

अक्षता या सर्वसमावेशक असल्याने त्यांना मध्यभागी, म्हणजेच तबकाच्या केंद्रबिंदूच्या ठिकाणी स्थान द्यावे.

अक्षता या शब्दाचा अर्थ अविनाशी असा असल्याने तबकातील अक्षता कपाळी लावून डोक्यावर टाकतात.

तर सर्वात शेवटी कापूस ओवाळून डोक्यावर ठेवायचा आणि म्हणायचे कापसासारखा म्हातारा हो.

अक्षतांच्या थोडेसे पुढे, परंतु मध्यभागी दीपाला स्थान द्यावे. दीप हा जिवाच्या आत्मशक्तीच्या बळावर कार्यरत होणाऱ्या सुषुम्नानाडीचे प्रतीक आहे.आह.

अशा प्रकारे तबकातील घटकांची योग्य मांडणी केल्याने जिवाला देवतेच्या तत्त्वाचा अधिक लाभ मिळतो.

औक्षण करण्याची योग्य पद्धत

एका पाटाभोवती रांगोळी काढा. ज्याचे औक्षण करायचे आहे त्याला पाटावर बसवा.

सुसंस्कृत व्यक्तीच्या कपाळावर मधल्या बोटाने ओलं कुंकुं लावून त्यावर अक्षत लावाव्या.

निरंजनाचं ताट उचलून त्यातील अंगठी (किंवा सोन्याचे कोणतेही दागिने) आणि सुपारी घ्या त्या व्यक्तीच्या चेहऱ्याभोवती फिरवा.

सर्वप्रथम व्यक्तीच्या आदेशाच्या ठिकाणी अंगठी आणि सुपारीला एकत्र स्पर्श करा.

व्यक्तीच्या उजव्या खांद्यापासून (घड्याळाच्या काट्याच्या दिशेने) अंगठी आणि सुपारी घेऊन डाव्या खांद्यापर्यंत या. तसेच विरुद्ध दिशेकडून आरती करताना उजव्या खांद्यावर यावे. हे तीन वेळा करा. प्रत्येक वेळी ताटासोबत अंगठी आणि सुपारीला स्पर्श करा.

आरतीच्या ताटातून व्यक्तीची आरती काढा. व्यक्तीला मिठाई खायला द्या.

त्याच्यासाठी प्रार्थना करा.

अक्षता खाली ठेवून त्यावर आरतीचे ताट ठेवा.
उत्तर लिहिले · 1/4/2022
कर्म · 121765