3 उत्तरे
3
answers
परमार्थ म्हणजे काय?
7
Answer link
परमार्थ म्हणजे काय ?
उत्तर : परमार्थ हा शब्द दोन अर्थांनी वापरला जातो. पहिला अर्थ असा :- परमार्थ म्हनजे परम अर्थ. परमार्थ म्हणजे मोठा, श्रेष्ठ अर्थ. साधुसंतांनी ज्या मोठ्या अर्थाची सिद्धता किंवा प्राप्ति करून घेतली, त्याला परमार्थ म्हणतात. हा मोठा अर्थ म्हणजे आत्मा किंवा परमात्मा अथवा ब्रह्म आहे. दुसरा अर्थ असा :- परमात्म्याच्या प्राप्तीसाठी जे जे काही करावे लागते, ते ते सुद्धा परमार्थ शब्दाच्या अर्थात अंतर्भूत होते. परमार्थरूप परमात्म्याच्या प्राप्तीसाठी जे जे करावे लागते किंवा केले जाते, ते ते सर्व म्हणजेही परमार्थ होय.
परमात्मा चैतन्यरूप आहे. परमार्थामध्ये चैतन्याचा अनुभव घ्यावयाचा असतो. चैतन्याने चैतन्याचे द्वारा चैतन्याचा अनुभव घेणे हाच परमार्थ. चैतन्याच्या द्वारा चैतन्याशी तादात्म्य होणे हा निखळ परमार्थ आहे. चैतन्यास पाहणे, चैतन्याची अनुभूति घेणे हाच परमार्थ आहे.
परमात्मा हा सच्चिदानंद-वायु-स्वरूपी आहे. म्हणून परमार्थात वायूचेच साधन आहे. आणि वायूचे साधन हाच निखळ परमार्थ आहे. जीवनात जीवनाचे होणारे विचरण म्हणजेच परमार्थ. जीवनात जीवन मिसळणे हाच परमार्थ. वार्यात वारे मिसळणे हाच परमार्थ. साध्य तेच साधन व साधन तेच साध्य हाच परमार्थ.
परमार्थ म्हणजे स्वार्थाची पराकाष्ठा. आपल्या सर्व इच्छा संपल्या म्हणजे स्वार्थाची पराकाष्ठा होते; मग आपण निःस्वार्थी बनतो; हाच परमार्थ आहे.
आपल्या ठिकाणावर आपण आरूढ होणे हाच परमार्थ. केवळ सुखाची अवस्था जन्मभर व मेल्यावर उपभोगणे हाच परमार्थ.
आपल्या जीवाने शिवरूप पहाणे हाच परमार्थ आहे. जीवाने शिवरूप होणे हाच परमार्थातील अनुभव आहे.
परमार्थ हा फक्त ' निश्चळ ' या शब्दातच साठवला आहे. हे सर्व जग चंचळ आहे. फक्त परमात्मा निश्चळ आहे. म्हणून निश्चळ होण्यातच परमार्थ साठवलेला आहे. निश्चळ साध्य झाली म्हणजे मग परमार्थातील निश्चळता साध्य होते.
परमार्थात खसखशीइतके समाधान जरी मिळाले तरी पुरे आहे. कारण त्याचा परिणाम फार मोठा आहे. ऍटम् बॉंबमधून जशी खूप शक्ति निर्माण होते, तद्वत् परमार्थातील खसखशीइतक्या समाधानाचे महत्त्व मोठे आहे.
परमार्थात एक महत्त्वाचे वर्म आहे. कोणीही व कसाही जीव असो, त्याने परमार्थात पाऊल टाकले की तो कडेला जायलाच पाहिजे. आयुष्याचा शेवट नामस्मरणातच व्हायला पाहिजे म्हणजे आम्ही परमार्थ केला हे सिद्ध होते.

1
Answer link
परमार्थ म्हणजे काय, हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. परमार्थाचे जर काही मर्म असेल तर, आसक्ति सोडून प्रपंच करणे हे होय. ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असे समजून वागले, म्हणजे आपल्याला त्याबाबत सुखदुःख बाधत नाही. हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेले परमात्म्याचे नाम आपण घेत असावे. गुरु कुणाला करावे ? जिथे आपले समाधान होते तेच गुरुपद म्हणावे. गुरुपद कुठेही एकच असते. गुरूला कोठे आडनाव असते का ? गोंदवलेकर गोंदवल्यास राहात असतील, दुसरा कोणी आणखी कोणत्या गावी राहात असेल. म्हणून लौकिक आडनाव जरी निराळे झाले तरी गुरुपद हे सर्वकाळी अबाधित असेच असते. तुमचे जिथे समाधान झाले त्याला गुरू समजा, आणि तो जे साधन सांगेल त्यातच त्याला पहा; त्याच्या देहाकडे पाहू नका. तो लुळापांगळा आहे की काय, हे पाहू नका. तो देहाने कसाही असला, तरी त्याने सांगितलेल्या साधनात राहा. त्याची लाज, जिथून गुरुपद निर्माण झाले, त्याला असते. गुरुआज्ञा हाच परमार्थ; तो सांगेल तेच साधन. तुम्ही आपल्या मनाने काही ठरवून करू लागलात, तर त्यात तुम्हाला यश येणार नाही. अभिमान धरून काही करू लागलात, तर ते साधणार नाही. म्हणून अभिमान सोडून गुरूकडे जा. गुरू सांगेल तेच साधन हे पक्के लक्षात ठेवा.
खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो स्वतःकरता आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल, तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थकता नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे, हा तर मोठा घात आहे. एकाने कोळश्याचे दुकान घातले आणि दुसऱ्याने पेढ्याचे दुकान घातले; दुकान कशाचेही असले तरी शेवटी फायदा किती होतो याला महत्त्व आहे. तसे, प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्त्व नसून, मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला महत्त्व आहे. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते. आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. एकीकडून मनाचे संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला, म्हणजे परमार्थ लवकर साधतो. खरोखर परमार्थ इतका सोपा आहे, की तो सहज रीतीने करता येतो. पण गंमत अशी, की तो सोपा आहे म्हणून कुणीच करीत नाही. प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही, तो परमार्थासाठीच आहे, हे पक्के लक्षात ठेवावे. साधकाने देहाचे कर्तव्य प्रारब्धावर टाकून, मनाने मात्र ईश्वरोपासना करावी.
0
Answer link
परमार्थ म्हणजे 'परम अर्थ'. या शब्दाचा अर्थ आहे:
- अंतिम सत्य: परमार्थ म्हणजे जीवनाचे अंतिम सत्य किंवा ध्येय. हे सत्य स्व-अनुभव आणि आत्म-साक्षात्काराने प्राप्त होते.
- मोक्ष: परमार्थ म्हणजे जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती, म्हणजेच मोक्ष.
- आध्यात्मिक अभ्यास: परमार्थ म्हणजे स्वतःच्या आत्मिक उन्नतीसाठी केलेले प्रयत्न, जसे की ध्यान, योग, सत्संग, आणि सेवा.
- निःस्वार्थ कर्म: परमार्थ म्हणजे फळाची अपेक्षा न करता केलेले নিঃस्वार्थ कर्म.
थोडक्यात, परमार्थ म्हणजे आपल्या जीवनाचा खरा अर्थ शोधून काढणे आणि त्याप्रमाणे आचरण करणे.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता: