साक्षरता
0
Answer link
साक्षरता प्रचार आणि शिक्षण यातील तणाव सविस्तर लिहा.?
शिक्षणआपले व्यक्तिमत्त्व घडवण्यात आणि आपल्या
जीवनाला दिशा देण्यात शिक्षणाचा वाटा महत्त्वाचा असतो.एकीकडे वैयक्तिक प्रगती साधण्यासाठी तर शिक्षण महत्त्वाचेअसतेच, पण बाहेरच्या जगाचे आपल्याला ज्ञान देण्यासाठीआणि त्या जगाशी आपल्याला जोडण्याच्या कामी शिक्षण मोठा
वाटा उचलते. परंतु आपल्या देशात शिक्षणाचा प्रसार फार थोडा झाला आहे. उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण या गोष्टीअधिकच दुर्मिळ आहेत. त्यामुळे अशिक्षित, साक्षर आणि उच्चविद्याविभूषित असे वेगवेगळे गट आपल्याला आढळतात. गरीब, मागासलेल्या जातींमधील लोक यांच्यात अशिक्षितांचे
प्रमाण सर्वाधिक असते तर श्रीमंत आणि वरिष्ठ जातींमध्ये
शिकलेले लोक जास्त आढळतात.
साक्षरता प्रसार, एखाद्या विशिष्ट उद्दिष्टासाठी वा ज्ञानार्जनासाठी लिपीचा उपयोग करण्याची कार्यक्षमता म्हणजे साक्षरता होय. साक्षरतेचे दोन प्रकार तज्ज्ञ निर्दिष्ट करतात. एक, एखाद्या विशिष्ट कार्यासाठीच लिपीचा परिचय होत असतो, त्यास कार्यिक साक्षरता म्हणतात तर दोन, एखाद्या विशिष्ट पाठ्यातील अन्वयार्थ व कौशल्यविषयक कार्यक्षमता निर्दिष्ट करणाऱ्या प्रकारास अभिजन साक्षरता म्हणतात. लिपीच्या प्रकाराचा आणि कार्याचा सर्वसाधारण परिचय मूलभूत साक्षरतेद्वारा होतो. सामाजिक विकासात साक्षरतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साक्षरतेच्या उगमाबरोबरच मौखिक ज्ञानग्रहण परंपरा संपुष्टात आली. साक्षरतेतील बदल हे संस्कृतीतल्या बदलांशी संबद्घ असतात
1
Answer link
साक्षरता म्हणजे लिहिता वाचता येणे किंवा शिक्षण घेणे होय. साक्षरता म्हणजे केवळ लिहिता वाचता येणे इतकाच अर्थ अभिप्रेत नाही, तर एखाद्या विशिष्ट उद्दिष्टासाठी वा ज्ञानार्जनासाठी लिपीचा उपयोग करण्याची कार्यक्षमता म्हणजे साक्षरता होय. साक्षरता ही दोन प्रकारे व्यक्त केली जाते: 'कार्यात्मक साक्षरता' या स्वरूपात, म्हणजे साक्षरतेचा वापर शिकलेल्या लिपीचा वापर विविध कामकाजात करणे; आणि 'अभिजन साक्षरता' म्हणून आपले मत व्यक्त करणे, अन्वयार्थ लावणेसाठी.
5
Answer link
जागतिक साक्षरता दिन हा प्रतिवर्षी ८ सप्टेंबर या तारखेला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक विकास व त्यातून शांतता व सुव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या युनेस्कोने शिक्षणाचे, साक्षरतेचे महत्त्व लक्षात घेऊन ८ सप्टेंबर हा दिवस 'जागतिक साक्षरता दिन' म्हणून साजरा करण्याचे ठरविले. युनेस्कोत हा निर्णय ७ नोव्हेंबर इ.स. १९६५ रोजी झाला आणि ८ सप्टेंबर इ.स. १९६६ पासून जगभरात 'जागतिक साक्षरता दिन' साजरा केला जाऊ लागला.
2