
रोग व उपचार
क्लिनिकमध्ये पिवळेजर्द डोळे घेऊन आलेली एक मुलगी उलटय़ा करून बेजार झाली होती. कावीळ झाल्याचे समजताच तिने झाडपाल्याचे- गावठी औषध घेतले होते व त्यानंतर उलटय़ा वाढल्या म्हणून हैराण झाली होती. हिपेटायटिस ए तसंच ई या प्रकारची कावीळ झालेले रुग्ण असे असतात. याउलट नोकरीसाठी हेल्थ चेकअप करताना रक्तात थोडीशी कावीळ सापडली हे कारण घेऊन औषधासाठी येणारे रुग्ण हे हिपेटायटिस बी किंवा सीने ग्रासलेले असतात.
पावसाळा आला, पाणी गढूळ झाले की काविळीचे रुग्ण वाढू लागतात. एखादा सांडपाण्याचा पाइप व पिण्याचा पाण्याचा पाइप एकत्र येत असतील व तिथे काही चिरा पडून पाणी झिरपत असेल तर त्या भागात काविळीची साथ आढळून येते, हे आपण वर्तमानपत्रात वरचेवर वाचत असतो व हे नेहमीचेच आहे म्हणून तितक्याच लवकर मनातून झटकूनही टाकलेले असते. जोपर्यंत स्वत:ला किंवा जवळच्या एका नातेवाईकाला कावीळ होत नाही तोपर्यंत काविळीचे गांभीर्य कुणाच्या लक्षात येत नाही.
कावीळ झाली आहे किंवा होते आहे किंवा नुसता काविळीचा संशय जरी आला तरी लोक प्रथम धाव घेतात ती झाडपाल्याचं औषध देणाऱ्या माणसाकडे. मग तो पाल्याचा रस असो, खायच्या पानातून द्यायचे काही औषध असो, चुन्याच्या पाण्यात हात टाकून ते कावीळ उतरवून पिवळे करणे असो किंवा कुण्या हकिमाकडे जाऊन डोक्यावर काही झाडून घेऊन कावीळ उतरवणे असो. काहीही म्हणा पण आपल्या देशात काविळीवर अॅलोपथीमध्ये काहीही औषध नाही, हा समज वा गैरसमज बऱ्याच प्रमाणात घट्ट पाळमुळे रोवून बसलेला आहे.
आम जनतेची काविळीची ओळख ही अशी आहे. काही जण म्हणतात पोटातील कावीळ, सफेद कावीळ इ. काविळीचे प्रकार अथवा नांवे लोकांकडून ऐकायला मिळतात, त्याचा अर्थ ना त्यांना माहीत असतो, ना डॉक्टरला.
खरे सांगायचे तर कावीळ ही अनेक प्रकारची असते व कावीळ होण्याची कारणेदेखील अनेक असतात आणि या कारणांवरूनच काविळीवरती उपचारपद्धती ठरवली जाते.
लक्षणे :
कावीळ अर्थातच जॉण्डीस म्हणजेच डोळ्याचा पिवळेपणा. कावीळ म्हणजे डोळे, लघवी पिवळीजर्द होणे, भूक मंदावणे, अंग मोडून येणे, उलटय़ा होणे इ.
कावीळ होण्याची विविध कारणे :
१) जंतुसंसर्गामुळे होणारी कावीळ- ज्याला इनफेक्टिव्ह हेपेटायटिस (Infective Hepatitis) म्हटले जाते.
हिपेटायटिस = म्हणजे यकृताला आलेली सूज. जंतुसंसर्ग (Virus) – अतिसूक्ष्मजिवाणूच्या संसर्गाने कावीळ होऊ शकते.
२) हिपेटायटिस ए आणि हिपेटायटिस ई व्हायरस – हे व्हायरस दूषित पाणी वा दूषित अन्नातून आपल्या पोटात जातात. यकृतावर हल्ला करतात व आपण जी कावीळ म्हणतो ती याचमुळे होते. जिची लक्षणे पाहून व रक्ततपासणी करून निदान पक्के करता येते. यामध्ये रुग्णास थकवा व ताप येतो. डोळे पिवळे होतात व लघवी पिवळसर लाल होते. यकृताला सूज येते. रक्ततपासणीमध्ये बिलिरुबिन, एसजीओटी (SGOT), एसजीपीटी (SGPT), जीजीटी (GGT), हे नॉर्मलपेक्षा दुपटीने वाढलेले असते. हिपेटायटिस ए हा सर्वसाधारणपणे लहान मुलांना होतो. पंधरा वर्षांनंतरच्या व्यक्तींना हेपाटायटिस ई होतो.
