औषधे आणि आरोग्य आरोग्य व उपाय रोग व उपचार आरोग्य

मला खूप ताप आला आहे आणि सर्व शरीर तापले आहे. हॉस्पिटलमधून इंजेक्शन घेतले आहे, पण फरक पडत नाही.

2 उत्तरे
2 answers

मला खूप ताप आला आहे आणि सर्व शरीर तापले आहे. हॉस्पिटलमधून इंजेक्शन घेतले आहे, पण फरक पडत नाही.

16
*Viral Fever दूर करण्यासाठी घरगुती उपाय*_

_वातावरणात बदल झाल्याने बऱ्याच जणांना त्रास होत असतो. तापमानाची चढ-उतार होत असल्याने शरीराची इम्यून सिस्टीम कमजोर होते. ताप, डोळ्यांमध्ये जळजळ, डोकेदुखी, अंगदुखी, घशात वेदना, खोकला, थकवा, सांधेदुखी, उलटी, पोटाची समस्या अश्या प्रकारचा त्रास बऱ्याचजणांना सहन करावा लागतो. व्हायरल इन्फेक्शनला अधिक प्रमाणात तापाचं नावं दिलं जातं. हे दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय केला जाऊ शकतात._

▪ *लसूण*
लसणाचे अनेक फायदे असतात. लसणामध्ये असे काही तत्व असतात जे वायरल तापाचा प्रभाव कमी करतं. याचा वापर करण्यासाठी ३ ते ४ लसणाचे तुकडे गरम पाण्यामध्ये उकळा. थंड झाल्यावर हे पाणी प्यावे आणि सोबतच लसणाचे तुकडेही खावे.

▪ *कोंथिबीर किंवा धने*
कोथिंबीर अनेक प्रकारचे वायरल इन्फेक्शन दूर करण्यासाठी मदत करतं. वायरल ताप आल्या धन्यांचं सेवन केल्यास वायरल ताप दूर होतो.

▪ *आलं*
आलं हे अंगदुखी आणि सांधेदुखी दूर करण्यासाठी मदत करतं. त्यामुळे वायरल ताप असेल तर याने तुम्हाला आराम मिळू शकतो. यासाठी आल्याच्या पेस्टमध्ये थोडं मध मिश्रित करुन थोड्या थोड्या वेळाने सेवन करा याने तुम्हाला आराम मिळेल.

▪ *मेथी*
मेथी सुद्धा वायरल ताप कमी करण्यास मदत करते. यासाठी मेथीचे दाणे एक ग्लास पाण्यात टाकून रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी गाळून प्यावे. या पाण्याचं सेवन प्रत्येक २ तासांनी करणे फायद्याचं ठरेल.

▪ *लिंबू आणि मध*
लिंबू आणि मधाच्या सेवनामुळे वायरल ताप कमी होण्यास मदत मिळते. दोन्ही एकत्र करुन याचं सेवन केल्यास वायरल ताप लवकर कमी होऊ शकतो.

*महत्वाचे :* जर वातावरण बदलामुळे तुम्ही वायरल तापाच्या कचाट्यात आले असाल आणि त्यावर उपाय म्हणून वरील गोष्टी वापरत असाल तर आधी एक्सपर्ट किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण या सर्व नैसर्गिक गोष्टी आहेत आणि याच्या सेवनाने कुणाला अॅलर्जी असेल तर अडचण वाढू शकते.
 एक भांडे/पातेलं घेऊन त्यामध्ये थोडेसे मोठे/खडा मीठ घेऊन पाण्यात टाका व त्यामध्ये सुती कापडाच्या 2 ते 3 पट्ट्या बनवा.एक एक पट्टी घेऊन कपाळावर ठेवा 2-3 मिनिटांनी ती पट्टी त्या पाण्यात टाका व दुसरी पट्टी घ्या.असे करत रहा.सकाळ संध्याकाळी 2-3 दिवसापर्यंत करा.जर लवकरच आराम मिळालं तर ही क्रिया सोडून द्या. जर मोठे मीठ नसेल तर बारीक मीठ चालेल.व तुम्ही स्वतः करण्यापेक्षा एखाद्या घरातील स्त्री(आई,बहीण,बायको)ला करण्यास लावा.
उत्तर लिहिले · 14/9/2018
कर्म · 569245
0
मला तुमच्या त्रासाबद्दल ऐकून वाईट वाटले. ताप येणे आणि इंजेक्शन घेऊनही फरक न पडणे हे निश्चितच चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही काही गोष्टी करू शकता:

1. डॉक्टरांचा सल्ला घ्या:

  • लगेच तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि त्यांना तुमच्या लक्षणांबद्दल सांगा.
  • तुम्ही घेतलेल्या इंजेक्शनबद्दल आणि इतर औषधांबद्दल त्यांना माहिती द्या.
  • डॉक्टर तुम्हाला काही चाचण्या करण्याचा सल्ला देऊ शकतात, ज्यामुळे तापाचे कारण समजेल.

2. आराम करा:

  • जास्तीत जास्त आराम करा.
  • शरीराला पुरेसा वेळ द्या जेणेकरून ते लवकर बरे होईल.

3. भरपूर पाणी प्या:

  • शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये म्हणून भरपूर पाणी प्या.
  • तुम्ही लिंबू पाणी, नारळ पाणी किंवा फळांचे रस देखील घेऊ शकता.

4. थंड पाण्याने अंग पुसा:

  • जर ताप खूप जास्त असेल, तर थंड पाण्याने अंग पुसा.
  • त्याने शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होईल.

5. योग्य आहार घ्या:

  • हलका आणि पौष्टिक आहार घ्या.
  • पचनास जड असलेले पदार्थ टाळा.
  • ताजे फळे आणि भाज्या खा.

6. घरगुती उपाय:

  • तुम्ही काही घरगुती उपाय देखील करू शकता, जसे की:
  • तुळशीची पाने आणि मध यांचे मिश्रण घ्या.
  • आले आणि मध यांचे मिश्रण घ्या.
  • हळदीचे दूध प्या.

7. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घ्या:

  • डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमितपणे आणि वेळेवर घ्या.
  • कोणतेही औषध स्वतःहून घेणे टाळा.

8. खालील लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा:

  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • छातीत दुखणे
  • severe डोकेदुखी
  • neck मान Stiff होणे
  • फिट येणे
  • consciousness level कमी होणे

Disclaimer: हा सल्ला केवळ माहितीसाठी आहे. कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1420

Related Questions

कावीळ मध्ये गळ्यात जी दोरी घालतात ती का मोठी होते?
वेस्ट नाइल व्हायरस (West Nile virus) म्हणजे काय? लक्षणे व कारणे?
जलोदर (जलोदर) रोग झालेल्या माणसाला गाढवाची लघवी पाजल्याने रोग बरा होतो का?
सर्दी हा आजार नेमका का होतो? शरीरातील गर्मी वाढल्यामुळे होतो का?
उन्हात संरक्षण कसे करावे आणि चक्कर का येतात?
माझी बहीण गर्भवती असून तिला पांढरी कावीळ आहे, त्यासाठी काय करावे?
माझ्या गाईला आसाड्या रोग (शेपटीच्या खाली जखम होऊन त्यात किडे झाले) झाला आहे, त्यासाठी उपाय सुचवा?