औषधे आणि आरोग्य स्नान आरोग्य

गरम पाण्याने आंघोळ करणे चांगले की थंड पाण्याने करणे चांगले?

3 उत्तरे
3 answers

गरम पाण्याने आंघोळ करणे चांगले की थंड पाण्याने करणे चांगले?

9
 गरम पाण्याने आंघोळ करता? : मग बातमी वाचाच 

             *_सगळीकडे थंडी पडली आहे. थंडीत बरीच मंडळी आंघोळ करण्‍यास काहीसे आडेवेडे घेतात. त्‍यातही कामानिमित्त बाहेर जायचे असेल तर आंघोळ करण्‍याशिवाय पर्यायच नसतो. मग तेव्‍हा कडक अशा गरम पाण्‍याने आंघोळ केली जाते. पण कडक पाण्‍याने आंघोळ केल्‍यामुळे आपल्याला नुकसान पोहचू शकते. संशोधनात असे आढळले आहे की, या पाण्‍याचे तापमान ३२ डिग्री सेल्‍सियस ऐवढे असावे._*

याहीपेक्षा जास्‍त गरम पाण्‍याने आंघोळ क़ेल्‍यास त्यापासून शरीराला नुकसान पोहचू शकते. तसेच डॉक्‍टर देखील कोमट पाण्‍याचा सल्‍ला देतात. जाणून घेऊय गरम पाण्‍याने आंघोळ करण्‍याचे तोटे...
*▪मऊपणा व ताजेपणा हरविण्‍याचा धोका*
गरम पाण्‍याने आंघोळ केल्‍याने त्‍वचेचा मऊपणा, ताजेपणा कमी होतो. यामुळे त्‍वचेची चमख हारवते. यासाठी गरम पाण्‍याने अंघोळ न करता कोमट पाण्‍याने आंघोळ करावी.
*त्‍वचेला संसर्ग होण्‍याचा धोका_*
गरम पाण्‍याने आंघोळ केल्‍याने त्‍वचा कोरडी पडते. यामुळे त्‍वचेला संसर्ग होण्‍याचा धोका जास्‍त असतो.
*▪त्‍वचेवर सुरकुत्‍या पढण्‍याची शक्‍यता*
गरम पाण्‍याने आंघोळ केल्‍याचा परिणाम त्‍वचेतील पेशीवर पडण्‍याची शक्‍यता असते. त्‍यामुळे त्‍वचा खराब होण्‍यास सुरुवात होते. यामुळे त्‍वचेवर वेळेआधीच सुरकुत्‍या पडण्‍याची शक्यता असते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, *केस कोरडे पडतात*
गरम पाण्‍याने आंघोळ केल्‍याने केस रुक्ष, कोरडे पडतात.यामुळे केसांचा मऊपणा हारवला जातो. ज्‍यामुळे केस गळती व केसांमध्‍ये कोंडा हाण्‍याची शक्‍यता असते.
*डोळ्‍यात जळजळ होण्‍याचा धोका*
गरम पाण्‍याने आंघोळ केल्‍याने डोळे लाल होतात. तसेच डोळ्यात जळजळ म्‍हणजे खाज सुटते. यामुळेच डोळ्‍यातून पाणी येते.
यामुळे थंडीत कडक पाण्‍याने आंघोळ करणे टाळा. कोमट पाण्‍याने आंघोळ करणे कधीही आरोग्‍यासाठी फायदेशीर ठरते.

1
तुमच्या प्रकृतीला जे सहन होईल ते करणे चांगले. सगळे म्हणतात थंड पाण्याने अंघोळ करणे चांगले म्हणून आपल्याला पण ते करणे शक्य होईल असं नाही, स्वतःवर स्वतः संशोधन करा आणि मग ठरवा काय सूट होते ते.
उत्तर लिहिले · 26/8/2018
कर्म · 6225
0
गरम पाण्याने आंघोळ करणे चांगले की थंड पाण्याने, हे व्यक्तीच्या आवडीवर आणि आरोग्याच्या स्थितीवर अवलंबून असते. दोघांचेही फायदे आणि तोटे आहेत.

गरम पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे:
  • स्नायूंना आराम मिळतो: गरम पाण्याने स्नायू शिथिल होतात आणि त्यामुळे वेदना कमी होतात.
  • तणाव कमी होतो: गरम पाण्याने आंघोळ केल्याने तणाव कमी होतो आणि मन शांत होते.
  • त्वचा स्वच्छ होते: गरम पाण्याने त्वचेतील छिद्रे उघडतात आणि त्यामुळे त्वचा अधिक स्वच्छ होते.
  • झोप सुधारते: रात्री गरम पाण्याने आंघोळ केल्याने झोप चांगली लागते.

गरम पाण्याने आंघोळ करण्याचे तोटे:
  • त्वचा कोरडी होते: गरम पाण्याने त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होते आणि त्वचा कोरडी पडते.
  • रक्तदाब कमी होतो: गरम पाण्याने रक्तवाहिन्या रुंद होतात आणि त्यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो.
  • चक्कर येऊ शकते: जास्त वेळ गरम पाण्यात राहिल्याने चक्कर येऊ शकते.

थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे:
  • उत्तेजना वाढते: थंड पाण्याने शरीर उत्तेजित होते आणि ताजेतवाने वाटते.
  • रोगप्रतिकारशक्ती सुधारते: थंड पाण्याने रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि आजारांशी लढण्याची क्षमता वाढते.
  • रक्त परिसंचरण सुधारते: थंड पाण्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे रक्त परिसंचरण सुधारते.
  • वजन कमी होते: थंड पाण्याने चयापचय वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

थंड पाण्याने आंघोळ करण्याचे तोटे:
  • सर्दी होऊ शकते: थंड पाण्याने आंघोळ केल्याने सर्दी होण्याची शक्यता असते.
  • स्नायू कडक होऊ शकतात: थंड पाण्याने स्नायू कडक होऊ शकतात आणि वेदना वाढू शकतात.
  • हृदयविकार असणाऱ्या व्यक्तींसाठी हानिकारक: थंड पाण्याने हृदयविकार असणाऱ्या व्यक्तींना त्रास होऊ शकतो.

निष्कर्ष:
गरम पाणी आणि थंड पाणी दोघांचेही फायदे आणि तोटे आहेत. त्यामुळे, आपल्या आरोग्याची स्थिती आणि आवडीनुसार आपण निवड करू शकता.
उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2200

Related Questions

गरम पाण्याने अंघोळ करावी का?
मला सकाळी सकाळी गार पाणी अंघोळीला घेणे चांगले असते की वाईट?
अभ्यंगस्नान म्हणजे कसले स्नान?
उन्हाळ्याच्या दिवसात किंवा वर्षभर थंड पाण्याने अंघोळ करावी का? (फायदे आणि तोटे सांगावे)