2 उत्तरे
2 answers

धर्मनिरपेक्षता म्हणजे काय?

9
धर्मनिरपेक्षता - 

भारतातील कोणत्याही व्यक्तीला त्याला योग्य वाटणाऱ्या उपासनेचा, धर्मपालनाचा, पारलौकिक कल्याणाचा, आध्यात्मिक उन्नतीचा पूर्ण अधिकार आहे. वरील अधिकारात धर्माच्या नावावर सरकार हस्तक्षेप करणार नाही तसेच मदत व विरोधही करणार नाही. सामाजिक व राजकीय जीवनात व्यक्ती-व्यक्तीमध्ये धर्माच्या नावाने भेदभाव केला जाणार नाही.

(संकलित आधारित माहिती)
धर्मनिरपेक्षता म्हणजे काय ?
पाश्‍चिमात्य जगामध्ये शतकानुशतकांच्या हिंसक व वैचारिक संघर्षानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देणारी लोकशाही व्यवस्था जन्मास आली. या संघर्षामधूनच वर्तमान काळामधील राजकीय व्यवस्थेस आकार देणारी मूल्ये जन्मास आली. याबरोबरच प्रचंड उलथापालथीनंतर धर्मसत्ता व राजकीय सत्ता यांच्यामधील भेद पूर्णत: निश्‍चित करण्यात आला. यानुसार, राष्ट्रवाद व देशामधील शासनसंस्थेची कर्तव्ये निश्‍चित करण्यात आली. आता अर्थातच कोणत्याही स्वरुपाच्या धर्ममार्तंडास वा धर्ममतास शासनव्यवस्थेच्या दैनंदिन कारभारात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही. या मुलभूत मांडणीमधूनच धर्मनिरपेक्षतेचा खरा विचार उदयास आला आहे.

शासन संस्था कोणत्याही नागरिकाचा धर्म पाहून त्यास झुकते माप देणार नाही; वा त्याच्या धर्मामुळे त्यच्यावर अन्यायही करणार नाही. शासनसंस्था "धर्मनिरपेक्ष' असेल! यामुळे लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमामधून जनतेचा प्रत्यक्ष सहभाग असलेली; कोणत्याही धार्मिक ग्रंथाकडे मार्गदर्शनासाठी न पाहणारी शासन व्यवस्था उदयास आली. तेव्हा धर्म व मनुष्याच्या दैनंदिन आयुष्याचे नियमन करणारी शासन संस्था असा स्पष्ट भेद या वैचारिक आवर्तामधून निर्माण झाला. शिवाय बुद्धिवाद व वस्तुनिष्ठतेची मूल्ये या संघर्षानंतर अस्तित्वात आली.

जी राष्ट्रे धर्मसत्तेच्या हातात हात घालून वाटचाल करू लागली, तेथे दहशतवाद उदयाला आला; आणि जी राष्ट्रे धर्मसत्तेला बाजूला ठेवून वाटचाल करू लागली, तेथे लोकशाही रूजली... लोकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहिले.मनुष्यास पडलेल्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे ही मनुष्यानेच आपल्या बुद्धीचा वापर करुन, कोणत्याही ईश्‍वरी मदतीशिवाय शोधावयाची आहेत; व उत्तरे शोधण्याच्या या प्रवासात प्रस्थापित समीकरणांना, मानवी धार्मिक, सामाजिक श्रद्धांना धक्का द्यावा लागला, तरी सत्यमार्गाची कास सोडता येणार नाही, हे खरे बुद्धिवादाचे स्वरुप आहे.

गेल्या शतकभरापेक्षा जास्त काळापासून पाश्‍चिमात्य देश या वैचारिक मांडणीच्या आधाराने प्रवास करत आहेत. या प्रदीर्घ प्रवासानंतर ख्रिश्‍चन वा अन्य कोणत्याही धर्माची ढवळाढवळ नसलेली व मनुष्याचा मनुष्य म्हणून विचार करणारी शासन व्यवस्था प्रस्थापित करण्यात पाश्‍चिमात्य देश यशस्वी झाले आहेत.आपले संविधान लिहितांनाही दिग्गजांच्या दृष्टीपुढे अशा प्रकारची धर्मनिरपेक्ष लोकशाही अभिप्रेत होती, म्हणूनच आज आपण मुक्तपणे वावरू शकतोय. तेव्हा ह्या स्वातंत्र्याच्या हक्काबरोबरच आपल्याला जबाबदारीची जाणीवही ठेवणे अगत्याचे आहे. (सदर माहिती संकलित केली आहे)
उत्तर लिहिले · 11/9/2018
कर्म · 458580
0

धर्मनिरपेक्षता म्हणजे कोणताही धर्म किंवा पंथ मानणाऱ्या नागरिकांमध्ये कोणताही भेदभाव न करता, सर्वांना समानतेने वागणूक देणे.

धर्मनिरपेक्षतेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये:

  • सर्व धर्म समान: कोणताही धर्म श्रेष्ठ नाही.
  • राज्याचा कोणताही अधिकृत धर्म नाही: सरकार कोणत्याही एका धर्माला पाठिंबा देत नाही.
  • धार्मिक स्वातंत्र्य: प्रत्येक नागरिकाला कोणताही धर्म निवडण्याचा, आचरणात आणण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार आहे.
  • अल्पसंख्यांकांचे संरक्षण: अल्पसंख्यांक धार्मिक समुदायांच्या हक्कांचे संरक्षण केले जाते.
  • धर्म आणि राजकारण वेगळे: धार्मिक विचार आणि श्रद्धांवर आधारित निर्णय न घेता, कायद्याचे राज्य चालवणे.

भारतासारख्या विविध संस्कृती आणि धर्मांच्या देशात धर्मनिरपेक्षता अत्यंत महत्त्वाची आहे.

अधिक माहितीसाठी:

  1. विकिपीडियावरील धर्मनिरपेक्षतेची व्याख्या
  2. Britannica website वर धर्मनिरपेक्षता
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5280

Related Questions

नरेंद्र मोदी यांचा जन्म केव्हा झाला?
दबाव गटाचे पाच प्रकार लिहा?
राज ठाकरे यांच्या रॅलींना मोठी गर्दी जमते, मग लोक त्यांना मत का देत नाहीत?
राज ठाकरे प्रत्येकाला आवडतात पण त्यांचा पक्ष निवडून का येतं नाही?
राज ठाकरे यांच्या सभेला मोठी गर्दी होते, पण लोक मनसेला मत का देत नाहीत?
काही नेत्यांच्या सभांना हजारोंची गर्दी होते, पण ते निवडणूक जिंकत नाहीत?
मराठी माणूस देशाचा पंतप्रधान का होऊ शकला नाही?