शिक्षण दिनविशेष दिनदर्शिका साक्षरता

जागतिक साक्षरता दिन केव्हा असतो?

3 उत्तरे
3 answers

जागतिक साक्षरता दिन केव्हा असतो?

5
जागतिक साक्षरता दिन हा प्रतिवर्षी ८ सप्टेंबर या तारखेला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक विकास व त्यातून शांतता व सुव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या युनेस्कोने शिक्षणाचे, साक्षरतेचे महत्त्व लक्षात घेऊन ८ सप्टेंबर हा दिवस 'जागतिक साक्षरता दिन' म्हणून साजरा करण्याचे ठरविले. युनेस्कोत हा निर्णय ७ नोव्हेंबर इ.स. १९६५ रोजी झाला आणि ८ सप्टेंबर इ.स. १९६६ पासून जगभरात 'जागतिक साक्षरता दिन' साजरा केला जाऊ लागला.
उत्तर लिहिले · 7/9/2018
कर्म · 4330
1
आंतरराष्ट्रीय जागतिक साक्षरता दिवसाची मराठी माहिती भाषण निबंध घोषवाक्य कविता इतिहास व थीम 2021 | 

नमस्कार मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दरवर्षी 8 सप्टेंबरला संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. जागतिक साक्षरता दिवस साजरा करण्याची सुरुवात 1966 साली झाली, जेव्हा युनेस्कोने दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी 'जागतिक साक्षरता दिवस' साजरा करण्याचे ठरवले जेणेकरून लोकांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता वाढेल आणि जगभरातील लोकांचे लक्ष वेधले जाईल. 

आंतरराष्ट्रीय जागतिक साक्षरता दिवसाची थीम 2021 कोणती आहे?

 संपूर्ण जगभरात मागीलवर्षी पासून कोरोना महामारी पसरली असल्याने, यावेळी सुध्दा कोरोना संदर्भात च 2021 ची थीम आहे, या वर्षी 2021 ला आंतरराष्ट्रीय जागतिक साक्षरता दिवसाची थीम ही "Literacy for a human-centred recovery: Narrowing the digital divide" ( साक्षरता दिन थीम 2021 "मानवी-केंद्रित पुनर्प्राप्तीसाठी साक्षरता: डिजिटल विभाजन संकुचित करणे" आहे.).

 पहिला आंतरराष्ट्रीय / जागतिक साक्षरता दिवस कोणी व कोठे सुरू केला (इतिहास )?

 जरी साक्षरता दिन साजरा करण्याची घोषणा 26 ऑक्टोबर 1966 रोजी करण्यात आली होती, परंतु त्याची कल्पना सर्वप्रथम इराणच्या तेहरान येथे झालेल्या शिक्षण मंत्र्यांच्या जागतिक परिषदेच्या वेळी आली. ही परिषद 1965 साली आयोजित करण्यात आली होती, ज्यात निरक्षरता संपवण्यासाठी जगभरात जागरूकता मोहीम चालवण्यावर चर्चा झाली

साक्षरता दिन 2021 घोषवाक्ये भाषण व निबंध साठी खाली क्लिक करा

https://www.marathibhashan.com/2021/09/jagtik-saksharta-din-mahiti-marathi-2021.html
उत्तर लिहिले · 4/9/2021
कर्म · 290
0

जागतिक साक्षरता दिन दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी असतो.

हा दिवस जगभरात साक्षरतेचे महत्त्व वाढवण्यासाठी आणि लोकांना शिक्षणाबद्दल जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो.

UNESCO ने 1966 मध्ये हा दिवस घोषित केला.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1820

Related Questions

साक्षरता प्रसार आणि शिक्षण यातील तणाव सविस्तर लिहा?
साक्षरता म्हणजे काय..?
साक्षरता म्हणजे काय?
जागतिक साक्षरता दिवस कधी असतो?