३) हिपेटायटिस बी, सी – हे व्हायरस रक्तातून शरीरात शिरतात. सुरुवातीस साधा ताप व थकवा येतो. कावीळही होते. काही रुग्णांना हा आजार अनेक वर्षे राहतो. त्यामुळे काही वर्षांनंतर त्यांचे यकृत खराब होते. त्यांना सिरोसिस (Cirrhosis) होतो व नंतर यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता असते. म्हणूनच काविळीचे योग्य निदान करणे आवश्यक असते.
हिपेटायटिस बी आणि सी ची कारणं –
१) दूषित रक्त चढवल्याने बी/सी व्हायरस आपल्या शरीरात प्रवेश करतात.
२) इंजेक्शनच्या सुया, सीरिंज वापरणे (न उकळलेल्या किंवा र्निजतुक नसलेल्या). शिवाय शस्त्रक्रियेची साधने जर हिपेटायटिस बी आणि सीच्या पेशंटमुळे बाधीत असतील व नीट र्निजतुक नसतील तर रुग्णाला हिपेटायटिस बी/सी होऊ शकतो.
३) ड्रग अॅडिक्ट – स्वत:ला इंजेक्शन मारून घेताना तिथूनही हा व्हायरस शिरू शकतो.
४) टॅटू – करून घेतल्याने हा व्हायरस शरीरात शिरू शकतो.
५) असुरक्षित शारीरिक संबंध: हिपेटायटिस बी/सी – झालेल्या व्यक्तीशी कंडोम न वापरता केलेल्या संभोगामुळे हा हेपेटायटिस होतो.
६) आईला ही कावीळ झाली असेल तर प्रसूतीच्या वेळी मुलाला हिपेटायटिस बी/सी होऊ शकते.
काविळीची इतर कारणं :
१) दारूमुळे होणारी कावीळ- जास्त प्रमाणात व रोज दारू पीत राहिल्याने यकृताच्या पेशींना इजा होते तसेच यकृताला सूज येते व त्यामुळे कावीळ होते. या काविळीमध्ये यकृताला सूज येणे, पोटात पाणी होणे (ascites), सतत आजारी वाटणे अर्थात डोळे पिवळे होणे ही लक्षणं दिसतात. रक्ततपासणी करून या काविळीचे निदान करता येते. या काविळीमध्ये शेवटी यकृत सिरोसिस होते, म्हणजे यकृतच छोटे होते. सर्व यकृताच्या पेशी जाऊन फायबरचे धागे राहतात. त्यामुळे यकृताचे काम एकदम कमी प्रमाणात चालते व रुग्ण भ्रमिष्ट होऊ शकतो, बेशुद्ध होऊ शकतो. दारूमुळे यकृत खराब होऊन अनेक बळी जातात.
२) औषधाचे यकृतावरील दुष्परिणाम व त्यामुळे होणारी कावीळ- अनेक औषधे ही यकृताला घातक असतात. त्यामुळे ही औषधे घेतल्यानंतर काही जणांमध्ये कावीळ झालेली दिसून येते. उदा. टीबीवरील काही औषधं -(Rifampicin, Isoniazide), कर्करोग, मधुमेहावरील काही औषधे, एड्सवरील काही औषधे, काही वेदनाशामक, काही कुटुंब नियोजनाच्या गोळ्या, काही आकडीसाठी देण्यात येणारी औषधे चालू केल्यावर नियमित लक्ष द्यावे / विशिष्ट रक्ततपासणी करून घेत राहावी म्हणजे कावीळ लवकर लक्षात येते. कधी कधी ही तीव्र स्वरूपाची असून यामध्ये रुग्ण दगावूही शकतो.
३) अवरोधक कावीळ (Obstructive jaundice): पित्ताशयाच्या नळीला पित्ताच्या खडय़ाने वा स्वादुपिंड कॅन्सरने अडथळा निर्माण होऊन कावीळ होते. यामध्ये काविळीबरोबर अंगाला खाज येते. बरेच दिवस ही कावीळ राहिल्यास यकृत खराब होऊ शकते. अवरोधक कावीळचे निदान करण्यासाठी सोनोग्राफी, सिटी स्कॅन किंवा एमआरआय करण्याची गरज असते. यावर उपाय हा दुर्बिणीतून किंवा शस्त्रक्रियेद्वारे करावा लागतो.
४) काही जन्मजात आजार यकृतावर परिणाम करतात व कावीळ होते.
उदा. – हेमोलॅटिक जॉण्डीस (Hemolytic Jaundice) आजार – रक्तपेशी जास्त प्रमाणात विघटन पावून कावीळ वाढते.
