2 उत्तरे
2 answers

नत्र म्हणजे काय?

3
तुमच्या प्रश्नाचे उत्तर पुढील माहिती मधून मिळेल...

पिकांना वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्ये बहुतांशी जमिनीतून मिळतात. मात्र काही प्रमाणात पिकांची ही अन्नद्रव्यांची गरज रासायनिक खते, हिरवळीची खते, शेणखत, कंपोस्ट, पीक फेरपालटीत, शेंगवर्गीय पिकांचा समावेश इत्यादी प्रकारे भागविता येते. प्रमुख अन्नद्रव्यांचे जमिनीतील प्रमाण, स्वरूप, उपलब्धता व त्याचबरोबर रासायनिक खतांची वापरण्याची पद्धत, प्रमाण इत्यादींची शास्त्रीय माहिती असणे आवश्यक आहे. पिकांच्या योग्य वाढीसाठी एकंदर १६ 'विविध अन्नद्रव्यांची' गरज भासते. हि अन्नद्रव्ये म्हणजे दुय्यम अन्नद्रव्ये आणि सुक्ष्म अन्नद्रव्ये. यांपैकी प्रमुख तीन अन्नद्रव्यांविषयी आपण थोडे जास्त जाणून घेऊ.

नत्र(नायट्रोजन) - पिकातील नायट्रोजनच्या योग्य उपलब्धतेनुसार पिकातील हरितद्रव्यांचे प्रमाण वाढते. तसेच लूसलुसीत तजेलदार ठेवण्याचे काम नायट्रोजन करतो. तसेच नायट्रोजनमुळे पिकांची शाखीय वाढ मोठ्या प्रमाणात होते.

नत्र कमतरतेची लक्षणे -

पिकांची पाने पिवळी पडतात.

पिकांची वाढ खुंटते.
उत्तर लिहिले · 10/9/2018
कर्म · 123540
0

नत्र, ज्याला इंग्रजीमध्ये नायट्रोजन (Nitrogen) म्हणतात, हा एक रासायनिक घटक आहे. हा पृथ्वीच्या वातावरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि सजीवांसाठी आवश्यक आहे.

नत्राची काही वैशिष्ट्ये:
  • रासायनिक चिन्ह: N
  • अणुक्रमांक:
  • आवर्त सारणीतील स्थान: गट १५
  • स्वरूप: रंगहीन, गंधहीन वायू
नत्राचे उपयोग:
  • खते आणि नायट्रोजनयुक्त संयुगे तयार करण्यासाठी.
  • अमोनिया, नायट्रिक ऍसिड आणि सायनाईड सारखी रसायने बनवण्यासाठी.
  • शिळे अन्न साठवण्यासाठी (package)
  • औद्योगिक प्रक्रियांमध्ये निष्क्रिय वातावरण निर्माण करण्यासाठी.
नत्राचे महत्व:
  • DNA आणि RNA सारख्या महत्वाच्या रेणूंचा घटक.
  • प्रथिनांच्या निर्मितीसाठी आवश्यक.
  • वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक पोषक तत्व.
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1780

Related Questions

न्यूलँड्सचा अष्टकांचा नियम सांगा.
किंमतची व्याख्या लिहा?
दूध कशामुळे बनते?
Boric powder c.p?
बोरिक पावडर सी.पी.?
आधुनिक आवर्तसारणी कोणत्या खंडात विभागली जाते?
बटाटा चिप्सच्या पाकिटामध्ये कोणता वायू वापरला जातो?