ऑटोइम्युन डिसऑर्डर (Autoimmune Disorder) – स्वत:च्या प्रतिकार शक्तीने झालेले आजार – कावीळ
Congenital – जन्मजात यकृतातील दोषामुळे झालेली कावीळ
काविळीचे निदान :
१) रुग्णाची नीट तपासणी केली जाते. यकृताला किती सूज आहे, हे पाहिले जाते.
२) रक्ततपासणी करून कुठल्या प्रकारची कावीळ आहे ते शोधले जाते. तिची तीव्रता कळते.
३) यूएसजी (USG) सोनोग्राफी करून – लीवरची सूज, तिची साइज, पित्ताशय, पित्तानलिका इ. पाहिले जाते.
यकृत किती प्रमाणात खराब झाले आहे हे वरील तपासणीतून कळते.
काविळीवर उपचार
जंतुसंसर्गामुळे, प्रदूषित पाण्यामुळे : होणाऱ्या काविळीमध्ये हेपाटायटीस ए/ई वर खालील उपचार करावे.
१) रुग्णांनी विश्रांती घ्यावी. आराम करावा. साधा आहार घ्यावा. यामध्ये कमी तेलाचे व पचायला सोपे असे जेवावे. शाकाहारी जेवण जेवावे. यामध्ये मऊ भात, खिचडी, फुलके, कमी तेलाच्या भाज्यांचे सेवन करावे. सोबत बी कॉम्प्लेक्स, यकृताची टॉनिक्स (Tonics) ही घ्यावीत. या आजारात यकृतातील ग्लुकोज कमी होते म्हणून ग्लुकोज पावडर घ्यावी. ऊस खावा.
२) हिपेटायटिस बी/सी – यामध्ये रक्ततपासणी व डीएनए याची तपासणी करून जर त्यामध्ये हिपेटायटिस अॅक्टिव्ह असेल तर अॅण्टी व्हायरल ड्रग्ज देणे आवश्यक असते. ही उपचारपद्धती खर्चीक व बराच काळ चालणारी असते म्हणून सर्वसाधारण व्यक्तीला घेणे परवडत नाही. म्हणूनच हा आजार टाळावा.
३) आयुर्वेदामध्ये असलेली आरोग्यवर्धिनी गुटिका ही देखील गुणकारी ठरू शकते. आयुर्वेद डॉक्टरला विचारून सल्ला घ्यावा.
४) कावीळ झाली असता मद्यपान करू नये.
५) अवरोधक कावीळ असल्यास दुर्बिणीतून किंवा शस्त्रक्रियेद्वारे उपचार करावा लागतो. त्यासाठी योग्य डॉक्टरकडे सल्ला घ्यावा.
काविळीचे योग्य निदान व त्यावर त्वरित उपचार केल्याने बहुतांशी रुग्ण बरे होतात, पण हे सारे डॉक्टरच्या देखरेखीखाली करावे.
( .. तरी कृपया अंधश्रद्धा पाळू नका. योग्य उपचार घ्या. )
⚡ भारतामध्ये सध्या वेस्ट नाइल व्हायरस (West Nile virus) धुमाकूळ घालत असून या भयंकर आजाराने सोमवारी आपला पहिला बळी घेतला.
🦟 डासांमुळे होणाऱ्या या आजाराने पीडित असणाऱ्या सहा वर्षांच्या मुलाने आपला जीव गमावला. केरळचे आरोग्यमंत्री केके शैलजा यांनी ही माहिती देत सांगितले की, यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. कारण हा व्हायरस रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे. तसेच आरोग्यमंत्र्यांनी व्हायरस रोखण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुचना दिल्या आहेत.
▪ *वेस्ट नाइल व्हायरस (West Nile virus) ची लक्षणं*
वेस्ट नाइल व्हायरसची लागण झालेल्या पाचपैकी चार लोकांमध्ये कोणतीही लक्षणं आढळून येत नाहीत. असं मानलं जातं की, या व्हायरसन पीडित व्यक्तीला बराच वेळा ताप येत राहतो. तसेच याव्यतिरिक्त या आजाराच्या लक्षणांमध्ये तापाव्यतिरिक्त, डोकेदुखी, अंगदुखी, चक्कर येणं, उलट्या होणं आणि त्वचेवर निशाण येणं इत्याही समस्यांचा सामना करावा लागतो.
▪ *वेस्ट नाइल व्हायरस (West Nile virus) वर उपचार*
वेस्ट नाइल व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी कोणतीही विशिष्ट उपचार पद्धती नाही. जर प्रकृती अधिक गंभीर झाली तर रूग्णालयामध्ये दाखल करण्याची गरज भासते.
▪ *वेस्ट नाइल व्हायरसमुळे मृत्यूचा धोका*
वेस्ट नाइल व्हायरस गंभीर आजाराचं कारण तेव्हा होतं जेव्हा हा व्हायरस रक्त आणि मेंदूला बाधित करतं. मेंदू आणि मणक्याच्या हाडाला संक्रमित करू शकतो. व्हायरस मेंदूच्या कामकाजाला बाधित करतं. ज्यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होतो.
▪ *वेस्ट नाइल व्हायरसपासून बचाव करण्याचे उपाय*
१. यापासून बचाव करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला डासांपासून दूर राहावं लागेल.
२. जेव्हा तुम्ही बाहेर जाता, त्यावेळी इन्सेक्ट रिपेलेंट्स (बग स्प्रे) चा उपयोग करावा.
३. जेव्हा डास सर्वात जास्त सक्रिय असतात, म्हणजेच सकाळी आणि संध्याकाळी जास्त बाहेर फिरू नका.
४. शक्यतो संध्याकाळी घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा.
५. आपल्या घराच्या आजूबाजूला डासांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करा.
▪ *कुठून आला हा व्हायरस ?*
वेस्ट नाइल व्हायरस पहिल्यांदा 1999मध्ये न्यूयॉर्क शहरामध्ये आढळून आला होता. परंतु अमेरिकेमध्ये या डासाची उत्पत्ती कशी झाली याबाबत काहीच माहिती नाही.
_वातावरणात बदल झाल्याने बऱ्याच जणांना त्रास होत असतो. तापमानाची चढ-उतार होत असल्याने शरीराची इम्यून सिस्टीम कमजोर होते. ताप, डोळ्यांमध्ये जळजळ, डोकेदुखी, अंगदुखी, घशात वेदना, खोकला, थकवा, सांधेदुखी, उलटी, पोटाची समस्या अश्या प्रकारचा त्रास बऱ्याचजणांना सहन करावा लागतो. व्हायरल इन्फेक्शनला अधिक प्रमाणात तापाचं नावं दिलं जातं. हे दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय केला जाऊ शकतात._
▪ *लसूण*
लसणाचे अनेक फायदे असतात. लसणामध्ये असे काही तत्व असतात जे वायरल तापाचा प्रभाव कमी करतं. याचा वापर करण्यासाठी ३ ते ४ लसणाचे तुकडे गरम पाण्यामध्ये उकळा. थंड झाल्यावर हे पाणी प्यावे आणि सोबतच लसणाचे तुकडेही खावे.
▪ *कोंथिबीर किंवा धने*
कोथिंबीर अनेक प्रकारचे वायरल इन्फेक्शन दूर करण्यासाठी मदत करतं. वायरल ताप आल्या धन्यांचं सेवन केल्यास वायरल ताप दूर होतो.
▪ *आलं*
आलं हे अंगदुखी आणि सांधेदुखी दूर करण्यासाठी मदत करतं. त्यामुळे वायरल ताप असेल तर याने तुम्हाला आराम मिळू शकतो. यासाठी आल्याच्या पेस्टमध्ये थोडं मध मिश्रित करुन थोड्या थोड्या वेळाने सेवन करा याने तुम्हाला आराम मिळेल.
▪ *मेथी*
मेथी सुद्धा वायरल ताप कमी करण्यास मदत करते. यासाठी मेथीचे दाणे एक ग्लास पाण्यात टाकून रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी गाळून प्यावे. या पाण्याचं सेवन प्रत्येक २ तासांनी करणे फायद्याचं ठरेल.
▪ *लिंबू आणि मध*
लिंबू आणि मधाच्या सेवनामुळे वायरल ताप कमी होण्यास मदत मिळते. दोन्ही एकत्र करुन याचं सेवन केल्यास वायरल ताप लवकर कमी होऊ शकतो.
*महत्वाचे :* जर वातावरण बदलामुळे तुम्ही वायरल तापाच्या कचाट्यात आले असाल आणि त्यावर उपाय म्हणून वरील गोष्टी वापरत असाल तर आधी एक्सपर्ट किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण या सर्व नैसर्गिक गोष्टी आहेत आणि याच्या सेवनाने कुणाला अॅलर्जी असेल तर अडचण वाढू शकते.
जलोदर (Ascites) हा रोग झालेल्या माणसाला गाढवाची लघवी पाजल्याने तो बरा होतो याबद्दल कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. जलोदर हा एक गंभीर वैद्यकीय आजार आहे, ज्यामुळे पोटात द्रव जमा होतो. यकृत रोग, किडनी रोग, हृदयविकार आणि कर्करोग यांसारख्या अनेक कारणांमुळे जलोदर होऊ शकतो.
उपचार:जलोदरच्या उपचारांमध्ये मूळ कारणांवर लक्ष केंद्रित केले जाते आणि द्रव साचणे कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. उपचारांमध्ये खालील गोष्टींचा समावेश असू शकतो:
- आहार बदलणे (सोडियम कमी घेणे)
- लघवीचे प्रमाण वाढवणारी औषधे (Diuretics)
- पोटातील द्रव काढणे (Paracentesis)
- शस्त्रक्रिया (Surgery)
गाढवाची लघवी पिणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे की नाही याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. काही पारंपरिक औषधांमध्ये गाढवाची लघवी वापरली जाते, परंतु त्याचे फायदे आणि धोके याबद्दल कोणतेही वैज्ञानिक संशोधन झालेले नाही. त्यामुळे, जलोदरच्या उपचारांसाठी गाढवाची लघवी वापरणे सुरक्षित नाही.
महत्वाचे:जलोदर झाल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. स्वतःहून कोणताही उपचार करू नका.
Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे आणि ती वैद्यकीय सल्ला नाही.सर्दी (Common cold) हा एक सामान्य आणि संसर्गजन्य रोग आहे जो नाका-घशाच्या भागाला होतो. हा आजार व्हायरसमुळे होतो, शरीरातील गर्मी वाढल्यामुळे नाही.
सर्दी होण्याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- व्हायरस (Virus): रायनोव्हायरस (Rhinovirus) नावाचा वायरस सर्दी होण्याचे प्रमुख कारण आहे. ह्या व्यतिरिक्त इतर अनेक प्रकारचे वायरस देखील सर्दीला कारणीभूत ठरतात.
- संसर्ग (Infection): जेव्हा एखादी व्यक्ती सर्दी झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येते, तेव्हा तिलाही संसर्ग होऊ शकतो. उदाहरणार्थ, शिंकताना किंवा खोकताना हवेत उडणारे थेंब श्वासाद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि आपल्याला सर्दी होते.
- कमकुवत रोगप्रतिकारशक्ती (Weak immune system): ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते, त्यांना सर्दी लवकर होण्याची शक्यता असते.
लक्षणे:
सर्दीची लक्षणे वायरसच्या प्रकारानुसार बदलू शकतात, परंतु काही सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:
- नाक वाहणे किंवा नाक चोंदणे
- घसा खवखवणे
- शिंका येणे
- खोकला
- डोकेदुखी
- थकवा जाणवणे
उपाय:
सर्दीवर कोणताही विशिष्ट उपचार नाही, परंतु काही उपाययोजना केल्यास आराम मिळतो:
- पुरेशी विश्रांती घेणे
- भरपूर पाणी पिणे
- गरम पाण्याची वाफ घेणे
- मीठ पाण्याच्या गुळण्या करणे
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेणे
सर्दी ही सामान्यतः गंभीर नसते आणि ती काही दिवसात ठीक होते. परंतु, जर लक्षणे गंभीर असतील किंवा जास्त दिवस टिकून राहिली, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
यासाठी घरातून बाहेर पडताना किमान एक ते दीड ग्लास पाणी पिऊन निघावे.
सोबत पाण्याची बाटली घेऊन जावे.
जास्त पाणी एकाच वेळेस प्यायला होत नसल्यास दर २० मिनिटांनी अर्धा ग्लास पाणी पीत रहावे.
अशक्त पणा वाटल्यास मेडिकल मधून इलेक्ट्रॉल पावडर घेऊन पाण्यात विरघळून ५-५ मिनीटांनी एक एक घोट पीत रहावे. हे पाणी २४ तासानंतर घेऊ नये.
शक्यतो फळे देखील सोबत ठेवावीत.
लहान पनी पांढऱ्या कवीळ ची लस घेतली नसेल तुमच्या बहिनी ने , अत्ता जे बाळ होईल त्याला तर पांढऱ्या कवीळ चा कहि धोका नाही ना हे विचारा डॉक्टरना
अणि त्या बाळा ला ही योग्य वयात पांढऱ्या कवीळ ची लस देन विसरु नका
ही लस
त्यांच्या husband चे पण ब्लड चेक करना जरुरी आहे , फॅमिली मधे परत कोणाला होण्याची शक्याता आहे
म्हणजे समजा जर हा आजार माझ्या वडिलांना असता तर , मला पण होउ शकतो पांढरा कवीळ.
काळजी घ्या तुमची बहिन् लवकर बरी होईल